चौक
ही कविता उगाच नाही लिहिली
दूर अंतरावरच्या मित्राला साद आहे.
एका आर्त हाकेला 'ओ' आहे
आठवणींच्या रोपट्याला पाणी आहे.
तू ही असाच बोलशील माझ्याशी
राहिलेले आणि साठलेले दोन्हीही.
माध्यमांच्या तकलादू भिंती
समाजाने उखडून टाकल्यावर.
की, तरीही काही असेल बाकी?
तुला न कळलेले वा मला न झेपणारे.
असो. जाऊ दे मला काय त्याचे
ज्याची तुलाही फिकीर नाही.
कैफियत बयां करावी भर चौकात
या एकट्या मार्गावर चौक कसा सापडावा?
ऐक, तू असं कर मार्ग बदल
आपण चौक तयार करू.
तू दुसरी वाट चाल
मी मैलाचा दगड होतो.
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
15 May 2020 - 10:17 pm | गणेशा
+1
18 May 2020 - 2:37 am | कौस्तुभ भोसले
कविता छान आहे
मांडणी व्यवस्थीत हवी
21 May 2020 - 6:57 am | चांदणे संदीप
प्रतिसादाला आणि कवितेला... दोन्हीला
+१
सं - दी - प
18 May 2020 - 5:50 pm | मन्या ऽ
+१
21 May 2020 - 9:39 pm | जव्हेरगंज
वेल. सही
+१
24 May 2020 - 10:10 am | पाषाणभेद
काहीतरी झोल आहे काय?
तो वाट चालत गेला मग अन एक जण मैलाचा दगड म्हणून तेथेच राहीला तर चौक कसा तयार होईल? चार जण लागतील ना चारी दिशांसाठी?
अन तो चालत गेला अन समजा झालाच चौक अन तुम्ही 'बयाँ' करायला लागले तर तो ऐकेल कसा?
बाकी आपले म्हणणे खोटे जरी असेल तरी तात्पूरते हो ला हो म्हणणारे कुणीतरी असावे असे वाटते.