"तू"

अलि's picture
अलि in जे न देखे रवी...
27 Jun 2009 - 12:44 pm

तुझी चाहूल सौदामिनी
तुझं येणं झिम्मडसर
थांबणं तृप्त पाऊसओल
मन हिरवं करणारं

ओठी धनू इंद्राचं
सप्तरंगी शब्दशर
डोळ्यात आभाळ थेंबभर
निरभ्र, निःशब्द करणारं

कवितामुक्तकआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

27 Jun 2009 - 12:58 pm | पर्नल नेने मराठे

तुझं येणं झिम्मडसर :D
चुचु

टारझन's picture

27 Jun 2009 - 1:17 pm | टारझन

या अलि
रेहेम अलि
या अलि हजिअलि !

(मी) टारझन

घाटावरचे भट's picture

28 Jun 2009 - 11:53 am | घाटावरचे भट

वा! आवडली कविता.

पाषाणभेद's picture

29 Jun 2009 - 3:28 pm | पाषाणभेद

मस्त रे कांबळी.
अजुन येवू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)