शामी कबाब!!!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
6 Aug 2009 - 10:16 am

"ट्रिंग, ट्रींग...", बरोब्बर सव्वापाच वाजता त्याचा फोन वाजला....
त्याने बरोब्बर ओळखलं की हा तिचा फोन! गेल्या वीस वर्षांचा पायंडा!!! ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी हा तिचा ठरलेला फोन....

"हॅलो", त्याने फोन उचलला.....
"हे बघ, आता मी घरी जायला निघतेय १०-१५ मिनिटांत", तिचा हुकमी आवाज
"ओके, मी पण तितक्यातच निघतोय. काय आणायचंय का? आज काय करायचंय?", त्याची नेहमीची चौकशी...

इतक्या वर्षांची ठरलेली सवय! तिने थेट घरी जायचं आणि त्याने जे काही आणायचं असेल ते घेऊन मग घरी यायचं!!!!

"नाही, काही आणायचं नाही आज! आणि जर तू मला मदत करणार असशील तर शामी कबाब करूयांत आज!!!", तिचा गोड म्हणजे अगदी सुमधूर आवाज......

तो एव्हांना मरून वर स्वर्गात गेलेला!!!! फक्त खात्री करून घेण्यासाठी त्याने विचारलं,

"आज काय करूयांत?", तो.
"शामी कबाब!!! पण मला मदत केली पाहिजेस तू!!!!"
"अगं मदतच काय, तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे मी!!!!" तो संपूर्ण सत्य वदला....
"चावटपणा नकोय!! मदत केलीस तर तेही पुष्कळ आहे", ती अस्सल मराठी मुलगी.
"अस्सं! तर मग तू आता बघच!!!

त्याने घाईघाईने कंप्यूटर बंद केला. १०-१५ मिनिटं गेली उडत. तिला तिच्या आधी घरी भेटायचंच या हेतूने तो ९०-९५ मैलांच्या स्पीडने घरी पोहोचला. तिची कार अजून आलेली नव्हती. त्यातच त्याने आपला पहिला विजय मानून भराभर कपडे बदलले आणि मीट थॉ करत ठेवलं. कांदे कापून ठेवले. चण्याची तिने सकाळी अगोदरच भिजत घातलेली डाळ वाटून ठेवली. लसणाची आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली.......

तितक्यात तिने ड्राईव्ह-वेमध्ये तिची गाडी पार्क केल्याचा आवाज आला. त्याने घाईघाईने त्याचा कुकींग अ‍ॅप्रन अंगावर चढवला. तिच्यायला, उगाच आल्याआल्या बोलणी खायला नकोत.....
:)
ती आत आली. त्याला किचनमध्ये एप्रन घालून बघितल्यावर सुखावली. पण ते किंचितही न दाखवता म्हणाली,

"मी जरा कपडे बदलून येते! मग करूया कुकिंग!!"

तो खुशीत हसला.....

"तू कोणतेही कपडे बदल जानेमन!! शेवटी त्यांचं काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे!!!!", तो मनातल्या मनात खुदखुदला!!!!

तिने कपडे बदलून आल्यावर लगेच किचनचा ताबा घेतला. त्याने केलेली तयारी बघून तिचा आनंद दुणावला....

"बोल आता मी आणखी काय मदत करू?", त्याचा उत्साह...
"हे सगळं ठीक आहे! आता पुढचं संभाळते मी!!!"
"अगं मग मी काय करू?"
"तू आता जाऊन तुझं ड्रींक घे! पण जास्त नाही, दोनच पेग!!!"

पडत्या फळाची आज्ञा घेऊन तो त्याच्या स्टडीमध्ये धावला.....

आज त्याची नेहमीची लाडकी शिवास रीगल सोडून त्याने तात्याच्या गर्लफ्रेंन्डशी सलगी साधायचा चावट विचार केला आणि ग्लेन्फिडिश अनावृत केली....

DSC_0219_311

आणि तीही आतुरतेने त्याला बिलगली!!! च्यामारी ह्या तात्याच्या......

दोन ग्लास घुटके झाले न झाले तोच आतून आवाज आला....
"चल रे, जेवण आहे तयार!!!"

आपल्या मित्राची आठवण झाल्याने त्याने ग्लेनफिडीशला निकराने दूर सारलं.....
मर्द हुवा तो क्या हुवा? आखिर दोस्ती भी कोई चीज होती है!!!!
:)

किचनमध्ये येऊन बघतो तो ताट शामी कबाब, मलगटवानी सूप आणि गार्लिक नानने भरलं होतं.....
किसलेला कांदा आणि काकडीचं कचुंबरही सोबतीला होतं....
हरहर महादेव म्हणून त्याने भोजनावर ताव मारला.....

"वा!! तुझ्या हातचे कबाब म्हणजे हॉटेलं झक मारतात त्यांच्यापुढे!!!", त्याची मनमोकळी प्रतिक्रिया....
ती खुदकन हसली!!! पण तेही त्याच्या नजरेतून सुटलं नाही.....
"अगं पण हे काय? रेसेपी दे ना!!! त्याशिवाय मिसळपाववर कसं लिहिणार मी?", तो.

"अरे त्यात काही नाही, सोपं आहे!! तेलावर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्यात लसूण आणि आल्याची पेस्ट घालून ते परतून घ्यायचं. त्यानंतर आपला शामी कबाबचा मसाला आणि मिरचीपूड परतून घ्यायची. त्याच्यानंतर त्यात खिमा आणि डाळ घालून शिजवून घ्यायचा. पाणी उडवून टाकायचं आणि मग तो खिमा थंड झाल्यावर त्याचे गोळे करून खमंग तळायचे! झाले शामी कबाब, आहे काय आणि नाही काय त्यात!!"

मिपावरच्या भगिनींनो, ही रेसेपी गोड मानून घ्या....

"हो, पण मला एक फोटोही घ्यायचाय! फोटो दिल्याशिवाय तो शिंचा अवलिया प्रसन्न होत नाही!!", तो.
"अरे पण आता फोटो काढायला कबाब शिल्लक राहिलेयत कुठे? जरा आधी तरी सांगायचंस!!!", सचिंत ती...
"ते जे काय उरले आहेत ना, त्याचाच काढू फोटो!! नायतरी अवलियाला चार-पाच कबाबांपेक्षा जास्त बघायची सवय नसणार! अग सडाफटींग माणूस तो!! तो कशाला किलोभरचे कबाब करील?" :)
"तुझ्या जिभेला ना काही हाडच नाहिये!! उगाच कोणाहीबद्दल काहीही बोलतोस!! बघ बाबा, चालत असेल फोटो उरल्या-सुरल्या कबाबांचा तर घे!!"
"चालेल! मेजवानी तर नुकतीच सिद्ध झाली...

DSC_0223_315

अन तबकात उरल्या; देठ, लवंगा, साली...

तो फोटो घेतोय, फ्लिकरवर चढवतोय आणि हे सगळं लिहितोय तोच......

खोलीतला दिवा बंद होऊन नाईटलॅम्प चालू झाला.....
रेशमी वस्त्राची झुळझूळ कानी आली......
आणि त्याच्या आवडीचा मोगर्‍याचा सुगंध दरवळला.........

मित्रांनो, आता त्यानं बेडरूममध्ये जाणं त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे......

जगलो वाचलो, तर उद्या भेटूच....

शब्बा खैर!!!!!!

:)

पाकक्रियाकथाजीवनमानआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Aug 2009 - 10:19 am | अवलिया

वा !
पिडाकाका (आजोबा ;) ) मन तृप्त !!
जियो !! :)

--(सडाफटिंग) अवलिया

सहज's picture

6 Aug 2009 - 10:24 am | सहज

अमेरिकन खिमा असलेल्या पाकृ. व ते खाल्लेल्या अमेरिकानिवासी काका(आजोबा) त्यांच्यावर मन तृप्त करुन घ्यायची वेळ आली?

हाऽऽऽड! अमेरिका द्वेष जिवंत ठेवाच. असे चालणार नाही.

पिडाकाका भारी पाकृ आवल्डी!! सांगायची शैली.

तुम्ही लोक असं लिहता ना मग मला पण दरवेळी जेवायच्या अगोदर फोटो काढल पाहीजे असे वाटते पण मग नको अवलियाची बुरी नजर... :-)

अवलिया's picture

6 Aug 2009 - 10:28 am | अवलिया

ओ सहजराव उगा फाटे फोडु नका पिडाकाकाच्या धाग्याला... !
त्यांची आमची दोस्ती पाहवत नाही का तुम्हाला ? नतद्रष्ट कुठले !

हा प्रतिसाद चांगली नजर असलेल्या सहजरावांना अर्पण !

टारझन's picture

6 Aug 2009 - 11:35 am | टारझन

वा वा .. कं जबरा लिवलंय ... एक णंबर्स .. स्वतःच्या ष्टाईलनं पाकॄ !! ४ ओळींच्या पाककृतीला भरपुर मसाला लावलाय .. आवडलं ..

आणि हो ,

तू कोणतेही कपडे बदल जानेमन!! शेवटी त्यांचं काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे!!!!", तो मनातल्या मनात खुदखुदला!!!!

हे वाक्य हृदयाला भिडले !!

-(डांबिश्रीचा मित्र) टार्‍या

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Aug 2009 - 10:20 am | ब्रिटिश टिंग्या

_/\_

अनिल हटेला's picture

7 Aug 2009 - 2:22 am | अनिल हटेला

_____/\_____

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

आशिष सुर्वे's picture

6 Aug 2009 - 10:31 am | आशिष सुर्वे

खल्लास!!
आपण मटण-चिकन खात नाय.. पण आपल्या सादरीकरणाची पध्दत काळजाचा वेध घेऊन गेली!


@
^
^
फेटा उडवून दाद देतूया राव!!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Aug 2009 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, एकदम झांटम्याटीक रेसिपी आणि लिखाण आहे. मी व्हेजिटेरियन असले तरीही, तुमचं नाव वाचून लेख उघडला आणि अजिबात निराशा झाली नाही.
काकूलाही नमस्कार सांगा.

अदिती

विजुभाऊ's picture

6 Aug 2009 - 10:46 am | विजुभाऊ

मला लेखाचे नाव वाचून अगोदर वाटले की काकुची रेसीपीची वही तुमच्या हाताला लागली की काय?
पण हा तुमचा नेहमीचा डॅम्बीसपणा होता हे वाचल्यावर कळाले.

शंका: मलगटवानी सूप हा सिंधी खाद्यप्रकार आहे का?

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

सुनील's picture

6 Aug 2009 - 10:51 am | सुनील

हे काय पिडां? ऐन श्रावणात तुम्हाला ही रेसिपी द्यायची दुर्बुद्धी व्हावी ना?

पण रेसिपी आणि ती द्यायची इष्टाइल मात्र आवडली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मिसळभोक्ता's picture

6 Aug 2009 - 11:18 am | मिसळभोक्ता

काका,

ग्लेनफिडिशमध्ये अम्मळ बर्फ जास्त पडलाय.. छ्या..

मजाच नाही.

दोन पेक्षा जास्त दगड नको. ही काय रेडलेबल आहे का ? पुढच्यावेळी काळजी घ्या...

बाकी, पाककृतीची श्टाईल जबरा..

बाकी चित्रे (म्हणजे लेखनसीमेनंतरची) कधी ? की ती दुसर्‍या संकेतस्थळावर ? :-) :-)

-- मिसळभोक्ता

Dhananjay Borgaonkar's picture

6 Aug 2009 - 11:22 am | Dhananjay Borgaonkar

काकाश्री..मी शाकाहारी जरी असलो तरी त्या कबाब चा फोटो बघुन पाणी सुटल तोंडाला...

आणी त्यातुन ग्लेनफिडीच चा फोटो बघुन अजुनच खुश झालो..

अजुन येउद्यात...

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:40 am | विसोबा खेचर

खल्लास रे पिडा...

आपला,
(ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.

विंजिनेर's picture

6 Aug 2009 - 1:11 pm | विंजिनेर

ह्म्म्म..
रेशिपी मधे चावट-मसाला अंमळ जास्ती झाला आहे. त्यामुळे शन्नांची एखादी कथानक कमी पण माल मसाला जास्ती अशी गोष्ट असेल तसे वाटते :)
असो..
स्वगतः पिवळा डांबीसांनी गो ग्रीन (हिरवट व्हा ?) चळवळ मनावर तर घेतली नाही ना ;) एकदम ह. घेणे....

श्रावण मोडक's picture

6 Aug 2009 - 1:32 pm | श्रावण मोडक

केवळ निषेध!!!

मी शाकाहारी आहे.. त्यामुळे ही पाकृ करून पाहण्याचा प्रश्न्च नाही.. पण पाकृ देण्याची वेगळी ही शैली आवडली...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

श्रीयुत संतोष जोशी's picture

6 Aug 2009 - 6:15 pm | श्रीयुत संतोष जोशी

लै म्हणजे लैच भारी.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

संदीप चित्रे's picture

6 Aug 2009 - 7:22 pm | संदीप चित्रे

क्या बात है पिडाकाका....
एकदम रेसिपी देताना लव्ह स्टोरीच गुंफली की ... जियो ...

>> "तू कोणतेही कपडे बदल जानेमन!! शेवटी त्यांचं काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे!!!!", तो मनातल्या मनात खुदखुदला!!!!

>> आणि त्याच्या आवडीचा मोगर्‍याचा सुगंध दरवळला.........
मोगर्‍याचा सुगंध अशक्यच असतो :)

प्राजु's picture

6 Aug 2009 - 9:49 pm | प्राजु

सॉल्लिड मसालेदार!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्ता's picture

6 Aug 2009 - 10:30 pm | मुक्ता

नवरा बायकोची मने जुळली की आयुश्याची रेसीपी अशीच जमते.मग आनंदाचा
मोगरा दरवळला नाही तरच नवलं

तुमच्या रेसीपीने "आमोद सुनास जाहला"..

(स्वानुभवी)../मुक्ता

धनंजय's picture

7 Aug 2009 - 7:11 am | धनंजय

पाकक्रिया मस्तच!