खेळ
खेळाचे नियम तेच असतील
खेळ एकट्याने खेळायचा नाही
त्यांना बहिष्कृत करण्यात येईल
जोडीदार बदलायचा असेल
तर रितीरिवाज पाळावे लागतील
खेळ मधूनच सोडायचा नाही
कायद्याने तो गुन्हा आहे
कोणी बेईमानी केली
तर तुमच्यासाठी ते आव्हान ठरेल
खेळात कोणाची मदत घेतली
तर चालेल
खेळ तोपर्यंत खेळला जाईल
जोपर्यंत तो अस्तित्वात आहे
आणि सर्वात महत्त्वाचे
खेळ खेळून झाल्यावर
तुम्ही जिंकलात की हरलात
हे तुम्ही स्वतःच ठरवायचे आहे
खेळाचे नाव आहे
राजा, राणी आणि संसार
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
13 May 2020 - 7:00 pm | गणेशा
मुक्तछंद पण म्हणेल छंद जाऊदे पण एव्हडे मुक्त असता का कुठं भावा.. फाऊल ये हा...
हे sashak कथे सारखे लिहिले आहे..
भावना कळाली..
14 May 2020 - 11:37 am | जव्हेरगंज
सहम आहे. कवितेच्या नावाखाली कैच्या कै लिहिले आहे.
माझ्याकडून
-१
17 May 2020 - 1:34 pm | चांदणे संदीप
नवे खेळः
राजा राजा आणी संसार!
राणी राणी आणि संसार!
इतके बास आहेत सध्या... उगाच खोलात जाऊन अभ्यास नको! ;)
सं - दी - प
24 May 2020 - 10:54 am | पाषाणभेद
चल खेळ खेळू दोघं मी अन तू
चल खेळ खेळू दोघं
तुझी तंगडी कधी माझ्या हातात
माझी तंगडी कधी तुझ्या हातात
- दादा कोंडके