चर्चा

फुफ्फुस प्रत्यारोपण

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
14 Mar 2024 - 6:08 am

स्वतःच्या व्यसनाने / चुकांनी गेलेले अनेक कलाकार आपल्याला माहिती आहेत पण तसे काही नसलेले ३ कलाकार काही वर्षात कठीण आजारातून गेले आहेत
सुदैवाने ते त्यातून बाहेर आले .... यातील एक म्हणजे विद्यधार जोशी
https://www.youtube.com/watch?v=XRbprwgjEpI

अतुल परचुरे
https://www.youtube.com/watch?v=jEAnldW47bI&t=84s

रेल्वेचे युटीएस UTS app वापरून तिकीट.

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
14 Jan 2024 - 8:19 am

युटीएस UTS app वापरून तिकीट.

रेल्वेच्या युटीएस UTS appचा वापर करून online unreserved तिकीट.
याबद्दल ऐकून होतो की चालत्या गाडीतून तिकीट काढता येत नाही. पण काल हा प्रयोग केला. यशस्वी.
.
.

या app चा बरेच प्रवासी वापर करून रेल्वेचं अनारक्षित तिकीट काढतात. रेल्वे तिकीट खिडकीपासून सहा मीटरस दूर असतानाच तिकीट निघू शकते. म्हणजे स्टेशनच्या बाहेरूनच. याचा अर्थ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्याअगोदर तुमच्याकडे रेल्वे तिकीट हवे.
.
.

वैवाहिक सहजीवन

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
30 Dec 2023 - 6:22 pm

पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.

आर्थिक नियोजन

Nishantbhau's picture
Nishantbhau in काथ्याकूट
23 Sep 2023 - 7:12 am

नमस्कार,

मिसळ पाव वर आर्थिक नियोजन बाबत काही धागे आहेत का? Bonds, gold, equity अशा वेग वेगळ्या गोष्टी मध्ये कोणत्या प्रमाणात पैसे गुंतवावे याबद्दल काही चर्चेचे धागे आहेत काय?

या वर्षी गणपतीची प्लॅस्टिक सजावट नकोच ?

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in काथ्याकूट
7 Sep 2023 - 6:30 pm

या वर्षी गणपती सजावट नकोच ?

त्या काळी घरी गणपती बसवायचा म्हणजे कागद, पुठ्ठया, साड्यांचे पडदे, झुरमुळ्या असं घरगुती काही बाही सामान वापरत सजावट करायचो.....
हळूहळू लाईटच्या माळ आल्या , त्या ही महाग असायच्या एकच माळ गणपती, दिवाळी असं दोन्हीला कित्येक वर्षे वापरायचो.
मग लाईटच्या माळा थोड्या स्वस्त झाल्या ... आणखी दोन चार घेऊन टाकल्या .. मग काय गणपती पुढे झगमगाट भारी वाटायला लागला ... पुढे फोकस आले ... मग रंगीत फोकस आले ... चिनी लाईट च्या अतिस्वस्त माळा आल्या ... आपल्या गणपती बाप्पा सजावट लै भारी

रिमोट राज्यशकट ( मराठयांची उत्तरेतील जरब! )

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
25 Aug 2023 - 5:03 am

एकूणच मराठयांची शक्ती ( मराठा जात नव्हे तर " मराठा समूह ") याबद्दल माझ्य मनात बऱ्याच वर्षात पडलेले काही प्रश्न आहते, विचारावेसे वट्ले.. हरकत नसावी
या खालील विधानात बऱ्याच चुका हि असतील तरी कोणी अभ्यासु व्यक्तीने यावर प्रकाश टाकवा अशि विनन्ति ( मनो यनि लिहवे अशि विनन्ति)

पॅन कार्ड, आधार कार्ड...कशासाठी?

रविकिरण फडके's picture
रविकिरण फडके in काथ्याकूट
11 Apr 2023 - 8:00 am

पॅन कार्ड, आधार कार्ड...कशासाठी?
मला एक प्रश्न फार वर्षांपासून पडलेला आहे. कदाचित मिसळपाववरील जाणकार मंडळी त्यावर प्रकाश टाकू शकतील.

(उदाहरणार्थ) गेल्या आठवड्यात मी पंजाब नॅशनल बँकेत गेलो. मला अकाउंटवरचा माझा पत्ता बदलायचा होता. त्या बाई म्हणाल्या, एक अर्ज आणि त्यासोबत तुमच्या नवीन वास्तव्याचा पुरावा द्या. मी विचारलं, माझ्या पासपोर्टची प्रत देतो ती चालेल ना? बाई म्हणाल्या, चालेल, सोबत पासपोर्टही आणा, आणि हो, तुमच्या पॅन कार्ड व आधार कार्डची एकेक प्रतही लागेल.

ओटीटीला मराठीत ......

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in काथ्याकूट
29 Mar 2023 - 5:38 pm

मनोरंजन क्षेत्रात आताचे युग OTT चे युग आहे. ओटीटी हा शब्द मनोरंजन विश्वात पावलो पावली वापरला जातो.   
वृत्तपत्रे, मासिके, छापील माध्यमे तसेच आंतरजालीय विश्वात देखील ओटीटी या शब्दाने धुमाकूळ घातलेला आहे.  

ओटीटी या शब्दाला योग्य मराठी शब्द अद्याप वाचण्यात ऐकण्यात आलेला नाहीय.
ओटीटी म्हणजे Over The Top म्हणजे satelite च्या वर जाऊन ( किंवा पलीकडे) अर्थात satelite लाही वरताण असे मनोरंजन/ माहितीरंजन बीन तरी यंत्रणेने चलाखीने ( smart) वेगवान पद्धतीने देतो. 

हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण

माईसाहेब कुरसूंदीकर's picture
माईसाहेब कुरसूंदीकर in काथ्याकूट
30 Jan 2023 - 12:31 pm

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History

करोना माफिया: Dollo-650

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
4 Aug 2022 - 12:11 pm

आपल्या देशात उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, करोंना झालेल्या रुग्णांना ताप उतरविण्यासाठी हेच औषध सर्व डॉक्टर लिहीत होते. सर्व रुग्णांना वाटत होते करोंनाचा ताप फक्त याच औषधाने उतरणार. करोंना काळात मेडिकल माफियाने परिस्थितीचा लाभ घेऊन देशातील जनतेला लुटण्याचे कार्य केले, ह्याच मताचा मी होतो. आता करोंना माफियचे पितळ हळू-हळू उघडू लागले आहे. तशी बातमी सर्वच वर्तमान पत्रांत होती तरी ही वाचकांसाठी एक लिंक.