शोधू जरा (गझल)
खिन्न रात्रींचे मुके आक्रंदणे शोधू जरा
चांदण्याने भिजवलेली अंगणे शोधू जरा
खिळखिळ्या खिडक्यांतुनी का रोज ही दिसती भुते?
हरवलेले आपले बुजगावणे शोधू जरा...
वाट चुकलो की नवा पथ पावलांना गवसला
भेटलो इतके खरे, पण- कारणे शोधू जरा
चांदण्यांची रोजची वर्दळ नभी आहे तरी
आज चंद्राच्या मनीची धोरणे शोधू जरा
निरनिराळे अर्थ शब्दांना जरी असले तरी
फक्त त्यांचे रूप मोहक देखणे शोधू जरा
एक घडते भेट, पडते एक उत्कट ती मिठी
चल पुन: लाटेप्रमाणे विखुरणे शोधू जरा
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
17 May 2020 - 12:03 am | मोगरा
+1
17 May 2020 - 12:03 am | कानडाऊ योगेशु
हा शेर आवडला.
17 May 2020 - 3:55 am | कौस्तुभ भोसले
+१ गझलेचा आत्मा राखला त्यासाठी.
देवप्रिया वृत्त आहे, हे लघुंचे गुरू अनेक ठिकाणी केल्याने
लवकर समजुन येत नाही. त्यामूळे वृत्ताची लय वाचताना जाणवत नाही.
18 May 2020 - 5:46 pm | मन्या ऽ
वाह!
19 May 2020 - 7:41 am | गणेशा
चांदण्यांची रोजची वर्दळ नभी आहे तरी
आज चंद्राच्या मनीची धोरणे शोधू जरा
+1
20 May 2020 - 7:26 pm | गोंधळी
+१
21 May 2020 - 7:07 am | चांदणे संदीप
गझला झरती झरझर नित्य मिपांगणी
हिच्याही झरण्याची कारणे शोधू जरा
सं - दी - प
21 May 2020 - 9:37 pm | जव्हेरगंज
गझलांनी कशी मजल मारली आहे
जशी टोळधाड पडावी झुर्ररकन =))
22 May 2020 - 11:38 am | प्राची अश्विनी
+1
23 May 2020 - 11:25 am | तुषार काळभोर
+१
23 May 2020 - 8:21 pm | अजब
+1 छान गजल!
1 Jun 2020 - 5:51 pm | सत्यजित...
सारे खयाल ही सुंदर!अधीक गहिरे करुन लिहिलेत पुढे,तर त्यात सूर मारुन तरंगत रहावेसे वाटेल! पुलेशु!
अभिनंदन!
अवांतर—
मतल्याची पहिली ओळ...
'खिन्न रात्रींची मुकी आक्रंदणे...'
अशी असावयास हवी,असे वाटते!