मुखवटे
बाहेर पडलो घरातून माणसांच्या घोळक्यात
अचंबित झालो पाहून नाना रूपे.
सुख, दुःख, एकांत सगळे वेगळे प्रत्येकाचे
मुक्या ओठांनी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?"
आकाश सम, जमीन विषम आहे
हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे.
शरीर सारखेच पण पांघरूण लायकीनुसार
माणूसकी सोडून हर चीज इथे दर्जेदार.
हाव फक्त मनात व्यसन, पैसा अन् वासनेची
भूक मिटते रात्रीपुरती, पण ओढ नाही झोपेची.
कत्तली करण्यात मश्गूल रक्तपिपासू
ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू.
घरी परत जायच्या वाटा बंद केल्या
दया आणि करूणेच्या भावनाही मेल्या.
यंत्र झालो नाही, माझ्यात आगच पेटेना
अनोळख्या गर्दीत कुणी वाटाड्या भेटेना.
जीव गुदमरला की माणूस तडफडतो
मरणाच्या भितीने हातपाय मारतो.
धक्के लागले शेजाऱ्यांना, त्यांचे मुखवटे गळाले
घोळक्यात फक्त माणसंच नव्हती हे मला कळाले.
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
19 May 2020 - 7:42 am | गणेशा
+1
21 May 2020 - 7:00 am | चांदणे संदीप
नीटशी कळली नाही.
मुखवट्यांवर, वळणे घेत घेत उशीरा पोचली कविता.
सं - दी - प
23 May 2020 - 11:12 am | तुषार काळभोर
छान कविता.
24 May 2020 - 10:05 am | पाषाणभेद
हम्म्म्म ...हेच जीवन आहे.