एक स्वप्न प्रवास (११)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
24 Jul 2009 - 12:09 am

या पूर्वीचा दुवा एक स्वप्न प्रवास (१) http://misalpav.com/node/1699
एक स्वप्न प्रवास (२) http://misalpav.com/node/1712
एक स्वप्न प्रवास.(३) http://misalpav.com/node/1785
एक स्वप्न प्रवास.(४) http://misalpav.com/node/1797
एक स्वप्न प्रवास.(५) http://misalpav.com/node/1859
एक स्वप्न प्रवास.(६) http://misalpav.com/node/1894
एक स्वप्न प्रवास.(७) http://misalpav.com/node/1966
एक स्वप्न प्रवास (८) http://www.misalpav.com/node/2085
एक स्वप्न प्रवास (९) http://www.misalpav.com/node/3210
एक स्वप्न प्रवास(१०) http://misalpav.com/node/3338

मला अचानक शंका आली मी एखाद्या प्राण्याच्या पोटात तर नाहिय्ये ना? ....मी वर पाहिले.त्या चिंचोळ्या दालनाची भिंत लांबवर वळत गेली होती. मधुनच ती आकुंचन पावत असावी असे मला वाटले.मला दरदरुन घाम फ़ुटला. माझ्या सर्वांगावर कसलातरी श्लेश्मल द्राव पसरतो आहे असे मला वाटले. मी बोट लावुन पहिले. हातावर गालावर पायावर कसलासा चिकट बुळबुळीत श्लेश्मल द्रव होता.अगदी कोटिंग केल्यासारखा.
मला एकाचवेळेस हुडहुडी भरुन थंडी वाजु लागली , पोटात एकदम मुरडा आला , जाम उकडत असावे तसा घाम आला, छातीचे ठोके एकदम सर्वाना ऐकु जातील एवढ्या मोठ्याना पडत होते.
मला जाणीव झाली...मी कुठल्यातरी प्राण्याच्या आतड्यात होतो....बापरे.....आता बाहेर कसे पडायचे?

हालाचाल न करताही मी कुठेतरी ओढला जात होतो. घसरगुंडीवर होते तसे काहिसे.
मला एकदम नारायण धारप आणि त्यांचे समर्थ आठवले .वातवरण निर्मिती एकदम झक्क झाली होती .फक्त "ते" यायचे बाकी होते. मी कशाच्या आधारे उभे रहायचा प्रयत्न करत होतो. उभे रहताच येत नव्हते. मी घसरत होतो धडपडत होतो. शेवटी कशाचा तरी आधार मिळाला. त्या अंधार्‍या बोळीतून दूरवर प्रकाशाचा ठीपका दिसू लागला.
अंधेरेमे एक प्रकाश...म्हणत मी त्या ठीपक्याच्या दिशेने चालू लागलो. चालत म्हणण्यापेक्षा घसरत चाललो होतो म्हणाना.
प्रकाशाचा ठीपका हळूहळू मोठा मोठा होत गेला. मग तो सम्पूर्ण आकाश भरून राहीला.
मी आता मेलाक्का च्या "जालान हांग जेबात" अर्थात जाँकर स्ट्रीटवर उभा होतो. सभोवताली अनेक जण वेगळ्यावेगळ्या प्रकारचे कपडे घालून इकडे तिकडे फिरत होते. मला तर मद्रासच्या फूल बाजाराची आठवण झाली. अगदी तस्सेच वातावरण होते
तो छोटासा रस्ता एकेकाळी म्हणे धनिकांचे वसतीस्थान होते. आता तेथे चिनी दुकानदार अ‍ॅन्टीक वस्तु विकत बसतात.
मला त्यात काहीच रस नव्हता. मला लवकरात लवकर तुला भेटायचे होते. म्हणून मी हाताची घडीघालून डोळे मिचकावले. त्याक्षणी मला काहीतरी जाणवले पिसासारखा हलका होत मी हवेत उडालो आणि क्षणात खाली आलो. आता मी पेन्नंगच्या जॉर्ज टाऊन मध्ये होतो.ही एकेकाळी पेन्नांगची राजधानी . इस्ट इंडीया कम्पनीने याला प्रिन्स ऑफ वेल्स आयलंड्स हे नाव दिले होते. सेबेराई पेराई आणि पलाऊ पिनांग या दोन बेटात विभागलेले पेन्नांग निसर्गाच्या बाबतीत इश्वराची देणगी घेऊन आले आहे.
पलाउ जेराक , बालीक पलाऊ , पलाउ बेताँग, सुंगॉइ अरा सुंगॉइ दुआ. या भागातून तुझे घर शोधायचे होते.
मग लक्षात आले की अरेच्चा आपण तुला पत्ताच विचारायचे विसरलो. स्वप्नाना सीमा नसतात. असतात ते पंख हे कुठेतरी वाचलेले वाक्य आठवले. तुझे घर कोठे आहे ते कोणालातरी विचारायचेच. समोरून एक मुलगी येताना दिसली मी तीला विचारले
" सलामत तेंगाह हारी.माफकान साया. नामा साया विजुभौ. आपा नामा आंदा ? सया चकप तिदाक बोलेह बहाषा मलेशिया"
ती हसली . तीने मला उलट विचारले....सदाशिव पेठेत कितीवेळा पत्ता विचारला होतात?
मी दचकलो. अरे बापरे हे काय. मग मी तिला समजावून सांगु लागलो." साया कवान दिया. साया कवान अ‍ॅन"
ती आता म्हणाली मी नवीन आहे हो या भागात. माझे हे असे नेहमी का होते ते कळतच नाही. मी ज्या माणसाला पत्ता विचारतो तो त्या भागात नवीन असतो. पण हे स्वप्नातसुद्धा व्हावे ?असो...
चालत चालत मी लेबूह आर्मेनीयन म्हणजे अर्मेनियन्स्ट्रीटवर आलो. इथे तू नक्की असशील. जगात असतील नसतील तेवढ्या वंशाचे आणि वर्णाचे लोक माझ्या सभोवताली होते. मला कोणाचा तरी धक्का लागला. एन्शुल्डीगेनझी. बिट्ट .... वी हायझन झी? आरबाईटन झी ? वो हीन कोमनझी आउस?
मला कळेना मी कोणत्या देशात होतो ते.
मग मी ठरवेल की बिन्धास्त मराठीत बोलायचे म्हणून. मलेशियन भाषेतले कितीतरी शब्द मराठी सारखेच आहेत. नवर्‍याला "स्वामी" म्हणतात तर बायकोला "एस्तरी" म्हणजे स्त्री. शिक्षक्यासाठी शब्द आहे "गुरू"
प्रेमाला चिंता म्हणतात.कारणाला कारण म्हणतात .रंगाला वर्ण म्हणतात.आवडणे याला "सूख" म्हणतात .चेहेर्‍याला "मुख" म्हणतात. शरीर म्हणजे बदन .सर्वात गमतीचे म्हणजे नर्सला "जरुरत" म्हणतात आणि डॉक्टरला दुकान म्हणतात. आणि अगदी सही अर्थाचा म्हणजे चूक यासाठी शब्द आहे "साला"
अ‍ॅन आपण भेटल्यावर तु मलेशियन भाषेत बोल मी मराठीत बोलेन दोघेही काय बोललो ते एकमेकाना उत्तम समजेल.
खरेतर स्वप्नात भाषेची जरूरच काय? पण हे प्रश्न स्वप्नात पडत नाहीत. स्वप्नात जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरे मिळत नाहीत. आणि ज्यांची उत्तरे मिळतात त्याना भक्कम पाय मिळत नाहीत. एखादाच केक्यूले असतो.
अ‍ॅन आपण भेटल्यावर काय करु ग? मस्त पैकी सिटी हॉल ला एक चक्कर मारू तेथून बीच स्ट्रीट वर जाऊ तेथे गाड्यावरची तिसर्‍या आणि मिरच्या नी बनवलेले रोजक खाऊ.तेथून क्वीन्सबे मॉल ला जाऊ पण तेथे आत न जाता सरळ गुर्ने ड्राईव्ह च्या हॉकर फूड सेन्तर ला जाऊ. मला गाड्यावरचे खर्रे चिनी पदार्थ खायचे आहेत.
तेथून मग आपण मस्तपैकी बाटु फेरींघी ला बीचेस वर जाऊ. मस्त समुद्राची गाज ऐकत बसु. थोड्यावेळाने जेलुताँग एक्स्प्रेस वे ने जात पेनांग ब्रीज वर जाऊ दुपारच्या पावसात मस्त चहा पीत भिजू. मला एकदा कधितरी लांगकावी केदाह च्या रेझोर्ट्स ला सुद्धा भेट द्यायची आहे. जॉर्ज टाउनचा कार्नवालीस किल्ला सुद्धा पहायचा आहे.केक लोक सी च्या देवळातली बुद्धाची मुर्ती पहायची आहे . चैयमंगलराम ची ,धार्मिकराम ची देवळे पहायची आहेत ......
आता तुझे घर जवळच कुठेतरी असावे असे मला खात्रीशीर वाटू लागले. मी भराभर चालू लागलो. अचानक एक मोठी इमारत माझ्या समोर उभी ठाकली. आता पाऊस पडायला लागला होता ती इमारत मला आडोसा वाटू लागली. अचानक एकदम लख्ख प्रकाश पडला बहुधा वेज चमकली असेल .चेहेर्‍यावर पाणी पडले म्हणून मी डोळे मिचकावले.
डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले.........
मी माझ्या रूम मध्ये होतो. सकाळचे नऊ वाजत होते.पडदे उघडलेले होते. बाहेर लख्ख उजेड पडला होता मला उठवण्यासाठी मित्र चेहेर्‍यावर पाणी शिम्पडत होता.
छॅ.......या वेळीही तुला स्वप्नात भेटायचे राहिलेच की.....
बघु पुन्हा केंव्हातरी..... पण अ‍ॅन...प्रॉमिस इज प्रॉमिस.
जुंपा लागी.साया अकान जुंपा आंदा एसोक.
(क्रमशः)

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

24 Jul 2009 - 9:32 am | अवलिया

अजुन किती भाग आहेत ? म्हणजे सगळे भाग एकदमच वाचुन प्रतिसाद देता येईल.

--अवलिया
* * * * * * * * * * * *
डायल एक.. दोन.. पाच...... : अवांतर प्रतिसाद प्रतिबंधक दल - चांदनीबार, खडखडरोड, वाह्यातवाडी !