साथीच्या रोगांमध्ये ज्यांची रोग प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना त्याचा कुठेनकुठेतरी फायदा होतच असणार. सध्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांकडे लक्ष दिल्यास त्यात ऍन्टी-ऑक्सिडंट्स, भरपूर प्रथिने असलेले आहार, व्हायटामिन्स (प्रामुख्याने सी), व स्वच्छतेची काळजी (आंतर्बाह्य सुरक्षा) हेच उपाय सुचविलेले दिसत आहेत.
प्लेटलेटस काऊंट हा एक ह्या चर्चेशी जोडला जाणारा आणखी एक विषय. लढाई करायची तर सैन्याची जादा कुमक असणे महत्वाचे.
सध्या आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (बहीण, मामेभाऊ) हे सगळे करत आहोत. विनंती ही की, प्रत्येकाने आपापली रोग प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी काय केले पाहीजे ह्याची माहीती डॉक्टरांच्या मदतीने घेऊन व उपचार लवकरात लवकर सुरु करावेत.