हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!
शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...
ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
-शिवकन्या
काव्यरस
वाचने
10760
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त
जबरदस्त
सुंदर !
सुंदर !
आरं बाब्बो, लईच शरिराची
आरं बाब्बो, लईच शरिराची मोडतोड चालू हाये.
ते अमुर्त चित्रेकारी का काय असते तशी कविता दिवसेंदिवस होते आहे. म्हणजे एक डोळा दोन नाक. मेंदू गुढग्यात. हात पायच्या जागी.
गझल वाचून कसे गरगरायला होते तसे वाटते आहे. नकोच त्या वाटेने जाणे.
छान.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
हे तळवे बाजूला काढून
नाहि_समजले.
काहीच नाही समजले.
काहीच नाही समजले.
भावार्थ
हे एक विरहगीत आहे.
कवयित्री म्हणते आहे की शक्य असते तर तिने आपल्या तळव्यांना एखाद्या फोटोप्रमाणे (किंवा आठवणीप्रमाणे) फोटोफ्रेममध्ये फोल्ड करून दूर ठेवून दिले असते ज्याने की तिला तिच्या प्रियकराची आठवण येणार नाही.
असं करता आलं असतं तर सगळे प्रश्नच सुटले असते.
शेवटी ती देवाला आर्ततेने म्हणते की माझ्या हातांना निदान पंख तरी द्यायचे म्हणजे मी माझ्या सख्याकडे उडून गेले असते (बघा: पंख होते तो उड आती रे)
??
In reply to भावार्थ by सोन्या बागलाणकर
तिच्या तळव्यांचा अन प्रियकराचा काय संबंध ?
हृदयाचा अन प्रियकराचा समजू शकतो.
पंख मिळालेले तळवे, उडत उडत
In reply to ?? by तुषार काळभोर
पंख मिळालेले तळवे, उडत उडत जाऊन, दूर गेलेल्या प्रियकराच्या गालांवर जोरात... असे काहीसे असावे. ;) :) (हघ्याहेवेसांन)
हाहाहा... गालावर तळवे उमटले
In reply to पंख मिळालेले तळवे, उडत उडत by डॉ सुहास म्हात्रे
हाहाहा... गालावर तळवे उमटले असतील.
पैलवान साहेब,
In reply to ?? by तुषार काळभोर
पैलवान साहेब,
याचे उत्तर कवितेच्याच पहिल्या वाक्यात आहे.
बोले तो त्याने तिच्या हातावर पेनने हृदय वगैरे काढले होते. (कृ ह घेणे)
सगळंच क्रिप्टीक!
हे असलं हुच्च काव्य पार डोक्याच्या वीतभर वरून जातं!
खूप छान.
आवडलं मुक्तक.
हुच्च् अतिहुचक काव्याआरास इथे
हुच्च् अतिहुचक काव्याआरास इथे मांडिली
तळवे गार पडले ,
चमकले काजवे
तरीही काहीच नाही समजली
गहन ग्रहण लागले
ग्रहणात गहन काय होते ?
छायेचा खेळ सारा
डोक्याचे पार लागले
सगळ्यांचेच आभार.
सगळ्यांचेच आभार.
सगळ्यांचेच आभार.
In reply to सगळ्यांचेच आभार. by शिव कन्या
ते ठीके, पण अर्थ सांगा की!