चर्चा

विसंगती सदा घडो...

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
11 Oct 2015 - 10:54 pm

लोकांना आपल्याच वागण्यातली विसंगती कळते का कधी..? दोन अ‍ॅक्टीवास्वार, एक युवती व एक म्हातारे काका वीसफुटी रस्त्याचा डावा अर्धा भाग आवरून गप्पा हाणित उभे.. मी सरळ त्येंच्या अंगावर फोर-वीलर घातली. बाकी रस्ता मोकळा असूनही वळसा घातला नाही. ते हटेपर्यंत शांतपणे कार त्यांच्यासमोर उभी ठेवली. त्यांच्या आरामाच्या गप्पांमधे खंड पाडल्याने माझ्या कडे भयंकर क्रुद्ध नजरेने पाहत होते. जणू मीच मोठ्या गाडीची मस्ती दाखवत होतो. हे आपल्या भारताचे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय नागरिक, जे जाता-येता 'इस देश का कुच नै हो सकता' आळवत असतात, दुसरे कसे चुकीचे वागतात यावर धीर-गंभीर चर्चा झाडत असतात.

इसीस मध्ये भारतीयांचा सहभाग

तुडतुडी's picture
तुडतुडी in काथ्याकूट
8 Oct 2015 - 3:40 pm

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचनात आली होती . इसीस मधील भारतीयांच्या सहभागाबाबत .अर्थात आधीही अश्या बातम्या आल्या आहेत .काही महिन्यांपूर्वी कल्याण मधून ४ जन इसीस मध्ये सामील होण्यासाठी गेले असण्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहित आहेच . त्याआधी पिंपरी-चिंचवड मधून काही तरुण गेल्याची बातमीही आपल्या वाचनात आली असेल . परंतु आता हा वाढता सहभाग भारतासाठी धोकादायक ठरत चालला असल्याची चाहूल काही गोष्टींतून स्पष्ट जाणवते . अफशा जबीन नावाची ३७ वर्षीय हैद्राबादी तरुणी UAE मध्ये नोकरीनिमित्त गेली होती . 'निकी जोसेफ' हे टोपण नाव घेवून ब्रिटीश नागरिक असल्याचं भासवून हि इसीस चं काम करत होती .

मासाहार की शाकाहार... आणि सरकार!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
12 Sep 2015 - 10:20 am

मासाहार खाण्यावर बंदी नाही घातलेली सरकारने. केवळ 2 दिवस पशु हत्या न करण्याचे आदेश आहेत सरकारचे. ते ही केवळ सरकारी कत्तलखान्यामधे. देवनार येथे. त्याहुनही महत्वाची गोष्ट ही की हां निर्णय कॉंग्रेस सरकारने 2004 साली घेतला आहे. फडणवीस सरकारने नाही.

बृहन्मुंबई महानगर पालिकेने मागिल वर्षी अजुन दोन दिवस पशु हत्या करू नये असा ठराव सर्व पक्षिय मंजुरिने केला होता. तो यावर्षी मागे घेतला आहे.

याचा अर्थ हे केवळ मतांचे राजकारण होते आहे असे वाटते.

मुहुर्तामागचं शास्त्र !

जयन्त बा शिम्पि's picture
जयन्त बा शिम्पि in काथ्याकूट
18 Jul 2015 - 3:15 pm

फार पुर्वी, किशोर वयात असतांना , कोणतीही लग्न पत्रिका पाहिली कि नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे " गोरज मुहुर्त म्हणजे नेमका किती वाजेचा मुहुर्त ? ' कधीतरी , कोणीतरी ज्ञानात भर घातली कि गो म्हणजे गाय , खेड्यापाड्यात गायी सायंकाळी शेतातून घरी येतात , त्यावेळी जी धूळ ( रज ) उडते , ती वेळ म्हणजे ' गो-रज ' मुहुर्त ! !

आय आर बी आणि पुणे द्रुतगती महामार्ग

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in काथ्याकूट
24 Jun 2015 - 11:26 am

खरं तर काकु प्रांतात मी फारसा फिरकत नाही. तरीही आजच्या वर्तमानपत्रात हे वाचले आणि काही प्रश्न पडले.

कार लोन का होम लोन टॉपअप?

नागेश कुलकर्णी's picture
नागेश कुलकर्णी in काथ्याकूट
23 Jun 2015 - 11:45 am

नमस्कार मिपाकर,
हा माझा मिपावरील पहिलाच प्रयत्न, त्यामुळे चुकभुल देणेघेणे

तर मित्रांनो,
माझा एक मित्र आहे तो नविन गाडी घेण्याचा विचार करत आहे. फायनान्सकरीता तो दोन पर्यायांचा विचार करीत आहे.

  1. कार लोन
  2. फायदे - कमी व्याजदर, मर्यादित काळ (५ ते ७ वर्ष)
    तोटे - मिळकत करात सवलत नाही

  3. होम लोन टॉपअप
  4. फायदे - मिळकत करात सवलत (कार आणी जागा घेतल्यास) , स्टेट बॅकेचे घेतल्यास मॅक्सगेनचा फायदा घेता येइल.
    तोटे - व्याजदर कार लोनपेक्षा थोडा जास्त

होम लोन टॉपअप मिळण्यासाठी पात्रता

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग १

गवि's picture
गवि in काथ्याकूट
12 Jun 2015 - 11:07 am

सदस्यहो..

हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.

एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १

गवि's picture
गवि in काथ्याकूट
12 Jun 2015 - 11:06 am

सदस्यहो..

हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि..