चर्चा

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
27 Mar 2017 - 11:04 am

चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-b...)

माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.

हल्लीच काय खरेदी केलंत ?

गवि's picture
गवि in काथ्याकूट
8 Mar 2017 - 12:11 pm

अमेझॉनकृपेने किंवा लोकल बाजारात काहीना काही खरेदी चालूच असते. रीटेल थेरपीचा वापर वाढतोच आहे.

एखाद्या अतिभव्य मॉलपासून ते गावच्या आठवडी बाजारापर्यंत कुठेही काहीतरी खास हवं असलेलं मिळून जातं अतीव समाधान किंवा भ्रमनिरास होतो.

कदाचित इकडेतिकडे चार रिव्ह्यूज टाकले जातात आणि ती वस्तू मागे पडते.

तर एकंदरीत आपण खरेदी केलेल्या सामानाबद्दल काही सांगावंसं वाटलं तर इथे नोंदवून ठेवावं अशी इच्चा आहे.

वाळूमाफिया कोण असतात? काय करतात?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
3 Mar 2017 - 2:27 pm

बऱ्याचदा वर्तमानपत्रात "वाळूमाफिया/ रेतीमाफिया" हे शब्द ऐकिवात आले आहेत. पण यांच्या "व्यवसायाची" सखोल माहिती कधी कुठे वाचली नाही. मला काही प्रश्न आहेत

१. वाळूमाफिये नेमके काय काम करतात? किती पैसे कमावतात?

२. त्यामुळे निसर्गाला कांय धोका होतो?

३. जर भविष्यात बांधकामासाठी वाळूच नाही मिळाली तर त्याचे काय परिणाम होतील? हा प्रॉब्लेम जगात कुठे निर्माण झाला आहे का?

किंडल वरची टायपिंग मिस्टेक नसलेली चांगली मराठी पुस्तके कोणती?

अत्रे's picture
अत्रे in काथ्याकूट
26 Feb 2017 - 12:05 am

काही दिवसांपूर्वी किंडल वर "का रे भुललासी वरलीया रंगा" - व पु काळे (प्रकाशक: मेहता) हे इ-बुक विकत घेतले. त्यात बर्याच काना/मात्रा/ वेलांटीच्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. म्हणून मी म्हटले की इथून पुढे इ-पुस्तक घेण्याआधी लोकांना विचारावे आणि मगच घ्यावे.

कोणी किंडल वर घेतलेली वाचनीय आणि टायपिंग मिस्टेक नसलेली पुस्तके सुचवू शकेल काय?

धन्यवाद!

आकर्षण, प्रेम आणि जवळीक

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
10 Feb 2017 - 7:48 pm

आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.

हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?

नवीन थीमबाबत चर्चा

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
1 Jan 2017 - 1:40 am

नमस्कार,

आज मिपाला एक नवीन रूप आहे. याला नवीन थीम असं म्हणू या. या नवीन थीमबाबत तुमचं मत काय? यातील काय आवडलं? काय नाही आवडलं? ते नक्की लिहा.
या रंगरूपासोबत आपण मिपाची ठेवण बदलायला सुरुवात केलीये. एखादं नवीन लेखन करताना जोडायचे संबंधित टॅग आता सहज जोडता येतील. नवीनसुद्धा जोडता येतील.
आजपासून प्रत्येक सदस्याला आपला फोटो लावता येईल. सर्वांना विनंती आहे की त्यांनी 'माझे खाते'मध्ये जाऊन आपला फोटो लावून घ्यावा.

याशिवाय यापुढे काही काळ हे बदल होत राहतील, त्या बदलांबाबतसुद्धा येथेच चर्चा व्हावी.

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

बार्नी's picture
बार्नी in काथ्याकूट
20 Nov 2016 - 11:11 am

माझ्या एका मित्राला तू मराठी फिल्म्स का बघत नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the brahmins , by the brahmins , for the brahmins " आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे ,
उदा .
१) मराठी फिल्म इंडस्ट्री तील बहुतेक कलाकार ब्राह्मण आहेत .

२) मराठी टीव्ही मालिका मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , विदर्भ किंवा मराठवाडा येथील भाषा क्वचित असते .

द स्केअरक्रो - अँड्रॉइड बुक अँप

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in काथ्याकूट
3 Oct 2016 - 9:29 am

नमस्कार मंडळी,
मिपा वरील बोका ए आझम ह्यांनी अनुवाद केलेली 'द स्केअरक्रो' हि कादंबरी अनेक वाचन प्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. ह्या दीर्घ कादंबरीच्या अनुवादा साठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे मिपाकरांनी आपल्या प्रतिक्रियांतून कौतुकही केले आहे. त्यांची हि कादंबरी जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड बुक अँप च्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे वाचक ती ऑफलाईन पण वाचू शकतील अर्थातच मोफत. हे Book app केवळ 4.4 Mb चे आहे जे आपण खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.

लोकांमध्ये वाचनाची आवड वाढण्यासाठी 'Booklet' चळवळ

माधव's picture
माधव in काथ्याकूट
21 Sep 2016 - 12:28 am

नमस्कार मंडळी,
श्री. अमृत देशमुख नावाचे एक सद्गृहस्थ आहेत. ते प्रत्येक आठवड्याला एक बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश (बुकलेट) लिखित व ऑडिओ मध्ये तयार करून व्हाट्सअँपवर पाठवतात. हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. श्री. अमृत हे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून "मेक इंडिया रीड' हा उपक्रम चालवतात.

मी या उपक्रमाचा सभासद आहे व गेले 3 आठवडे त्यांच्या बुकलेटचा आस्वाद घेत आहे.

मजार की मझार

दिव्य's picture
दिव्य in काथ्याकूट
27 Aug 2016 - 7:06 pm

हजी अली दर्जासंदर्भातील बातमी अाज वाचली. या बातमीत काही वर्तमानपत्रात मजार तर काही ठिकाणी मझार हा शब्द वापरला अाहे. मराठीत याेग्य शब्द काेणता