मासाहार की शाकाहार... आणि सरकार!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in काथ्याकूट
12 Sep 2015 - 10:20 am
गाभा: 

मासाहार खाण्यावर बंदी नाही घातलेली सरकारने. केवळ 2 दिवस पशु हत्या न करण्याचे आदेश आहेत सरकारचे. ते ही केवळ सरकारी कत्तलखान्यामधे. देवनार येथे. त्याहुनही महत्वाची गोष्ट ही की हां निर्णय कॉंग्रेस सरकारने 2004 साली घेतला आहे. फडणवीस सरकारने नाही.

बृहन्मुंबई महानगर पालिकेने मागिल वर्षी अजुन दोन दिवस पशु हत्या करू नये असा ठराव सर्व पक्षिय मंजुरिने केला होता. तो यावर्षी मागे घेतला आहे.

याचा अर्थ हे केवळ मतांचे राजकारण होते आहे असे वाटते.

'अच्छे दिन' यासंकल्पनेची चर्चा देखिल खूप रंगली आहे. त्यामुळे नमूद करावेसे वाटते की मासाहार करणे किंवा न करणे यातुन अच्छे दिन ठरत नाहीत. झिरो बॅलेन्स अकाउंट उघडणे; 12 रूपयात मेडीक्लेम करता येणे या आणि अशा सारख्या सामान्यांसाठी सुरु केलेल्या योजनांमधुन आर्थिक दृष्टीने मागासलेल्या वर्गाला चांगले आयुष्य जगता येईल हा विचार करणे; बहुतेक याला अच्छे दिन म्हणतात.

शेतकऱ्याला केवळ कर्जमाफ़ी देणे हा उपाय नसून; जलयुक्त शिवार सारख्या संकल्पनेतुन लहान गावे आणि खेड्यातुन कायम स्वरूपी पाण्याचे दुर्भिक्ष कमी व्हावे असे प्लॅनिंग करणे हे असतात अच्छे दिन.

रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक इमारतीला बंधनकारक आहे. ते कोणी केले आहे का? असा स्वतःलाच प्रश्न विचारला तर आपले सामाजिक देणे आपण किती देतो त्याचेदेखिल उत्तर मिळेल.

प्रतिक्रिया

मासाहार ..शाकाहार ..सरकार...अच्छे दिन..कर्जमाफी...

(?)-जेपी

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2015 - 11:34 am | अत्रुप्त आत्मा

@मासाहार की शाकाहार... >> =)) पांडू................... =)) ये रे ये! =)) तुझा आवडता विषय आला बघ

मि पावर ;)

मुक्त विहारि's picture

12 Sep 2015 - 12:18 pm | मुक्त विहारि

तेव्हढा एकच विषय नाही आहे.

इतर पण बरेच विषय ह्या एकाच धाग्यात आहेत.

(पण पुणे विरुद्ध इतर गावे, असा विषय मात्र नाही. धागाकर्ता/धागाकर्ती बहूदा पुणेकर असावा/असावी.)

याॅर्कर's picture

12 Sep 2015 - 12:41 pm | याॅर्कर

सारखं सारखं तोच विषय ढवळून काढायचा म्हणजे काय म्हणायचं ह्या मिडियाला?
पूर्वी काॅग्रेस काळामध्ये का नाही उगळला हा विषय? तेव्हाही दोन दिवस बंदी होतीच ना?
हा लोंकांच्या आवडीची विषय म्हणजे टीआरपी वाढणार,आणि सरकारविरोधी दुसरे कोणते मुद्दे शिल्लक नसावेत बहुधा? म्हणून सारे धंदे चाललेत.
सरकारने आता मिडियाबंदी घालायला हवी.कारण हा वाद शाकाहारी विरूद्ध मांसाहारी असा नाही तर......

हिंदू(मांसाहारी),मुसलमान,ख्रिश्चन,बौद्ध,(दलित) Vs हिंदू(शाकाहारी),जैन,लिंगायत
असा आहे.
मज्जाच आहे बुवा, नवीन IPL आहे वाटतं?सगळे इकडेतिकडे मिक्स.
जास्त बोली कोणाकोणाची लागते बघुया.

दुश्यन्त's picture

12 Sep 2015 - 8:12 pm | दुश्यन्त

मुद्दा तोडून मोडून चलाखीने मांडला आहे हे दिसतेय. याआधी २ दिवस बंदी असायची तेव्हा कधी वादंग झाला नाही. मीरा भायंदर मध्ये भाजपच्या महापौरांनी ८ दिवसांची बंदी घातली , पाठोपाठ मुंबई- नवी मुंबइत प्रशासनाकडून ४ दिवस बंदी घालण्यात आली म्हणून हा वाद झाला आहे. भाजप हा संधिसाधू पक्ष आहे. काड्या टाकून वाद निर्माण करायचे आणि मज बघायची हा भाजपचा खेळ नेहमीचा झाला आहे. या वादाला भाजपेयी कारणीभूत आहेत. ८ -८ दिवसांची बंदी चुकीची आहे. सगळीकडून टीका झाली , कोर्टाने झापले तेव्हा परत २ दिवसांवर येवून थांबले.

रेन वॉटर हार्वेस्टिंग बाजूला राहू दे. आत्ता पण चिकार ठिकाणी पाणी वाया जात असते. त्याच्यावर municipality काय करते ? १०० वर्ष जुन्या पाईप लाईन बदलण्य ऐवजी इतर चमको गिरी काम फक्त करते. जेव्हा कधी लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते तेव्हा हे लोक तिकडे हात लावणार. आज पेपर मध्ये बातमी आहे कि लुइस वाडी ठाणे येथे लाईन फुटली आहे पण वाहतूक बंद करू शकत नाही म्हणून पाणी वाया जात आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग तर बाजू ला राहू दे. खूप ठिकाणी टाक्या ओवर फ्लो होऊन पाणी वाया जाते . त्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला. ऐकत नाहीत. त्यांना वरूनच मार बसला पाहिजे तर जागे होतील. muncipality याच्यावर काही करू इच्छिते का ? मला निनावी तक्रार करायची आहे. कशी करू ? काही मार्ग आहे का ? email id / फोन नंबर ?
१० हजार रु मध्ये ऑटो सेन्सोर बसवून मिळतात टाकीला. पाणी अजिबात वाया जाणार नाही. जनता अडाणी असेल आणि हे करत नसेल तर तो मार्ग तिला दाखवा कि. काही incentive द्या. लोक करतील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Sep 2015 - 6:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

१० हजार? हॅ हॅ हॅ. २२०० रुपये विथ ३ वर्षांची सेन्सर गॅरंटी आणि ६ महिन्याची फ्लोट वॉरंटी.

अभिजित - १'s picture

15 Sep 2015 - 8:38 pm | अभिजित - १

मी आपला एक जास्तीत जास्त म्हणून आकडा टाकला होता. नुसत्या गणपती किवा सत्य नारायण पूजेचे ( विथ जेवण ) १००० रु वर्गणी काढतात. पण टाकीला सेन्सोर बसवायला पैसे नाहीत. आणि याबाबत काही जन जागृती करावी आणि ऐकत नसतील तर लोकांना बांबू लावावा असे मायबाप सरकारला पण वाटत नाही.

काळा पहाड's picture

15 Sep 2015 - 8:07 pm | काळा पहाड

खूप ठिकाणी टाक्या ओवर फ्लो होऊन पाणी वाया जाते . त्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला. ऐकत नाहीत.

हा रक्तातला प्रॉब्लेम आहे. त्यावर उपाय नाही. एखाद्या हुकूमशहा ने बंदुकीच्या दस्त्याने अशा लोकांचं डोकं फोडणे हा एकमेव उपाय आहे यांच्यासाठी. आणि बहुसंख्य भारतीय असेच आहेत.

तुडतुडी's picture

15 Sep 2015 - 12:43 pm | तुडतुडी

अभिजित - १
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx
इथे complaint देवू शकता .
25508171 हा फोन नंबर दिलाय .

अभिजित - १'s picture

15 Sep 2015 - 7:29 pm | अभिजित - १

धन्यवाद . पण मला मुंबई आणि ठाणे येथील हवा आहे. बाकी इथल्या muncipal बाबुना पाण्याची फार फिकीर नाहीये. बेफाम पाणी सगळी कडे वेस्ट होत असते. त्यांना काही करायचेच नाहीये. याच्या करता स्पेशल सेल स्थापन करता येईल. पण इथे मलई नाही. होऊ दे खर्च प्रवृत्ती आहे.

वेल्लाभट's picture

15 Sep 2015 - 12:59 pm | वेल्लाभट

आधीच सांगतो हे धागाकर्त्याला उद्देशून नाही तर एक जेनेरिक स्टेटमेंट आहे.

भारतात लोकांना काम धंदे नाहीयेत. शाकाहार-मांसाहार उगाळत बसलेत.

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2015 - 7:24 pm | ज्योति अळवणी

संपूर्ण सहमत