सदस्यहो..
हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. एकोळी धागे, मदत हवी, माहिती हवी, प्रश्न पडला आहे, अशा प्रकारचे अनेक धागे येतात. आणि त्याहून जास्त धागे अनेकांच्या मनात असूनही "केवळ एक शंका, प्रश्न विचारण्यासाठी कुठे धाग्याची मांडणी करणार?" अशा विचाराने काढलेच जात नाहीत.
एका ओळीत प्रश्न विचारावा तर धाग्याचं "मटेरियल" होत नाही आणि एकोळी म्हणून धोरणानुसार तो अप्रकाशित होतो.
त्यामुळे सदस्यांनी एकमेकांना आपल्या मनात येणारे प्रश्न किंवा एखाद्या विषयावर माहिती नसल्यास ती मिळवणं अशा कारणांसाठी कोणीही या धाग्यात प्रतिसाद लिहू शकेल. रोचक प्रश्न किंवा अडचणी, मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या का असेनात, इथे विचारा. त्या क्षेत्रातली माहिती असलेले अनेकजण इथे असण्याची खूप शक्यता आहे.
शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. आणखी एक पान जोडलं जाईल. त्यामुळे वाचनातली सोयीस्करपणा राहील.
शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यानंतरच्या एखाद्या नवीन प्रश्नाचा नवीन धागा त्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच सुरु करण्यात येईल. प्रश्न छोटे, मोठे, साधे, क्लिष्ट कसेही असोत.
माझ्या मनातला सध्याचा प्रश्न असा की:
कार / वाहनाच्या इंजिनबाबत बोलताना "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" असे दोन शब्द वापरले जातात. एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
प्रतिक्रिया
12 Jun 2015 - 11:36 am | कंजूस
सर्वात प्रथम संपादक मंडळाला धन्यवाद इतक्या जलदगतीने हवा असलेला धागा-सदर आणि। तेसुद्धा एक नाहीतर दोन शुरू केलेत. एक हा छोटे प्रश्न विचारण्यासाठी आणि एक बातम्यांकडे लक्ष वेधून त्यावर चर्चा करण्यासाठी.
गवि,तुमच्या वरच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेच.एक प्रश्न जो मी सकाळी या धाग्यानिमित्त संपामंडळाला विचारता होता तोही इथे डकवतो- टॅावरमधल्या वाढत्या आगी आणि त्यात अग्निशमनदलाचेच कर्मचारी बळी का पडताहेत?लिफ्टच्या वापरातूनही अधिक धोका निर्माण झाला आहे.प्रशिक्षणात काही चूक आहे का?
12 Jun 2015 - 11:42 am | सुनील
दोन्ही संकल्पना (छोटे प्रश्न आणि बातम्या) 'शेजारधर्मातून' आल्या असल्या तरी आहेत स्तुत्यच!
बेपर्वाई आणि प्रशिक्षणाचा अभाव, ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच कारणीभूत आहेत ह्या दुर्घटनांना.
12 Jun 2015 - 11:55 am | गवि
..निश्चित..अनुकरणीय ते अनुसरावे यात सर्वांचा आनंद असतो.
...एकोळी धागे अप्रकाशित होऊ नयेत आणि उलट त्यातून माहिती पुढे यावी याकरिता हे धागे.
12 Jun 2015 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत उपयोगी उपक्रम !
आग लागण्याची कारणे आणि अग्निशमन करताना होणार्या दुर्घटनांची महत्वाची कारणे...
(अ) मोठ्या इमारतींच्या बांधकामात आवश्यक असणार्या सर्व सुरक्षयोजना बांधण्यात बेपर्वाई, अज्ञान आणि/अथवा केवळ फायद्याकडे पाहून यामुळे बिल्डर्स करत असलेली हयगय.
(आ) बिल्डर्सच्या बेपर्वाईने आणि/अथवा संगनमताने दुर्लक्ष करणारे शासकिय अधिकारी.
(इ) इमारतीत राहणार्या लोकांची सुरक्षितेबद्दलची बेपर्वाई.
(ई) भरतीपूर्वी अपुरे शिक्षण आणि भरतीनंतरच्या सततच्या शिक्षणाचा (कंटिन्युईंग प्रोफेशनल डेवलपमेंट) अभाव असणारे अग्निशमन दलातील कर्मचारी.
(उ) अग्निशमक दलातील कर्मचार्यांसाठी आवश्यक असलेल्या संरक्षक सामग्रीचा अभाव व अपुरेपणा आणि त्याकडे होणारे अक्षम्य शासकिय दुर्लक्ष.
12 Jun 2015 - 2:18 pm | मोदक
+१११११
बहुदा वरील मुद्द्यांमध्ये याचा समावेश झाला असावा. तरीही देत आहे.
१) बिल्डरने सुरक्षिततेच्या मुद्द्याला संपूर्णपणे फाट्यावर मारून फक्त "कम्प्लीशन सर्टिफिकेटसाठी" केलेली पूर्तता म्हणून बसवलेली कुचकामी यंत्रणा
२) अग्नीशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्यामुळे वाढलेली आगीची तीव्रता. याला कारणीभूत असलेली रस्त्यांची दुरावस्था किंवा त्या अनुषंगाने असलेल्या सर्व गोष्टींचा अभाव.
आपण साध्या साध्या बाबी सहज पडताळू शकतो.
१) आगीचा बंब, पाण्याचा टॅंकर आणि इतर वाहने आपल्या सोसायटीमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करू शकत आहेत का..? दोन इमारततींच्या दरम्यान असलेल्या वायर, केबल किंवा वाटेत उभी असलेली वाहने अशा क्षुल्लक गोष्टी बहुमुल्य वेळ वाया घालवू शकतात.
२) इमारतीमध्ये बसवलेली यंत्रणा वर्षानुवर्षे बंद असते त्यामुळे त्या पाईप ला चिरा जावून पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्या पाईपचे आयुष्य वाढवण्यासाठी ती गुंडाळी सोडवणे व बाहेर काढून नीट तपासून गुंडाळणे आवश्यक असते.
३) Fire Extinguisher असतील तर त्यांचे आयुष्य पडताळावे लागते व वेळोवेळी आपल्या भागातील Fire Department कढून प्रमाणीत करून घ्यावे लागते.
12 Jun 2015 - 12:15 pm | सुबोध खरे
गवि साहेब
एकाच आकारमानाच्या इंजिनात एका वेळेस इंधन किती जाईल आणि कसे जळेल त्यावर त्याची शक्ती अवलंबून असते.
उदा १०० सी सी च्या चार मोटार सायकल बाजारात आल्या. १९८४-८५ मध्ये यात हिरो होंडा CD १००-- ७. ० बी एच पी होती पण ४ स्ट्रोक ची असल्यामुळे तिचे मायलेज ७०-८० होते. इंड सुझुकी ८. ५ बी एच पी होती पण मायलेज ५० ते ५५ होते. बजाज कावासाकी KB १०० ची शक्ती १० बी एच पी होती पण मायलेज ५० होते आणि सर्वात शक्तिमान यामाहा RX १०० -- ११ बी एच पी होती पण मायलेज ४५ होते.
आपल्या भाषेत सांगायचे तर तेवढ्याच आकाराचे विमानाचे इंजिन टर्बो प्रॉप कि टर्बो फ्यान आहे कि टर्बो जेट आहे कि राम जेट आहे यावर त्याची शक्ती अवलंबून असते.
12 Jun 2015 - 1:56 pm | मोहनराव
डोळ्याचा नंबर (चष्मा) घालवण्यासाठी लेझर प्रक्रीया किती लाभदायक आहे? ती आयडियली कधी करावी? किती खर्च येऊ शकतो.?
याचे काही दुष्परीणाम आहेत का?
12 Jun 2015 - 2:39 pm | आदूबाळ
मी २००८ साली ही शस्त्रक्रिया करून घेतली. एका डोळ्याला उणे १२ आणि दुसर्याला उणे १० नंबर होता. चष्मा फुटला तर तळहातावरच्या रेषाही दिसत नसत.
आमच्या फ्यामिली ऑप्थेल्मॉलॉजिस्टनेच शस्त्रक्रिया केली. नंबर पूर्णपणे गेला.
कधी करावी हे ऑप्थेल्मॉलॉजिस्टच सांगू शकतील. आमच्या ऑप्थेल्मॉलॉजिस्टने ३ वर्षं थांबायला लावलं होतं.
खर्च रु. ३५,००० आला. लेसिक शस्त्रक्रिया कॉस्मेटिक सर्जरी प्रकारात मोडत असल्याने इन्शुरन्समध्ये कव्हर झाली नाही.
पुढे साधारण वर्षंभर डोळे कोरडे पडायचा त्रास झाला. पण ते हळूहळू कमीकमी होत गेलं.
12 Jun 2015 - 2:58 pm | कपिलमुनी
काही वर्षांनी पुन्हा नंबर येतो असा ऐकला आहे.
तुमचा अनुभव काय आहे ?
12 Jun 2015 - 3:07 pm | आदूबाळ
सोळा-अठरा तास डोळ्यांचा हेवी उपयोग करूनही सात वर्षांत तरी नाही आला. (लाकूड-स्पर्श)
पुढे काय माहीत...?
12 Jun 2015 - 4:25 pm | मोहनराव
माहितीबद्दल धन्यवाद. माझ्या दोन्ही डोळ्यांचा नंबर जास्त नाहिये. १.७५ व २.२५ आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी की न करावी अशा संभ्रमात आहे.
12 Jun 2015 - 4:29 pm | कपिलमुनी
कधी रे झाला ?
12 Jun 2015 - 4:32 pm | मोहनराव
झाला रे काळानुरुप... काय करणार.. बुढापा पास आ रहा है!! :)
12 Jun 2015 - 4:29 pm | कपिलमुनी
कधी रे झाला ?
12 Jun 2015 - 5:13 pm | अजया
या नंबरला लेन्सेस पण वापरता येतील.सर्जरीची काय गरज?
12 Jun 2015 - 5:20 pm | गिरकी
लेन्सेस वापरणे सेफ असते का? मध्ये काहितरी स्वयंपाक करताना उष्णतेमुळे लेन्सेस डोळ्याला चिकटून डोळे गेले वगैरे असलं थोबाडपुस्तकावर वाचलेलं होतं. फाट्यावर मारण्याएवढी अतिशयोक्ती असतेच तिकडे. पण खरेच, लेन्सेस चूज कशा कराव्या? आमच्या घरी डोळ्यात फॉरेन ऑब्जेक्ट घालायची नाही येवढेच कारण देऊन नकार घंटा वाजत असते.
12 Jun 2015 - 5:51 pm | मधुरा देशपांडे
अजयाताईशी बाडीस. कमी नंबर असेल तर लेन्सेस बर्या पडतात. माझा -२.५ आणि -१.७५ आहे. त्यात एका डोळ्याला सिलिंड्रिकल (Astigmatism) नंबर. मी वापरते लेन्सेस. काहीही त्रास होत नाही. उलट फार बरं वाटतं दिवसभर चश्मा न लावता. संगणकावर सगळे काम असले तरीही सलग ८-१० तास काही अडचण येत नाही. घरी गेले की चश्मा.
मी सुरुवातीपासुन मंथली डिसपोजेबल वापरते म्हणजे चुकुन एखादी खराब झालीच, तरी नुकसान कमी होते. चांगल्या ब्रँडच्या कुठल्याही सॉफ्ट लेन्सेस वापरल्या तरी हरकत नाही.
लेन्सेस घालुन झोपायचे नाही, डोळे चोळायचे नाहीत या बेसिक प्रीकॉशन्स. एकदा सवय झाली की हे न ठरवताही जमते. अजुन एक काळजी म्हणजे शक्यतोवर मिरच्या, कांदा चिरुन मग नंतर चुकुन डोळ्याला हात लावला तर त्रास होतो, पण ही काही फार मोठी कटकट होत नाही. कांद्याने डोळ्यातुन कितीही पाणी काढले तरीही लेन्सेस व्यवस्थित राहतात. ;) हे अर्थातच रोज रोज होऊ नये पण चालतं. टु व्हीलर चालवताना हेल्मेट वापरायचे त्यामुळे तेव्हाही डोळ्यात काही जाण्याचा त्रास व्हायचा नाही. उन्हाळ्यात सुर्यचश्मा लावता येतो ही एक माझ्यासाठी आनंदाची बाब. :)
मोठ्या प्रवासात शक्यतो टाळायचे लेन्सेस. नेहमीसाठी त्या लेन्सेसची डबी आणि क्लीनिंग लिक्विड पर्समध्ये ठेवावे लागते ही जरा कटकट, पण कंफर्ट जास्त महत्वाचा. :)
मला लग्नात लेन्सेस घालुन मी खूप रडले तर काय, याचे भयंकर टेन्शन आले होते, प्रत्यक्षात मी शिस्तीत रडण्याआधी काढुन ठेवल्या. ;)
12 Jun 2015 - 9:34 pm | जुइ
मी जवजवळ २-३ वर्ष सॉफ्ट लेन्स वापरल्या आहेत. काही त्रास झाला नाही उलट खूप सुटसुटीत वाटते. लेन्सही कशाला वापरायच्या म्हणून लेसरची ट्रीटमेंट घेतली. बरेच वर्ष झाली डोळ्यांना कोणताही त्रास नाही.
13 Jun 2015 - 6:27 am | अनन्त अवधुत
+१ लेन्सेस ने त्रास होत नाही. डोळे लेन्सेस साठी योग्य आहेत अथवा नाहीत ते बघून लेन्सेसचा पर्याय स्वीकारा. लेन्सेस लावायचा सराव डॉक्टर करून घेतात. सुरुवातीला त्रास होतो, वेळ लागतो पण सरावाने विनात्रास लेन्सेस लावणे आणि काढणे साधता येते.
संगणक अथवा टीव्ही समोर फार वेळ बैठक असेल तर लेन्सेस टाळा. कारण फार वेळपर्यंत संगणक अथवा टीव्ही समोर बसलात तर लेन्सेस कोरडे होण्याची शक्यता आहे. त्याने डोळे लाल होतात , जळजळतात.
लेन्सेस ची काळजी चष्म्यापेक्षा जास्त घ्यावी लागते. वेळच्यावेळी लेन्सेस काढून ठेवणे , लेन्सेस चांगल्या सोलुशन मधेच ठेवणे, वगैरे. मुदत संपल्यावर किती वापर केलाय याचा विचार न करता लेन्सेस टाकून देणे योग्य. लेन्सेस ची योग्य काळजी नाही घेतली तर त्याने डोळ्याला अल्सर सुद्धा होऊ शकतो (लेन्सेस चा सराव करताना डॉक्टर ने लेन्सेसची आर होते, त्याचा हा गोषवारा)
Astigmatism कॉमन आहे पण तरीही सगळ्या लेन्सेस astigmatism साठी योग्य नाहीत. त्यामुळे लेन्सेस घेताना हा पण एक मुद्दा पाहून घेणे. माझ्या लेन्सेस ला astigmatism correction नाही पण चष्म्याला आहे.
बाकी माहिती डॉक्टर देतीलच.
अवांतर:
तुमचा चष्मा दूरचा असेल तर संगणक / टीव्ही साठी एक शून्य नंबरचा antiglare चष्मा आणि गाडी चालवायला , बाहेर फिरायला prescribed sunglasses घेऊ शकता
1 Jul 2015 - 6:22 am | सविता००१
मी तर गेली ८ बर्षे वापरते आहे मंथली डिसपोजेबल लेन्सेस. काहीही त्रास होत नाही. आणि ....
लेन्सेस घालुन झोपायचे नाही, डोळे चोळायचे नाहीत या बेसिक प्रीकॉशन्स. एकदा सवय झाली की हे न ठरवताही जमते. अजुन एक काळजी म्हणजे शक्यतोवर मिरच्या, कांदा चिरुन मग नंतर चुकुन डोळ्याला हात लावला तर त्रास होतो, पण ही काही फार मोठी कटकट होत नाही. कांद्याने डोळ्यातुन कितीही पाणी काढले तरीही लेन्सेस व्यवस्थित राहतात. ;) हे अर्थातच रोज रोज होऊ नये पण चालतं. टु व्हीलर चालवताना हेल्मेट वापरायचे त्यामुळे तेव्हाही डोळ्यात काही जाण्याचा त्रास व्हायचा नाही. उन्हाळ्यात सुर्यचश्मा लावता येतो ही एक माझ्यासाठी आनंदाची बाब. :)
मोठ्या प्रवासात शक्यतो टाळायचे लेन्सेस. नेहमीसाठी त्या लेन्सेसची डबी आणि क्लीनिंग लिक्विड पर्समध्ये ठेवावे लागते ही जरा कटकट, पण कंफर्ट जास्त महत्वाचा. :) हे अगदीच सेम. नवीन नवीन स्वैपाक करायला लागल्यावर या गोष्टीचा त्रास अजुन आठवतो. जरा जरी मिरची, कांदा चिरून स्वच्छ हात धुवून जरी लेन्सेस घालायच्या म्हटलं तरी डोळे खूप चुरचुरतात. पण नंतर आपण आपली कामं आणि लेन्सेस यातलं आधी काय हे आपोआप ठरवू लागतो.
मला लग्नात लेन्सेस घालुन मी खूप रडले तर काय, याचे भयंकर टेन्शन आले होते, प्रत्यक्षात मी शिस्तीत रडण्याआधी काढुन ठेवल्या. ;) - हे अजून भारी. मी लेन्स सकट रडारड केली. काही त्रास झाला नाही-लेन्सेस चा ;)
12 Jun 2015 - 6:12 pm | मोहनराव
मी लेन्सेस वापरुन पाहिल्या आहेत. मला खुपदा त्रास झाला त्याचा. डोळे दुखतात. सकाळी लेन्स चढवायला १५-२० मिनिटे जायची. परत डोळ्यात काही गेले तर प्रॉब्लेम. ४-५ हजार खर्च करुन चांगल्या करुन इकडे परदेशात घेउन आलो. पण आता तश्याच पडुन आहेत. त्यापेक्षा चष्मा सोईस्कर वाटतो मग.
12 Jun 2015 - 6:23 pm | मधुरा देशपांडे
तुम्ही डॉ.शी याबाबत बोलला आहात का? म्हणजे काही केसेस मध्ये लेन्सेसने प्रॉब्लेम होऊ शकतो पण सहसा नाही. अगदी सुरुवातीला मलाही १५-१५ मिनिटे लागायची आणि फक्त चिडचिड व्हायची. पण सवय झाल्यानंतर मात्र २ मिनिटे देखील खूप झाली. गेली ५ वर्ष मी रेग्युलर लेन्सेस वापरते पण डोळे दुखणे, काही इन्फेक्शन असेही काहीच झाले नाही. जेव्हा पोलन्सचा सीझन असतो, तेव्हा अॅलर्जीसारखे वाटले तर फक्त २-३ दिवस टाळते.
12 Jun 2015 - 6:22 pm | आदूबाळ
धत् तेरे की... हा काय नंबर आहे?! ;)
(ह घ्या)
12 Jun 2015 - 3:03 pm | आनंदी गोपाळ
ऑपरेशन फेल झाल्यास जास्तीत जास्त काय नुकसान होईल? हा प्रश्न तुमच्या डाक्टरांना विचारून पहा. त्याचे उत्तर मिळाल्यानंतर निर्णय घ्या.
15 Jun 2015 - 11:50 pm | रेवती
माझ्या नणदेनी करून घेतली होती. तिला ३ की ४ असे काहीसे नंबर्स होते. दोन चार दिवसांची काळजी घेतली. हे प्रकरण निदान १८ वर्षांपूर्वीचे तरी असावे. खर्च अदूबाळ म्हणतात त्यापेक्षा कदाचित कमी असावा. माहित नाही. पण डोळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे.
30 Jul 2015 - 7:48 pm | अकिलिज
लेझर प्रक्रियेमध्ये कोंर्नियाला जो छेद देतात तो ब्लेडने न देता लेझरनेच देणारी करा. किंवा आजकाल छेद न देताही लेझर करता येणारी प्रक्रिया आली आहे. थोडी महाग आहे इतकंच.
12 Jun 2015 - 5:51 pm | मॅक
12 Jun 2015 - 6:21 pm | खटपट्या
आपल्याला शेअर मार्केटबद्दल माहीती असल्यास आपण डेली ट्रेडींग करु शकता. मार्केट बद्द्ल माहीत नसल्यास प्रशीक्षण घेउ शकता.
(साध्या भाषेत हा जुगार आहे. योग्य व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय करु नये)
12 Jun 2015 - 7:48 pm | कंजूस
लॉजिस्टिक्स -बंदरात बोटी येतात त्यांच्या मालाचे नियोजन करता येईल.
12 Jun 2015 - 8:10 pm | असंका
सगळे उत्तमोत्तम/ आवडते वगैरे धागे एकत्र कुणी ठेवले आहेत का हो? समजा आपल्या स्वतःच्या प्रोफाइलवर?
12 Jun 2015 - 8:29 pm | सतिश गावडे
संपर्क करा: श्रीरंगरावजी जोशी पाटील
12 Jun 2015 - 8:27 pm | सतिश गावडे
मोबाईल संगणकाच्या युयसबीने चार्ज केल्यास खूपच मंद गतीने चार्ज होतात हे आज कळले. :)
12 Jun 2015 - 8:54 pm | लंबूटांग
USB 2.0 असल्यास ढोबळमानाने दुप्पट वेळ लागतो कारण त्याच्यातून फक्त ५०० मिली अॅम्पिअर इतकाच विद्युतप्रवाह येतो. USB 3.0 असल्यास ९०० मिअॅ इतका प्रवाह येतो. सर्वसाधारणपणे जे आपल्या भिंतीतल्या outletमधे जाणारे चार्जर असतात ते १००० मिअॅ इतक्या प्रवाहाने चार्ज करतात.
सर्वसाधारण पणे तुमच्या फोनमधे १५०० मिअॅअवर (mAh) ची बॅटरी असते. त्यामुळे तिला wall outlet च्या चार्जर ने दीड तास लागेल पण USB 2.0ने १५००/५०० म्हणजेच ३ तास वेळ लागेल.
ह्याच कारणास्तव शक्यतो एका उपकरणाचा चार्जर दुसर्या उपकरणासाठी वापरू नये कारण जर का एखादा चार्जर २००० मिअॅने चार्ज करत असेल आणि तुमचा फोन तितका प्रवाह वापरण्यास सक्षम नसेल तर खराब होऊ शकतो.
माझ्या आठवणी प्रमाणे अॅपलने आपल्या आयपॅड साठी अजून जास्ती मिअॅ चा चार्जर बनवला होता पण तो केवळ १.२ मिअॅ इतकाच होता त्यामुळे iPhone वगैरे खराब झाले नाहीत पण बर्याच लोकांना iPhone चे चार्जर वापरून iPad चार्ज करणे शक्य होत नव्हते. तसेच iPad तुमच्या PC चा USB पोर्ट वापरून अजिबातच चार्ज होत नसे. आता परिस्थिती बदलली असेल तर कल्पना नाही.
माझ्या सद्ध्याच्या नोकरीच्या लॅपटॉप मधे एक USB port केवळ charging साठी dedicated आहे (त्यावर बॅटरीचे चिन्ह आहे) आणि त्याला फोन चार्जिंग ला लावल्यास पटकन चार्ज होतो.
1 Jul 2015 - 5:27 pm | gogglya
जर चार्जर चे विभवान्तर सारखेच असेल [ ५ v ], तर जास्त अॅम्पिअर च्या चार्जर ने काहिही फरक पडत नाही. आपल्या घरात जसे २४० v ला १० w चा बल्ब लावा किंवा २००० w चा गीझर लावा, तसेच...
28 Jul 2015 - 11:33 pm | लंबूटांग
व्होल्टेज, Ampere आणि Wattage मध्ये.
V=IR त्यामुळे 5V च्या charger मधून वेगवेगळ्या mA चा विद्युतप्रवाह पाठवता येऊ शकतो. तसेच १२ V च्या charger मधून 1 mA current पाठवू शकतो. मात्र तुमचे उपकरण केवळ ५V व्होल्टेज साठीच प्रमाणित असेल तर ते जळून जाईल.
यामुळेच अमेरिकेतील उपकरणे जी १२०V वर चालतात ती भारतात आणली असता त्यांना स्टेप down transformer लावावा लागतो.
या उलट W = VI
तुम्ही जे उदाहरण दिले आहे ते त्याचा अर्थ एवढाच होतो की तो बल्ब १०/२४० = ०.०४१६६६६.. A इतका प्रवाह (current) वापरतो तर गीझर २०००/२४० = ८.३३३ A इतका प्रवाह वापरतो.
येथे http://www.helcohi.com/sse/body/hp.html व्होल्टेज करंट आणि Wattage मधील फरक छान समजावला आहे.
14 Jun 2015 - 11:09 am | ऋतुराज चित्रे
६-७ वर्षांपुर्वी Lars and the Real girl हा इंग्रजी सिनेमा बघण्यात आला होता. एका सेक्स डॉलच्या प्रेमात पडलेल्या तरुण युवकाची विनोदी अंगाने जाणारी कथा होती. सिनेमा सुंदर होता, बिभित्सपणाचा लवलेशही नव्ह्ता. परंतु भारतात बिभित्सतेच्या नावाखाली सेक्स डॉल विक्रीला बंदी आहे. सेक्स डॉलची ऑनलाइन खरेदी कायदेशीर आहे का?
14 Jun 2015 - 3:29 pm | संदीप डांगे
खरेदी विक्री बेकायदेशीर नाही. पण आयात बहुतेक कस्टम्स च्या कचाट्यात पडण्याची शक्यता आहे.
जेव्हापासून जिवंत माणसाच्या हुबेहुब प्रतिकृती बघितल्या आहेत तेव्हापासून ह्यांचा वापर वेश्यांऐवजी व्हावा असे वाटायला लागले आहे.
14 Jun 2015 - 3:57 pm | कंजूस
अगदी पहिल्या गवि यांच्या प्रश्नाचे उत्तर ( गाडी वगैरेचा काही अनुभव नाही )केवळ शास्त्रीय आधारावर--१२००cc पेट्रोल एंजिनअसल्यास वीसने भागून ६० एचपी { आणि ३ लिटर डिझल असल्यास ४० ने भागून ७५ एचपी } ताकद होते.
एखादे एंजिन समझा ८ हजार ताकदीचे असेल तर तो एक वजन आणि वेगाचा गुणाकार म्हणून पाहायचे. १००किग्र वजनाची गाडी ८० किमी वेगाने नेईल अथवा ८० किग्रा वजनाची गाडी १००किमी वेगाने नेईल. आपल्याला अपेक्षित वेगाचे गाडीचे मॅाडेल असले की आपण खुश होतो.
15 Jun 2015 - 9:41 am | नाव आडनाव
असाच अजून एक धागा - ज्या धाग्यावर विनोद (फॉरवर्ड केलेले + ऐकलेले + समोर होणार्या गोष्टीतले) टाकता येतील - चालू करता येइल का ? आणी बातम्या, प्रश्न...शंका..., विनोद या तीन धाग्यांसाठी एक सेक्शन (आणी त्यासाठी एक टॅब) सुध्धा वेगळा करता येइल
15 Jun 2015 - 10:09 am | खटपट्या
कल्पना चांगली आहे.
रच्याकने - कल्पना कोण असे क्रुपया विचारु नये.. :)
15 Jun 2015 - 10:36 am | गवि
..हाच जोक नव्या धाग्यावर टाकून जोकधाग्याचा नारळ फोडावा काय?
;-)
15 Jun 2015 - 1:26 pm | धनावडे
प्ले ग्रुपला मुलाना शिकण्यासाठी टाकने फायदेशीर आहे का?
15 Jun 2015 - 10:44 pm | काळा पहाड
टाकलं तर लागणार नाही का त्यांना?
15 Jun 2015 - 11:36 pm | धनावडे
अशी प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते(६ वर्ष वाचनमात्र असण्याचा अनुभव)
बाकी प्रश्न चुकलाय थोडा हे माहित आहे.
धन्यवाद
1 Jul 2015 - 5:04 am | अरुण मनोहर
मुलांना टाकले तर कोणीही सोम्यागोम्या उचलून नेईल ते चालेल कां?
15 Jun 2015 - 10:48 pm | संदीप डांगे
तुमचा प्रश्न सुटा सुटा करा आणि त्यावर विचार करा.
मुलाचं वयः साधारण दिड वर्षांच्या वरची मुले प्लेगृपमधे पाठवावी. काही उत्साही पालकांना नऊ महिने ते एक वर्षाच्या मुलांना प्ले-गृपमधे 'टाकून' देतांना पाहिलंय. इतकी लहान मुले अशा वातावरणात आईविना सोडणे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे असू शकते. (वर्किंग मदरच्या अडचणी मी जाणतो पण त्या बाबतीत माझे विचार जरा कठोर आहेत.)
प्ले-गृप = लहान मुलांना खेळण्यासाठीचे ठिकाण, जेथे मुलांचं प्राथमिक अवस्थेतलं सामाजिकिकरण होतं. वेगवेगळ्या खेळ-खेळण्यांच्या माध्यमांतून त्यांच्या शारिरीक, मानसिक वाढीला मदत होते.
शिकण्यासाठी = काय शिकण्यासाठी? वन-टू-थ्री-फोर, ए-बी-सी-डी, बा-बा ब्लॅक्शीप असं फाड फाड म्हणणं शिकण्यासाठी? 'शिकणे' यातून आपल्याला काय अभिप्रेत आहे त्यावर बर्याच गोष्टी अवलंबून आहेत.
फायदेशीर = वय वर्षे दीड ते साडेतीन वयोगटातल्या मुलांच्या शिकण्यातून 'फायदेशीर' असे काय अपेक्षीत आहे?
असो.
माझा सल्ला: दिड ते साडेतीन वर्षे वयाच्या मुलांना भरपूर खेळायला मिळेल, त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाईल अशा प्ले-गृप मधे मज्जा करण्यासाठी मुक्त सोडावे. किमान दिड तास ते कमाल तीन तास हा कालावधी असावा. 'शिकण्यासाठी टाकू' नये. दुसर्या मुलांसोबत होणारे आदान-प्रदान, बोलणे, खेळणे, रंग, आकार, आवाज ओळखणे यांतून मूल त्या वयाला आवश्यक ते सर्व योग्य रितीने शिकत जातं. त्याला तशी पार्श्वभूमी देणे एवढंच आपलं काम. बाकी या वयात जबरदस्ती अंक, अल्फाबेट्स आणि लिहायला वाचायला शिकवणे माझ्यामते मुलांच्या बालपणावर अत्याचार आहे. आणि पुढील आयुष्यात त्याचा काही उपयोग नाही.
15 Jun 2015 - 11:37 pm | धनावडे
धन्यवाद सर
20 Jun 2015 - 11:51 am | भिंगरी
संदीप डांगे यांच्या मताशी एकदम सहमत.
(वर्किंग मदरच्या अडचणी मी जाणतो पण त्या बाबतीत माझे विचार जरा कठोर आहेत.)
हेही बरोबर आहे.
15 Jun 2015 - 10:17 pm | जयन्त बा शिम्पि
मी सेवा निव्रुत्त झालो आहे , भाषांतराचे काम ( मराठीचे इंग्रजीत व इंग्रजीचे मराठीत ) उत्तम जमते. वेळ आहे, पण हे काम कोठे व कसे मिळवावे ? घरी सन्गणक आहेच.( ल्याप्टॉप ). भाषांतरासाठी पर पेज किती पैसे आकारावे ? तेही सांगावे.
15 Jun 2015 - 10:38 pm | आदूबाळ
www.proz.com/ सारख्या साईट्सवर मिळेल. तिथे रजिस्टर करा. आपला उत्तम सीव्ही तयार करा. विचारणा आली की पुढच्या पंधरा मिनिटांत निर्णय घेऊन उत्तर पाठवा. वेळेत काम पूर्ण करून पैसे वगैरे मिळाल्यावर त्या माणासाला रिव्ह्यू लिहायला सांगा. लिंक्डईन प्रोफाईल बनवा.
15 Jun 2015 - 10:59 pm | गवि
..हल्लीच रामदासकाकांनी इथे याविषयी एक धागा काढला होता.अर्थात नेमकी ती रिक्वायरमेंट आता नसेलही, पण धागा कोणाला सापडला तर लिंक द्यावी.
15 Jun 2015 - 11:05 pm | श्रीरंग_जोशी
हा घ्या दुवा - मदत हवी आहे.
18 Jun 2015 - 1:05 pm | एस
दुधातील (विशेषतः पिशवीतल्या दुधातील) भेसळ घरच्या घरी कशी ओळखावी? युरियाची भेसळ पकडता येते का?
18 Jun 2015 - 4:37 pm | संदीप डांगे
खालच्या दुव्यावर वेगवेगळ्या पदार्थांच्या घरगुती टेस्ट्स कशा कराव्या या बद्दल माहिती आहे.
http://www.fssai.gov.in/Portals/0/Pdf/Final_test_manual_part_I%2816-08-2...
18 Jun 2015 - 1:35 pm | काळा पहाड
जेव्हा मी गाडी दुसर्या गियर मध्ये ५००० आरपीएम ला चालवतो तेव्हा आणि जेव्हा चौथ्या गियर मध्ये ५००० आरपीएम ला चालवतो तेव्हा मला सारखेच मायलेज मिळते का? उदाहरणार्थ ५००० आरपीएम दुसर्या गियर मध्ये २० च्या वेगात येवू शकते आणि चौथ्या गियर मध्ये ४० च्या वेगात. तर इथे फरक फक्त वेगाचाच असतो का?
18 Jun 2015 - 2:20 pm | टवाळ कार्टा
नाही...एकाच आरपीएम्ला हायर गीयरमध्ये जास्त मायलेज मिळते पण प्रत्येक गीअरमध्ये आरपीएम जास्तीत जास्त किती वाढवावे त्याचे आकडे मून्युअल मध्ये दिलेले अस्तात
18 Jun 2015 - 6:07 pm | सिरुसेरि
गिअरचे डायमीटर वेगवेगळे असतात .त्यामुळे फरक पडतो .
24 Jun 2015 - 3:40 pm | सूड
पावसाळ्याच्या दिवसात कपडे नीट वाळले तरी त्यांना एक वेगळाच कुबटसा वास येत राहतो. तो न येण्यासाठी काय करावे?
24 Jun 2015 - 3:57 pm | काळा पहाड
कपडे वेळच्या वेळी धुवावेत
24 Jun 2015 - 4:21 pm | टवाळ कार्टा
आणि वाळवावेत सुध्धा ;)
24 Jun 2015 - 4:04 pm | एस
नीट धुवावेत. ;-)
बादवे, कपड्यांना वाळल्यावर इस्त्री करून ठेवल्यास कुबट वास येणार नाही.
24 Jun 2015 - 4:46 pm | बाळ सप्रे
इस्त्रीचा उपाय बेस्ट
आणि खरंतर कुरकुरीत वाळलेल्या कपड्यापेक्षा अशा थोड्याशा ओलसर कपड्याला इस्त्री चांगली होते..
24 Jun 2015 - 4:07 pm | कपिलमुनी
कपड्याच्या थरामध्ये कापूर ठेवा.
24 Jun 2015 - 4:24 pm | गवि
मशीनमधे धूत असल्यास एकाच धुण्यात किंवा हाती धुवत असल्यास एकाच बादलीत कपड्यांची महाप्रचंड क्वांटिटी भिजवू नये. दोनतीन छोट्या बॅचेस कराव्यात. पाणी जास्त असावे.
याखेरीज दुसर्यांदा बिनसाबणाच्या स्वच्छ पाण्यातून ते काढावेत आणि मग शक्यतो बंदिस्त नसलेल्या जागी वाळत घालावेत. या सर्वांमुळे कुबट वासाची शक्यता कमी होते.
24 Jun 2015 - 4:28 pm | टवाळ कार्टा
तरीसुध्धा वास येत असल्यास स्वतः रोज आंघोळ करावी =))
24 Jun 2015 - 4:35 pm | काळा पहाड
शक्यतो पाणी वापरुन.
24 Jun 2015 - 4:36 pm | गवि
हो.. पण लाल लाईफबॉय, मार्गो नीम, मेडिकेअर (अ.भा. लॉजेस हॉटेल मालक महासंघ प्रमाणित) यांपैकी नको. त्याचा वास घालवायला आणखी उपाय करावे लागतील.
24 Jun 2015 - 4:40 pm | काळा पहाड
पण कुठलातरी साबण वापरावा हे नक्की. नुसतं पाणी शिंपडून येण्यापेक्षा गेलाबाजार लाईफबॉय, मार्गो नीम, मेडिकेअर हे सुद्धा चालतील.
24 Jun 2015 - 5:11 pm | सूड
स्वतःला कावीळ झाली म्हणून जग पिवळे समजू नये टकू बाळ!!
24 Jun 2015 - 5:13 pm | सूड
आता आलं लक्षात!
24 Jun 2015 - 4:48 pm | संदीप डांगे
कपड्यांचा वास घालवणे, रंग उजळवणे आणि स्वच्छ करणे या तीनही कामांसाठी एकच रामबाण उपायः
खाण्याचा सोडा!
कपडे भिजवतांना बादलीभर पाण्यात नेहमीच्या सर्फ/एरीयल्/टाइड सोबत २-३ ग्रॅम खा.सो. आणि २-३ ग्रॅम मीठ टाकावे. कपडे धुवून झाल्यावर शेवटी १० मिनिट फक्त खा.सो.च्या पाण्यातून बुचकळून काढावे. नव्यासारखे चमकतात. फॅब्रीकचा फील कमालीचा सॉफ्ट होतो, रंग उजळतात. वास घालवतो, (कम्फर्ट वैगेरे वापरायची गरज राहत नाही). ३ वर्ष जुनी जीन्स नव्याने चमकू लागली आहे. घरातले सगळे कपडे, चादरी इत्यादींसोबत हाच प्रयोग केला आहे. उत्तम रीझल्ट्स.
सूचना: वेगवेगळ्या पावडरींसोबत खा.सो. आणि मीठाचे प्रमाण वेगवेगळे ठेवावे लागते. आम्ही सर्फ एक्सेल वापरतो, ५ ग्रॅम सोडा एका मशीनला व्यवस्थित रीझल्ट देतो.
24 Jun 2015 - 8:40 pm | सूड
किती बादली पाण्यात, किती सोडा?
25 Jun 2015 - 5:53 pm | संदीप डांगे
सांगीतले की वरच...
१ बादली पाण्यात २-३ ग्रॅम खायचा सोडा व मीठ. धुतल्यावर तेवढ्याच पाण्यात तितकाच सोडा घेऊन परत १० मिनिटे भिजत घाला, नीट पिळून झटकून झटकून (खांदे दुखेपर्यंत) वाळत घाला. मुंबईत असाल तर आर्द्रता कपड्यांची मदर-सिस्टर करते. मूळ कपड्यांतून घामाचा वासच जात नसतो, तो ही आर्द्रता अजून असह्य करते. त्यासाठी आधी घामाचा वास पूर्ण जाण्यासाठी सोडा. नंतर झोडा.
कोरड्या वातावरणात इतका त्रास होत नाही. ( मुंबई सोडा! ;-) )
25 Jun 2015 - 6:59 pm | सूड
आज प्रयोग केल्या गेला आहे.
24 Jun 2015 - 7:39 pm | कंजूस
संदीपभाऊ नावे घेतलीत तर नवीन मंडळ तुमच्या पोस्टीला कमर्शलचा चार्ज लावेल.झैरातींच्या रेटची चाचपणी सुरू आहे.
24 Jun 2015 - 7:49 pm | आदूबाळ
सोडा हो!
25 Jun 2015 - 3:05 pm | नाखु
नाहीतर काय "खायच्या" बाता आहेत त्या!!
25 Jun 2015 - 5:56 pm | संदीप डांगे
????
24 Jun 2015 - 8:33 pm | धनावडे
कर्णाळा किल्यावर जुलै महिन्यात जाण्यासाठी परवानगी असते का? आणि यावेळी जाणे ठिक होइल का?
25 Jun 2015 - 6:14 pm | कंजूस
जा ना मागच्या दाराने ( रसायनी मार्गे कर्नाळा )
26 Jun 2015 - 12:18 am | धनावडे
नेहमीच्या वाटेने नाही जाता येणार का?
म्हणजे कर्णाळा अभयारण्याच्या गेट वरून
26 Jun 2015 - 3:34 pm | भिंगरी
छातीत दुखत असलेल्या रुग्णाला अतीदक्षता कक्षात ठेवले जाते.
छातीत दुखण्याची अनेक कारणे असतात पण तपासण्या झाल्यावर त्याचे निदान १५ मिनीटे ते साधारणपणे ८/१० तासात होते.
ECG नॉर्मल, हृदयासाबंधी काहीही आजार नाही, रक्ताच्या तपासणीतही गंभीर असे काहीही नाही असे असताना २४ तासानंतरही रुग्णाला ICU मध्ये का ठेवले जाते?
26 Jun 2015 - 5:31 pm | कपिलमुनी
कोणतेही निदान अचूक असेल याची खात्री नसते खास करून ECG !
ECG ही प्राथमिक टेस्ट आहे, जर निदान चुकीचे ठरले आणि आणीबाणीची परीस्थीती आली तर उपचार लगेच्ग मिळावेत म्हणून रुग्णाला ICU मध्ये ठेवले जाते
1 Jul 2015 - 5:01 am | अरुण मनोहर
कृष्ण ह्या शब्दाचा अर्थच मुळी "काळा" असा आहे. किंवा शामल, सावळा असा देखील असू शकतो.
मग गोकुळातला कृष्ण निळा कां अन कधीपासून चित्रात किंवा वर्णनांत दाखवू लागले?
या विषयी काही माहीती असेल तर सांगा!
1 Jul 2015 - 11:31 am | काळा पहाड
कृष्ण काळाच आहे, राम निळा. कदाचित भारतीयांचा काळ्या रंगाबद्दलचा तिरस्कार पाहून तसा बदल केला गेलेला असावा.
-
पहाड.
1 Jul 2015 - 12:18 pm | गवि
लहानपणचे उपद्व्याप खोड्या इत्यादि पाहता मोठ्या लोकांकडून भरपूर मार खात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काळेनिळे होणे आपणांस ठाऊक आहेच. ;)
1 Jul 2015 - 12:34 pm | स्पा
कर्बोदके आणि प्रथिने यात काय फरक आहे ?
1 Jul 2015 - 12:42 pm | भुमन्यु
कर्बोदके -
प्रथिने (इन जनरल)
प्रथिने (न्युट्रिएंट)
1 Jul 2015 - 12:48 pm | स्पा
माफ करा , मला इंग्रजी येत नाही :)
1 Jul 2015 - 10:17 pm | संदीप डांगे
ब्रेड आणि अंड्यात आहे तेवढाच. :-)
जोक्स अपार्ट, प्रश्न नेमका कशा संदर्भात आहे त्यावर उत्तर अवलंबून आहे. म्हणजे रासायनिक, जैविक, पोषणमूल्य, चयापचयातले त्यांचे कार्य की अजून वेगळं काही?
2 Jul 2015 - 8:25 am | कंजूस
आपला आधार कार्ड नंबर वोटर कार्ड नंबरशी संसग्न करण्यासाठीचे काम चालू आहे. १) मोबाइल sms पद्धतीने झाले नाही. २)ceo-Maharashtra site वरून झाले नाही. ३) National voter service portal च्या साइटवरून होत आहे. Page-- वोटर कार्ड प्लस आधार असं दिसेल-
आधार कार्डावरचे नाव, EPIC NO वोटर कार्ड नंबर,आधार चा बारा आकडी नंबर चार चार असा तीन चौकोनात ,मोबाइल नंबर,owner id=self,emai,भरून "submit करा. लगेच "Your request for associating Aadhaar number with Electoral Roll has been registered successfully" असा मेसेज येईल.
15 Jul 2015 - 11:02 am | पिलीयन रायडर
L2 विजा वर जाणारी व्यक्ती आपला कंपनीचा लॅपटॉप US ला नेऊन तिथे काम करु शकते का? (बिनपगारी रजा टाकली आहे आणि काही अभ्यास करायचा असल्याने लॅपटॉप नेणे आवश्यक आहे.)
नेता येत असेल तर सोबत काय डॉक्युमेंट्स लागतील?
कोणताही लॅपटॉप नेताना (पर्सनल / कंपनीचा) सोबत पावती / परवानगीचे पत्र लाग्तेच का?
15 Jul 2015 - 10:24 pm | श्रीरंग_जोशी
माझ्या माहिती व निरिक्षणाप्रमाणे नेहमीच्या ओळखीतले कुठलेही उपकरण अमेरिकेत कुठल्याही व्हिसावर येताना वेगळी परवानगी लागत नाही.
कंपनी लॅपटॉप अमेरिकेत नेणारे कंपनीकडून पत्र सोबत घेतात कारण भारतात परतताना ते नवा लॅपटॉप सोबत आणू शकतात. ते पत्र नसल्यास अन भारतील विमानतळावर उतरल्यावर कस्टम्स अधिकारी नव्या लॅपटॉपवर कस्टम्स ड्युटी आकारू शकतात.
प्रत्येक व्यक्ती परदेशातुन परतताना १ पर्सनल लॅपटॉप अन ₹२५,००० किमतीचे सामान आणु शकते. यावर कुठलेही आयात शुल्क लागत नसते. या नियमात एवढ्यात काही बदल झाला असल्यास ठाऊक नाही.
17 Jul 2015 - 2:47 pm | भाते
माझ्या मित्राला घराच्या वारसा हक्कासाठी (नॉमिनी) कायदेशीर मदत हवी आहे. त्याची माहिती त्याच्याच शब्दात पुढे देत आहे.
आजोबांचे दादरला चाळीत दोन खोल्यांचे घर होते. आजोबांच्या पश्चात, चाळीच्या पुनर्विकासात तिकडे इमारत झाल्यावर, ते घर आजीच्या नावावर झाले. त्यांना चार अपत्ये आहेत. दोन मुले आणि दोन मुली. आजीच्या पश्चात ते घर चारही भावंडांना मिळाले. आता त्यातला एक मुलगा (मोठा) ते घर आपल्या नावावर करून द्यावे असे म्हणतो आहे. दुसऱ्या मुलाचे स्वत:चे घर आहे. त्यामुळे बाकी भावाबहिणींचा याला विरोध नाही आहे. सध्या यात कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही आहे. पण ज्याच्या नावावर घर करायचे आहे त्याला अपत्य नाही आहे. त्यामुळे सध्या वारसदार म्हणुन त्याच्या बायकोचे नाव टाकायचे ठरले आहे.
इतर दोन मुलींना आणि एका मुलाला अपत्य आहेत. इतर तिन भावंडांच्या मुलामुलींचा, वडिलोपर्जित मालमत्ता म्हणुन, आजीआजोबांच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क आहे का? ते आत्ता घर एकाच्या नावावर करताना, नातवंडे आपल्या आईवडिलांकडे, आपल्या वारसा हक्कासाठी आग्रह धरू शकतात का? एकदा घर मोठया मुलाच्या आणि बायकोच्या नावावर झाल्यावर नंतर त्यांच्या पश्चात त्या घरावर हक्क सांगणे इतरांना अशक्य आहे. मोठया मुलाची बायको आपल्या पश्चात आपल्या माहेरच्या लोकांना ते घर देईल अशी शक्यता आहे.
17 Jul 2015 - 3:39 pm | संदीप डांगे
इतर तिन भावंडांच्या मुलामुलींचा, वडिलोपर्जित मालमत्ता म्हणुन, आजीआजोबांच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क आहे का?
माझ्यामते असला पाहिजे. आजोबांची मालमत्ता ही नातवांच्या नावे सरळ ट्रांसफर होत असते. या प्रकरणात चारही भावंडांच्या मुलांचाही ह्या घरावर समान हक्क आहे. पण भावांनी आपसातल्या समजूतदारीने हा फ्लॅट रितसर पुर्णपणे मोठ्याच्या नावावर केला आणि आपआपली ना-हरकत प्रमाणपत्रे दिलीत तर नातवंडे हक्क सांगू शकणार नाहीत. पण पुढे तंटा होऊ नये म्हणून आताच मोठ्या भावाने बाजारभावाप्रमाणे पैसे देऊन तो फ्लॅट रितसर विकत घ्यायला पाहिजे. अथवा चौघांचा हक्क कायम ठेवला पाहिजे. भविष्यात ज्या कुणाला ती जागा स्वतःकरिता हवी असेल त्याने त्यावेळेच्या बाजारभावाप्रमाणे सगळ्यांना पैसे चुकते करावे. बाहेरच्याला विकायची असेल तर आलेले पैसे समान वाटून घ्यावे.
माझ्या नात्यात हेच प्रकरण झाले आणि सर्वात लहान असलेल्या एकट्या भावाने इतर चार बहिणींना हुशारीने भुलवून १-१.५ लाखाला मनवले, प्रत्यक्षात फ्लॅटची बाजारभावाप्रमाणे किंमत ४५-५० लाख होती. बहिणींना सगळं कळत असून भावाशी काय भांडायचं म्हणून विषय सोडून दिला. त्यातल्या दोन बहिणींची अगदी हलाखीची परिस्थिती असूनही रग्गड पैसा असलेल्या भावाने काहीच विचार केला नाही.
माझ्यामते हा प्रश्न नेहमीचाच आहे, त्यामुळे मेनबोर्डावर वेगळा धागा म्हणून काढावा.
17 Jul 2015 - 3:43 pm | केवळ_विशेष
मला तात्या अभ्यंकरांचा नंबर मिळेल का?
खरड्वहीत पाठवेल का कोणी?
धन्स
17 Jul 2015 - 3:49 pm | भिंगरी
मेल बॉक्स मध्ये येणारे नको असलेले मेल कसे थांबवावेत?
जसे होरोस्कोप फ्री,युवर डेली याहू स्टोरिज्.....इ.
17 Jul 2015 - 3:53 pm | टवाळ कार्टा
त्या मेल्सना "स्पॅम" मध्ये टाका
4 Aug 2015 - 3:29 pm | श्रीगुरुजी
नको असलेली मेल्स उघडा. त्याच्या तळाला Unsubscribe असे लिहिलेली लिंक असते. त्यावर क्लिक करून स्वतःचा ईमेल आयडी टाकून त्या मेल्सला Unsubscribe करा.
समजा तशी लिंक नसेल तर ऑप्शन्स मध्ये जा. काही विशिष्ट शब्द असलेली ईमेल्स किंवा विशिष्ट आयडीकडून येणारी ईमेल्स ब्लॉक करता येतात. तेथे जाऊन होरोस्कोप फ्री,युवर डेली याहू स्टोरिज् असे शब्द असलेली ईमेल्स थांबवा किंवा ती मेल्स पाठविणारे मेलआयडी ब्लॉक करा.
18 Jul 2015 - 11:51 am | कापूसकोन्ड्या
पहिल्या पासून थोड्क्यात व्यापाम चा घपला ऐका
व्यापाम
27 Jul 2015 - 1:15 am | श्रीरंग_जोशी
मिलिंद सोमण यांच्या आयर्नमॅन ट्रायथलॉनमधल्या कामगिरीवरचा हा लेख वाचनीय आहे.
Why I Run.
28 Jul 2015 - 10:15 pm | हेमन्त वाघे
@ सुबोध खरे @ कंजूस आणि गवी
गाडी चे "डिसप्लेसमेंट" आणि "पॉवर" चा ९ अनेक लोक समजतात तसा काहीही समंध नाही
. आणि
एकच डिसप्लेसमेंट असलेल्या (उदा १२०० सीसी) इंजिनची दोन वेगवेगळ्या गाड्यांमधली "पॉवर" कमीजास्त बीएचपी कशी असू शकते?
कारण तंत्राद्यान
सध्या अशी इंजिन बनतात - कि त्यात अनेक प्रकारचे तंत्राद्यान असू शकते . नवी सर्व इंजिन मध्ये संगणक कंट्रोल करतो . तसेच प्रत्येक टप्प्यात वेगळे तंत्राद्यान असते , त्यामुळे नवीन इंजिन हे पॉवर बरोबर उत्तम मायलेज देणारी हि असू शकतात.
हे इंजिन बघा.
http://www.indiancarsbikes.in/cars/1-5-litre3-cylinder-400-bhp-engine-ni...
१५०० सीसी , फक्त ३ सिलीन्देर आणे टाकत - ४०० अश्वशक्ती
आणि हिरो होंडा हि ४ स्ट्रोक तर बाकी सर्व २ स्ट्रोक गाड्या होत्या . हे पूर्णत;; वेगळे तंत्राद्यान आहे.
28 Jul 2015 - 10:44 pm | श्रीरंग_जोशी
माहितीपूर्ण प्रतिसाद.
थोडीबहुत अशीच चर्चा पूर्वी इथे झाली आहे.
30 Jul 2015 - 8:34 am | कंजूस
हेमन्त आणि श्रीरंग,तुम्ही दिलेल्या लिंकस वाचल्या.
प्र श्न डिस्प्लेसमेंट/पावर/ बद्दल आहे हे धरून -एक ग्रम इंधन (पेट्रोल /डिझेल/नॅचरल गॅस/एथनॅाल वगैरे)जाळल्यास प्रत्येकातून किती ( गणिती /therotical)शक्ती निर्माण होऊ शकते ते केमिस्ट्री /फिजिक्समधून कळते .त्यात काही बदल होणार नाही.आता ती शक्ती वेगासाठी वापरायची का वजन वाहून नेण्यासाठी वापरायची एवढाच पर्याय शिल्लक राहतो.A)रेसिंग कार्सच्या बाबतीत { आणि B)सैन्यातल्या वाहनाच्या बाबतीत } इंधन किती वापरावे लागले हा मुद्दा गौण असतो.A मध्ये वेग आणि Bमध्ये वजन वाहून नेणे महत्त्वपूर्ण असते.आपण उत्सुक आहोत ती वाहने इकनॅामिकल म्हणजे १०० किमी ला ६ ते ८ लिटरस पेट्रोल खाणारी असतात.
मला वाटतंय की हा मुद्दा समजावता आला आहे.
30 Jul 2015 - 10:02 am | हेमंत लाटकर
चीनने जशी 2000 कि.मी. भिंत बांधुन परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण केले. तसे भारतातील खैबर खिंड बंद करून अफगाणी आक्रमणापासून देशाचे रक्षण करण्याचे त्यावेळच्या एकाही राजाच्या मनात कसे आले नसेल. यावर आपले मत मांडा.
30 Jul 2015 - 10:21 am | सदस्यनाम
खैबरखिंड ताब्यात असणार्या त्यावेळच्या सगळ्या राजांची नावे सांगा ना म्हणजे सगळ्यांचे एकेक प्रॉब्लेम सांगता येतील क्रमाने?
कसय ते.. ७/१२, एफेसाय, सिंमेंट, रेती, दगड, लोन, घरगुती अडचणी असे बरेच जेन्युन प्रॉब्लेम असायचे हो. ;)
30 Jul 2015 - 12:08 pm | आदूबाळ
नाय मांडणार.
30 Jul 2015 - 3:10 pm | अस्वस्थामा
वेगळा धागा काढा आणि मंग बगा. ;)
बादवे, तूर्तास गूगल मॅपवरुन खैबर खिंड पहा. मग थोडी फार कल्पना येईल अशी आशा..
(पण कल्पना रंजक आहे)
30 Jul 2015 - 7:43 pm | श्रीरंग_जोशी
काही महिन्यांपूर्वी मार्को पोलो ही मालिका नेटफ्लिक्सवर पाहिली.
मार्को पोलो हा चंगेझ खानाच्या दरबारातला महत्वाचा माणूस असतो. चंगेझ खान यास एका चिनी राजावर आक्रमण करायचे असते. त्या राजाच्या राजधानीच्या ठिकाणाभोवती भक्कम व उंच तटबंदी असते. त्यापूर्वी कुणीही ती भेदू शकलेलं नसतं. मार्को पोलो संशोधन करून एक अजस्त्र यंत्र बनवतो जे अवजड दगडही लांबवर फेकू शकते.
जेव्हा चढाई केली जाते तेव्हा सर्वप्रथम या यंत्राचा वापर करून त्या तटबंदीवर स्फोटकांचा मारा केला जातो. त्या तटबंदीचा एक भाग कोसळल्याची वार्ता त्या चिनी राजाला पोचते तेव्हा त्याचे उद्गार असतात.
That wall was built by men. It can be destroyed by men.
तसेच तुम्ही सुचवलेली कामगिरी व्यवहार्यही नव्हती. कित्येक पिढ्या ते काम चालले असते. काम पूर्ण होई पर्यंत खूप सारे मनुष्यबळ याच कामात राहिले असते जे आक्रमकांच्या पथ्थ्यावर पडले असते.
30 Jul 2015 - 2:38 pm | वेल्लाभट
तुपाला मोहन का म्हणतात
30 Jul 2015 - 3:24 pm | आदूबाळ
तुपाला मोहन कुठे म्हणतात. गरम तेल बाईंडर म्हणून वापरलं (उदा० पुरीच्या कणकेत) तर त्याला मोहन म्हणतात. का ते माहीत नाय...
30 Jul 2015 - 5:51 pm | श्रीरंग_जोशी
मोहन की मोहण?
मी तर नेहमीच मोहण ऐकले आहे या संदर्भात.
30 Jul 2015 - 7:51 pm | स्रुजा
बरोबर. मी पण मोहन च ऐक्लं आहे. आणि तेलाचं पण मोहन असतंच. जर मोहन जास्त पडलं तर भजी , पुर्या जास्त तेल पितात.
31 Jul 2015 - 8:33 pm | मी-सौरभ
मोहन राव फोर एक्ष्पेर्त ओपिनिओन
4 Aug 2015 - 2:20 am | सायकलस्वार
4K टीव्ही घ्यावा की एचडी? 4K चे तंत्रज्ञान रूळायला, म्हणजे सर्व प्रमुख चॅनेल्स 4K मध्ये उपलब्ध आहेत, असा दिवस उजाडायला अजून किती वर्षे लागतील? फ्लॅट स्क्रीन टीव्हीचे आयुष्य साधारण दोनतीन वर्षे असते. एवढ्या काळात 4K प्रॅक्टिकल झालेले असेल, की 4K साठी वाजवलेल्या एक्स्ट्रा दमड्या वाया जातील? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा...
24 Aug 2015 - 9:06 pm | प्रदीप
तांत्रिक विषय असल्याने, मराठीतून टंकणे मला कठीण असल्याने, इथे प्रतिसाद न देता आपल्या खरडवहीत इंग्लिशमधून लिहीत आहे.
4 Aug 2015 - 8:04 am | राघवेंद्र
मी सध्या कारने लांब (अंदाजे १०० किमी ) जा-ये करतो. या रोजच्या प्रवासात डुलकी न -लागण्याचे उपाय काय आहेत ?
सध्या चहा बरोबर नेतो.
ए सी प्रवासी सिट कडे करतो .
प्रवासाची वेळ सकाळी ७:३० व संद्याकाळी ६ अशी आहे.
प्रवास सरळ एकाच महामार्गा वरून आहे.
11 Aug 2015 - 12:39 am | काळा पहाड
झकास डुलकी काढायचं सोडून कसले प्रयोग करत बसता? विणकाम, भरतकाम, मोबाईलवर गेम खेळणे, पक्षीदर्शन वगैरे होत असेल तर पहा.
11 Aug 2015 - 2:11 am | बहुगुणी
हा उपाय मला उपयोगी ठरला आहे.
तुम्हाला कॉफी आवडत असेल तर कॉफी कँडीज मिळतात त्या जवळ ठेवा, आणि दहा-एक मिनिटांत एक गोळी संपेपर्यंत तरी हुषार रहाल आणि डुलकी लागणार नाही. (त्या गोळ्यांचे पॅकेट उन्हात राहणार नाहीत असं बघा, उन्हात पाघळून त्या आवरणाला चिकटतात, आणि मग गाडी चालवत असतांना ते आवरण सहज दूर करता येत नाही!)
अर्थात्, खूपच झोप येत असेल तर मुकाट्याने गाडी रस्त्यावरून बाहेर काढून दहा मिनिटे आराम करणं आणि डोळे धुवून परत ड्रायव्हिंगला बसणं हेच श्रेयस्कर, अपघातात जीव धोक्यात घालण्यापेक्षा थोडा उशीर सहन करणं कधीही चांगलं!
11 Aug 2015 - 6:39 pm | राघवेंद्र
धन्यवाद बहुगुणी आणि काळा पहाड साहेब. कॉफी कँडीज चा प्रयोग वापर करण्यात येइल.
4 Aug 2015 - 12:48 pm | अलक निरन्जन
मित्रा हो ,
यू एस ए मधुन कोणता टीवी न्यावा / का नेउच नये या बद्दल काहि माहिती असलयास कृपया पोस्ट करा
देस निकाला आहे डिसेंबर मधे
10 Aug 2015 - 5:50 pm | भाते
मटामधल्या १५ मुली, एक मुलगा तरीही पुत्रहट्ट! बातमीने हसु आले. मनात पहिले विचार आला कि हा कदाचित एखादा विक्रम तर नसावा. सहज कुतूहल म्हणुन आंजा वर शोध घेतला. तर याही पेक्षा भयानक वाचायला मिळाले. गिनिज बुक मध्ये एकाच पत्नीपासुन सर्वात जास्त अपत्य संख्या ६९ आहे. आणखी शोध घेतला असता हे सुध्दा सापडले.
10 Aug 2015 - 11:09 pm | श्रीगुरुजी
लादेनच्या बापाला असंख्य बायका होत्या (एकावेळी चारच. पाचवीशी लग्न करायच्या वेळी तो आधीच्या चौघीतल्या एकीला घटस्फोट द्यायचा). त्याला एकूण ५८ मुले झाली (३६ मुली + २२ मुले). लादेन २२ मुलांमधला १८ वा होता.
लादेनने देखील एकूण ६ लग्ने केली होती. त्याचे एक लग्न केवळ २ दिवस टिकले होते. त्याला देखील १९-२० मुले होती.
11 Aug 2015 - 4:05 am | संदीप डांगे
आजचा धडा:
१. मुसलमान खूप लग्ने करतात. दहशतवादी मुसलमानही खूप लग्ने करतात. जगात त्यांनाच खूप पोरे होतात.
गृहपाठासाठी प्रश्नः
१. हिंदूंमधे 'एकपत्नीपद्धत' केव्हापासून प्रचलित आहे याची माहिती काढणे.
२. हिंदू राजांच्या वैवाहिक इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करणे.
परिसर अभ्यासः
१. १८-२२ मुले असणारे अनेक घरंदाज, 'सत्ताधारी जाती'तले हिंदू आढळतात. त्याबद्दल निरिक्षण मांडणे.
पाठ्यपुस्तकाबाहेरचा अभ्यासः
१. काही हिंदूंच्या 'मुसलमानांच्या चार बायका पद्धतीबद्दल' फारच प्रक्षोभक(?) भावना आहेत. त्या नेमक्या कुठल्या मानसिक गंडातून प्रसवतात याचे सर्वेक्षण करणे.
*('दहशतवादी मुसलमान' हा एकच शब्द आहे याची पक्की खूणगाठ मारणे) ;-)
11 Aug 2015 - 12:47 pm | श्रीगुरुजी
वा! वा! संदीप डांगे, तुमचा गाढा अभ्यास आणि जलद आकलनशक्ती पाहून धन्य झालो.
>>> १. मुसलमान खूप लग्ने करतात. दहशतवादी मुसलमानही खूप लग्ने करतात. जगात त्यांनाच खूप पोरे होतात.
बरोब्बर. पैकीच्या पैकी गुण.
>>> १. हिंदूंमधे 'एकपत्नीपद्धत' केव्हापासून प्रचलित आहे याची माहिती काढणे.
प्रश्न धड्यातील अभ्यासावर हवेत. धड्याबाहेरील अभ्यासावरील प्रश्न गृहपाठात विचारणे अयोग्य आहे.
>>> २. हिंदू राजांच्या वैवाहिक इतिहासाबद्दल अधिक अभ्यास करणे.
प्रश्न धड्यातील अभ्यासावर हवेत. धड्याबाहेरील अभ्यासावरील प्रश्न गृहपाठात विचारणे अयोग्य आहे.
१. १८-२२ मुले असणारे अनेक घरंदाज, 'सत्ताधारी जाती'तले हिंदू आढळतात. त्याबद्दल निरिक्षण मांडणे.
>>> 'सत्ताधारी जात' ? ही कोणती नवीन जात? राजपत्रात, राज्यघटनेच्या एखाद्या परिशिष्टात या जातीचा उल्लेख आहे का? असल्यास ही जात उच्चवर्णीय, इतर मागासवर्गीय, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या विमुक्त जाती इ. पैकी कोणत्या गटात मोडते?
>>> १. काही हिंदूंच्या 'मुसलमानांच्या चार बायका पद्धतीबद्दल' फारच प्रक्षोभक(?) भावना आहेत. त्या नेमक्या कुठल्या मानसिक गंडातून प्रसवतात याचे सर्वेक्षण करणे.
प्रक्षोभक भावना म्हणजे नक्की कोणत्या स्वरूपाच्या भावना? या भावना मानसिक गंडातून येतात का? या भावना इतर कोणकोणत्या गंडातून येतात आणि मानसिक गंडातून प्रक्षोभक भावनेव्यतिरिक्त अजून कोणत्या भावना येतात का?
>>> *('दहशतवादी मुसलमान' हा एकच शब्द आहे याची पक्की खूणगाठ मारणे) ;-)
मारली.
11 Aug 2015 - 8:28 pm | संदीप डांगे
अभ्यास वाढवा...
आजचा सुविचारः
अल्पज्ञानाच्या स्वयंकेद्रित मधुकोषात फक्त सडक्या विचारांची पैदास होते.
12 Aug 2015 - 1:31 pm | श्रीगुरुजी
>>> अल्पज्ञानाच्या स्वयंकेद्रित मधुकोषात फक्त सडक्या विचारांची पैदास होते.
+१
तुमचा स्वानुभावाधारीत सुविचार पटला.
12 Aug 2015 - 8:38 pm | संदीप डांगे
थांबूया का?
धागा पाहून काहीतरी विधीनिषेध मी तरी पाळत असतो.
या विषयावर अधिक ज्ञान पाहिजे असेल तर वेगळा धागा काढा.
धन्यवाद!
12 Aug 2015 - 10:36 pm | श्रीगुरुजी
>>> थांबूया का?
धागा पाहून काहीतरी विधीनिषेध मी तरी पाळत असतो.
मला पहिलाच प्रतिसाद देण्याआधी हा विधीनिषेध पाळण्याचं सुचलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती.
>>> या विषयावर अधिक ज्ञान पाहिजे असेल तर वेगळा धागा काढा.
न मागता दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद!
12 Aug 2015 - 10:59 pm | संदीप डांगे
आज तुमच्यावर ही वेळ आली नसती.
कसली वेळ आलीये माझ्यावर...?
11 Aug 2015 - 9:32 pm | डायवर
माझ्या अल्पमतीनुसार पोलीसांना कोणत्याही ठिकाणी धाड घालण्याआधी सर्च वॉरंट मिळवणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ असा कि जर पोलिसांनी वॉरंट शिवाय एखाद्याच्या घरात प्रवेश केला तर त्यांच्यावर अनधिकृत पणे प्रवेश केल्याची केस तसेच दरम्यान त्यांनी काही वस्तू तपासा साठी नेल्या तरी दरोड्याचे कलम लावता येवू शकते म्हणून खासगी मालमत्तेवर धाड टाकण्या आधी पोलिस वॉरंट घेवून जातात.
मात्र हेच पोलिस रस्त्यावर हमखास खासगी वाहने अडवून चेकिंग करतात, प्रसंगी खासगी असणारे सामान जप्त करून कधी कधी अटक देखील करतात. जर खासगी स्थावर मालमत्तेत धाड टाकताना वॉरंट लागतो तर एखाद्याचे खासगी वाहन हे देखील एक खासगी मालमत्ताच असते. मग अशा वाहनाच्या चेकिंग साठी व काही संशयास्पद असल्यास जप्ती व संबधित व्यक्तीच्या अटकेसाठी वॉरंट का लागत नसावा? केवळ एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारत आहे, जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
14 Aug 2015 - 12:00 am | दा विन्ची
माझ्या चेपू अकौंट वरून काही अश्लील पोस्ट्स आणि video आपोआप शेअर होत आहेत. चेपू वर बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी असल्याने मला हा प्रॉब्लेम तातडीने संपवायचा आहे. हे अकौंट तात्पुर्ते बंद करावे का व ते तसे करता येते का ?
14 Aug 2015 - 1:26 pm | श्रीगुरुजी
(१) सर्वात प्रथम आंतरजालाशी जोडणी न करता तुमच्या संगणकावर विषाणूविरोधी कार्यक्रम तातडीने चालवून संपूर्ण कठीण चकती तपासा आणि एखादा विषाणू/ट्रोजन लपलेला असल्यास तो तातडीने नष्ट करून टाका. तो नष्ट केल्यावर पुन्हा एकदा विषाणूविरोधी कार्यक्रम चालवून संपूर्ण कठीण चकती तपासा आणि आता कोणतेही विषाणू/ट्रोजन इ. लपलेले नाहीत याची खात्री करून घ्या.
(२) त्यानंतर चेपु खात्याचा कळीचा शब्द ताबडतोब बदला. सुरवातीच्या काळात थोड्या थोड्या वेळाने कळीचा शब्द बदलत रहा.
(३) चेपु प्रशासकांना आपल्या समस्येबद्दल कळवून त्यांचा सल्ला मागा.
(४) संगणकाला जोडण्याआधी पेन ड्राईव्ह, सीडी इ. ची विषाणूसाठी तपासणी करून मगच वापरा.
(५) आंतरजाल जोडणी बंद करताना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रोग्रॅममधून (ईमेल खाती, चेपु, ट्विटर इ.) लॉगआऊट व्हा. कधीही "रिमेम्बर पासवर्ड" हा पर्याय वापरू नका. कुकीज अलाऊ करू नका. संगणकावर साठलेल्या टेम्पररी फाईल्स नियमितपणे डीलीट करा. भ्रमणध्वनीद्वारे वरील प्रोग्रॅम वापरत असाल तरीसुद्धा हीच खबरदारी घ्या.
(६) जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या आयडीच्या माध्यमातून व्हिडिओ, अश्लील पोस्ट्स इ. शेअर होत असतील, तर तात्पुरते त्या आयडीला ब्लॉक करा.
14 Aug 2015 - 10:33 pm | दा विन्ची
श्रीगुरुजी
धन्यवाद . हे करून पाहीन.
14 Aug 2015 - 12:46 am | पिलीयन रायडर
मोबाईल बद्दल प्रश्न आहे. कुठे नक्की विचारावं ते कळेना म्हणुन इथे
जुलै मध्ये नवर्याने US मध्ये Amazon वरुन Lenovo K3 Note मागवला. आता सध्या मी तो वापरतेय. त्याला कधी काही त्रास झाला नाही. मला मात्र खालील प्रॉब्लेम्स येत आहेत.
१. बारिक सारिक गोष्टी चीनी भाषेत आहेत. कुणाचाही नंबर डायल केला की सिटीचे नाव चायनीज मध्ये. कॉन्टेक्ट्स मध्ये यल्लो पेजेसचा टॅब चायनीज. काही अॅप्सची नावं (क्लिन मास्टर) चायनीज. डीफॉल्ट भाषा इंग्लिश आहे तरीही.
२. ह्या नंतर त्रास सुरु झाला ते अॅटोमॅटिक अॅप्स डाऊनलोड होण्याचा त्रास. कुठलेही चित्र विचित्र चायनीज अॅप्स (त्यात अश्लील अॅप्सही येतात मध्येच) आपोआप येतात. मी ते कितीही वेळा उडवले तरी परत हजर. रोज नव नवे अॅप्स येतात. कधी इंग्लिशही असतात.
३. क्रोम उघडलं की आपोआप एकामागे एक ३-४ साईट्स ओपन होतात. गुगल प्ले स्टॉअरची साईट ओपन होऊन अॅप्स दिसतात.
४. चेपु ओपन केलं की खाली चायनीज अॅड्स येत आहेत.
५. मोबाईलमध्ये जो इन्स्टॉल्ड अॅण्टीव्हायरस आहे तो म्हणतो की कंपनीने आधीच डालो करुन दिलेले थीम सेंट्र्स, ट्विटर हे मालवेअर आहेत. आम्ही उडवु शकत नाही. काही तरी "रुट" करण्या विषयी येतं.
नेट्वर शोध घेतला तर अनेकांना हा त्रास आहे आणि तो मोबाईल "रुट" करुन काही प्रमाणात दुर झालाय.
एक अॅप आहे लिनोव्होचं, त्यात मोबाईल डायग्नोस्टीक होते. त्यात मोबाईल रुटेड - येस असं दिसतं.
मला ह्या मोबाईलवर अजिबात खात्री नाही. माझा डेटा सेफ आहे असं वाटत नाही.
काय करावे?
14 Aug 2015 - 1:02 am | श्रीरंग_जोशी
तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी... - कदाचित या धाग्यावर या समस्येबाबत चर्चा झाली असू शकते. पण ५०० हून अधिक प्रतिसाद असल्याने खात्रीशीरपणे सांगता येत नाही.
15 Aug 2015 - 8:15 pm | काळा पहाड
मोबाईल रूट करणं म्हणजे मोबाईल ची जी ऑपरेटींग सिस्टीम असते उदाहरणार्थ अॅन्ड्रॉईड (जे बहुधा लिनक्स ऑपरेटींग सिस्टीमचं एक रूप आहे त्याला) ताब्यात घेणं. साधारणपणे हा प्रकार ऑपरेटींग सिस्टीम चे डेव्हलपर्स वापरतात. पण जर रूट केलं तर तुम्ही तुमच्या अॅन्टीव्हायरस ला या कंपनीच्या अॅप्स ना उडवायसाठी वापरू शकता. एक धोका यात असतो की रूट करताना काही प्रॉब्लेम झाला तर तुमचा मोबाईल वीट (ब्रीक) होवू शकतो. म्हणजे पूर्णपणे बाद होवू शकतो. मोबाईल फार महाग नसेल तर करून पहायला हरकत नाही. मी माझा जुना मोबाईल रूट केला होता आणि त्याचा काही प्रॉब्लेम आला नाही. रूट करण्यासाठी सॉफ्टवेअर्स मिळतात. बाकी तुम्ही जे सांगताय त्यानुसार तुमचा डेटा अजिबात सेफ नाही याबद्दल खात्री बाळगा. नेट बँकींग चे व्यवहार मोबाईल वरून करू नका.
ही लिंक पहा: http://www.wondershare.com/mobile-phone/android-root-tool.html
14 Aug 2015 - 9:40 pm | श्रीरंग_जोशी
'झारीतले शुक्राचार्य' हे पाताळयंत्री माणसांसाठी वापरलं जाणारं विशेषण आहे.
यातले शुक्राचार्य म्हणजे दैत्यगुरु शुक्राचार्य असावेत. पण झारी म्हणजे काय? लहानपणी मी तळणाचा झारा जो असतो तो जर लहान आकाराचा असेल तर त्यास झारी म्हणत असावेत असा समज करून घ्यायचो ;-) .
14 Aug 2015 - 10:12 pm | संदीप डांगे
झारीतले शुक्राचार्य हे पुराणातल्या एका कथेवरून रुळलेले आहे. हे पाताळयंत्री माणसांसाठी नसून विनाकारण अडवणूक करणार्या माणसासाठी वापरलं जातं.
बहुतेक बळीराजा का कोण देवांना काहीतरी दान करण्याचा संकल्प सोडतो तेव्हा पाणी हातावर सोडतांना कमंडलू हातात घेतो तेव्हा जिथून पाणी पडतं त्या हत्तीच्या सोंडेसारख्या भागाला झारी म्हणतात तिथे हे दान घडू नये म्हणून शुक्राचार्य छोटे रुप घेऊन पाणी अडवण्यासाठी बसतात. नंतर कोणी ऋषी त्यात दर्भ का कायतरी घालून अडथळा काढतो आणि दान संपन्न होते.
14 Aug 2015 - 10:20 pm | श्रीरंग_जोशी
या सचित्र प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
स्व. गोपिनाथ मुंडे स्वपक्षीय विरोधकांच्या बाबतीत असा उल्लेख करत असल्याने मला वाटायचे की त्यांना अशा लोकांचा पाताळयंत्रीपणा दाखवून देण्याचा उद्देश असावा.
बाकी जय हनुमान या मालिकेतलं दैत्यगुरु शुक्राचार्य माझं आवडतं पात्र होतं :-) .
24 Aug 2015 - 3:37 am | प्यारे१
बलि राजाने वामनाच्या तीन पावलं जमिन दान देण्याच्या विनंतीला होकार देऊन दानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हातात कमंडलू घेऊन हातावर पाणी सोडण्यासाठी सुरुवात केली तेव्हा बलिचे गुरु (राक्षसांचे/असुरांचे) गुरु शुक्राचार्य यांनी वामनाचा डाव ओळखला आणि सूक्षम् रुप धारण करून झारीमध्ये आत गेले. बाकी डांगे साहेब म्हणाले तसं. दर्भाची काडी कमंडलू मध्ये वामनानं घातल्यावर शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली आणि डोळा फुटला. त्यांना एकाक्ष असंही म्हणलं जाऊ लागलं.
24 Aug 2015 - 10:50 am | संदीप डांगे
अगदी हेच. धन्यवाद!
मला बळीराजा कन्फर्म नव्हतं, वामनाची तीन पावलांची गोष्ट आणि शुक्राचार्य हे कनेक्शन आठवत नव्हते.
16 Aug 2015 - 10:28 pm | संदीप डांगे
आज दोन इन्डोअर पाम ची झाडे घेतलीत. त्यांची निगा कशी राखावी व दुसर्या भांड्यात बदली करतांना काय काळजी घ्यावी हे दोन प्रश्न आहेत. कुणाला याविषयी माहीती असेल तर कृपया द्यावी ही विनंती.
24 Aug 2015 - 2:08 am | बहुगुणी
दुवे:
एक
दोन
साधारण सारखीच माहिती आहे. काही काळापूर्वी घरात पाम्स आणून लावायची इच्छा होती, तेंव्हा माहितीची शोधाशोध केली होती, पण ती इच्छा प्रत्यक्षात आणली नाही त्यामुळे आधिक फर्स्ट-हँड माहिती नाही.
हौसेपलिकडे जाऊन आणखी पैसे खर्च करायची इच्छा असल्यास हे पुस्तक उपलब्ध आहे.
24 Aug 2015 - 10:56 am | संदीप डांगे
बहुगुणीजी,
दुव्यांबद्दल धन्यवाद! सुरेख माहिती आहे. जमलं तर पुस्तक घेइन.
23 Aug 2015 - 7:59 pm | मारवा
हेवीवेट ट्रेनींग ला सपोर्ट करेल असा प्रथिनांची पुर्तता करु शकेल असा प्रोटीन पावडर चा ऑथेन्टीक ब्रॅन्ड कुठला आहे ?
तुम्ही वापरुन बघितलेला आहे का ? खास करुन दिल्ली गाझियाबाद मध्ये आकर्षक डब्यात रीपॅक होणारा इम्पॉर्टेड नको भारतीय उत्पादक बनवत असलेला असेल तर प्राधान्य आणि व्हे प्रोटीन चा च हवा कृपया सुचवा. हेल्थ कार्ट बघुन झालेल आहे.
फार्मास्युटीकल्स कंपनीज ग्लॅक्सो सिप्ला वगैरे व्हे प्रोटीन पावडर बनवत नाही का ?
24 Aug 2015 - 11:54 am | भुमन्यु
सप्लीमेंट्सचा मी समर्थक नाही. काही विशेष कारण असे नाही परंतु, जीम ट्रेनर आणि तिथे बसलेल्या त्या डाएटीशियन्स यांच्यावर आजिबात विश्वास नाही. तस्मात, एखाद्या चांगल्या डाएटीशियन (जीम मध्ये न बसणारी) कडुन सल्ला घेऊनच सुरुवात करा. काही प्रश्नांची उत्तरे:
"व्हे प्रोटीन चा च हवा?"
व्हे प्रोटीन मध्ये कर्बोदकांचे प्रमाण अगदी नगण्य असते. (कर्बोदकांमुळे वजन वाढते).
ब्रांडः
ऑप्टीमम न्युट्रिशन हा बराच नावाजलेला ब्रांड आहे.
फार्मास्युटीकल्स कंपनीज:
अॅबॉट न्युट्रिशन बहुदा देत असावेत. (वडीलांना बायपास नंतर अॅबॉट न्युट्रिशनच्या प्रोटीन सप्लीमेंट्स दिल्या होत्या.)
धन्यवाद
भुमन्यु
24 Aug 2015 - 2:08 pm | मारवा
जीम मध्ये बसणारे जनरली व्यावसायिक हेतुने प्रेरीत चुकीचा सल्ला देतात. म्हणुनच इथे विचारणा केली. सॉय प्रोटीन मध्ये एस्ट्रोजेन या स्त्री हार्मोन्स चे प्रमाण असते. पुरुषांनी त्याचे सेवन केल्याने प्रॉब्लेम होतो व्हे मध्ये तसे नसल्याने व दुसर व्हे अॅबजॉर्ब व्हायला सुलभ आहे म्हणून. काय गंमत माझ्या एका नातेवाइकांना पण डॉक्टरने ऑपरेशन नंतर एक बँड दिला होता त्याचे नाव व्हिवा ब्लुम २५०० रु. अर्धा किलो किंमत होती. मात्र आश्चर्य म्हणजे फुड अँड ड्रग ला आम्ही बांधील नाही असे चक्क लिहुन हात वर केलेले होते. सर्वच प्रोटीन पावडर जनरली बहुधा शेड्युल्ड ड्रग मध्ये येत नसल्याने असे करत असावीत. त्यामुळे फॉर्मास्युटीकल वेलनोन ब्रँड त्यातला त्यात बरा या साठी तसा ब्रॅन्ड शोधतोय
अॅबॉट चा तपास करतो.
माहीतीसाठी धन्यवाद
25 Aug 2015 - 11:44 am | भुमन्यु
अॅबॉट व्हे प्रोटीन
24 Aug 2015 - 5:39 pm | तुडतुडी
दर्गा फक्त सुफी संतांचाच असतो का ? इस्लाम मधील इतर पंथातल्या संतांच्या समाधीला काय म्हणतात ?