देता निरोप तुजला
देता निरोप तुजला, स्मरले क्षणात काही..
सांगायचे तुला जे, विरले मनात काही..
तू घाव जे दिलेले, सारे भरून गेले.
व्रण मात्र खोल त्याचे, उरले उरात काही..
मन थांबता जरासे, सुख सापडून गेले.
जे शोधण्या उगा ते, फिरले दिशात दाही..
मिळते म्हणे प्रसिद्धी, सफलतेच्या कथांनी
मम बर्बादीचे किस्से, फिरले जनात काही..
करण्या उजाड मजला, ढग संकटांचे आले.
बरसून काही गेले, विरले नभात काही..
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही,
सोसावयास नाही, उरले जगात काही..
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
19 May 2020 - 1:58 pm | मनिष
+१
फारंच सुरेख आहे ही !!
19 May 2020 - 11:18 pm | मोगरा
+1
20 May 2020 - 12:00 pm | रातराणी
+ 1
फार सुरेख!
21 May 2020 - 7:14 am | चांदणे संदीप
पुलेशु!
सहजचः दोन उरले, दोन फिरले, दोन विरले ;)
सं - दी - प
25 May 2020 - 10:58 pm | स्वच्छंद
खरं सांगायचं तर काफिया कडे लक्ष देता देता याकडे लक्ष गेलेच नाही. तुम्ही सांगितल्यानंतर मला हे लक्षात आले. आता थोड आश्चर्य वाटतंय याचं. पण आपले प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
1 Jun 2020 - 9:35 pm | सत्यजित...
काफिया पुन्हा-पुन्हा वापरण्यास काही हरकत नाही.
>>>करण्या उजाड मजला, ढग संकटांचे आले.
बरसून काही गेले, विरले नभात काही..>>> इथे मात्र दोनही ओळींत एक मात्रा अधिक आली आहे.
>>सफलतेच्या >> लघू-गुरु क्रम बदलला गेल्याने लय अडखळली.
>>फिरले दिशांत दाही >> रदीफ पाळल्या गेली नाही!
खयाल कधी-कधी इतका मोहक वाटतो की निदान कसली सूट घेवून तरी,शेर लिहावाच! पण गझलेचा साज आणि बाज सांभाळणे ही देखिल आपली जबाबदारी असावी.
>>सोसावयास नाही उरले जगात काही>> ही ओळ खासंच!
पुलेशु!
22 May 2020 - 11:34 am | प्राची अश्विनी
+1
23 May 2020 - 11:49 am | तुषार काळभोर
असं काही नसतं.
कल्पनेपलीकडील संकटे घडण्याची वाट बघत थांबलेली असतात.
25 May 2020 - 10:59 pm | स्वच्छंद
हो खरंय
24 May 2020 - 9:25 am | गणेशा
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही,
सोसावयास नाही, उरले जगात काही..
+1