(काळजी)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
22 May 2009 - 11:26 pm

आंतरजालावर भटकताना आपल्या आनंदयात्री साहेबांची 'काळजी' ही सुरेख गजल वाचली आणि दूरदर्शनवरचे गाण्याचे कार्यक्रम ऐकताना मला समस्त प्रेक्षकांची वाटणारी काळजी अचानक आठवली! ;)

गायचा आहे तुला का राग हा चंपाकळी
त्या बिचार्‍या तबलजीचा जायचा आहे बळी!

जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे
हाय! 'टाळ्यांनी पुन्हा' त्या घेतला माझा बळी!

अंतरा दुसराच होता, वाटते सुटलो बुवा
पण अभागी प्रेक्षकांची वाट नसते मोकळी!

दु:ख गाण्याचे तुझ्या कोंडून ये मज अंतरी
वाटतो घडला मला उपवास हा की निर्जळी!

चल अता विसरून जाऊ गायकी खाणाखुणा
चल अता ओढून घेऊ डोसक्यावर कांबळी!

हजल आता सोड 'रंग्या', कर जराशी काळजी
कविजनांचा लोट भवती घट्ट वेढा आवळी!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

23 May 2009 - 6:58 am | क्रान्ति

धमाल विडंबन!
जीवघेण्या गायकांना ऐकणे नव्हते नवे
हाय! 'टाळ्यांनी पुन्हा' त्या घेतला माझा बळी!
अंतरा दुसराच होता, वाटते सुटलो बुवा
पण अभागी प्रेक्षकांची वाट नसते मोकळी!
दु:ख गाण्याचे तुझ्या कोंडून ये मज अंतरी
वाटतो घडला मला उपवास हा की निर्जळी!

खासच! =D> =D> =D> =D> टाळ्याच टाळ्या!!!!!!!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

सँडी's picture

23 May 2009 - 7:44 am | सँडी

सुरेख!
आवडले. :)

श्रावण मोडक's picture

23 May 2009 - 4:56 pm | श्रावण मोडक

सुसाट आहे गाडी.

निखिल देशपांडे's picture

23 May 2009 - 5:10 pm | निखिल देशपांडे

विडंबन मस्तच आहे....
यात्रीची गझल मस्तच
==निखिल

परिकथेतील राजकुमार's picture

23 May 2009 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार

टॉपच इडंबन हो !!

परायात्री
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

केशवसुमार's picture

23 May 2009 - 6:28 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
मस्त विडंबन..चालु दे..
केशवसुमार.