भुंगा
शांत बसलेलो असतो तेव्हा
कोठून तरी विचारांचा भुंगा डोक्यात शिरतो
मेंदू पोखरतो
दाबून टाकलेल्या जुनाट
कुजक्या आठवणींचा
भुसा बाहेर पाडत राहतो
हुसकून लावावा म्हणता
खोलवर आत जात राहतो
मन बेचैन करतो
चित्त हरपतो
घटकाभर कसलीच मात्रा चालत नाही
हताश करून सोडतो
कोठून तरी भुंगा डोक्यात शिरतो
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
19 May 2020 - 7:54 pm | रुपी
छान कविता
20 May 2020 - 7:17 am | मन्या ऽ
होत अस कधी कधी!
21 May 2020 - 7:15 am | चांदणे संदीप
अशा भुंग्याला पकडून कवितेत आणला आणी आमच्या मागे सोडला हे बरे नाही केले तुम्ही. ;)
सं - दी - प
21 May 2020 - 12:24 pm | गणेशा
अजून थोडे लिहायचे की
का भुंगा लगेच गेला उडून :)))
+1 चांगले लिहिले आहे.. थोडे अजून हवे होते असे वाटत आहे..
21 May 2020 - 9:27 pm | जव्हेरगंज
भुंगा बाहेर काढायचा राहिलाच की!
+१
23 May 2020 - 11:50 am | तुषार काळभोर
हा भुंगा लई वाईट्ट!
24 May 2020 - 9:18 am | पाषाणभेद
छान प्रकटन.