प्रस्तावना : काल तीला भेटलो...ती धड हो म्हणत नाही....तिच्यासाठी ही कविता....
तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात |
तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात ||
ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय |
तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय ||
प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा |
जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा ||
नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण |
तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण ||
तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर |
तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर ||
आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा |
तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मला बँडबाजा ||
येतेस रोज संध्याकाळी, राणीच्या बागेत फिरायला |
एकदाचा होकार दे, आणी मुक्त कर माझ्या जिवाला ||
प्रतिक्रिया
30 Sep 2009 - 8:31 pm | दशानन
तुला एका गुरुची गरज आहे....
माझ्याकडे ये... मी तुला दिक्षा देऊ म्हणत आहे ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
30 Sep 2009 - 8:40 pm | दशानन
तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर |
तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर ||
अल्टिमेट ओळी :)
छान आहे रे... कविता...!
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
30 Sep 2009 - 8:40 pm | सूहास (not verified)
तुला एका टारुची गरज आहे....
राजेकडे जा... तो तुला "दिक्षा" देऊ म्हणत आहे,त्याने दिक्षाला सोडली तर...
प्रभ्या..
येतेस रोज संध्याकाळी, राणीच्या बागेत फिरायला |>>>
"नाईट आउट" च्या युगात राणीच्या बागेतच न्या तुम्ही, कशा येणार रे पोरी तुमच्याबरोबर...
सू हा स...
30 Sep 2009 - 8:50 pm | छोटा डॉन
>>"नाईट आउट" च्या युगात राणीच्या बागेतच न्या तुम्ही, कशा येणार रे पोरी तुमच्याबरोबर...
=)) =))
च्यायला खरं आहे बे सुहास तुझे ...
आपल्याला कवितेतले कायबी कळत नाही, मात्र लै तळमळीने लिहली आहे असे वाटते.
एखादा गुरु गाठा प्रभोशेठ, असले मामले लै बिकट असतात ... ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
30 Sep 2009 - 9:16 pm | प्रभो
>>"नाईट आउट" च्या युगात राणीच्या बागेतच न्या तुम्ही, कशा येणार रे पोरी तुमच्याबरोबर...
कारे बाबा..तु रोजच्या नाईट आउट वालीला तुझी बायको बनवतोस का?????? म्हणजे परवडायला नको का????
30 Sep 2009 - 9:21 pm | सूहास (not verified)
कारे बाबा..तु नाईट आउट वालीला तुझी बायको बनवतोस का??????>>>
अरे रे निव्वळ गैरसमजापोटी असे काही लिहीशील असे वाटले नव्हते..असो...बहुतेक ट्रीपला जाऊन " अंताक्षरी" म्हणणार्यापैंकी एक दिसतोयस तु..ये एकदा पुण्याला " सात्विक नाईट आउट" काय असते ते दाखवु..आणी तु येतोयेस ना शनीवारी .फोनव मला (दु.क्र. व्यनी केला आहे)..बाकी दे रे सोडुन कोणालाही कोठेही घेउन जा भावना महत्त्वाची..म्हणुन कविता छान आहे असे म्हटले ..
कवितेचा मतितार्थ समजावा...नाहीतर फाट्यावर मारण्यात येईल... >>>
जा नाही समजला मतितार्थ ..मार आता ते काय ते फाट्यावर वगैरै (तात्यांनी हा शब्द मिपाला देउन जमाना झाला तरी त्याच्यातच रहा तुम्ही..)
बाकी जे आम्हाला फाट्यावर मारायला निघालेत ते सौताच सौंदर्यफुफाट्यावर मेलेत .
सू हा स...
30 Sep 2009 - 9:29 pm | प्रभो
अरे रे निव्वळ गैरसमजापोटी असे काही लिहीशील असे वाटले नव्हते..असो
असेच म्हण्तो...अरे बाबा ते असंच लिहिला होतं....परवडत नाही रे नाईट आउट वाली...सध्याची जरा वेगळीय...म्हणूनच पटायला अंमळ जास्त वेळ घेतेय.... असो...
गैरसमज नसावा.... :)
30 Sep 2009 - 10:08 pm | दिपाली पाटिल
प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा |
जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा ||
त्या तिकडे त्सुनामी आला की रे... :D
दिपाली :)
30 Sep 2009 - 11:00 pm | अवलिया
कविता वाचुन आम्हाला आमच्या एका जुन्या मित्राची आठवण आली.
तो सारखा सारखा कौल काढत असे... तुम्ही कविता करत आहात.
पण तुम्ही सज्जन दिसताहात म्हणुन उत्तेजनार्थ प्रतिसाद दिला ! :)
लगे रहो.... ही नाही तर ती.. कुणीतरी नक्की हो म्हणेल !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Oct 2009 - 12:57 pm | विजुभाऊ
कविता वाचुन आम्हाला आमच्या एका जुन्या मित्राची आठवण आली.
तो सारखा सारखा कौल काढत असे... तुम्ही कविता करत आहात.
सहमत मलाही त्या कौलारु सदस्य मित्राची आठवण झाली.
त्याचे अनुभव जाणून घ्या. या बाबतीत तो सदस्य अनुभवी आहे
30 Sep 2009 - 11:18 pm | टारझन
कसले डोहाळे लागले रे भावा ?
तात्याला आदर्श मान !! तानपुरा खाजव !! दारू घेत जा !! आणि उरलेला वेळ आवडत्या स्त्रीच्या सानिध्यात!
किंवा लेका , एखादी तरी कविता इथं टाकण्याऐवजी तिला ऐकव .. काहीतरी चान्स बनेल !!
मला दाट संशय यायला लागलाय .. हा प्रभ्या इथेच कोणावर तरी लाईन मारतोय म्हणून !! =)) उंच आहे तसा , उंच लोकांना राग येत नाही म्हणे =)) =))
-(पक्षी निरिक्षणात मग्न) टारझन वासुदेव
30 Sep 2009 - 11:22 pm | अवलिया
सहमत आहे रे...
हाण तिच्यायला
=)) =)) =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Sep 2009 - 11:25 pm | प्रभो
भाड्या...टारभार
स्वताचे कारभार असे दुसर्याच्या अंगावर टाकू नयेत.... =))
--प्रभो
1 Oct 2009 - 4:56 am | सुबक ठेंगणी
तुझी 'ती' हुच्चवाली आहे का रे? ह्यावेळी लेखन शुद्ध झालंय! (संदर्भः फक्त तूझ्यासाठी ;) )
अरे खूप मनापासून लिहिली आहेस...म्हणेल ती हो नक्की :D
राजेपेक्षा गणपाची दीक्षा घ्या! ;)
5 Oct 2009 - 4:35 pm | प्रभो
हुच्चवाली नाय गं....ती आपली साधीच हाय....म्हणून तर लै वेळ लागतोया.....
--(येशेशीला मर्हाटीत ६३ मिळालेला)परभो....
1 Oct 2009 - 7:25 am | लवंगी
मेरी जीवन नैया बिच भवरमे गुडगुड गोते खाए
उसको पार लगा दे
मेरे अंधे कुवेमे दिप जलाके करदे उजाला ...
अशी अवस्था केली कि रे देवदास तुझी..
=))
1 Oct 2009 - 8:40 am | शाहरुख
कविता करून पोरी पटत असत्या तर मग अजून काय पाहिजे होते राव !!
डायरेक्ट जाऊन विचारा "लाईन देती का" म्हणून..
(लायनर) शाहरुख
1 Oct 2009 - 11:00 am | प्रभो
शारूक,
तुझी प्रतिक्रिया वाचून मला पुरूषोत्तम मधे पाहिलेल्या एका एकांकिकेची आठवण झाली...तिचं नाव होतं "गमभन".....मस्त होती....त्यातल्या एका पात्राचे डायलॉग होते हे..."ए...आपल्याला लाईन देते काय????"
(सध्या पट्टीने लाईन मारणारा) प्रभो
4 Oct 2009 - 8:41 pm | प्रमेय
मित्रा, माझा एक सल्ला मनाचा...
जरा मित्रांसोबत वेळ घालव...
समदु:खी माणसांबरोबर हे असले दु:ख हलके होइल...
बाकी सोबतीसाठी कधीही हाक मार...
आम्ही आहोत ना यार...
5 Oct 2009 - 10:17 am | हर्षद आनंदी
प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा |
जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा ||
नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण |
तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण ||
तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर |
तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर ||
जी कोण आहे, तीला ऐकवाच एकदा. किमान पक्षी हे खुळं बरं भेटलं असे म्हणुन देईल लाईन ;)