[कविता' २०२०] - ......फूल/ पिस्तूल ठेविले.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 May 2020 - 5:16 pm

......फूल/ पिस्तूल ठेविले.

विचारला तू प्रश्न सुगंधी, उत्तरात मी फूल ठेविले
दप्तरात पुस्तके हवी, तिथे कुणी पिस्तूल ठेविले

अंतरधर्मी नाते अपुले, मान्यच नव्हते दुनियेला या
जगलो आपण कसेतरी पण नाव मुला मकबूल ठेविले

कुणी चहाडी केली अपुली, कसे समजले आईला हे?
कोण विचारी, समोर तेव्हा तुझे बिलोरी डूल ठेविले

भीक देईना कुणीही जेव्हा झोळीमध्ये तिच्या अभागी,
पाझर फुटण्या लोकदयेला शेजारी मग मूल ठेविले

नाव पाहूनी मिळती लाईक, अर्थ जरी का कळला नाही.
ओळखून ही रीत जगाची तखल्लुस "सोकूल" ठेवले.

(मतला उधार घेतला आहे, त्याचा शायर माहित नाही.)

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

15 May 2020 - 5:46 pm | चलत मुसाफिर

लव्ह जिहाद!!!

मन्या ऽ's picture

15 May 2020 - 6:21 pm | मन्या ऽ

भारी!

साहित्य संपादक's picture

15 May 2020 - 9:29 pm | साहित्य संपादक

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.

चांदणे संदीप's picture

17 May 2020 - 1:49 pm | चांदणे संदीप

हा शेर तेव्हाही आवडला नव्हता आणि आताही आवडला नाहीच.
शिवाय, तो शेर तसाच्या तसा उचलून नवी गजल लिहिण्याचा प्रयत्नही नाही आवडला.

पोपट कवितेची गोष्ट वेगळी होती. तिथे निव्वळ विनोदनिर्मितीसाठी तो शेर वापरलेला म्हणून तिथे तो खपून गेला. इथे नाही.

सं - दी - प

आगाऊ म्हादया......'s picture

23 May 2020 - 8:09 am | आगाऊ म्हादया......

प्लस वन वगैरे नको

पाषाणभेद's picture

24 May 2020 - 10:14 am | पाषाणभेद

झालीय आपली चर्चा मागेच येते, आता बोलण्याला काय अर्थ आहे?
परंतु आठवण रहावी कायमची म्हणून येथे प्रतिसाद लिहून आहे ठेविले