राम राम मंडळी,
उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी, अर्थात गणेश चतुर्थी...!
लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत..
आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना..
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा! आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व समाधानाचे आयुष्य लाभो हीच त्या विघ्नहर्त्या, सुखकर्त्या-दुखहर्त्या चरणी प्रार्थना..!
बोला,
गणपतीबाप्पा मोरया..
लालबागच्या राजाचा विजय असो....!
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
22 Aug 2009 - 12:21 pm | mamuvinod
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा
तात्याचे व आम मिपाकराचे अभिनदन दुसरा वर्धापन दिनानिमित्त ....
धन्यवाद
मामु
23 Aug 2009 - 7:19 pm | डॉ.प्रसाद दाढे
श्रीगणेशाच्या कृपेने मिसळपावची अशीच भरभराट होवो.. !
तात्यांचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
22 Aug 2009 - 12:59 pm | दशानन
गणपतीबाप्पा मोरया..
लालबागच्या राजाचा विजय असो....!
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
22 Aug 2009 - 1:50 pm | समंजस
हेच म्हणतो!!!!
23 Aug 2009 - 2:49 am | लवंगी
मिपा जिये हजारो साल
22 Aug 2009 - 12:22 pm | विनायक प्रभू
वेगवेगळ्या विचारांच्या सदस्यांना एकत्र बांधुन ठेवणारे हे संस्थळ असेच उंची गाठत राहो.
22 Aug 2009 - 2:29 pm | नंदन
सरांशी सहमत आहे. दोन वर्षं पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन आणि आगामी अनेक वर्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Aug 2009 - 7:46 pm | घाटावरचे भट
मिपाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. मिपाची कीर्ती अशीच उत्तरोत्तर वाढत राहो अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया!!
22 Aug 2009 - 8:41 pm | पिवळा डांबिस
दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल मिपाचे आणि मिपाकारांचे हार्दिक अभिनंदन!!!!
आगामी अनेक वर्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!!
आपला,
पिवळा डांबिस
22 Aug 2009 - 9:11 pm | यशोधरा
पिडांकाकांसारखेच म्हणते!
23 Aug 2009 - 7:06 pm | प्रियाली
सर्वांमागून का होईना पण माझ्याकडूनही अनेक शुभेच्छा!! :)
22 Aug 2009 - 12:34 pm | मदनबाण
गणपती बाप्पा मोरया !!! :)
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्धल तात्या अभ्यंकर यांचे सर्व प्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!! :)
मिपा ने अशीच प्रगती करावी हीच सदिच्छा !!! :)
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
22 Aug 2009 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
असेच म्हणतो :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
22 Aug 2009 - 12:46 pm | अवलिया
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
असेच म्हणतो :)
--अवलिया
==============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
22 Aug 2009 - 12:50 pm | गणपा
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
हेच बोल्तो. ;)
22 Aug 2009 - 3:01 pm | सहज
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
हेच बोल्तो.
:-)
22 Aug 2009 - 6:47 pm | टारझन
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
+१
-(मिपावर आपली ओळख णिर्माण केलेला) टारझन
23 Aug 2009 - 2:38 am | निमीत्त मात्र
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
23 Aug 2009 - 6:08 am | अनामिक
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
-अनामिक
24 Aug 2009 - 9:08 am | दिपक
इतके सुंदर संकेस्थळ काढल्या बद्दल तात्या अभ्यंकर यांचे सर्वप्रथम अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!
गणपती बाप्पा मोरया !! मिपावर तुमचे आशिर्वाद राहुद्या! :)
22 Aug 2009 - 12:54 pm | भाग्यश्री कुलकर्णी
या चांगल्या संकेतस्थळाची वाटचाल अशीच दिवसेंदिवस बहरत राहो.तसेच सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा .
23 Aug 2009 - 11:04 am | आनंदयात्री
हेच म्हणतो. हार्दिक अभिनंदन !
22 Aug 2009 - 1:02 pm | भोचक
महाराष्ट्रापासून दूर राहूनही आमचं मराठीपण जपणार्या, जागविणार्या नि आम्हाला महाराष्ट्राशी बांधून ठेवणार्या मिसळपावविषयी सविनय कृतज्ञता.
तात्यांचे हे रोप बहरले आहेच, ते अजून बहरो ही सदिच्छा. शिवाय गणेशोत्सवाच्या मिपाला आणि मिपाच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
22 Aug 2009 - 1:08 pm | सन्दीप
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा
22 Aug 2009 - 1:11 pm | रामदास
पुढच्या वाटचालीसाठी.
बाप्पाची कृपा आहेच.
22 Aug 2009 - 1:17 pm | प्रमोद देव
गणरायाची कृपा मिपावर आहेच त्यामुळे काळजी नाही.
तरीही माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा खास करून तात्याला आणि इतर समस्त मिपाकरांना.
इवलेसे रोप लावियले दारी
तयाच वेलू गेला गगनावरी...... असेच घडो!
तथास्तु!
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
22 Aug 2009 - 1:52 pm | विसोबा खेचर
काका, आपला आशीर्वाद हवाच.. तो माझा हक्क आहे! त्याचप्रमाणे आपल्याकडून माझे हवे ते आणि हवे तसे लाड पुरवून घेण्याचाही माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच! :)
आपला,
(प्रमोदकाकांकडून प्रसंगी आऊट ऑफ द वे जाऊनही सपोर्ट मिळण्याची खात्री असलेला) तात्या.
एक सुधारणा -
मूळ शब्द,
इवलेसे रोप लावियले दारी
तयाच वेलू गेला गगनावेरी
असे आहेत.
या बाबतीत बर्याच जणांचा घोटाळा होतो. हृदयनाथ मंगेशकरांनी याचं एकदा फार सुंदर विवेचन केलं होतं. ते म्हणाले होते की माउली इतकी नम्र आहे की ती 'वरी' च्या ऐवजी मुद्दाम 'वेरी' हा शब्द वापरते. गगनापेक्षा मोठं दुसरं काही नाही याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच ते वरी (गगनाच्याही वर) या पेक्षा वेरी (गगनापर्यंत!) असा शब्द मुद्दाम वापरतात!
शेवटी 'वेरी' हा शब्द वापरताना माउलीलाही 'स्काय इज द लिमिट' हेच अभिप्रेत असावं! :)
आपला,
(ह भ प) तात्या.
22 Aug 2009 - 2:24 pm | प्रमोद देव
गगनापेक्षा मोठं दुसरं काही नाही याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच ते वरी (गगनाच्याही वर) या पेक्षा वेरी (गगनापर्यंत!) असा शब्द मुद्दाम वापरतात!
आपुनको मालूमच नही था.
बरं झालं...ह्या निमित्ताने ज्ञानात भर पडली.
माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे
22 Aug 2009 - 8:48 pm | अन्वय
तात्या, गोरख कल्याणची याद करून दिली. धन्यवाद!
वर्धापन दिनाच्या लाखलाख शुभेच्छा!!
22 Aug 2009 - 1:23 pm | बिपिन कार्यकर्ते
द्वितिय वर्षपूर्तीनिमित्त मिपाचे अभिनंदन. हे स्थळ असेच उत्तरोत्तर वर्धिष्णु राहो हीच इच्छा!!!
बिपिन कार्यकर्ते
22 Aug 2009 - 1:28 pm | दिपाली पाटिल
द्वितिय वर्धापन दिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा... :)
दिपाली :)
22 Aug 2009 - 5:04 pm | रेवती
+१
दिपालीसारखेच म्हणते.:)
रेवती
22 Aug 2009 - 8:12 pm | सखी
असेच म्हणते - अनेक शुभेच्छा!
24 Aug 2009 - 12:20 pm | स्वाती दिनेश
असेच म्हणते,अनेकोत्तम शुभेच्छा!
स्वाती
22 Aug 2009 - 1:40 pm | ऋषिकेश
हॅप्पी बर्थडे मिसळपाव!!!! :)
तात्या आणि सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन आणि संकेतस्थळ उत्तरोत्तर बहरो अशी शुभकामना.
ऋषिकेश
------------------
दुपारचे १ वाजून ३७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "हॅपी बर्थडे टु यु!!!हॅपी बर्थडे टु यु!!! हॅपी बर्थडे मिसळपाव.. हॅपी बर्थडे टु यु!!!!!!...."
23 Aug 2009 - 12:42 pm | Nile
हॅप्पी बर्थडे मिसळपाव!!!
22 Aug 2009 - 1:59 pm | नाखु
कुणि निंदा कुणी वंदा......
मिसळ पाव भेट देणे हाच आमचा (आवडता) धंदा...
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
22 Aug 2009 - 2:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द्वितिय वर्धापन दिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन !!!
-दिलीप बिरुटे
22 Aug 2009 - 2:17 pm | घाशीराम कोतवाल १.२
मिसळपाव ला द्वितिय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्चा चला मंडळी कटटा करु एक अपेयपान निषिध असा फक्त गणेश दर्शन करु मुंबईचे काय तात्या?
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
22 Aug 2009 - 2:19 pm | पोलिसकाका_जयहिन्द
सर्व मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा..
आणि द्वितिय वर्धापन दिनानिमित्त मिपाचे आणि तात्यांचे हार्दीक अभिनंदन.....
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
22 Aug 2009 - 2:44 pm | दत्ता काळे
केवळ दोनच वर्षात लोकप्रियतेची उत्तुंग उंची गाठणार्या मिसळपावचे, त्याच्या मालकांचे आणि सर्व संपादकमंडळींचे मनापासून अभिनंदन !
22 Aug 2009 - 2:53 pm | झकासराव
वा!!
आपल्या सर्वांचच अभिनंदन.
तात्या पार्टी कधी करायची?
:)
22 Aug 2009 - 2:55 pm | सनविवि
तात्यांचे आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन. एवढे सुंदर संस्थळ सुरू केल्याबद्दल आणि स्वखर्चाने ते सुरू ठेवल्याबद्दल तात्यांचे आभार :)
22 Aug 2009 - 4:01 pm | मन
मिपा मालक , मिपा विश्वकर्मा(इथलं आभासी मिपा जग बनवणारा आणि त्यात वेळोवेळी सुधारणारा करणारा अभियांत्रिक),मिपा संपादक वर्ग ह्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.
आभार इतक्याच साठी की अस सरळसाधं स्थळ मिळणं आणि नव्या सदस्यालाही त्यात लागलिच मोकळेपणानं फिरता येणं हेच त्या संस्थळाचं एक मोठं यश आहे.
वेळोवेळी इथं अफाट वैविध्यपुर्ण (अगदी टवाळखोरी पासुन गंभीर विषयावर लिहिणारे सर्व)लेखक ह्यांचं अभिनंदन.
वाचकंचाही अशा लिखाणाला प्रतिक्रिया देउन सतत लिहितं ठेवण्यात मोठा हातभार आहे. त्यांचेही आभार.
ह्या स्थळाचा प्रवास अशाच योग्य दिशेला सुरु राहिल्यास मिपा केवळ स्थळ न राहता एक मोठी चळवळ किंवा समुदाय(community or activity) म्हणुनही उदयाला येइल हे निश्चित.
One day MIPAA will have it's own SAY.
It will be heard loud and clear to the greate extent.
कुणीही मुद्दाम AGENDA असा न ठरवता सुद्धा बहुतांश सदस्यांची नकळतच (थोडी फार का असेना)सामाजिक जाणिव वृद्धिंगत व्हायला मिपाचं योगदान आहेच.
मला स्वतःला आवडणारी इथलं गोष्ट म्हणजे :-
तत्काळ येणारे उत्स्फुर्त प्रतिसाद.
त्यामुळच चर्चेत जान येते, स्वतःचं लिखाण भरुन पावल्यासारखं वाटतं.
तुम्ही काही लिहा हो, तुमच्याशी तत्काळ सहमत होणारी किंवा हक्कानं/तावातावानं भांडाणारी माणसं इथं आहेत.
ह्यामुळचं कसं अगदि जिवंतपणा येतो इथल्या चर्चेला आणि नुसतच वाचायचं म्हटलं तरी मजा येते.
नक्की सांगता येत नाहिये पण म्हणायचय ते असं:-
"मिपा हे एक मर्हाटी मधलं आगळं वेगळं रसायन आहे लोक सहभागातुन घडत असलेलं. त्याची स्वतःची अशी काही वैषिष्ट्य आहेत. काही नव्यानं घडताहेत्.इथं सध्या नियमित दिसणारे लेखक हे केवळ व्यक्ती राहिली नसुन व्यक्तिमत्व झाली आहेत. म्हणजेच, व्यक्तींची आयुर्मयादा सान्त असली तरी व्यक्तीम्त्वाला काल मर्यादा नसते. अगदि उच्च पातळीवर बघाय्चं झाल्यास हजारो वर्षा नंतरही कृष्ण्-राधा-रुक्मिणी, कृष्णार्जुन ही व्यक्ती नाहित तर व्यक्तिमत्वं म्हणुनच जास्त जगली आहेत. त्यांच्या आयुष्या नंतरही त्यांचे विचार कुठतरी बोलले जाताहेत्...लिहिले जाताहेत.
आपण(व्यक्ती ) आज आहोत , उद्या असु वा नसु ...
मात्र आपलं इथलं अस्तित्व/व्यक्तिमत्व कायमच इथं राहिल. कदाचित एखाद्याच्या प्रभावानं दुसर्यात प्रवेश करुन त्यानं आधुनिक परकायाप्रवेश केलेला असेल किंवा त्याचा पुनर्जन्म झाला असेल विचांरांच्या रुपात! "
एखाद्याच्या व्यक्तिमत्वाला असं दीर्घायुष्य देणार्या मिपाचं म्हणुनच कौतुक वाटतं.
जियो मिपा... जियो.
आपलाच,
मनोबा
22 Aug 2009 - 4:14 pm | अमोल खरे
असेच म्हणतो.
22 Aug 2009 - 8:23 pm | अनिल हटेला
असाच बोलताये !!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
23 Aug 2009 - 5:52 pm | llपुण्याचे पेशवेll
असेच म्हणतो..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Aug 2009 - 4:21 pm | वेताळ
मिपाच्या व्दितीय वर्धापन दिना निमित्त तात्या अभ्यंकराचे विशेष अभिनंदन.मराठी संस्थळ काढुन ते व्यवस्थित दोन वर्षे चालवणे ही सोप्पी गोष्ट नाही आही.त्यामुळे तात्यांचे मनपुर्वक अभिनंदन. मिपाचे तांत्रिक सल्लागार निलकांताचे ही अभिनंदन.बाकी सर्व मिपा संपादक व वाचकाचे हार्दिक अभिनंदन.
सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
वेताळ
22 Aug 2009 - 4:38 pm | स्वाती२
तात्या आणि निल़कांत, मिपाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त त हार्दिक अभिनंदन! अनेक शुभेच्छा!
गणपतीबाप्पा मोरया!
22 Aug 2009 - 4:52 pm | चतुरंग
तात्याचे, तंत्रज्ञ नीलकांतचे आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन!
ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा.
गणपतीबाप्पा मोरया!! :)
-चतुरंग
ता.क. एक राहूनच गेलं. 'गमभन' कर्त्या ॐकारचेही मनःपूर्वक आभार कारण त्याच्या कर्तबगारीनेच आज मराठी संकेतस्थळे मानाने उभी आहेत! :)
22 Aug 2009 - 6:36 pm | प्राजु
तात्याचे, तंत्रज्ञ नीलकांतचे आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन!
:)
ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा.
यातला प्रगल्भ हा शब्द खूप महत्वाचा आहे असं वाटलं. :)
'गमभन' कर्त्या ॐकारचेही मनःपूर्वक आभार कारण त्याच्या कर्तबगारीनेच आज मराठी संकेतस्थळे मानाने उभी आहेत!
लाख बोललात! सहमत आहे.
जय गणेश!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Aug 2009 - 8:29 pm | मस्त कलंदर
तात्यां, तंत्रज्ञ नीलकांत, ओंकार आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन!
ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा.
सर्व मिपाकरांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
गणपतीबाप्पा मोरया!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
22 Aug 2009 - 5:03 pm | क्रान्ति
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचं हार्दिक अभिनंदन! :) मिपाच्या आजवरच्या वाटचालीचं कौतुक करावं, तेवढं कमीच. =D> यापुढची घोडदौड अशीच जोसात चालत राहो ही सदिच्छा. :) गणरायाच्या कृपेनं मिपानं असंच उत्तरोत्तर प्रगतीपथावर रहावं! =D>
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
22 Aug 2009 - 5:09 pm | अजय भागवत
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ~
शुभेछा!
22 Aug 2009 - 5:19 pm | विकास
मिपाच्या द्वितीय वर्षवर्धापनदिना बद्दल हार्दिक शुभेच्छा! अभिनंदन तात्या आणि नीलकांत!
अनेक विचारांचे आणि अनेक पद्धतीचे सदस्यांचे वाचताना तसेच त्यांच्याशी संवाद साधत असताना विचारांची समृद्धी येते. त्या बद्दल विशेष आभार!
22 Aug 2009 - 5:29 pm | नितिन थत्ते
मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
22 Aug 2009 - 5:53 pm | दिपोटी
मिसळपावने गेल्या दोन वर्षांत केलेल्या उत्तम आणि उल्लेखनीय वाटचालीबद्दल तात्या आणि नीलकांत यांचे विशेष अभिनंदन !
मिपाची यापुढील कामगिरी व प्रगती सुध्दा अशीच अखंड जोमात आणि प्रचंड जोषात होवो ही सदिच्छा !
- दिपोटी
22 Aug 2009 - 7:21 pm | हरकाम्या
तात्या तुझे अभिनंदन करायला माझ्याकडे " शब्दच "नाहीत.
" सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन "
22 Aug 2009 - 7:33 pm | चकली
तात्या आणि सर्व मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन !
चकली
http://chakali.blogspot.com
22 Aug 2009 - 7:40 pm | हृषीकेश पतकी
' मिसळ ' अगदी उत्तम जमून आली आहे...
तिची चव आपल्या सर्वांच्या जीभेवर अशीच रेंगाळत राहो हीच सदिच्छा !!
सर्व मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा..
आपला हृषी !!
22 Aug 2009 - 7:52 pm | अविनाश ओगले
अभिनंदन आणि शुभेच्छा!
-अविनाश ओगले बेळगावकर
22 Aug 2009 - 7:58 pm | मनस्वी
तात्या आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
22 Aug 2009 - 8:21 pm | मनीषा
द्वितीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा .. आणि अभिनंदन !!!
22 Aug 2009 - 8:38 pm | अव्यक्त
तात्यां, तंत्रज्ञ नीलकांत, ओंकार आणी सर्व मिसळपावकरांचे हार्दिक अभिनंदन!
ही वाटचाल अधिकाधिक प्रगल्भ होत पुढे चालू रहावी अशी सदिच्छा.
सर्व मिपाकरांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
गणपतीबाप्पा मोरया!!
22 Aug 2009 - 8:48 pm | सुनील
तात्या. नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेकानेक शुभेच्छा!!
(मिपाकर) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Aug 2009 - 9:06 pm | प्रकाश घाटपांडे
या वाटचाली मध्ये आपल्या सर्वांचाच सहभाग असल्याने समाधान व्यक्त करु या. गजानन सर्वांना सदबुद्धी देवो
(सश्रद्ध?)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Aug 2009 - 9:52 pm | विदेश
तात्या,दुस-या वर्धापन दिनानिमित्त तुमचे अभिनन्दन! मिपा रहो हजारो साल...सर्व मिपा सदस्याना आपल्या पुढील वाटचालीसाठी गणेशाच्या आगमना प्रीत्यर्थ हार्दिक शुभेच्छा!
22 Aug 2009 - 10:36 pm | एकलव्य
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मिपाच्या भरभराटीचा साक्षीदार - एकलव्य
23 Aug 2009 - 6:46 am | चित्रा
आणि अभिनंदन, तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे.
पुढील वाटचालही अशीच भरभराटीची राहो.
23 Aug 2009 - 6:55 am | टुकुल
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन..
मिपा अजुन खुप पुढे जावे !!
--टुकुल
23 Aug 2009 - 8:06 am | नरेंद्र गोळे
मराठी ही काही फक्त शिष्टा अन् सूज्ञांची माय नाही |
इथे मिसळीसाठी पावणार्या सज्जनांचीही तीच आई ||
तिच्या उत्कर्षार्थ कटिबद्ध "मिसळपाव"ही सदा राही |
सदा वर्धिष्णू, समर्थ व्हावे, ही शुभेच्छा त्यास माझी ||
तात्या, नीलकांत आणि सर्व पंच मंडळींना हार्दिक शुभेच्छा!
मिसळपावाच्या चाहत्यांस, ग्राहकांस आणि येथल्या सर्व किरदारांना हार्दिक शुभेच्छा!!
मायबोलीच्या वावरास हक्काचे संकेतस्थळ मिळवून देऊन, दीर्घकाळ अभंग आणि समर्थ राखण्यात आलेल्या दैदिप्यमान यशाखातर समस्त चालक मंडळींचे मन:पूर्वक अभिनंदन!!!
23 Aug 2009 - 9:47 am | क्लिंटन
तात्या आणि सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाच्या दुसर्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मिपाची प्रगती अशीच उत्तरोत्तर होवो ही सदिच्छा.
आय.आय.एम मधील एक विद्यार्थी म्हणून येत असलेल्या अनुभवांवर लेख नोव्हेंबरमध्ये लिहायचा मानस आहे.त्यावेळी आम्हाला आठवडाभर सुट्टी असणार आहे.असो.
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
आय.आय.एम. अहमदाबाद
वस्त्रापूर, अहमदाबाद-३८००१५
गुजरात
23 Aug 2009 - 10:01 am | योगी९००
सर्व मि.पा.करांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा!!!!
तात्यांचे आणि सर्व मि.पा. करांचे द्वितिय वर्धापनानिमित्त अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!!
खादाडमाऊ
23 Aug 2009 - 1:50 pm | अविनाशकुलकर्णी
तात्याचे व आम मिपाकराचे अभिनदन दुसरा वर्धापन दिनानिमित्त ....
23 Aug 2009 - 3:35 pm | संजय अभ्यंकर
मिपा सतत वृद्धिंगत होवो!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
23 Aug 2009 - 4:46 pm | Dhananjay Borgaonkar
तात्यानु..मिपाच्या द्वितीय वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा..
गणराची क्रुपा सदैव मिपावर अशीच राहो..
23 Aug 2009 - 7:21 pm | सागर
सर्व मिसळपाव करांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
सर्व मिसळपाव करांना मिसळपावच्या वर्धापनदिनाच्या ही हार्दिक शुभेच्छा... मिसळपावचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनही साजरा होवो या पुढील उत्तुंग वाटचालीच्या शुभेच्छा ...
(मिसळपावप्रेमी) सागर
23 Aug 2009 - 7:48 pm | बाकरवडी
हप्पी बड्डे मिसळपाव !
:B :B :B बाकरवडी :B :B :B
23 Aug 2009 - 8:23 pm | प्रमोद्_पुणे
मिपाचे हार्दिक अभिनन्दन..श्रीयुत तात्यान्चे पण अभिनन्दन!! मिपा अशीच व्रुद्धिन्गत होवो ही सदिच्छा...
23 Aug 2009 - 11:21 pm | देवदत्त
अभिनंदन आणि शुभेच्छा :)
23 Aug 2009 - 11:21 pm | देवदत्त
अभिनंदन आणि शुभेच्छा :)
24 Aug 2009 - 7:44 am | नि३
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचं हार्दिक अभिनंदन!
---नि३.
24 Aug 2009 - 8:35 am | नीधप
अभिनंदन
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
24 Aug 2009 - 8:42 am | पाषाणभेद
मिपाला हार्दिक शुभेच्छा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
24 Aug 2009 - 9:34 am | अमोल केळकर
समस्त मिसळपाव परिवाराचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
( शुभेच्छुक ) अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
24 Aug 2009 - 9:35 am | आशिष सुर्वे
मिपाच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना शुभेच्छा!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
24 Aug 2009 - 10:33 am | विशाल कुलकर्णी
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा
तात्यांचे व सर्व मिपाकराचे दुसर्या वर्धापन दिनानिमित्त मनःपुर्वक अभिनदन ....! :-)
मागच्या सप्टेंबरमध्ये प्रथम मायबोलीच्या संपर्कात आलो. तिथे लिहीता लिहीता कुठेतरी मिपाबद्दल वाचले आणि इथे डोकावलो. पहिले काही दिवस फक्त अवलोकन चालु होते. हळु हळु लक्षात आले की हे आपल्या स्वभावाला मानवण्यासारखं आहे. सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट इथे जाणवली असेल तर ती ही की इथे प्रत्येकाला सांभाळुन घेतले जाते, सामावुन घेतले जाते अगदी त्याच्या गुण दोषासकट !
मग कधी मिपाकर होवुन गेलो कळलेच नाही ! माबोपासुन सुरुवात केलेला मी, पण आजकाल माबोवर आठवड्यातुन एक्-दोन वेळाच जाणे होते. पण मिपावर मात्र दिवसरात्र पडिक असतो.
पुन्हा एकदा तात्या व सर्व मिपाकरांचे अभिनंदन आणि मनापासुन धन्यवाद ! मिपाला खुप खुप शुभेच्छा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
24 Aug 2009 - 11:38 am | मोहन
तात्या व इतर समस्त सहकार्यांचे हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचाली करता शुभेच्छा.
मोहन
24 Aug 2009 - 1:40 pm | पक्या
अभिनंदन, तात्या आणी पुढील वाटचालीस शुभेच्च्छा !!!