काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 9:18 pm

अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात.

(आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात)

तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

वावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतइतिहासवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रविज्ञानक्रीडाअर्थकारणशिक्षणमौजमजाविचारप्रतिसादआस्वादसमीक्षाबातमीमाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

24 Jan 2014 - 11:07 pm | तुमचा अभिषेक

कुठे कोकण-मालवण जत्रा वा आग्री कोळी मेळावा ज्यात कोंबडीवडे आणि मत्स्याहार, सोबतीला सोलकढी वगैरेचे खाण्यापिण्याचे स्टॉल असतील तर नक्की कळवा. मला समजले तर मी कळवेनच.

दर रविवारी सकाळी प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्यमंदिरात मिनी थिएटरमध्ये सकाळी दहा ते एक या वेळात वेगवेगळ्या विषयांवरच्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जातात. डाॅक्युमेंटरीजचे दिग्दर्शकही बहुतेकवेळा उपस्थित असतात, त्यांच्याशी अनौपरिक गप्पा, प्रश्नोत्तरं करता येतात. कोणत्या डाॅक्युमेंटरीज दाखवल्या जाणार हे एक ते दोन दिवस आधी जाहीर केलं जातं.
हा उपक्रम एफएफएसआय, आयडीपीए आणि फिल्म्स डिव्हिजनचा असून गेल्या कित्येक महिन्यापांसून विनाशुल्क राबवला जातोय.

कवितानागेश's picture

26 Jan 2014 - 11:32 pm | कवितानागेश

डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ
डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ
डाॅक्युमेंटरीला चलाऽऽऽऽ

इनिगोय's picture

27 Jan 2014 - 9:26 am | इनिगोय

चला चला..
डाक्मेंट्री कट्टा करायचा काय?
मग तिथून माटुंग्याला खादाडीलापण जाता येईल.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2014 - 9:35 am | मुक्त विहारि

"डाक्मेंट्री कट्टा करायचा काय?
मग तिथून माटुंग्याला खादाडीलापण जाता येईल."

कट्ट्याला आणि खादाडीला आमची कधीच ना नसते.

खाद्य, कला आणि संस्कृती मेळा

http://articles.timesofindia.indiatimes.com/2014-01-25/thane/46600296_1_...

पद्मश्री चित्रे's picture

27 Jan 2014 - 9:50 am | पद्मश्री चित्रे

नेमका कुठे आहे महोत्सव?

भुमन्यु's picture

27 Jan 2014 - 11:26 am | भुमन्यु

हिरानंदानी ठाणे मॅरथॉन १६ फेब्रु. २०१४.

माहिती - www.hiranandanithanehalfmarathon.com

रजीस्ट्रेशन - https://www.eventavenue.com/attReglogin.do?eventId=EVT4533

माणिकमोति's picture

30 Jan 2014 - 11:26 am | माणिकमोति

फेब्रुवारी मध्ये व्हीजेटीआय कॉलेज मधे अतिशय सुन्दर असे फुलान्चे प्रदर्शन असते. ह्यावर्षी किती तारखेला आहे, कुणाला कल्पना आहे??

उद्या परवा रामबाग कल्याण चिंतामणी हॉल गुलाब प्रदर्शन .उदघाटन तारका वर्षा उसगावकर .

कंजूस's picture

30 Jan 2014 - 2:19 pm | कंजूस

उद्या नाही .१ ,२फे ला

एकुजाधव's picture

30 Jan 2014 - 3:28 pm | एकुजाधव

छायाचित्र प्रदर्शन
जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा. दि. २९ जाने, २०१४ पासुन सुरू.

सुहास झेले's picture

1 Feb 2014 - 7:32 am | सुहास झेले

म्या जातोय.... सकाळी १० ते ५:३० साठ्येला ...
.
.
.

JSS

काला घोडा काही खास आहे का ?

मंगळवार ४ फेब्रु दुपारी १२ते २ काला घोडा ,

दुपारी ३ ते ५ शिवडी जेट्टी
फ्लेमिंगो पक्षी पाहाणे
असा विचार आहे .

अमोल केळकर's picture

1 Feb 2014 - 10:18 am | अमोल केळकर

आज मोनो रेल चे उदघाटन आहे :)

mono rail

श्रीनिवास टिळक's picture

8 Feb 2014 - 8:27 am | श्रीनिवास टिळक

काय: हिंदुत्व अध्ययन प्रमाणपत्र वर्ग
कोठे: केशव सृष्टी भायंदर मुंबई
केव्हा: फ़ेब्रुवारी २१-२३,२०१४
समन्वयक: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
अधिक माहिती: अनिल श्रीराम पांचाल १७ चंचल स्मृती ग द आंबेकर मार्ग वडाळा मुंबई
०२२ २४१८५५०२; २४१३६९६६; भ्रमण ध्वनी ९९७५४१५९२२

व्हिजन महाराष्‍ट्र फाऊंडेशन, वैद्य साने ट्रस्‍ट आणि ग्रंथाली

माधवबाग कृतार्थ मुलाखतमाला

पर्व दुसरे – पुष्‍प तेरावे

कमलाकर सोनटक्के

वय झाले, पण आस्था सरली नाही; जिद्द संपली नाही!

मुलाखत घेणार – चंद्रशेखर नेने

सोमवार २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता

चहापान – ५.३० ते ६.००

स्‍थळ - दादर माटुंगा कल्‍चर सेंटर, माटुंगा रोड.

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाट्यशिक्षण घेतल्‍यानंतर सोनटक्के यांना मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावून घेतले ते त्यांच्या नाट्यप्रशिक्षण वर्गाचे संचालक म्हणून. सोनटक्के यांनी त्यानंतर आयएनटी, मराठवाडा विद्यापीठ यांच्याकरता तीच जबाबदारी उत्साहाने निभावली व नाट्यप्रशिक्षण घेतलेले शेकडो नाट्यकलावंत ‘तयार’ केले. सोनटक्के यांनी कला संस्थेचे प्रशासक म्हणून नेहरू सेंटर आणि केंद्र व राज्य सरकारमध्ये उत्तम कामगिरी बजावली. मुख्यत: नाट्यमाध्यमातून व्यक्त झालेले सोनटक्के यांचे व्यक्तिमत्त्व बहुअंगी आहे. त्यामुळेच त्यांची मुलाखत हा गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा सांस्कृतिक ठेवाच ठरणार आहे. अवश्य यावे!

जे पर्यटक स्वत: सहलीचे आयोजन करून जातात त्यांच्यासाठी उपयोगी

आज दुपारी (प्रवेश१२ ते ४) १२ ते ६ ,गोरेगाव पूर्व ,बॉम्बे इक्सिबिशन सेंटर ,TTF -OTM चे ट्रावल प्रदर्शन .भरपूर माहितीपत्रके ,नकाशे देतात .राज्ये आणि परदेशांचे स्टॉलस .
प्रवेश रु पन्नास

पद्मश्री चित्रे's picture

9 Feb 2014 - 4:41 pm | पद्मश्री चित्रे

15 व 16 फेब्रुवारी ला सी के पी हॉल ठाणे येथे.
15 ला संध्याकाळी उद्‌घाटन. विविध पदार्थांचे स्टॉल्स. उदा- चिंबोरीचे कालवण, खिम्याचे कानवले,बोम्बिल फ्राय,निनावं, वालाचे बिर्डे इत्यादी.
प्रवेश फी 20/-

किसन शिंदे's picture

9 Feb 2014 - 4:46 pm | किसन शिंदे

धत्त त्तेरे की.. घासफूसवाल्यांसाठी काय नाय का? ;-)

सुहास झेले's picture

9 Feb 2014 - 4:48 pm | सुहास झेले

किसनद्येवा...झाडे लावा, झाडे जगवा :p ;-)

किसन शिंदे's picture

9 Feb 2014 - 5:07 pm | किसन शिंदे

:D

पद्मश्री चित्रे's picture

9 Feb 2014 - 5:37 pm | पद्मश्री चित्रे

आहे ना. निनाव ,वालाच बिर्ड ..

सूड's picture

11 Feb 2014 - 4:52 pm | सूड

निनाव काय असतं?

सानिकास्वप्निल's picture

11 Feb 2014 - 5:45 pm | सानिकास्वप्निल

बेसन, गुळ, नारळाचे दूध, वेलचीपूड, तूप घालून केलेल्या वड्या.
ह्या वड्या ओव्हनला किंवा गरम तव्यावर भाजून केकसारख्या बनवतात.

मोदक's picture

12 Feb 2014 - 8:18 pm | मोदक

पाककृती.. पाककृती.. ;)

सानिकास्वप्निल's picture

12 Feb 2014 - 8:20 pm | सानिकास्वप्निल

पद्मश्रीताई देतील पाकृ :)

आतिवास's picture

11 Feb 2014 - 4:48 pm | आतिवास

Bnhs Programmes‎The Bombay Natural History Society (BNHS)
Bats and Trees walk at Ranibaug

Date: 16th Feb, 2014, Sunday

Spread over 53 acres, Ranibaug is Mumbai’s only heritage botanical garden, and has recently celebrated 150 years of its existence. Ranibaug is home to an astonishing 853 plant species including 286 trees. Many exotic species like Baobab and Tree of Heaven can be seen here. Fruiting and flowering trees such as Flame of the Forest, Indian Laburnum, Indian Coral Tree, and fig trees grow here. The garden is also host to a large colony of India’s largest bat, Indian Flying Fox. Get to know more about these mysterious creatures of the night from a bat expert.

Reporting: Outside the main gate at 8.45 a.m.

Charges: For members Rs. 100/- per head and for non-members Rs. 150/- per head. (Cost includes entry ticket and BNHS expertise)

Registration*: Call at Hornbill House 22871202/22821811 or e-mail at bnhs.programmes@gmail.com. Please carry adequate water and hat/cap. Note: Carrying plastic bags, disposable water bottles or food is not allowed inside the zoo premises. Such items will be collected and kept outside at the gate. Participants can carry water in non-disposable water bottles.

मोक्षदा's picture

11 Feb 2014 - 9:57 pm | मोक्षदा

दर वर्षीप्रमाणे यंदाही व्ही.जे.टी.आय (V.J.T.I.) महाविद्यालयात २२ व २३ फेब्रुवारी २०१४ या दोन दिवशी फुलांचे प्रदर्शन भरणार आहे.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे खूप वेगवेगळ्या नर्सरीज यात आपल्या फुलांची सजावट मांडतात. बागेतील झाडे, बोन्साई, landscaping, औषधी वनस्पती बघण्यास मिळतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी फुलांच्या सजावटीत भाग घेतात, हरबेरियम बघण्यास मिळते. गुलाबाच्या फुलांची स्पर्धाही घेतली जाते आणि विजेत्यांना राजा-राणीचा किताब दिला जातो. विविध प्रकारच्या भाज्या-फळेही येथे मांडलेली असतात.

संपूर्ण प्रदर्शन बघण्यास २-३ तास लागतात. लहान मुले मात्र कंटाळतात. झाडे घेण्याचा मोह टाळता येतच नाही. त्यांच्यासाठी तर शेवटी मैदानावर खास स्टॉल असतात. झाडे, बिया, कुंड्या, गांडूळ खते, झाडांसाठी लागणारे अवजारे सर्व काही विकत मिळते.

हौसेला मोल नाही. जरूर भेट द्या. सर्वसामान्यांना परवडेल इतकेच तिकीट आहे.

(हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी वनस्पतिशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी पूर्ण वर्षभर मेहनत घेतात.)

माणिकमोति's picture

12 Feb 2014 - 10:21 am | माणिकमोति

माहीतीबद्दल धन्यवाद...!!! नक्की जाणार... कधिपासुन ह्या प्रदर्शनाची तारीख शोधत होते...

तुमचा अभिषेक's picture

20 Feb 2014 - 11:09 pm | तुमचा अभिषेक

येस्स , वीजेटीआय. आमच्या कॉलेजमध्ये.
एकेवर्षी फिरलोय मी, पण त्यामागे कारण वेगळेच होते. बाकी स्वताला फुलांची आवड नसली तरी आवड असलेल्यांनी नक्कीच बघण्यासारखे आहे एवढे खात्रीने सांगू शकतो.
तसेच गेल्या रविवारी मी भायखळा राणीबागेत देखील मित्रांबरोबर म्हणून एका फूलप्रदर्शनाला फेरफटका मारून आलो, ते देखील चांगले होते, ते ही दरवर्षी भरते हे मला जवळ राहत असूनही या वर्षीच समजले. फूलप्रदर्शनाचे फूलप्रदर्शन आणि मुलांना बरोबर न्यायचे असल्यास राणीबागेतले प्राणीही दाखवू शकता जेणेकरून ते वैतागणार नाहीत. याबद्दल आधी इथे सांगू न शकल्याबद्दल क्षमस्व !

दर्यासारंग's picture

12 Feb 2014 - 9:33 pm | दर्यासारंग

CKP HALL

आयुर्हित's picture

20 Feb 2014 - 2:09 pm | आयुर्हित

निरोगी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली देणा-या डॉ. सरिता डावरे आणि शेफ संजीव कपूर यांच्या ‘द लिव्ह वेल डाएट’ या पुस्तकाची आता मराठी आवृत्तीही प्रकाशित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल आणि ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘द लिव्ह वेल डाएट’ हे पुस्तक डाएटविषयीचं सगळे गैरसमज निश्चितपणे दूर करणारं आहे. कारण या पुस्तकात योग्य आणि अयोग्य खाण्यातील फरक समजावून सांगण्यात आलेला आहे, शिवाय निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आलेलं आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अभिनेत्री स्वरूप संपत या मान्यवरांशी गप्पा मारतील.
दिनांक : २४ फेब्रुवारी २०१४
स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
वेळ : सायंकाळी ६
साभार: प्रहार

आत्ताच मटामध्ये ही बातमी वाचली.

कवितानागेश's picture

20 Feb 2014 - 4:21 pm | कवितानागेश

अरे वा.
आता मात्र डोम्बिवलीच मध्यवर्ती करुन घ्यावं लागणार की. निदान एका दिवसापुरतं ;)

मुक्त विहारि's picture

20 Feb 2014 - 9:50 pm | मुक्त विहारि

तर आमच्यासाठी नेहमीच

डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

नरेपार्क परेळ, मुंबई - खाद्यमेळावा

बहुतेक या रविवार पर्यंत असेल, काही डिटेल्स मिळाले तर कळवतो, कानावर आले तसे इथे टाकलेय, इतर कोणाला माहीत असेल तर त्यांनीही महिती दिल्यास उत्तम :)

मुक्त विहारि's picture

5 Mar 2014 - 10:44 pm | मुक्त विहारि

अर्थकारणा बद्दल व्याख्यानमाला

संध्याकाळी ७ ते ९

ब्राम्हण सभा, डोंबिवली पुर्व.

३ वक्ते आहेत.पैकी एक चंद्रशेखर टिळक.

आत्ताच मटामध्ये ही बातमी वाचली.

आयुर्हित's picture

25 Mar 2014 - 1:20 pm | आयुर्हित

पुराणशास्त्राला वाहिलेला आशियातील पहिलावहिला 'आख्यान २०१४' हा महोत्सव मुंबई विद्यापीठात रंगणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने या अनोख्या महोत्सवाची रचना केली आहे. भारतात जागतिक पुराणकथांवर आधारित एक परिपूर्ण अभ्यासक्रम चालवणारे मुंबई हे एकमेव विद्यापीठ आहे. संस्कृत विभागातर्फे हा अभ्यासक्रम राबविला जातो. पुराणकथांबाबत आज चुकीची किंवा अर्धवट माहिती तसेच एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनातून माहिती दिली जाते. यामुळे अनेक गरसमजुती तयार होतात. हे टाळण्यासाठी योग्य, नेमकी आणि निष्पक्ष माहिती उपलब्ध करून देण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. हा महोत्सव ५ एप्रिल रोजी विद्यापीठातील संस्कृत भवनात पार पडणार आहे.
साभार:पुराणांचे 'आख्यान'

येवा, आंबे खावा!
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - कोकणातील अस्सल हापूस आंब्याची चव चाखणार्‍यांसाठी कोकण प्रतिष्ठानने नेहमीप्रमाणेच आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव १२ एप्रिल ते २७ मे या कालावधीत विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली या ठिकाणी भरविण्यात येणार असल्याचे आज प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी या महोत्सवाची माहिती दिली.
इथे भरणार महोत्सव
१२ ते २० एप्रिल : डॉ. हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले (पू)
२१ ते ३० एप्रिल : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक,
शिवाजी पार्क.
१ ते ९ मे : न्यू इंग्लिश स्कूल मैदान, राम मारुती रोड, ठाणे (प)
१० ते १८ मे : संभाजी राजे मैदान, मुलुंड (पू)
१९ ते २७ मे : एमएचबी कॉलनी मैदान, बोरिवली (प)
कालावधी : १२ एप्रिल ते २७ मेपर्यंत
ठिकाण : विलेपार्ले, दादर, ठाणे, मुलुंड, बोरिवली
विलेपार्ल्यातही आमंत्रण
कोकणातील बागायतदारांना उद्योगात प्रोत्साहन मिळावे म्हणून श्रीकांत सरमळकर फाऊंडेशनच्या वतीने २७ एप्रिल ते ७ मेदरम्यान भव्य आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघात संपन्न होणार्‍या या महोत्सवात बागायतदारांनी २३ एप्रिलपर्यंत संपर्क व नाव नोंदणी करावी. महोत्सवातील स्टॉल्स विनामूल्य देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी श्रीकांत सरमळकर फाऊंडेशन, इमारत क्रमांक ३५ समोर, खेरनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ५१ येथे संपर्क साधावा.

तुमचा अभिषेक's picture

11 Apr 2014 - 12:42 am | तुमचा अभिषेक

सोबतीला आणखीही कोकणी खाद्यपदार्थ असतीलच ना.. किमान आंब्याफणसाचे तरी..

२१-३० एप्रिल - शिवाजी पार्क , यातील एखादा विकांत जमवायला हवे.

वरील परिसंवादात (१८-२१ सप्टेंबर,ठाणे) वाचण्यात येणाऱ्या ४० एक शोध निबंधांचे सारांश विद्या प्रसारक मंडळ ठाणे यांच्या web site वर प्रसिद्ध झाले आहेत. जिज्ञासूनी ते खालील दुव्यावर अवश्य वाचावेत http://www.vpmthane.org/bhaskara900/ नमुना म्हणून एक सारांश खाली देत आहे जो माझ्या सारख्या गणितात अनभिज्ञ असलेल्या माणसालाही उद्बोधक वाटला

IX PEDAGOGICAL IMPORTANCE OF BHĀSKARĀCĀRYA’S WORKS TODAY
Pedagogical Analysis of Lilavati
Sudhakar C. AGARKAR, VPM's Academy of International Education and Research, Thane

Lilavati, a book written by Bhaskaracharya in 1150 is a master piece of mathematical treatises. Bhaskaracharya, literally means Bhaskar the teacher. One notices that various facets of a good teacher are interspersed within the text. The entire text is written in poetic form with profuse use of alliterations, pun, metaphors, etc. At several places he addresses the reader as sakhe (a female friend), bale (a young girl), mitra (a male friend), etc. Moreover, he frames the questions taking the help of animals and bird like elephants,
monkey, serpent, peacock, swans, bees, etc. He also makes use of mythological stories from Hindu epics like Ramayana and Mahabharata to frame question. Lilavati has a huge collection of problems relating to arithmetical calculations, algebraic equations and properties of geometrical figures. The author attempts to develop essential pre-requisites through a series of examples and provides necessary hints required to solve a given problem. Openness is the hallmark of Lilavati as the author suggests different ways of dealing with the problem and leaves it to the reader to use the most appropriate one. As a part of a yearlong celebration of Bhaskaracharya's 900th birth anniversary the
Vidya Prasarak Mandal, Thane has initiated workshops on Lilavati for school children.

Since January 2014 a dozen workshops have been conducted both in rural as well as the urban parts of India. Apart from acquainting them with salient features of Lilavati these workshops were used to test the utility of Bhaskaracharya's pedagogy in teaching school mathematics. It has been noticed that the pedagogic techniques advocated in Lilavati are found effective in removing students' fear of mathematics, motivating them to handle an unknown situation and developing problem solving skills. Constructivism, as a philosophy of learning, has gained importance in recent days and is advocated as an effective method of teaching school subjects. The critical analysis of Lilavati shows that Bhaskaracharya has used this technique about 900 years ago. It is high time that we implement it for effective teacher pupil interactions. The paper will present the
pedagogic analysis of Lilavati and discuss its relevance for the teaching of mathematics in 21st century

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 7:09 pm | बॅटमॅन

बहुत धन्यवाद. नक्की प्रयत्न केला जाईल अटेंड करण्याचा.

शिद's picture

12 Nov 2014 - 3:06 am | शिद

निर्मळ यात्रेस १८ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ज्यांना सुकेळी खायची असेल त्यांनी जरुर हजेरी लावावी.

सुहास झेले's picture

12 Nov 2014 - 10:46 am | सुहास झेले

हो.. नक्की जाणार आहे :)

कवितानागेश's picture

12 Nov 2014 - 10:36 am | कवितानागेश

ऐकलय याबद्दल खूप. पण जायला मिळालं नाही कधी.
लिन्कवर माहिती नीट दिलेली आहे.

1

कोळी नृत्य, आगरी कोळींचा पेहराव, त्यांची बोली भाषा, अस्सल कोळी लोकांचे झणझणीत तयार झालेले पारंपारिक मासळी खाद्य व त्यांचा परंपरागत चालत आलेला मच्छिमारी व्यवसाय याचबरोबर यातून परिस्थितीशी झटून उभा राहिलेला आधुनिक आगरी-कोळी माणूस याचे जिवंत चित्र या महोत्सवातून प्रदर्शित होणार आहे.

अंधेरी पच्छिम का? ह्म्म मला तर हल्ली अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पच्छिम ह्यात फार गोंधळायला होतं.

शिद's picture

18 Dec 2014 - 3:38 pm | शिद

अंधेरी पश्चिम. :)

शिद's picture

18 Dec 2014 - 3:05 pm | शिद

1

शिद's picture

19 Dec 2014 - 8:54 pm | शिद

1

शिद's picture

16 Jan 2015 - 10:21 pm | शिद

सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टतर्फे आयोजित या फेस्टिवलचे उद्‍घाटन आज, शु‌क्रवारी संध्याकाळी सहा वाजता ख्यातनाम अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते ठाण्याच्या खारकर आळीमधील सीकेपी हॉल येथे होणार आहे.

अधिक माहीती साठी म.टा. मधील सीकेपी फूड फेस्ट बातमी पहा.

ठाणे ,भायखळा येथे फुलांची प्रदर्शने येत्या १५ -२०दिवसांत आहे.

वेल्लाभट's picture

19 Jan 2015 - 10:55 am | वेल्लाभट

जरा तपशील सांगता का? जायचं जमवायचं बघेन.

१)ठाणे नपा॰फुले प्रदर्शन
गावदेवी मैदान 30 ,31 jan, 1feb

२)Friends of Trees
7, 8- feb, VJTI MATUNGA.

३)मुंबई मनपा॰ फुले झाडे प्रदर्शन १३ १४ १५ फे राणीची बाग भायखळा

-वेबसाइटस-
A)आगामी फुले झाडे प्रदर्शने
इथे पाहा

B)आगामी इतर महत्त्वाची प्रदर्शने
इथे १पाहा

इथे २पाहा

बेस्ट ! ठाण्याच्या प्रदर्शनास भेट नक्की. बाकी भायखळा बघू.

भायखळ्याच्या प्रदर्शनात बोनसाइ ,फळझाडे रोपेपण असतात.

वेल्लाभट's picture

23 Jan 2015 - 11:06 am | वेल्लाभट

ठाणे नौपाडा येथील उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या किंवा हितवर्धिनी सभेच्या पटांगणात माघी गणेशोत्सव असतो. या वर्षी अनेक चांगले कार्यक्रम आहेत. त्यात आज संध्याकाळी ७:३० वाजता निनाद बेडेकर यांचं संभाजी राजांवर व्याख्यान आहे. इच्छुकांनी हजेरी लावावी :)

कंजूस's picture

24 Jan 2015 - 3:02 pm | कंजूस

पर्यटन करणाऱ्यांसाठी प्रदर्शन
१)OTM चे पत्रक

फोटोची लिँक इथे

२)प्रदर्शनात आहेत

फोटोची लिँक इथे