सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि..
बातमीचा मजकूर , हेडलाईन, आणि तिची मूळ लिंक शेअर करणं.. तसंच त्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या लोकांना आपापली मतं देता येणं या कारणांसाठी कोणीही या धाग्यात बातमी आणि प्रतिसाद लिहू शकेल.
वाचनाच्या सोयीसाठी शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल..
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यावेळच्या एखाद्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच नवा भाग सुरु करण्यात येईल.
सध्या मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघाताची बातमी चर्चेत आहे. मॅगी थोडीथोडी मागे पडते आहे. म्यानमारच्या हद्दीत लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नेते आता इतर "शेजारी देशांना" गर्भित इशारे देताहेत. हे आधीपेक्षा वेगळं धोरण असल्याचं म्हटलं जातंय.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सुटी सिगरेट विकण्यावर बंदी आली आहे. चांगलं आहे.
बाकी जगात काय विशेष ?
प्रतिक्रिया
12 Jun 2015 - 12:10 pm | गवि
टोलनाक्यावर खाजगी वाहनांना वगळण्याचा निर्णय अंमलात आला न आला तोच कोर्टाने त्यावर ताशेरे प्रश्न स्थगितीचा विचार वगैरे सुरु केलं. आजची लोकसत्ताची हेडलाईन. रस्ते चांगले हवेत तर पैसे भरलेच पाहिजेत वगैरे कोर्ट सुनावत आहे. खाजगी वाहनवाल्यांना होलसेलमधे गर्भश्रीमंत असं संबोधत आहे.
बारबालाबंदी, गुटखाबंदी , टोलबंदी ..सरकारने निर्णय घ्यायचे (नोटिफ़िकेशनद्वारे) आणि कोर्टाने स्थगिती किंवा उलट निर्णयाने सरकारचा पोपट बनवायचा हे रिपीट होतं आहे. आधीच पूर्ण कायदेशीर अभ्यास करुन निर्णय घेत नाही का सरकार ?
http://www.loksatta.com/mumbai-news/why-toll-exemption-to-wealthy-class-...
12 Jun 2015 - 12:22 pm | कपिलमुनी
खाजगी गाडीवाले अगदी गर्भश्रीमंत नाहीत पण उच्च मध्यमवर्गीय नक्कीच आहेत.
३ लाखाची गाडी , तिचे वार्षिक २ सर्विस ( १०,०००) , विमा (५०००) आणि वीकेंड साठी ४ रू. प्रतिकिमी ने ५००० किमी प्रवास ( २०,०००) .म्हणजे महिना साधारण ३००० रू. कार वर खर्च करणार्या फॅमिलीच्या टोलमाफीचा खर्च बाकी जनतेने का भरायचा ?
अजून तरी भारतात कार ही लक्झरी समजली जाते. त्यामुळे हा खर्च जनतेच्या पैशातून वसूल करण्यास न्यायालयाने विरोध केला आहे.
बादवे : यावर सकाळी एक जण म्हणाला , मग आम्ही शेतकरी नाही तर त्यांच्या पॅकेजचा खर्च आमच्या टॅक्समधून कसा काय वसूल करतात :)
12 Jun 2015 - 12:33 pm | गवि
..बरोबर आहे मुद्दा.पण मुळात सिस्टीम क्लीन नसल्याने भरपूर कर भरुनही पुन्हा "चांगले रस्ते हवेत तर त्याचे पैसेही तुम्हीच भरा" असल्या निर्लज्ज अपेक्षा केल्या जातात.
..हाच जो काही उच्च मध्यमवर्गीय गट आहे ना तोच तेवढा पगार/कमाईच्या हातात येण्याच्याही आधी कर भरतोय.
..ना वरचे भरताहेत ना खालचे.
12 Jun 2015 - 12:38 pm | कपिलमुनी
उच्च मध्यमवर्गीय गट खासकरून नोकरदार हा कराच्या बाबतीत सॉफ्ट टारगेट झाला आहे .
कोर्टाने सुद्धा "चांगले रस्ते हवेत तर त्याचे पैसेही तुम्हीच भरा" याला पाठिंबा देणे चुकीचे आहे. सरकारला आहे त्या पैशात चांगले रस्ते बांधा असे सुनवायला हवे.
12 Jun 2015 - 12:44 pm | गवि
..एक्झॅक्टली..आणि त्यापेक्षा प्रश्न असा की कोर्टात कोणीतरी हितसंबंधी पार्टी जाणारच..तिथे न टिकणारे निर्णय मुळात जाहीर करुन तोंडघशी का पडतात?
..कायद्याच्या दारात काय टिकेल ते आधी कळत नाही?
..बीफबंदी मे बी नेक्स्ट..
13 Jun 2015 - 7:55 am | गणपा
गवि वर तुम्ही म्हणालात की सरकार एक निर्णय घेतं नी मग कोर्ट ते फिरवतं मग सरकार आधीच विचार करुन निर्णय का घेत नाही.
अहो साधं गणित आहे हे. सत्ताधारी सरकार पुढल्या पाच वर्षांची तजवीज करुन ठेवतं. ते असेच निर्णय घेतात ज्या बद्दल त्यांना खात्री असते की कोर्टात त्यांना नक्की आव्हान मिळुन निर्णय फिरवला जाईल.
उद्या लोकांसमोर बोंबा मारायला मोकळे की आम्ही तुमच्या हिताचे निर्णय घेतलेले पण न्यायालयाने ते फिरवले. ज्यांच्या विरोधात सरकारने निर्णय घेतलेले असतात त्यां 'हित'संबंधीयांना या बाबत आधिच माहिती दिलेली असते तस्मात ती बाजू ही सावरलेली असते. :)
12 Jun 2015 - 2:32 pm | वेल्लाभट
मुळात मी टोल का भरायचा?
मी इनकम टॅक्स भरतो
मी गाडीबरोबर रोड टॅक्स भरतो
इतर अनेक टॅक्स भरतो.
रस्ता ही मूलभूत सोय आहे त्याला मी वर अजून पैसे का देऊ?
लूट आहे ही. पण लोकं एकत्र होतच नाहीत. मला परवडतंय मी का उगाच विरोध करू? असं म्हणतील.
परवडायचा प्रश्नच नाही हा. कोर्टाला सांगावं कुणीतरी.
प्रश्न तत्वाचा आहे.
12 Jun 2015 - 2:41 pm | टवाळ कार्टा
या वाक्यावर पुणॅकरांचा कॉपीराईट आहे ना? आणि आधी साधे हेल्मेट घालायला कायदा करावा लागतो अश्या ठिकाणी वरच्या अपेक्षा ठेवणे म्हणजे लैच....
12 Jun 2015 - 2:52 pm | वेल्लाभट
समस्त पुणेकरांना सल्ला. (मिपाकरच असं नाही)
गुपचुप ठरवून एक दिवस सगळ्यांनी मुंबईस निघावे आणि टोलपाशी येऊन गाड्या (चारचाकी) बंद करून तिथेच उभे रहावे. वाटल्यास एक महाआंदोलनकट्टा म्हणावं त्यास.
जाचक टोलच्या सक्ती विरोधात ठिय्या !
12 Jun 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा
खिक्क...पण असे झाले तर थोडीफर तरी जाग येईल
चायला ठाणे ते मुलुंड आणि उलट यायचे झाले तर ३५ + ३५ = ७० रु. टोलसाठी जातात आणि पेट्रोल्ला सुध्धा तितकेच
12 Jun 2015 - 3:03 pm | वेल्लाभट
कहर आहे तो तर.
एमटीएनएल साठी मुंबई मध्ये ठाणे येतं.
एम एम आर डी ए साठी नाही.
युसलेसगिरी आहे ही
13 Jun 2015 - 12:14 pm | सुबोध खरे
मागे मी एका ठिकाणी असे लिहिले होते कि रस्ते करण्यासाठी टोल लावणे हे स्थानिक राजकारण्यांना चराऊ कुरण उपलब्ध करून देण्यासाठी आहे. पहिली गोष्ट रस्ते तयार करण्यासाठी पैसा लागतो हि वस्तुस्थिती आहे मग त्यासाठी पेट्रोल किंवा डीझेल वर सरळ एक रुपया अधिभार लावा. जो जितका जास्त रस्ते वापरेल तितके जास्त पैसे भरेल केवळ टोल नका पार केल्याचा भुर्दंड भरायचा आणि ज्याने त्याच्या अलीकडे १०० किमी गाडी चालवून एक पैसाही भरायचा नाही.
दुसरी गोष्ट चार चाकी वाहनांनीच टोल का भरायचा? दुचाकी वाहने काय स्वर्गातून आली आहेत. हि गरिबांना "खुश" करण्याची वृत्ती बंद होणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट मी गरीब आहे म्हणून ती मला फुकट मिळाली पाहिजे हि गेली ७० वर्षे "कल्याणकारी सरकारने"तयार केलेली मनोवृत्ती ताबडतोब बंद करणे आवश्यक आहे. या वृत्तीमुळे फक्त ट्रक नि टेम्पोवर टोल लावला तर ते भाव वाढवून आपल्याच खिशातून बाहेर काढणार म्हणजे महागाई होऊन शेवटी गरीबच मारला जाणार. टोल नाक्यावर होणार्या वाहतूक खोळम्ब्यामुळे वाया जाणारे इंधन कितीतरी हजार कोटी रुपयांचे आहे शिवाय त्यामुळे होणारे प्रदूषण आणि वाया जाणारे मनुष्य (तास)बळ याचा हिशेब पूर्ण पणे आतबट्ट्याचा आहे.
पण लक्षात कोण घेतो?
12 Jun 2015 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
"कोणाच्या खिश्यात किती पैसे आहेत ?" हा टोल लावण्यासाठी निकष नसावा तर...
(अ) सर्वसामान्य करव्यवस्थेतून मिळणार्या पैश्यांपेक्षा जास्त पैसे उभे करणे कोणत्या प्रकारच्या रस्त्यांना आवश्यक आहे ?
(आ) टोलच्या दराचा आणि तो चालू ठेवण्याचा कालावधी यांचा केलेल्या कामाशी आणि दिलेल्या इतर संलग्न सेवांशी (विश्रामगृहे, इ) अर्थाअर्थी संबंध असावा.
याविरुद्ध...
बर्याच फुटकळ आणि दुरावस्थेतल्या रस्त्यांवरही अनिश्चित कालाकरिता टोल आकारला जातो आहे... त्यांचा केवळ टोलभैरवांचे खिसे भरण्यापलिकडे काही फार उपयोग होत नाही असेच दिसते !
12 Jun 2015 - 12:45 pm | होबासराव
.
12 Jun 2015 - 12:52 pm | कपिलमुनी
12 Jun 2015 - 3:07 pm | आनंदी गोपाळ
ब्लू बुल म्हणजे नीलगाय ना?
12 Jun 2015 - 3:16 pm | एस
निराशाजनक बातमी. जावडेकरांनी भारतातल्या पर्यावरणाची एकंदरीतच संपूर्ण वाट लावायची ठरवलेली दिसते. हे पर्यावरण मंत्री आहेत की पर्यावरणविध्वंस मंत्री आहेत?
13 Jun 2015 - 10:25 am | नाव आडनाव
पर्यावरणविध्वंस मंत्री :)
13 Jun 2015 - 10:28 am | पैसा
५ वर्षे झाल्यावर हे सरकार गेले तरी तोपर्यंत बहुधा ५०० वर्षांत भरून निघणार नाही एवढी हानी झालेली असेल.
13 Jun 2015 - 10:59 am | आनंदी गोपाळ
आपने हमारे मूँहकी बात छीन ली..
26 Jun 2015 - 8:12 pm | dadadarekar
...
27 Jun 2015 - 1:07 am | कपिलमुनी
नव्या अवतारात स्वागत
12 Jun 2015 - 1:19 pm | सतिश गावडे
काल मुंबई सातारा कात्रज बाह्यवळण मार्गावर वडगाव पुलावर अपघात झाला. पुलावर डंपरने मारुती ओमनी गाडीला ठोकर दिल्याने डंपर आणि ओमनी दोन्ही पुलावरून खाली कोसळले. यात सहा जीव बळी गेले.
अपघात हे सांगून होता नसतात हे जरी खरे असले तर एकुणातच लोकांचा वाहन वापराबाबतीमधला निष्काळजीपणा, बेदरकारपणा वाढत आहे. पूर्वी लोक साथीच्या रोगाने मरायचे. आता वाहन अपघातांमध्ये मरत आहेत.
"नही जाती किसिकी रास्तेपे जान, मेरा भारत महान" या ओळींना काहीच अर्थ उरलेला नाही.
12 Jun 2015 - 1:03 pm | कपिलमुनी
काही वर्षापूर्वी असाच अपघात या पुलावर झाला होता.
डंपर , कंटेनर , बस यांना इमर्जन्सी ब्रेक नसतात का ?
12 Jun 2015 - 1:18 pm | मोहनराव
असे अपघात टाळता येऊ शकतात. आपल्याकडे डंपर , कंटेनर, बस यांच्या सुरक्षिततेकडे फार कमी लक्ष दिले जाते. निव्वळ मालवाहतुक, प्रवासी वाहतुक या नजरेने पाहिले जाते. ABS वगैरे सुविधा खुप कमी गाड्यामध्ये असते. तसेच वाहन चालवणारा बेदरकारपणे चालवतो. हे लोक रात्री अपरात्री गाड्या चालवुन कधीकधी झोपेत गाड्या चालवतात. दारू पिऊन चालवणे तर कॉमन आहे. या सर्वाला कुठेतरी आळा बसायलाच हवा.
12 Jun 2015 - 1:29 pm | गवि
..हायवे एन्ट्री पॉईंट्सना मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाहतूकबंदी केली तर?
.ड्रास्टिक भासला तरी इफेक्टिव्ह आहे उपाय असं वाटतं..इव्हिल अवर्स आहेत ते.
12 Jun 2015 - 1:34 pm | सदस्यनाम
रेल्वे फाटकासारखे गेट च (टाईमावर ऊघड्णारे/बंद होणारे) बसवावे लागतील. स्वयंशिस्तीने किंवा पोलीसाने हे होणे नाही.
12 Jun 2015 - 1:42 pm | सदस्यनाम
त्यापेक्षा वाहनांतला अन रस्त्यातला फरक नागरिकांना कळणे महत्वाचे आहे. गावात मोठ्या गाड्या (ट्रक/बस) ट्राफीक जाम करत हळूहळू जात असतात तर हायवेवर त्यांना कार्स आणि बाईक आड्व्या घालत ओव्हरटेक करत असतात. फक्त स्वतःपुरते बघणे हेच कारण असते. ट्राफीक सेन्स फक्त लायसन्स, पीयुसी आणि थोडेफार सिग्नल अन भीती एवढाच राह्यलाय.
12 Jun 2015 - 1:50 pm | मोहनराव
इतके स्तुत्य वाटत नाही कारण रात्री यांना मज्जाव केला तर दिवसा कोंडी करतील. मला वाटते यांच्या वेळा ठरलेल्या असाव्यात. दिवसभरात पुरेशी झोप होईल अश्या यांच्या कामाच्या वेळा कायद्याने निश्चित कराव्यात. वाहन कायदे व सुव्यवस्था कडक करुन दारु पिऊन गाडी चालवणार्यांवर योग्य ती कारवाई करावी.
एक अनुभव: माझ्या मामाच्या शेतातील कांदा मुख्य बाजारपेठेत बेंगलोरला विक्रीकरता न्यायचा होता. संध्याकाळी ट्र्क निघाला. रात्री भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रकवाल्याने ट्रक धाब्यावर जेवणासाठी थांबवला. ड्रायवरने स्वत:ची टंकी दारुने फुल करायला चालु केली. मामाने विचारले असता म्हणाला..साहेब याशिवाय गाडी रस्यावर सरळ धावु शकणार नाही!! नाहीतर मी गाडी चालवु शकत नाही!! आता मामा काय बोलणार. अडला हरि... मामा सरळ बसने गेला. सकाळपर्यंत ट्र्क बाजारपेठेत हजर होता!!
12 Jun 2015 - 3:12 pm | विवेक्पूजा
"मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला मुंबइकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकाने कसेबसे वाचविले खरे; मात्र, या प्रयत्नात चालकाने ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकाकडे घेतली. त्याच वेळी पाठीमागून वेगाने आलेल्या डंपरचालकाने अचानक "ब्रेक‘ लावला. मात्र, तरीही डंपरचा वेग कमी झाला नाही."
12 Jun 2015 - 1:07 pm | खेडूत
फोनवर बोलत चाललेल्या एका महिलेमुळे हा अपघात झाला असं पुढे आलंय !
12 Jun 2015 - 1:46 pm | काळा पहाड
पुण्यातले लोक (बहुधा बाहेरचेच असावेत) फार माजोरडे झालेत आज काल. या शिक्षित किंवा खालच्या स्तरावरच्या लोकांचं प्रबोधन वगैरे करणं शक्य आहे असं मला वाटत नाही. ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या तिथं शिक्षा करण्याचे (म्हणजे नडग्या तोडण्याचे) अधिकार द्यायला हवेत असं माझं मत आहे.
12 Jun 2015 - 2:23 pm | सामान्यनागरिक
शे पाचशे रुपयांचा दंड लावुन काही होत नाही. वाहतुकीचे नियम तोडणार्यांना तेथेच चौकात उभे करुन शंभर फटके दिले पाहिजेत. शहरांत तर वाहरुक आणी बाणी घोषित करावी. तोडला नियम की मार फटके असेकेल्याशिब्वाय सुधरणार नाहीत.
आपण सुद्धा आपल्या मुला मुलींना दुचाक्या घेऊन देतो तेंव्हतोआपल्याला खात्री असते का की यांना वाहतुकीचे नियम नीट समजले आहेत ? हीचे मुले पुढे चारचाकी गाड्या घेऊन फिरतात आणि समाजाला धोका होतो.
माझ्या माहितीते कितीतरी मुले आहेत ज्यांना चौकात पोलिसाने अडवले तर पन्नास रुपये द्यावेच लागतात असे वाटते. त्यात काही अयोग्य आहे असे त्यांना वाटतच नाही आपली काही चुक आहे म्हणुन दंड भरावा लागला हेच त्यांना माहीत नसते.
12 Jun 2015 - 2:24 pm | टवाळ कार्टा
यामुळे फक्त चिरिमीरीच्या रकमेत वाढ होईल
12 Jun 2015 - 3:07 pm | नाखु
चा खरा अर्थच मला पोसा असा आहे.
त्यामुळे कुठलेही नियम हे फक्त आणि फक्त पैसे उकळण्यासाठीच जन्माला घातले आहेत.
आणि अंमल्बजावणी करताना काय होईल हे वेगळे सांगायला नको.
बोकाफिल्डींग पाव्तीबहाद्दरांना रोज पाहणारा
नाखुस
12 Jun 2015 - 3:07 pm | काळा पहाड
होवू दे झालं तर. निदान ती चिरीमिरी जास्त असल्यामुळे तरी लोक नीट वागतील.
12 Jun 2015 - 3:17 pm | टवाळ कार्टा
शक्यच नाही
12 Jun 2015 - 3:18 pm | नाखु
पैशे फेकले की आप्ण अंगाव गाडी घालायला मोकळे असा संदेश जाऊ लागलाय मुंबै बाका नगरीत.
अलिकडच्या हिट रन बातमीतील कुटुंबाची बातमी पाहिलेला
नाखुस.
13 Jun 2015 - 2:10 am | संदीप डांगे
राज ठाकरेही असंच म्हणायचे. पण चिरमिरीची रक्कम दंड व शिक्षेपेक्षा देणारा-घेणारा यांच्या मानसिकतेवर अवलंबून असते.
उदा. सिग्नल तोडल्यावर १ लाख रुपये दंड भरायचा आहे. पोलिस इथेही तोडपाणीच करणार कारण गुन्हा घडला की नाही हे सांगणारा तोच अधिकृत व्यक्ती आहे. गुन्हेगार म्हणेल भरतो १ लाख तरी पोलिस म्हणेल जाउ द्या ना साहेब मला पन्नास द्या प्रकरण मिटवून टाकतो. अधिकारी व्यक्तीला 'वाटले' तर गुन्हा दाखल होतो. कायदे पाळले तर ते कडक असतात, अन्यथा बस सुविचार.
जो पर्यंत अशाप्रकारात नॉन-ह्युमन थर्डपार्टी येणार नाही तोपर्यंत हे बदलणार नाही. गडकरीसाहेब म्हणतायत की ४ तासांत घरपोच दंडपावती पोचेल म्हणून. सर्वत्र गुगल कार चालेल तेव्हाच हे सगळं थांबेल बहुतेक.
आपण मनुष्यजातही भारी आहोत. निर्जीव पदार्थांना आज्ञा पाळायला शिकवू शकतो पण सजीव माणसासमोर हात टेकतात.
12 Jun 2015 - 1:25 pm | होबासराव
हे असले नमुने डोक्यात जातात, रोज दिसतात असले पढतमुर्ख. गाडि चालवताना मान तिरपी करुन फोन कान आणि खांद्याच्या मध्ये ठेवुन बोलणे, दुचाकि वर सुद्धा व्हॉट्स अप वापरणे, लिफ्ट मध्ये शिरताना सुद्धा तेच.हे आपल्या सुरक्षेचा विचार तर करत नाहिच पण ह्यांच्या मुळे इतर लोक धोक्यात येतात हे सुध्द्दा कळत नाहि.
12 Jun 2015 - 2:15 pm | सामान्यनागरिक
टोल किती असावा आणि असावा की नाही हातर एक मोठाच मुद्दा आहे. पण जबरा टोल भरुन सुद्धा रस्त्यांची देखभाल व्यवस्थीत होतांना दिसत नाही.
उदा : नाशिक मुंबई चौपदरी रस्ता. कितीतरी ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि खड्डे पडले आहेत अगदी धुळ्यापर्यंत !
यांना काही निकष लावले जात नाहीत का ? की खड्डा झाल्यावर अमुक इतक्या दिवसांत बुजवल्या गेला पाहिजे
अनेक ठिकाणी ' वळण रस्त्याचे ( डायव्हर्शन )" चे बोर्ड लावलेले दिसतात. रात्रीच्या वेळीतर खुपच त्रास होतो.
बरे रस्त्याचे काम सुरु केलेकी त्याला किती वेळ लागावा यालासुद्धा काही नियम नाहीत. महिनोन महिने वळण रस्ते चालु असतात.
यांच्यावर देखरेख ठेवणारठेकोणीच नाही का त्यांनाही 'पटवले' जाते ? काही दिवसांनी या बद्दलसुद्धा लोकहित कोर्ट खटले चालु होतील.
असा काही नियम का बनवला जात नाही की रस्त्याच्या कामासाट्।ई वळण रस्त्याचे बोर्ड लावले की ते काम होई पर्यंत टोल मधे एखाद दोन रुपय कमी भरावे लागतील ? काम केले नाही कसेही केलेतरी पूर्ण टोल भराच. आम्ही आंम्हाला जमेल तसे दुरुस्ती करु किंवा करणारही नाकरुतुम्ही मुकाट टोल भरा असा कारभार आहे.
12 Jun 2015 - 2:57 pm | कपिलमुनी
खालील दुव्यांवर क्लिक करा
http://news.sky.com/story/1499464/toothed-eels-fall-from-sky-over-alaska...
http://www.bustle.com/articles/89273-its-actually-raining-toothed-eels-i...
12 Jun 2015 - 3:19 pm | गवि
अशा बातम्या मधूनच येत असतात. नेमके किती ईल्स (अॅक्चुअली ईल्स नव्हेतच.. ईलसदृश मासे) आकाशातून पडले ते कोणी लिहीत नाही स्पष्ट. एकूण आठवड्यात मिळून वट्ट चार मासे इकडेतिकडे पडलेले सापडले. डिस्कव्हरी न्यूजच्या साईटवर बघितल्यास स्पष्टीकरण मिळेल. सी गल्स समुद्रातून हे मासे पंजात पकडून ते खाण्यासाठी जमिनीवर विशिष्ट ठिकाणी जात असताना ते अनेकदा निसटून खाली पडतात.
http://news.discovery.com/animals/lamprey-eels-fall-from-sky-over-alaska...
12 Jun 2015 - 3:01 pm | वेल्लाभट
मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम - सार्स समूहातला हा एक आजार असून सध्या दक्षिण कोरियात तो पसरत आहे.
http://edition.cnn.com/2015/06/11/asia/south-korea-mers-outbreak/
http://edition.cnn.com/2014/05/02/health/mers-5-things/
12 Jun 2015 - 3:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईत किमान १०० वर अतिरेक्यांना यमसदनी पाठवलं. पहिल्यांदाच भारतीय सेनेने सिमे पलिकडे अशा प्रकारची मोहीम राबवली. सर्वच स्तरांवर अत्यंत गुप्तता बाळागत ही मोहीम भारतिय लष्कराने यशस्वी करुन दाखवली. मनात आणले तर आपण काय करु शकतो याची एक झलकच या निमित्ताने बघायला मिळाली.
ह्या कारवाई मधे सैन्यदलाचा जितका दावा आहे तेवढे यश मिळाले नाही. फक्त सात आठ अतिरेकी मारले गेले. अशा प्रकारच्या बातम्याही काही वृत्तपत्रात आल्या आहेत. पण त्या मुळे केलेल्या कारवाईचे आणि या कारवाईद्वारे ईतर शेजारी देशांना भारताने दिलेल्या संदेशाचे महत्व कमी होत नाही. कारण लगेचच "भारताने पाकिस्तानला म्यानमार समजू नये" असा इशारा पाकिस्तान ने भारताला दिला.
भारतिय लष्कराचे आणि त्यांना पाठबळ देणार्या भारतिय नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन. भारतिय लष्कराने अशा प्रकारच्या आणखी कारवाया करणयाची खरोखर गरज आहे.
पैजारबुवा,
12 Jun 2015 - 3:41 pm | नाखु
नक्की दोष कुणाचा
मदत मिळाली तरी आत्महत्याm
अश्या बातम्यांचा पुढे पाठपुरावा होत नाही.
नगरच्या जामखेड प्रकरणाला राजकीय्+जातीय रंगरंगोटी देऊन झाल्यावर वास्तव बाहेर आले ते कल्प्नातीत होते. घरच्यांनीच हत्याकांड केले होते.
वरच्या बातमीत मुख्यमंत्र्यांचा नक्की काय दोष होता किंवा त्यांनी काय करावे असे टीका करणार्या बोंडूक्वाले+मिपा "तज्ञांना" वाटते.
अब्दुल
नारायण
डिसूझा
+ नाखु
12 Jun 2015 - 3:48 pm | इरसाल
खुप दिवसांनी तुम्ही काहीतरी खरडलेत म्हणुन रहावले नाही . ;)
असपण हे धाग्याच्या शीर्षकाशीच संबंधीत आहे. :))
12 Jun 2015 - 4:42 pm | कपिलमुनी
झिंबाब्वेचा एक्स्चेंज रेट
१ यूएसए डॉलर = 35,000,000,000,000,000 झिंबाब्वे डॉलर.
आणि ही एक नोट असली की तुम्ही करोडपती
12 Jun 2015 - 4:48 pm | सतिश गावडे
एक अमेरिकन डॉलर = ६४ रुपये हे कोण ठरवतं? किंवा कसं ठरतं?
12 Jun 2015 - 5:12 pm | काळा पहाड
हे खरं तर अतिशयच काँप्लिकेटेड आहे, पण थोडक्यात सांगायचं तर जेव्हा तुम्ही रुपये विकता आणि डॉलर विकत घेता, तेव्हा ते दुसर्या बाजूने रुपये खरेदी करायला आणि डॉलर विकायला कोणीतरी असावं लागतं आणि त्याला तुम्ही सांगितलेली किंमत पसंत असायला हवी. पूर्वी हे सोपं होतं कारण ज्याच्याजवळ जितकं सोनं तितकी त्याची करन्सी मजबूत. पण तो प्रकार मोडीत निघाला. आता सगळ्या करन्सीज डॉलर ला मध्यवर्ती करन्सी धरून ठरवल्या जातात. पण याच्यात बरेच बाकीचे पण फोर्सेस अंतर्भूत असतात. जसं की एखाद्या देशातील व्याजाच्या दराचा, करन्सी लिक्विडिटीचा, देशातील स्थैर्याचा आणि इन्व्हेस्टमेंट येतीय की परत जातीय याचाही परिणाम होतो. पण एका शब्दात सांगायचं तर 'बाजारातल्या शक्ती' हा दर ठरवतात.
12 Jun 2015 - 5:28 pm | गवि
..पण रोज किंवा सतत बदलत राहते ही किंमत..म्हणजे उपरोक्त कॉम्प्लेक्स फॅक्टर्सची नोंद ठेवून रोज कोणीतरी आकडा जाहीर करत असणार....कोण आणि कसं?
13 Jun 2015 - 11:07 pm | काळा पहाड
माझ्या मते अनिर्बंध अर्थव्यवस्थेत (कुणीतरी माझं मत खोटं असेल तर तसं सांगावं) आंतर वित्तीयसंस्था (इंटर बँक) मार्केट ठरवतं. म्हणजे एसबीआय ला जर १०० कोटी युएस डॉलर्स खरेदीची गरज असेल तर ती सिटीबँकेला, बँक ऑफ अमेरिकेला आणि आरबीएसला विचारणा करते. मी फक्त उदाहरण देतोय. ज्यांचा दर सर्वात कमी त्यांच्याकडून ते डॉलर्स खरेदी करतील. हा आंतर वित्तीयसंस्था दर आहे. हा तुम्हाला आणि मला मिळत नाही. कारण या बँकांचे एकमेकांशी संबंध आणि ज्या मोठ्या प्रमाणात ते ट्रान्झॅक्शन्स करतात त्या मुळे त्यांना वेगळा दर मिळतो. फॉरेक्स डिलर्स ना थोड्या चढ्या भावानं डॉलर्स मिळत असणार. ते त्यांचा फायदा त्यात अधिक करून हे रेट्स प्रसारित करतात. जो आकडा जाहीर होतो तो या बिड (म्हणजे मागणी दराचा) आणि आस्क (म्हणजे पुरवठा दराचा). थोडक्यात सांगायचं तर जशी शेअर्सची किंमत ठरते तशीच करन्सी ची सुद्धा. वेगवेगळ्या डिलर कडे हे आकडे वेगवेगळे असू शकतात. त्याचा फायदा आर्बिट्रेटर्स (म्हणजे तुम्ही एका डिलर कडून विकत घेवून दुसर्या डिलरला चढ्या भावानं विकू शकता) घेवू शकतात. पण असं होताच मार्केट दोन्ही दरामधल्या भावाशी स्थिर व्हायला सुरवात होते. इंटर बँक रेट कसे ठरवले जातात हे वेगवेगळ्या गोष्टीवरअरठरतं.
निर्बंधित अर्थव्यवस्थेत सरकारची एखादी संस्था दर कृत्रिमरित्या ठरवते. अर्थात त्या संस्थेला त्यांच्या कडच्या फॉरेक्स रिझर्व्स ची काळजी घ्यावीच लागते नाही तर रिझर्व्स आटत जाण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी ही संस्था दर थोड्या महिन्यांनी किंवा वर्षांनी करन्सीचं अप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन (जशी परिस्थिती असेल त्या प्रमाणे) करते.
भारताची काही वर्षापूर्वीची करन्सी रेट ठरवण्याची पद्धत निर्बंधित होती. पण सध्या ती अनिर्बंध प्रकारची आहे. सध्याची सर्वात वादग्रस्त निर्बंधित पद्धतीचं मुख्य उदाहरण म्हणजे चीन.
26 Jun 2015 - 10:11 pm | खटपट्या
जालावर शोध घेतला असता विनिमय दर हा निव्व्ळ मागणी आणि पुरवठा यांच्या प्रमाणावर अवलंबून असतो असे बहुतेकांचे म्हणणे आहे. सोप्या भाषेत
चलन विकत घेणारे > चलन विकणारे = चलन विनिमय दरात घट
चलन विकत घेणारे < चलन विकणारे = चलन विनिमय दरात वाढ
प्रत्येक देशाची केंद्रीय बँक ही परकीय चलन देणारी एकमेव संस्था असते. त्यामुळे विनिमय दरातील चढ उतार हे देशातील चलनाची मागणी आणि पुरवठा तसेच परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा यावरही ठरतात.
भारताच्या बाबतीत - जर भारतीय चलनाची मागणी कमी असेल तर भारतीय चलनाचा दर उतरणार, आणि अमेरीकन डॉलर वधारणार, याचे परीणाम भारतीय चलन विनिमय दरात होणार.
(थोडे गोंधळात टाकणारे आहे खरे. जाणकार अजून सोप्या भाषेत पटवून देतील अशी आशा)
13 Jun 2015 - 9:45 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
भारत किती आयात आणि निर्यात करतो ह्याच्यावर ह्याची किंमत अवलंबुन असते ना? जेव्ढी आयात वाढवु तेवढे जास्तं रुपये १ डॉलरसाठी मोजावे लागतात आणि वाईस वर्सा.
13 Jun 2015 - 10:14 am | संदीप डांगे
हे विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजार, रुपयाचे मूल्य वैगेरेवर कुणा जाणकार व्यक्तीकडून लेख आला पाहिजे राव. उगा ते राजकारण, ब्राहमण-अब्राहमण, जाती-धर्म यावर वेळ घालवण्यापेक्षा कामाची योग्य माहिती मिळाली तर फार बरं होईल.
13 Jun 2015 - 11:09 pm | काळा पहाड
खरं सांगायचं तर सगळ्या टर्म्स इंग्रजीमध्ये आहेत. मराठी आठवायचं तर प्रत्येक शब्दाला अडखळायला होतं.
14 Jun 2015 - 9:44 am | संदीप डांगे
समजू शकतो.
मी एक सुचवू का? म्हणजे दोन-चार जाणकार लोकांनी अशी एखादी माहितीपूर्ण लेखमाला आखून जरा वेळ घेऊन लिहिली तर मिपासाठी एक कायम स्वरुपी अॅसेट होईल. अगदी सामान्य माणसाला समजेल अशी उदाहरणे देऊन साध्या भाषेत लिहिलं तर बरं होइल. हे कठीण आहे हे मी जाणतोच पण झालं तर खूप बरं होईल.
सामान्यांच्या व्यवहारात असूनही हे अर्थकारणाचे जग सामान्यांच्या आकलनाबाहेरच राहते याची खंत मात्र आहे. हे अर्थव्यवहार सामान्यांना समजू लागले तर त्यांच्या व्यवहारातपण त्यांना फायदा होईल असे मला वाटते.
15 Jun 2015 - 12:14 pm | बॅटमॅन
मिपाकर क्लिंटन यांचे लेखन पहा. फायनान्सबद्दल मस्त लेख लिहिलेले आहेत.
15 Jun 2015 - 1:30 pm | संदीप डांगे
धन्यवाद! :-)
12 Jun 2015 - 4:55 pm | बबन ताम्बे
पुर्वी दगड्गोट्यांच्या बदल्यात खरेदी/विक्री करायचे की काय झिम्बाब्वेयियन ?
13 Jun 2015 - 7:31 am | कंजूस
रेल्वेचे तिकीट नाही मिळाले तर विमानाचे मिळण्याचा पर्याय सुरू-कालपासून शंभरेक जणांनी घेतले.
13 Jun 2015 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इराण सरकारने पुरुषांचे सामने पाहण्यास मर्यादित परवानगी दिली आणि बास्केटबॉल सामन्याला महिला प्रेक्षक उपस्थित राहील्याच्या निषेधार्थ कट्टरवाद्यांनी मोर्चा काढला. मला गम्मतच वाटते अशा बातम्यांची, सालं आपण कुठे चाललो काहीच कळत नाही.
-दिलीप बिरुटे
13 Jun 2015 - 6:48 pm | धर्मराजमुटके
स्मार्टफोनच्या जमान्यात क्वेर्टी आणि नॉन क्वेर्टी फोन पुर्णच बंद होऊन जातील काय ? सध्या बाजारात कीपॅडवाले जे पण फोन आहेत ते एकदमच सामान्य दर्जाचे आहेत. आय मिस यु नोकीया अँड क्वेर्टी फोन्स.
14 Jun 2015 - 6:18 pm | संदीप डांगे
ही बहुधा जुनी बातमी आहे पण आजच्या दैनिक दिव्यमराठीमधे वाचली:
तरुणांच्या भावविश्वातील ड्रीम जॉबची स्थिती विदारक, सात हजार पायलट बेरोजगार
१ कोटीपर्यंत खर्च करूनही नोकर्या नाहीत. स्वप्ने पुरी करतांना भरमसाठ पैसा खर्च करण्याआधी रोजगार-उपलब्धतेचा अभ्यास आवश्यक आहे हेच यातून अधोरेखित होत आहे.
गविं चे मत अपेक्षित...
15 Jun 2015 - 7:08 am | कंजूस
स्मार्टफोनच्या जमान्यात धर्मराजमुटके-Sat, 13/06/2015 - 18:48नवीन स्मार्टफोनच्या जमान्यात क्वेर्टी आणि नॉन क्वेर्टी फोन पुर्णच बंद होऊन जातील काय ?""""-------
अगदी खरं आहे. ते नोकियाचे फोन सेफ लॅाकरमध्ये ठेवायची वेळ आली आहे. रणगाडे paton tanks आहेत.कोणतेही काम द्या अजूनही करतात.
15 Jun 2015 - 7:43 am | श्रीरंग_जोशी
भविष्यात होईल ते होईल पण सध्या तरी जीव आहे म्हणायचा.
पहिला दुवा एका नव्या फोनबाबत बातमी आहे. तर दुसरे दोन दुवे ब्लॅकबेरीचे गेल्या काही महिन्यांतील किबोर्ड फोन्सला मिलालेले चांगले व मोठ्या संख्येत असलेले युझर रिव्युज दाखवतात.
अमेरिकेत ब्लॅकबेरीच्या क्वेर्टी किबोर्डने काही लेखकांनी आपली पुस्तकं लिहिली आहेत :-) .
15 Jun 2015 - 8:41 am | कंजूस
ब्लॅकबेरीने त्यांचा प्रसेसर बदलायला फारच वेळ घेतला,ओउस ही थोडी उशिराच उद्धरित केली ,इनक्रिप्शनमुळे इकडे सर्विस प्रवाइडर महागडा मासिक प्लान घ्यायला भाग पाडायचे आणि किंमत या कारणांमुळे फारच थोडे ग्राहक या ब्रांडकडे वळले.
15 Jun 2015 - 8:47 am | श्रीरंग_जोशी
तुमचे म्हणणे भारतीय बाजारपेठेबाबत बरोबर आहे.
अमेरिकेत २००८ पर्यंत ब्लॅकबेरी युझर्सच्या संख्येत क्र. १ वर होतं. पहिले आयफोनने अन नंतर विविध अॅन्ड्रॉइड फोन्सनी त्यांचे संस्थान खालसा केले.
15 Jun 2015 - 9:14 am | नाखु
ही घ्या.
गुणवत्तेत पहिला
गुण उधळण्यातही पहिला
या आणि अश्या प्रकरणात पुढे शिक्षा होते का?
त्याचा पाठपुरावा होतो का ?
का सगळीकडे रसद पोहचवून शिल्लक रक्कम्+संपत्ती रिचवायला मोकळे?
यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांना काय वाटते?
प्रश्नार्थी
नाखु
15 Jun 2015 - 11:50 am | वेल्लाभट
भारत विरुद्ध गुआम - विश्वचषक फुटबॉल २०१८ पात्रता फेरीचा सामना
उद्या म्हणजेच मंगळवारी. वेळ माहीत नाही. सोनी सिक्स च्या साईटवरही नाहीये. पण आहे एवढं नक्की.
15 Jun 2015 - 1:32 pm | खटपट्या
अरे एवढा महत्वाचा सामना असून थेट प्रक्षेपण नाही ?
15 Jun 2015 - 1:36 pm | वेल्लाभट
तेच म्हटलं. पण वेळ कळत नाहीये.
15 Jun 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा
गुआम देश कुठे आहे?
15 Jun 2015 - 1:54 pm | खटपट्या
हो मीही पहील्यांदाच ऐकतोय !!
15 Jun 2015 - 2:45 pm | खटपट्या
जालावर शोध घेतला असता. ईंडोनेशीयाच्या भागात एक बारीक ठीपका दीसतोय.
यांना तरी हरवा रे...
15 Jun 2015 - 2:54 pm | वेल्लाभट
हरवतील सर. बी पॉझिटिव्ह. फुटबॉल इज अ स्लीपिंग मॉन्स्टर दॅट्स वेकिंग अप इन इंडिया.
बघा क्रिकेट ला मागे टाकेल येत्या १० वर्षात
15 Jun 2015 - 4:39 pm | खटपट्या
अहो, सर म्हणून लाजवू नका हो..
बाकी भारताच्या कामगीरीबद्द्ल नेहमीच आशावादी असतो.
15 Jun 2015 - 4:41 pm | बॅटमॅन
खेळाडू काय, चुकूनमाकून ब्राझीलजर्मनीलाही हरवतील...ते एक असो.
मेन मुद्दा हा की क्रिकेट हाच एकमेव खेळ मानणारे भारतीय तिकडे ढुंकूनही पाहतील किंवा नाही?????????
15 Jun 2015 - 4:46 pm | खटपट्या
बरोबर, बर्याच लोकांना असे सामने होतायत हेही माहीत नाहीये.
15 Jun 2015 - 4:54 pm | कपिलमुनी
लाइव्ह प्रक्षेपण असेल आणि सोय असेल तर नक्की बघतील.
भारतामध्ये भरपूर फुटबॉल प्रेमी आहेत .( ८० % वर्ल्डकप ते वर्ल्डकप उगवतात ते सोडा :) )
15 Jun 2015 - 5:05 pm | बॅटमॅन
यावर थोडा डाऊट आहे, पण येस- आय वुड लव्ह टु बी प्रूव्हन राँग ऑन धिस वन. :)
17 Jun 2015 - 12:57 am | धनावडे
भारत हारला हि मॅच १-२ ने
17 Jun 2015 - 1:20 am | वॉल्टर व्हाईट
भुजबळांबद्दलची बातमी बहुदा आजची सर्वात मोठी बातमी असावी. सत्तेत नसतांना सत्ताधार्यांचा गुडबुकात रहाणे ज्यांना जमत नाही त्यांनी निदान तोंडाळपणा करुन वैर तरी घेउ नये. शरद पवारांकडुन भुजबळ योग्य ते शिकले नाहीत हेच खरे. पवार कसे बरोबर मोदींच्या गुडबुकात आहेत, अशी कारवाई त्यांच्यावर आणि अजित पवारांवर होईल तेव्हा खरे अच्छे दिन आले असे म्हणावे लागेल.
17 Jun 2015 - 2:00 am | रेवती
बातमी वाचली. काय माणसे आहेत! हे माहित असलेले, जगापुढे आलेले आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे छापे पडतील असा अंदाज होताच! मग काय उपयोग? जे झाले तेही नसे थोडके, पण जो वेळ मिळाला त्यात काय काय झाले असेल त्याचा विचार केलेला बरा. झाल्या गोष्टींची पापे फेडणे असे काही होताना तर दिसत नाही. म्हणजे असे नसावेही. ज्याने त्याने कसे वागायचे हे ठरवणे इतकेच असावे.
17 Jun 2015 - 2:16 am | वॉल्टर व्हाईट
हे जेव्हा कधी काळी आपल्याला कळेल तेव्हा कळेल, तोवर फक्त अंदाज बांधु शकतो. सहाजिकच कोणीही अश्या वेळेस त्यांना सगळ्यात जास्त नुकसान पोहचवणार्या वस्तुंची उतरत्या क्रमाने यादी बनवेल आणि शक्य तितके नुकसान वाचवेल. आता धाडीत जर पैसा अडका, कागदपत्रे सापडली फक्त तर यापेक्षा धोकादायक असे काय गायब केले गेले हा प्रश्न राहीलच.
17 Jun 2015 - 3:54 pm | काळा पहाड
योगायोगाने, बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला असे दोन्ही 'मोहरे' या एकाच वर्षात देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. राणे आणि भुजबळ.
17 Jun 2015 - 4:50 pm | प्रसाद१९७१
भुजबळांवरच्या कारवाई मधे भाजप पेक्षा त्यांच्या पक्षातल्या लोकांचाच हात असावा असे वाटते. भाजप आणि राका च्या राजात काहीतरी सेटींग असावे.
17 Jun 2015 - 3:42 pm | विजुभाऊ
रिलायन्स जिओ ( ४जी) ला उत्तर म्हणून अनिल अंबाणींच्या आर कॉम कम्पनी ने सिस्टेमा शाम टेलीसर्व्हिसेस शी करार केलाय.
या करारतून आर कॉम ने स्वतःचे भाग भांडवल कमी केलय. नक्की काय अर्थ घ्यायचा कराराचा?
http://www.firstpost.com/business/rcom-sistema-m-ultimately-one-exit-229...
17 Jun 2015 - 7:19 pm | स्रुजा
काल डॉनल्ड ट्रंप नी प्रेसिडेन्शिअल रेस मध्ये स्वतःचं नाव दाखल केलं. ओप्रा म्हणे सेकंड चेअर असेल. कालपासून ट्विटर वर मजेदार प्रतिक्रिया येतायेत.
17 Jun 2015 - 8:10 pm | श्रीरंग_जोशी
WATCH THE FIRST HD FOOTAGE OF EARTH FROM THE INTERNATIONAL SPACE STATION
19 Jun 2015 - 8:23 am | श्रीरंग_जोशी
Birth order stereotypes and why they're often wrong
22 Jun 2015 - 12:17 pm | एस
अफगाणिस्तानच्या संसदेवर हल्ला झालाय. संसदेबाहेर बॉम्बस्फोट झालाय आणि आवारात गोळीबारही सुरू आहे.
25 Jun 2015 - 6:32 pm | नाव आडनाव
जादा पैसे दिले तर अमर्याद एफएसआय!
जादा पैसे देऊन आता मुंबईत हवा तेवढा एफएसआय मिळू शकेल अशी तरतूद असणारे गृहनिर्माण धोरण युती सरकारने आणले आहे. या धोरणातील काही तरतुदींना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचाच विरोध होता; पण बिल्डरधार्जिण्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दवाब आणून या धोरणाचा मसुदा प्रकाशित करायला लावला आहे.
मज्जाच मज्जा :)
27 Jun 2015 - 2:31 am | वॉल्टर व्हाईट
गे मॅरेजेस बद्दल अमेरिकन सुप्रीम कोर्टाने LGBT सपोर्टर्सच्या बाजुने निर्णय दिला आहे. या निर्णयाने अमेरिकेच्या सगळ्या ५० राज्यात गे मॅरेजेस लिगल झाली आहेत.
28 Jun 2015 - 10:03 am | मदनबाण
आसाम मधे भुकंपाचे झटके !
5.6 magnitude earthquake felt in Assam on Sunday
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
29 Jun 2015 - 10:01 am | धर्मराजमुटके
बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना... तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले...
महाराष्ट्र टाईम्समधील ही बातमी
8 Jul 2015 - 11:58 am | मदनबाण
सावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
27 Jul 2015 - 8:35 am | श्रीरंग_जोशी
सकाळमधला सुधींद्र कुळकर्णी यांचा स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर क्युबा हा लेख वाचनीय आहे.
27 Jul 2015 - 9:27 pm | नूतन सावंत
ंमा.भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम यांचे आकस्मिक दुःखद निधन.भावपूर्ण श्रद्धांजली.
28 Jul 2015 - 7:13 pm | मी-सौरभ
:)
30 Jul 2015 - 8:47 am | कंजूस
आइडिआ आणि एरटेलने 3G data महाग केला कालपासून ३००रु/१जीबी.
रिलाअन्सने थोडे दिवस प्रमोशनल ओफर दिली रु२९० /३जी अनलिमेटिड
रेग्युलर १९७रु/३जी/१जीबी
कालपासून विंडोज १० सुरू झाली.pc/tablet/mobile सर्वांसाठी एकच ओएस.
30 Jul 2015 - 9:58 am | श्रीरंग_जोशी
हिंदी महासागरातील Réunion या फ्रेंच बेटाच्या किनार्यावर मोठ्या विमानाच्या विंग फ्लॅपचा तुकडा वाहून आला आहे.
हा तुकडा एम एच ३७० या फ्लाइटच्या विमानाचा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या १७ महिन्यांत प्रथमच या अपघातग्रस्त विमानाचा एखादा अवशेष प्रत्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
बातमी: Debris Is Thought to Come From Malaysia Airlines Flight 370.
मिपाकर गवि यांचा या अपघाताबाबतचा लेखः MH370 - फ्लाईट डीलेड..
30 Jul 2015 - 4:16 pm | कपिलमुनी
फ्रांस पासून लई लांब बेट घेऊन ठेवलाय ..
10 Aug 2015 - 6:16 pm | श्रीरंग_जोशी
काही महिन्यांपूर्वी मी रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंटरी प्रकल्पाविषयी मिपावर लिहिले होते.
या डॉक्युमेंटरीचा विशेष शो स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी पुण्यात आयोजित केला गेलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. लोकवर्गणीच्या माध्यमातून या प्रकल्पाला मदत करणार्या लोकांच्या नावाची यादी शेवटी दाखवली आहे. त्यात काही मिपाकरांचीही नावे आहेत.
RSVP via FB.
17 Aug 2015 - 5:14 am | श्रीरंग_जोशी
आज योगायोगाने काही प्रेरणादायी वाचायला मिळालं. वाईट लोकांच्या वाईट कर्मांविषयी नेहमीच चर्चिलं जातं. पण कधी चांगल्या लोकांच्या सकारात्मक योगदानाविषयी कळलं की समाधान वाटतं. अशीच एक प्रेरणादायी घडामोड.
Take a Gander at This Amazing, Yet Little Known, 9-11 Story
संबंधीत माहितीपट.
17 Aug 2015 - 10:21 pm | श्रीरंग_जोशी
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची प्रसिद्ध उपहारगृहांबाबत खालील लेखांत वाचायला मिळाले.
A Walk Down Memory Lane: Country's Famous Pre-Independence Eateries Part I, Part II.
यातील पंचम पुरीवालाबाबत मिपावर लेखन झालं आहे.
तसेच पुण्यातील आप्पांची खिचडी मी आठ वर्षांपूर्वी खाल्ली आहे :-) .