जनातलं, मनातलं
पाकिस्तान-७

“पाकिस्तानने भारताला सहज पराभूत केले आणि केवळ संयुक्त राष्ट्रांच्या युद्धविरामामुळे युद्ध थांबले."
- जेम्स विनब्रँड (1965 कच्छ रण युद्धासंबंधी. पाकिस्तान आणि मध्य आशिया तज्ञ)
या देवी सर्वभूतेषु...
भारतात जे पाच प्रमुख हिंदू उपासना पंथ आहेत त्यापैकी शाक्त हे प्राचीन तसेच सर्वदूर प्रभाव असलेले होत. त्यांच्या प्रमुख तीर्थ क्षेत्रांचा उल्लेख शक्तीपीठ असा केला जातो. यातील कामाख्येसारखी काही अतिप्राचीन मूर्तिपूजेपेक्षाही प्राचीन देवस्थाने आहेत तर वैष्णोदेवीसारखी अलीकडच्या काळात नावारूपाला आलेली परंतु विख्यात असलेली अशी अनेक स्थाने आहेत.
मोगरा, पॉपकॉर्न आणि एआय
अगदी काही क्षणापुर्वीचे घरातील संभाषण
* मोगर्याचा वास भारी येतोय
* मला तर मोगर्याची उमललेली फुलं पॉपकॉर्नसारखी वाटली
हे संभाषण ऐकत असताना माझ्या समोर गूगल जेमिनी ओपनच होते. अस्मादिकांनी गूगल जेमिनीस खालील प्रश्न टाकला
प्रॉम्प्ट :
Show me picture of 'Mogra flowered plant' by replacing flowers with popcorn
माझी नर्मदा परिक्रमा
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो - धम्मपठारावरून थेट वृत्तांत
तुम्हाला ज्युरासिक पार्क या सिनेमातला तो जगप्रसिद्ध संवाद आठवत असेल "Life Finds way"
तसाच काहीसा अनुभव मला नुकताच आला आणि तो आपल्या सर्वाबरोबर शेअर करावा या साठी हा लेखन प्रपंच.
आणि हो या सगळ्या अनुभव प्रापंचात आपल्या मिपाचाही तेवढाच महत्वाचा वाटा आहे हे देखील मला आनंदाने नमूद करावेसे वाटते.
बेसरकार...
17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले.
मनी वसे ते
मनी वसे ते
--------------------------------------------------------------------------------------------------------
२७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन होता. त्यादिवशी रात्री शाळेत थांबायचं ठरलं. सर असं म्हणल्यावर त्या कल्पनेने वरुणला धमाल वाटली. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन होता.त्याच्या तयारीसाठी मुलं काम करणार होती.
अपहरण - भाग ४
भाग ३ - https://misalpav.com/node/51961
कर्नल ऑडमिंटन.
एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने! कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता.
पाकिस्तान-५
लोकशाहीचा दिवा विझण्यापूर्वी एकदाच फडफडला. भारतात प्रबळ विरोधी पक्ष उदयास यायला दशके गेली, एक पक्ष कितीतरी वर्षे विनासायास जिंकत राहिला; पाकिस्तानात मात्र विरोधी पक्ष लगेच तयार झाला. पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचे दोन्हीही संस्थापक मरण पावताच विघटन होऊ लागले.
सोम्या बाबा.
संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती.
"हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं.
"रुसलाय," आई म्हणाली.
"कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला.
"त्याला गाय हवेय," आई म्हणाली.
अपहरण - भाग ३
भाग २ - https://misalpav.com/node/51954
या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.
द होल ट्रूथ!
जेव्हा पक्या मला रस्त्यात आडवा गेला तेव्हाच मला समजायला पहिजे होत कि आजचा दिवस काही आपला नाही.
“चल, काहीतरी पिऊया.”
“नकोरे. अगदी आत्ताच चहा पिऊन बाहेर पडलोय.”
“मी कुठे म्हणतोय चहा घे म्हणून. काहीतरी थंडा घेऊ या. लस्सी, कोक, लिंबूपाणी किंवा अमृत कोकम. उन बघ काय राणरणतेय. फारा दिवसांनी पकड मध्ये आला आहेस. खूप गप्पा पेंडिंग आहेत.”
- ‹ previous
- 33 of 1009
- next ›
