[कविता' २०२०] - अनर्थ

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
12 May 2020 - 8:28 am

अनर्थ

"सद्या ए सद्या! काय करसी?
खोलीत सदैव का रे अससी?
सदैव चिंता चेहऱ्यावरती
झुरतोस असा कशासाठी?

भूकतहान का विसरसी?
झोपेमध्ये सदा बोलसी
दिवसाही ना डोळे मिटसी
भाळी आठ्या कशासाठी?

सिनेमा नाही नाटक नाही
पुस्तकेही ना हाती धरसी
असा यंत्रावत का रे जगसी?"
निराश असा कशासाठी?

"आई, तुजला कसं समजवू?
'प्रतिभा' झाली उनाड कोती
पीडा माझी कशी दाखवू?
झुरतो मी गं 'एका' साठी

सद्या झोपला असे सांगुनी
डोक्यावरती चादर घेऊनी
माता खाली मटकन बसली
घाम पुसे ती पदर ओढुनी

जुळल्या होत्या चार पत्रिका
त्यातील एक आवडली होती
शिक्षण उत्तम पगार भक्कम
नाकीडोळी सुंदर होती

प्रतिभा ही पोर कोण म्हणावी?
सद्यास बहुधा पसंत असावी.
तरी अशी का वाट बदलावी?
मुलींऐवजी मुलं बघावी ?

"देवा, असा कसा रे बदला घेशी?
जिवंत असता का मारसी?
कुठली पापं अशी मोजिसी?
त्यांच्याआडून सद्या बदलसी?"

पिता येता बाजारातुनी
मिळे त्यांना बित्तंबातमी
दोघे रडती धाय मोकलुनी
नाही सुचेना युक्ती नामी

निद्रा त्यागे सद्या दचकुनी
वाटे त्याला गचकले कोणी
बाहेर येऊनी त्यांसी पुससी
"घडले काय, सांगा मजसी"

दोघेजणही झाले स्तंभित
तयां पाहुनी सद्या अचंबित
सुरूच त्यांचे रुदनाचे गीत
"ही कसली रे विचित्र प्रीत?"

पुन्हा प्रतिभेस विनवू आम्ही
घालू मागणी हात जोडुनी
ना मानेल तर शोधू दुसरी
आम्ही शोधू झकास नवरी

पण नकोच मुलगा झुरण्यासाठी
आले आमचे प्राणही कंठी"
सद्या गोंधळे कळेना काही
इकडेतिकडे चमकुनी पाही

"कोण प्रतिभा? मुलगा कुठला
झुरतो कोण हो मुलासाठी ?
संबंध कुठला कुठे लावता?
सावळागोंधळ कशासाठी?

संस्थळ असे 'मिसळपाव' हे
कविता स्पर्धा तेथेची आहे
प्रतिभेविना कविता फसली
प्रयत्ने मग मी अशीच रेटली

गुणांचे दान अधिक एकचे
काव्य शोधण्या प्रथम कवीचे
अजून भोपळा माझ्या नावी
लाज माझ्या मुखी न मावी

म्हणून झुरतो 'एकासाठी'
असे बोललो दुःखापोटी
सूतही नसता स्वर्ग गाठता
आई! काय गे काय समजता?

सुकले अश्रू गालांवरती
मायबाप ते नाजूक हसती
हात जोडुनी वरती बघती
भगवंताची कृपा मानती

सद्या बिचारा उदास होई
बाकी कविता वाचत राही
विसरू जाण्या रचना दुखरी
लिहू लागला कविता दुसरी

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 May 2020 - 9:28 am | प्रचेतस

+१

हाहा, मस्त

जव्हेरगंज's picture

12 May 2020 - 11:17 am | जव्हेरगंज

बहोत खूब! मजा आ गया..!
+१

आवडाबाई's picture

12 May 2020 - 12:56 pm | आवडाबाई

For being light

:-)

चिगो's picture

12 May 2020 - 1:33 pm | चिगो

+१..

जबराच..

स्मिताके's picture

12 May 2020 - 7:07 pm | स्मिताके

+१ मस्त.

कानडाऊ योगेशु's picture

12 May 2020 - 8:55 pm | कानडाऊ योगेशु

वास्तव कविता ;)

गणेशा's picture

12 May 2020 - 11:40 pm | गणेशा

भारी कविता

+1

मन्या ऽ's picture

12 May 2020 - 11:54 pm | मन्या ऽ

मस्त

आगाऊ म्हादया......'s picture

13 May 2020 - 7:55 am | आगाऊ म्हादया......

काय गे काय समजता, जमलंय.

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:32 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

पलाश's picture

13 May 2020 - 10:16 am | पलाश

+१.
प्रतिभा छानच आणि "एका"ची उणीव इथेतरी दिसत नाही! मस्त. :))

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 1:25 pm | चांदणे संदीप

तीन कडवी डोळे बारीक करून वाचीत होतो. चौथ्या कडव्याला भुवया वर गेल्या आणि फिस्सकन हसूच आले.

आता पुन्हा एकदा निवांत सद्याला वाचून येतो. मग गुण वगैरेंच बघू...

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 1:30 pm | चांदणे संदीप

+१
+१
+१
प्लस वण रे सद्या! आणि सॉरी बर्का... आई वडिलांसारखे आम्हीही सुतावरून स्वर्ग गाठायला गेलतो. ;)

सं - दी - प

स्पर्धेत टफ फाईट देणारी कविता. पहिल्या क्रमांकास पात्र असलेली.
परंतु होते काय बर्‍याच स्पर्धेत किंवा सामान्य प्रकाशनामध्येही विनोद निर्मिती करणारे काव्य हे गणले जात नाही. गंभीर आव असणारे परिक्षक या असल्या कवितांना योग्य मोल देत नाहीत.
माझ्या मते एकदम समायोचीत काव्य.

प्र के अत्रे भेटले या कवितेतून !!! वहावा!!!!

Sumant Juvekar's picture

7 Jun 2020 - 12:07 am | Sumant Juvekar

वाहवा. लाजवाब! अप्रतिम!!