शशक'२०२२ - विमनस्क

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2022 - 12:22 pm

अंधाराचा काहूर होता मेघा मनूचा हात घट्ट धरून झपझप चालत होती.

आपला कोणीतरी पाठलाग करतय अशी शंका तिला आली.नजरेचा कटाक्ष तिने मागे टाकला वीजेच्या कडकडाटात तिला एक चेहरा दिसला..... 'रव्या'
इंदूबाईंचा वेडसर मुलगा गचाळ हसत येत होता. वेडा रव्या गावात दगड मारत फिरायचा,शिव्या द्यायचा.मेघाला आता दरदरून घाम फुटला."मनू चल लवकर"मेघा कळवळली .

छोटीसी मनू दमली होती.एका खड्ड्यात मनू पडली.ती मोठमोठ्याने रडू लागली.समोरून येणारी दोन तीन टारगट पोरं तिला हसायला लागली, तेव्हा मनूचा सूर आणखिनच वाढला.
भांबावल्या मेघाने रव्याकडे पाहिलं... त्याच्या हातातला दगड त्याने जोरात त्यांच्या दिशेला भिरकावला... तिने मनूला पोटाशी घेतलं.दगड जोरात लागल्याने धावत येणारी मोकाट कुत्री विव्हळत गेली.. विमनस्क रव्या की ती पोरं?

प्रतिक्रिया

सुरसंगम's picture

8 May 2022 - 4:43 pm | सुरसंगम

+१

मोहन's picture

8 May 2022 - 5:02 pm | मोहन

+१

nutanm's picture

8 May 2022 - 6:17 pm | nutanm

शेवट खास नाही .

विमनस्क चा अर्थ माहितेय ना?
म्हणजे कथाशीर्षकाला आणि शेवटच्या ट्वीस्ट वाक्यात तोच शब्द वापरला आहे.
विकृत म्हणायचे होते का?

चांदणे संदीप's picture

9 May 2022 - 4:38 pm | चांदणे संदीप

विमनस्क अवस्थेत बसलोय.

सं - दी - प

पोरं हसत होती, मधूनच कुत्री कुठून आली ?

अंधाराचा काहूर, मागून कोणीतरी येतंय- अचानक टारगट पोरं आल्यावर वातावरण भंग झालं.

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:34 am | तुषार काळभोर

मेघा अन् मनूच्या मागे रव्या.
मनू खड्ड्यात पडली.
समोरून ३ मुले येतात.
रव्या दगड मारतो.
तो कुत्र्याला लागतो.
विमनस्कचा अर्थ काही का असेना.
इथं विमनस्क कोण? रव्या, पोरं, मेघा की कुत्री?
का मी??

चौथा कोनाडा's picture

11 May 2022 - 1:07 pm | चौथा कोनाडा

+१
आवडली.

आणि शेवटचे वाक्य नसते असते तरी चालले असते असे वाटले.

प्रचेतस's picture

11 May 2022 - 2:13 pm | प्रचेतस

विमनस्क हा शब्दच चुकीच्य अर्थाने कथेत वापरला गेल्यामुळे कथा हुकली.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 10:59 pm | चेतन सुभाष गुगळे

फसलीये.