एकटीच राधिका...
एकटीच राधिका द्वारकेस चालली
श्यामध्यास, श्यामस्वप्न, श्यामरंग ल्यायली...
चांदणे तनावरी, चांदणे मनातही
चंद्रिकाच राधिका चांदण्यात नाहली...
श्याम हीच प्रेरणा, श्याम धारणा तिची
प्रेमिकाच राधिका कल्पनेत दंगली...
शब्द-श्याम, धून-श्याम, गीत-श्याम ऐकुनी
नर्तिकाच राधिका, नाच नाच नाचली...
ध्येय श्याम, वाट श्याम, श्वास श्याम, प्राणही
रान श्याम, ऊन श्याम आणि श्याम सावली...
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
13 May 2020 - 1:35 pm | गणेशा
कविता खुप आवडली..
भक्तीरस..
जाता जाता सहज
कवितेचे नाव, श्यामरंग हवे होते असे वाटले..
जर शब्द-श्याम, धून-श्याम, गीत-श्याम
ध्येय श्याम, वाट श्याम, श्वास श्याम, प्राणही श्याम
रान श्याम, ऊन श्याम आणि श्याम सावली
तर ती एकटी नाहीच...
कविता सुंदरच
14 May 2020 - 9:15 am | राघव
आवडली रचना. पुलेशु.
14 May 2020 - 9:23 am | मन्या ऽ
+१
14 May 2020 - 1:45 pm | प्राची अश्विनी
वाह!+१
14 May 2020 - 7:21 pm | तुषार काळभोर
+१
14 May 2020 - 8:34 pm | सौ मृदुला धनंजय...
+1
14 May 2020 - 9:55 pm | स्मिताके
+१ चाल लावून गाणे होईल अशी सुरेख कविता!
17 May 2020 - 3:00 am | श्रीगणेशा
+१
17 May 2020 - 1:38 pm | चांदणे संदीप
राधा आणि कृष्ण आले की ती रचना सुंदर होणार यात शंका नसते.
कवितेला + १
सं - दी - प
23 May 2020 - 8:15 am | आगाऊ म्हादया......
+1
पट्कन संपली, मस्त एक नाद तयार झाला होता वाचताना
23 May 2020 - 8:19 pm | कुमार जावडेकर
+१
23 May 2020 - 8:49 pm | मनस्विता
+१
श्यामवेडी राधा खूप आवडली.
24 May 2020 - 10:45 am | पाषाणभेद
श्याममय राधा होणे हेच तिचे स्वप्न होते. राधा अन श्याम विलग करणे अशक्य.
25 May 2020 - 1:17 pm | बिपीन सुरेश सांगळे
श्याममय झालेली सुंदर भक्ती रचना