तळवे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
13 Apr 2019 - 11:56 pm

हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!

शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...

ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....

नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?

-शिवकन्या

प्रेम कविताभावकवितामुक्त कविताहट्टकरुणधोरणमांडणीवावरसंस्कृतीप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Apr 2019 - 7:23 am | प्रचेतस

जबरदस्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2019 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

पाषाणभेद's picture

14 Apr 2019 - 12:49 pm | पाषाणभेद

आरं बाब्बो, लईच शरिराची मोडतोड चालू हाये.
ते अमुर्त चित्रेकारी का काय असते तशी कविता दिवसेंदिवस होते आहे. म्हणजे एक डोळा दोन नाक. मेंदू गुढग्यात. हात पायच्या जागी.

गझल वाचून कसे गरगरायला होते तसे वाटते आहे. नकोच त्या वाटेने जाणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2019 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

14 Apr 2019 - 4:27 pm | यशोधरा

हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते..

नाहि_समजले.

प्रमोद देर्देकर's picture

14 Apr 2019 - 5:01 pm | प्रमोद देर्देकर

काहीच नाही समजले.

सोन्या बागलाणकर's picture

15 Apr 2019 - 4:12 am | सोन्या बागलाणकर

हे एक विरहगीत आहे.

कवयित्री म्हणते आहे की शक्य असते तर तिने आपल्या तळव्यांना एखाद्या फोटोप्रमाणे (किंवा आठवणीप्रमाणे) फोटोफ्रेममध्ये फोल्ड करून दूर ठेवून दिले असते ज्याने की तिला तिच्या प्रियकराची आठवण येणार नाही.

असं करता आलं असतं तर सगळे प्रश्नच सुटले असते.

शेवटी ती देवाला आर्ततेने म्हणते की माझ्या हातांना निदान पंख तरी द्यायचे म्हणजे मी माझ्या सख्याकडे उडून गेले असते (बघा: पंख होते तो उड आती रे)

तुषार काळभोर's picture

15 Apr 2019 - 12:24 pm | तुषार काळभोर

तिच्या तळव्यांचा अन प्रियकराचा काय संबंध ?
हृदयाचा अन प्रियकराचा समजू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Apr 2019 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

पंख मिळालेले तळवे, उडत उडत जाऊन, दूर गेलेल्या प्रियकराच्या गालांवर जोरात... असे काहीसे असावे. ;) :) (हघ्याहेवेसांन)

सोन्या बागलाणकर's picture

15 Apr 2019 - 12:56 pm | सोन्या बागलाणकर

हाहाहा... गालावर तळवे उमटले असतील.

सोन्या बागलाणकर's picture

15 Apr 2019 - 12:54 pm | सोन्या बागलाणकर

पैलवान साहेब,

याचे उत्तर कवितेच्याच पहिल्या वाक्यात आहे.

हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!

बोले तो त्याने तिच्या हातावर पेनने हृदय वगैरे काढले होते. (कृ ह घेणे)

तुषार काळभोर's picture

15 Apr 2019 - 12:25 pm | तुषार काळभोर

हे असलं हुच्च काव्य पार डोक्याच्या वीतभर वरून जातं!

सिक्रेटसुपरस्टार's picture

15 Apr 2019 - 1:01 pm | सिक्रेटसुपरस्टार

आवडलं मुक्तक.

हुच्च् अतिहुचक काव्याआरास इथे मांडिली

तळवे गार पडले ,

चमकले काजवे

तरीही काहीच नाही समजली

गहन ग्रहण लागले

ग्रहणात गहन काय होते ?

छायेचा खेळ सारा

डोक्याचे पार लागले

शिव कन्या's picture

19 Apr 2019 - 6:29 am | शिव कन्या

सगळ्यांचेच आभार.

तुषार काळभोर's picture

19 Apr 2019 - 12:30 pm | तुषार काळभोर

ते ठीके, पण अर्थ सांगा की!