✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १

ग
गवि यांनी
Fri, 06/12/2015 - 11:06  ·  लेख
लेख
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि.. बातमीचा मजकूर , हेडलाईन, आणि तिची मूळ लिंक शेअर करणं.. तसंच त्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या लोकांना आपापली मतं देता येणं या कारणांसाठी कोणीही या धाग्यात बातमी आणि प्रतिसाद लिहू शकेल. वाचनाच्या सोयीसाठी शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यावेळच्या एखाद्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच नवा भाग सुरु करण्यात येईल. सध्या मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघाताची बातमी चर्चेत आहे. मॅगी थोडीथोडी मागे पडते आहे. म्यानमारच्या हद्दीत लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नेते आता इतर "शेजारी देशांना" गर्भित इशारे देताहेत. हे आधीपेक्षा वेगळं धोरण असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सुटी सिगरेट विकण्यावर बंदी आली आहे. चांगलं आहे. बाकी जगात काय विशेष ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36729 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

..पण रोज किंवा सतत बदलत राहते

गवि
Fri, 06/12/2015 - 17:28 नवीन
..पण रोज किंवा सतत बदलत राहते ही किंमत..म्हणजे उपरोक्त कॉम्प्लेक्स फॅक्टर्सची नोंद ठेवून रोज कोणीतरी आकडा जाहीर करत असणार....कोण आणि कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

माझ्या मते अनिर्बंध

काळा पहाड
Sat, 06/13/2015 - 23:07 नवीन
माझ्या मते अनिर्बंध अर्थव्यवस्थेत (कुणीतरी माझं मत खोटं असेल तर तसं सांगावं) आंतर वित्तीयसंस्था (इंटर बँक) मार्केट ठरवतं. म्हणजे एसबीआय ला जर १०० कोटी युएस डॉलर्स खरेदीची गरज असेल तर ती सिटीबँकेला, बँक ऑफ अमेरिकेला आणि आरबीएसला विचारणा करते. मी फक्त उदाहरण देतोय. ज्यांचा दर सर्वात कमी त्यांच्याकडून ते डॉलर्स खरेदी करतील. हा आंतर वित्तीयसंस्था दर आहे. हा तुम्हाला आणि मला मिळत नाही. कारण या बँकांचे एकमेकांशी संबंध आणि ज्या मोठ्या प्रमाणात ते ट्रान्झॅक्शन्स करतात त्या मुळे त्यांना वेगळा दर मिळतो. फॉरेक्स डिलर्स ना थोड्या चढ्या भावानं डॉलर्स मिळत असणार. ते त्यांचा फायदा त्यात अधिक करून हे रेट्स प्रसारित करतात. जो आकडा जाहीर होतो तो या बिड (म्हणजे मागणी दराचा) आणि आस्क (म्हणजे पुरवठा दराचा). थोडक्यात सांगायचं तर जशी शेअर्सची किंमत ठरते तशीच करन्सी ची सुद्धा. वेगवेगळ्या डिलर कडे हे आकडे वेगवेगळे असू शकतात. त्याचा फायदा आर्बिट्रेटर्स (म्हणजे तुम्ही एका डिलर कडून विकत घेवून दुसर्‍या डिलरला चढ्या भावानं विकू शकता) घेवू शकतात. पण असं होताच मार्केट दोन्ही दरामधल्या भावाशी स्थिर व्हायला सुरवात होते. इंटर बँक रेट कसे ठरवले जातात हे वेगवेगळ्या गोष्टीवरअरठरतं. निर्बंधित अर्थव्यवस्थेत सरकारची एखादी संस्था दर कृत्रिमरित्या ठरवते. अर्थात त्या संस्थेला त्यांच्या कडच्या फॉरेक्स रिझर्व्स ची काळजी घ्यावीच लागते नाही तर रिझर्व्स आटत जाण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी ही संस्था दर थोड्या महिन्यांनी किंवा वर्षांनी करन्सीचं अप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन (जशी परिस्थिती असेल त्या प्रमाणे) करते. भारताची काही वर्षापूर्वीची करन्सी रेट ठरवण्याची पद्धत निर्बंधित होती. पण सध्या ती अनिर्बंध प्रकारची आहे. सध्याची सर्वात वादग्रस्त निर्बंधित पद्धतीचं मुख्य उदाहरण म्हणजे चीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जालावर शोध घेतला असता विनिमय

खटपट्या
Fri, 06/26/2015 - 22:11 नवीन
जालावर शोध घेतला असता विनिमय दर हा निव्व्ळ मागणी आणि पुरवठा यांच्या प्रमाणावर अवलंबून असतो असे बहुतेकांचे म्हणणे आहे. सोप्या भाषेत चलन विकत घेणारे > चलन विकणारे = चलन विनिमय दरात घट चलन विकत घेणारे < चलन विकणारे = चलन विनिमय दरात वाढ प्रत्येक देशाची केंद्रीय बँक ही परकीय चलन देणारी एकमेव संस्था असते. त्यामुळे विनिमय दरातील चढ उतार हे देशातील चलनाची मागणी आणि पुरवठा तसेच परकीय चलनाची मागणी आणि पुरवठा यावरही ठरतात. भारताच्या बाबतीत - जर भारतीय चलनाची मागणी कमी असेल तर भारतीय चलनाचा दर उतरणार, आणि अमेरीकन डॉलर वधारणार, याचे परीणाम भारतीय चलन विनिमय दरात होणार. (थोडे गोंधळात टाकणारे आहे खरे. जाणकार अजून सोप्या भाषेत पटवून देतील अशी आशा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

भारत किती आयात आणि निर्यात

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 06/13/2015 - 09:45 नवीन
भारत किती आयात आणि निर्यात करतो ह्याच्यावर ह्याची किंमत अवलंबुन असते ना? जेव्ढी आयात वाढवु तेवढे जास्तं रुपये १ डॉलरसाठी मोजावे लागतात आणि वाईस वर्सा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे विनिमय दर, आंतरराष्ट्रीय

संदीप डांगे
Sat, 06/13/2015 - 10:14 नवीन
हे विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजार, रुपयाचे मूल्य वैगेरेवर कुणा जाणकार व्यक्तीकडून लेख आला पाहिजे राव. उगा ते राजकारण, ब्राहमण-अब्राहमण, जाती-धर्म यावर वेळ घालवण्यापेक्षा कामाची योग्य माहिती मिळाली तर फार बरं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

खरं सांगायचं तर सगळ्या टर्म्स

काळा पहाड
Sat, 06/13/2015 - 23:09 नवीन
खरं सांगायचं तर सगळ्या टर्म्स इंग्रजीमध्ये आहेत. मराठी आठवायचं तर प्रत्येक शब्दाला अडखळायला होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

समजू शकतो.

संदीप डांगे
Sun, 06/14/2015 - 09:44 नवीन
समजू शकतो. मी एक सुचवू का? म्हणजे दोन-चार जाणकार लोकांनी अशी एखादी माहितीपूर्ण लेखमाला आखून जरा वेळ घेऊन लिहिली तर मिपासाठी एक कायम स्वरुपी अ‍ॅसेट होईल. अगदी सामान्य माणसाला समजेल अशी उदाहरणे देऊन साध्या भाषेत लिहिलं तर बरं होइल. हे कठीण आहे हे मी जाणतोच पण झालं तर खूप बरं होईल. सामान्यांच्या व्यवहारात असूनही हे अर्थकारणाचे जग सामान्यांच्या आकलनाबाहेरच राहते याची खंत मात्र आहे. हे अर्थव्यवहार सामान्यांना समजू लागले तर त्यांच्या व्यवहारातपण त्यांना फायदा होईल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मिपाकर क्लिंटन यांचे लेखन पहा

बॅटमॅन
Mon, 06/15/2015 - 12:14 नवीन
मिपाकर क्लिंटन यांचे लेखन पहा. फायनान्सबद्दल मस्त लेख लिहिलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धन्यवाद! :-)

संदीप डांगे
Mon, 06/15/2015 - 13:30 नवीन
धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नोटांवर दगडांची चित्रे दिसताहेत...

बबन ताम्बे
Fri, 06/12/2015 - 16:55 नवीन
पुर्वी दगड्गोट्यांच्या बदल्यात खरेदी/विक्री करायचे की काय झिम्बाब्वेयियन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

रेल्वेचे तिकीट नाही मिळाले तर

कंजूस
Sat, 06/13/2015 - 07:31 नवीन
रेल्वेचे तिकीट नाही मिळाले तर विमानाचे मिळण्याचा पर्याय सुरू-कालपासून शंभरेक जणांनी घेतले.
  • Log in or register to post comments

च्यायला यांच्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/13/2015 - 08:04 नवीन
इराण सरकारने पुरुषांचे सामने पाहण्यास मर्यादित परवानगी दिली आणि बास्केटबॉल सामन्याला महिला प्रेक्षक उपस्थित राहील्याच्या निषेधार्थ कट्टरवाद्यांनी मोर्चा काढला. मला गम्मतच वाटते अशा बातम्यांची, सालं आपण कुठे चाललो काहीच कळत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

स्मार्टफोनच्या जमान्यात

धर्मराजमुटके
Sat, 06/13/2015 - 18:48 नवीन
स्मार्टफोनच्या जमान्यात क्वेर्टी आणि नॉन क्वेर्टी फोन पुर्णच बंद होऊन जातील काय ? सध्या बाजारात कीपॅडवाले जे पण फोन आहेत ते एकदमच सामान्य दर्जाचे आहेत. आय मिस यु नोकीया अँड क्वेर्टी फोन्स.
  • Log in or register to post comments

ही बहुधा जुनी बातमी आहे पण

संदीप डांगे
Sun, 06/14/2015 - 18:18 नवीन
ही बहुधा जुनी बातमी आहे पण आजच्या दैनिक दिव्यमराठीमधे वाचली: तरुणांच्या भावविश्वातील ड्रीम जॉबची स्थिती विदारक, सात हजार पायलट बेरोजगार १ कोटीपर्यंत खर्च करूनही नोकर्‍या नाहीत. स्वप्ने पुरी करतांना भरमसाठ पैसा खर्च करण्याआधी रोजगार-उपलब्धतेचा अभ्यास आवश्यक आहे हेच यातून अधोरेखित होत आहे. गविं चे मत अपेक्षित...
  • Log in or register to post comments

स्मार्टफोनच्या जमान्यात

कंजूस
Mon, 06/15/2015 - 07:08 नवीन
स्मार्टफोनच्या जमान्यात धर्मराजमुटके-Sat, 13/06/2015 - 18:48नवीन स्मार्टफोनच्या जमान्यात क्वेर्टी आणि नॉन क्वेर्टी फोन पुर्णच बंद होऊन जातील काय ?""""------- अगदी खरं आहे. ते नोकियाचे फोन सेफ लॅाकरमध्ये ठेवायची वेळ आली आहे. रणगाडे paton tanks आहेत.कोणतेही काम द्या अजूनही करतात.
  • Log in or register to post comments

भविष्यात

श्रीरंग_जोशी
Mon, 06/15/2015 - 07:43 नवीन
भविष्यात होईल ते होईल पण सध्या तरी जीव आहे म्हणायचा.
  • New Nokia 105: Same rock-bottom price, more storage
  • BlackBerry Passport - Factory Unlocked Smartphone - Black
  • BlackBerry Classic Smartphone - Factory Unlocked (Black)
पहिला दुवा एका नव्या फोनबाबत बातमी आहे. तर दुसरे दोन दुवे ब्लॅकबेरीचे गेल्या काही महिन्यांतील किबोर्ड फोन्सला मिलालेले चांगले व मोठ्या संख्येत असलेले युझर रिव्युज दाखवतात. अमेरिकेत ब्लॅकबेरीच्या क्वेर्टी किबोर्डने काही लेखकांनी आपली पुस्तकं लिहिली आहेत :-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ब्लॅकबेरीने त्यांचा प्रसेसर

कंजूस
Mon, 06/15/2015 - 08:41 नवीन
ब्लॅकबेरीने त्यांचा प्रसेसर बदलायला फारच वेळ घेतला,ओउस ही थोडी उशिराच उद्धरित केली ,इनक्रिप्शनमुळे इकडे सर्विस प्रवाइडर महागडा मासिक प्लान घ्यायला भाग पाडायचे आणि किंमत या कारणांमुळे फारच थोडे ग्राहक या ब्रांडकडे वळले.
  • Log in or register to post comments

बरोबर

श्रीरंग_जोशी
Mon, 06/15/2015 - 08:47 नवीन
तुमचे म्हणणे भारतीय बाजारपेठेबाबत बरोबर आहे. अमेरिकेत २००८ पर्यंत ब्लॅकबेरी युझर्सच्या संख्येत क्र. १ वर होतं. पहिले आयफोनने अन नंतर विविध अ‍ॅन्ड्रॉइड फोन्सनी त्यांचे संस्थान खालसा केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ही

नाखु
Mon, 06/15/2015 - 09:14 नवीन
ही घ्या. गुणवत्तेत पहिला गुण उधळण्यातही पहिला या आणि अश्या प्रकरणात पुढे शिक्षा होते का? त्याचा पाठपुरावा होतो का ? का सगळीकडे रसद पोहचवून शिल्लक रक्कम्+संपत्ती रिचवायला मोकळे? यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांना काय वाटते? प्रश्नार्थी नाखु
  • Log in or register to post comments

भारत विरुद्ध गुआम - विश्वचषक

वेल्लाभट
Mon, 06/15/2015 - 11:50 नवीन
भारत विरुद्ध गुआम - विश्वचषक फुटबॉल २०१८ पात्रता फेरीचा सामना उद्या म्हणजेच मंगळवारी. वेळ माहीत नाही. सोनी सिक्स च्या साईटवरही नाहीये. पण आहे एवढं नक्की.
  • Log in or register to post comments

अरे एवढा महत्वाचा सामना असून

खटपट्या
Mon, 06/15/2015 - 13:32 नवीन
अरे एवढा महत्वाचा सामना असून थेट प्रक्षेपण नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

आहे.

वेल्लाभट
Mon, 06/15/2015 - 13:36 नवीन
तेच म्हटलं. पण वेळ कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

गुआम देश कुठे आहे?

टवाळ कार्टा
Mon, 06/15/2015 - 13:36 नवीन
गुआम देश कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हो मीही पहील्यांदाच ऐकतोय !!

खटपट्या
Mon, 06/15/2015 - 13:54 नवीन
हो मीही पहील्यांदाच ऐकतोय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जालावर शोध घेतला असता.

खटपट्या
Mon, 06/15/2015 - 14:45 नवीन
जालावर शोध घेतला असता. ईंडोनेशीयाच्या भागात एक बारीक ठीपका दीसतोय. यांना तरी हरवा रे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हरवतील सर. बी पॉझिटिव्ह.

वेल्लाभट
Mon, 06/15/2015 - 14:54 नवीन
हरवतील सर. बी पॉझिटिव्ह. फुटबॉल इज अ स्लीपिंग मॉन्स्टर दॅट्स वेकिंग अप इन इंडिया. बघा क्रिकेट ला मागे टाकेल येत्या १० वर्षात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अहो, सर म्हणून लाजवू नका हो..

खटपट्या
Mon, 06/15/2015 - 16:39 नवीन
अहो, सर म्हणून लाजवू नका हो.. बाकी भारताच्या कामगीरीबद्द्ल नेहमीच आशावादी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

खेळाडू काय, चुकूनमाकून

बॅटमॅन
Mon, 06/15/2015 - 16:41 नवीन
खेळाडू काय, चुकूनमाकून ब्राझीलजर्मनीलाही हरवतील...ते एक असो. मेन मुद्दा हा की क्रिकेट हाच एकमेव खेळ मानणारे भारतीय तिकडे ढुंकूनही पाहतील किंवा नाही?????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

बरोबर, बर्‍याच लोकांना असे

खटपट्या
Mon, 06/15/2015 - 16:46 नवीन
बरोबर, बर्‍याच लोकांना असे सामने होतायत हेही माहीत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लाइव्ह

कपिलमुनी
Mon, 06/15/2015 - 16:54 नवीन
लाइव्ह प्रक्षेपण असेल आणि सोय असेल तर नक्की बघतील. भारतामध्ये भरपूर फुटबॉल प्रेमी आहेत .( ८० % वर्ल्डकप ते वर्ल्डकप उगवतात ते सोडा :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यावर थोडा डाऊट आहे, पण येस-

बॅटमॅन
Mon, 06/15/2015 - 17:05 नवीन
यावर थोडा डाऊट आहे, पण येस- आय वुड लव्ह टु बी प्रूव्हन राँग ऑन धिस वन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भारत हारला हि मॅच १-२ ने

धनावडे
Wed, 06/17/2015 - 00:57 नवीन
भारत हारला हि मॅच १-२ ने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

भुजबळांची बातमी

वॉल्टर व्हाईट
Wed, 06/17/2015 - 01:20 नवीन
भुजबळांबद्दलची बातमी बहुदा आजची सर्वात मोठी बातमी असावी. सत्तेत नसतांना सत्ताधार्‍यांचा गुडबुकात रहाणे ज्यांना जमत नाही त्यांनी निदान तोंडाळपणा करुन वैर तरी घेउ नये. शरद पवारांकडुन भुजबळ योग्य ते शिकले नाहीत हेच खरे. पवार कसे बरोबर मोदींच्या गुडबुकात आहेत, अशी कारवाई त्यांच्यावर आणि अजित पवारांवर होईल तेव्हा खरे अच्छे दिन आले असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

बातमी वाचली. काय माणसे आहेत!

रेवती
Wed, 06/17/2015 - 02:00 नवीन
बातमी वाचली. काय माणसे आहेत! हे माहित असलेले, जगापुढे आलेले आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे छापे पडतील असा अंदाज होताच! मग काय उपयोग? जे झाले तेही नसे थोडके, पण जो वेळ मिळाला त्यात काय काय झाले असेल त्याचा विचार केलेला बरा. झाल्या गोष्टींची पापे फेडणे असे काही होताना तर दिसत नाही. म्हणजे असे नसावेही. ज्याने त्याने कसे वागायचे हे ठरवणे इतकेच असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट

मिळालेला वेळ

वॉल्टर व्हाईट
Wed, 06/17/2015 - 02:16 नवीन
जे झाले तेही नसे थोडके, पण जो वेळ मिळाला त्यात काय काय झाले असेल त्याचा विचार केलेला बरा.
हे जेव्हा कधी काळी आपल्याला कळेल तेव्हा कळेल, तोवर फक्त अंदाज बांधु शकतो. सहाजिकच कोणीही अश्या वेळेस त्यांना सगळ्यात जास्त नुकसान पोहचवणार्‍या वस्तुंची उतरत्या क्रमाने यादी बनवेल आणि शक्य तितके नुकसान वाचवेल. आता धाडीत जर पैसा अडका, कागदपत्रे सापडली फक्त तर यापेक्षा धोकादायक असे काय गायब केले गेले हा प्रश्न राहीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

योगायोगाने, बाळासाहेबांना

काळा पहाड
Wed, 06/17/2015 - 15:54 नवीन
योगायोगाने, बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला असे दोन्ही 'मोहरे' या एकाच वर्षात देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. राणे आणि भुजबळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट

भुजबळांवरच्या कारवाई मधे भाजप

प्रसाद१९७१
Wed, 06/17/2015 - 16:50 नवीन
भुजबळांवरच्या कारवाई मधे भाजप पेक्षा त्यांच्या पक्षातल्या लोकांचाच हात असावा असे वाटते. भाजप आणि राका च्या राजात काहीतरी सेटींग असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

रिलायन्स जिओ ( ४जी) ला उत्तर

विजुभाऊ
Wed, 06/17/2015 - 15:42 नवीन
रिलायन्स जिओ ( ४जी) ला उत्तर म्हणून अनिल अंबाणींच्या आर कॉम कम्पनी ने सिस्टेमा शाम टेलीसर्व्हिसेस शी करार केलाय. या करारतून आर कॉम ने स्वतःचे भाग भांडवल कमी केलय. नक्की काय अर्थ घ्यायचा कराराचा? http://www.firstpost.com/business/rcom-sistema-m-ultimately-one-exit-2297704.html
  • Log in or register to post comments

काल डॉनल्ड ट्रंप नी

स्रुजा
Wed, 06/17/2015 - 19:19 नवीन
काल डॉनल्ड ट्रंप नी प्रेसिडेन्शिअल रेस मध्ये स्वतःचं नाव दाखल केलं. ओप्रा म्हणे सेकंड चेअर असेल. कालपासून ट्विटर वर मजेदार प्रतिक्रिया येतायेत.
  • Log in or register to post comments

आयएसएस मधून शहरांचे चित्रण

श्रीरंग_जोशी
Wed, 06/17/2015 - 20:10 नवीन
WATCH THE FIRST HD FOOTAGE OF EARTH FROM THE INTERNATIONAL SPACE STATION
  • Log in or register to post comments

एक रोचक संशोधन

श्रीरंग_जोशी
Fri, 06/19/2015 - 08:23 नवीन
Birth order stereotypes and why they're often wrong
  • Log in or register to post comments

अफगाणिस्तानच्या संसदेवर हल्ला

एस
Mon, 06/22/2015 - 12:17 नवीन
अफगाणिस्तानच्या संसदेवर हल्ला झालाय. संसदेबाहेर बॉम्बस्फोट झालाय आणि आवारात गोळीबारही सुरू आहे.
  • Log in or register to post comments

जादा पैसे दिले तर अमर्याद एफएसआय!

नाव आडनाव
गुरुवार, 06/25/2015 - 18:32 नवीन
जादा पैसे दिले तर अमर्याद एफएसआय! जादा पैसे देऊन आता मुंबईत हवा तेवढा एफएसआय मिळू शकेल अशी तरतूद असणारे गृहनिर्माण धोरण युती सरकारने आणले आहे. या धोरणातील काही तरतुदींना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचाच विरोध होता; पण बिल्डरधार्जिण्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दवाब आणून या धोरणाचा मसुदा प्रकाशित करायला लावला आहे. मज्जाच मज्जा :)
  • Log in or register to post comments

गे मॅरेजेस बद्दल निर्णय

वॉल्टर व्हाईट
Sat, 06/27/2015 - 02:31 नवीन
गे मॅरेजेस बद्दल अमेरिकन सुप्रीम कोर्टाने LGBT सपोर्टर्सच्या बाजुने निर्णय दिला आहे. या निर्णयाने अमेरिकेच्या सगळ्या ५० राज्यात गे मॅरेजेस लिगल झाली आहेत.
  • Log in or register to post comments

आसाम मधे भुकंपाचे झटके !5.6

मदनबाण
Sun, 06/28/2015 - 10:03 नवीन
आसाम मधे भुकंपाचे झटके ! 5.6 magnitude earthquake felt in Assam on Sunday

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments

जेव्हा संवेदना मृत्यू पावतात…

धर्मराजमुटके
Mon, 06/29/2015 - 10:01 नवीन
बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना... तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले... महाराष्ट्र टाईम्समधील ही बातमी
  • Log in or register to post comments

सावधान! भारतीय बाजारात चीनचा

मदनबाण
Wed, 07/08/2015 - 11:58 नवीन
सावधान! भारतीय बाजारात चीनचा प्लास्टिक तांदूळ मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
  • Log in or register to post comments

स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर क्युबा

श्रीरंग_जोशी
Mon, 07/27/2015 - 08:35 नवीन
सकाळमधला सुधींद्र कुळकर्णी यांचा स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर क्युबा हा लेख वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments

ंमा.भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.ए

नूतन सावंत
Mon, 07/27/2015 - 21:27 नवीन
ंमा.भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम यांचे आकस्मिक दुःखद निधन.भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

१०० वा प्रतिसाद

मी-सौरभ
Tue, 07/28/2015 - 19:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा