माझी गादी

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in जनातलं, मनातलं
3 May 2009 - 3:08 pm

(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्‍यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.)

मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्‍या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन. पानाची किंवा कोणत्या महाराजांची हक्कानी मिळणारी गादी नाही हो.(तसे हे महाराजांच्या गादीचे प्रकरण मस्त असते, एखादा दोन मुले असलेला माणुस जेव्हा त्याचा वडीलांच्या जागी महाराज बनुन गादी सांभाळतो तेव्हा काही तरी मजेशीर वाटते) तर ही गादी म्हणजे आमच्या घरातली एक भारतीय बैठक.

साधारण मी दहावीत असताना बैठकिचा खोलीमध्ये बसायला आसने कमी पडत असल्यामूळे भारतीय बैठक घालण्यात आली. जेव्हा सर्वप्रथम ह्याची जागा ठरवताना बराच वाद झाला. कारण ह्या नुसार घरातल्या बाकी सामानाची जागा ठरणार होती. सगळ्यावादातुन ह्या गादीची अशी जागा ठरली की ह्यागादीवरुन टी व्ही बघणे एकदम सोपे झाले. आता सोफा व इतर बैठकीचे महत्त्व कमी झाले कारण तिकडे लोळुन टी व्ही पाहाणे शक्यच नव्हते. तर अश्या ह्या जागे मुळेच आमच्या घरात वादाला सुरवात झाली.

तर मुख्य वाद होता तो माझ्या आणी ताई मध्ये. दोघांनाही तिथेच बसायचे असायचे. त्यातुन वाद काही वेळा मारामारी पर्यंत गेला. ह्या गादीचे अजुन एक महत्त्व म्हणजे, जो ह्या गादीवर बसेल रीमोट त्याचाच कडे असायचा. अहो आमचा रीमोट खराब झालेला. गादीवरुन त्याचा अँगल मस्त पकडला जायचा. त्या मुळे आमच्या मधले वाद अजुनच वाढायला लागले. माझी क्रिकेट बघण्यासाठीची मरमर तर ताई चे नेहमी सिरियल. ह्यात कधी कधी बाबासुद्धा त्यांचा व्हेटो वापरुन घ्यायचे. उन्हाळ्यात ह्या गादीचा अजुन एक फायदा म्हणजे कुलर ची सरळ हवा ह्या गादीवर यायची. आमच्या दोघांमधे तिसरा वाटा मागायला आमचा चुलत भाउ सुट्ट्या लागल्या की लगेच हजर व्ह्यायचा. हा सगळ्यात लहान असल्या मुळे आई बरेच वेळा त्याचीच बाजु घ्यायची. लहान आहे रे त्याला पण झोपु दे त्या गादि वर.

तर आमच्या कडची ही गादी म्हणजे लहान मुलांचे स्पेशल आकर्षण. ह्याचे कारण ह्या गादीची उंची. ह्या गादीवर कुठल्याही रांगु शकणार्‍या मुलाला स्वःताहुन चढता उतरता यायचे. आजही कोणीही छोटे आले की सरळ ह्या गादीवर जाउन बसते. तर अश्याह्या गादीवर मागचे चार दिवस झाले मी लोळत पडलो आहे. पण आता ती मजा नाही. मी एकटाच ह्या गाडी वर हे काही पटत नाही असे वाटते की आताच ताईला फोनकरावा व तिच्याशी खुप खुप भांडावे. तुम्हाला वाटत असेल की ह्याने हे एवढे सगळे कशाला खरडले असेल. तर ह्या गादीवर चार दिवस लोळुन तीच्या बद्दलचे प्रेम मला कुठे तरी करायचे होते म्हणुन.

संस्कृतीसमाजजीवनमानप्रकटनलेख

प्रतिक्रिया

उमेश__'s picture

3 May 2009 - 3:16 pm | उमेश__

हा एक अतिशय फालतु लेख आहे .
१०१ % सहमत..........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2009 - 3:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लिहिलंस रे ! घरातल्या काही वस्तूंची एक अशी स्वतःची जागा असते, त्या काही वस्तूंशी आपले भावनिक नाते जोडल्या जाते.
घरात प्रवेश केल्याबरोबर आपलीच नजर नेहमीच्या वस्तूंना शोधत भिरभिरत असते. त्यात थोडा जरी बदल असला, तरी अस्वस्थता येते, घरातल्या प्रत्येक वस्तूची एक कथा असते, तुमच्या गादीची गोष्ट अशीच...

अजून येऊ दे !

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

3 May 2009 - 3:28 pm | अवलिया

हेच म्हणतो
येवू दे अजुन ! :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

4 May 2009 - 6:45 am | विनायक प्रभू

रे तु. उलट्या प्रतिक्रियाना घाबरु नकोस.
चांगले लिहीले आहेस.

दशानन's picture

5 May 2009 - 9:16 am | दशानन

हेच म्हणतो, मस्त लिहले आहे.

थोडेसं नवीन !

विजुभाऊ's picture

5 May 2009 - 9:42 am | विजुभाऊ

उलट्या प्रतिक्रियाना घाबरु नकोस

हे च म्हणतो.
माणसाने बिंदास लिहित जावे.
( गादी या विषयावर मास्तरांचा पुढचा लेख येतो आहे. "गादी : एक शब्दच्छल चित्र)

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2009 - 3:33 pm | बिपिन कार्यकर्ते

निखिल, छान लिहिले आहेस. प्रत्येकाची आपापल्या घरांमधे अशी खास एक जागा असते.

पुलेशु.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

3 May 2009 - 4:20 pm | प्राजु

+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सँडी's picture

3 May 2009 - 3:40 pm | सँडी

अशा काही वस्तु असतात ज्या आपल्याला आठवणींशी बांधुन ठेवतात.

छान लिहिलयसं, निखिल!
लिहीत रहा.

-संदीप कुलकर्णी.
वरुन किरतन आनि आतुन तमाशा वाल्या हलकट लोकान्ला आमी फाट्याव मारतो. (साभारः य.रा. अण्णा ;))

रेवती's picture

3 May 2009 - 9:23 pm | रेवती

सहमत!
एकदम घरगुती लेखन...
अजून वाचायला आवडले असते.

रेवती

टारझन's picture

3 May 2009 - 8:10 pm | टारझन

णिखिल राव .. चोक्कस लिवलंय ... पण स्टॅमिणा वाढवा राओ !!

(बकवास वाचक) टारेश__

यशोधरा's picture

3 May 2009 - 9:23 pm | यशोधरा

आवडलं. :)

शितल's picture

4 May 2009 - 6:51 am | शितल

आठवणी छान लिहिल्या आहेत. :)

दवबिन्दु's picture

4 May 2009 - 7:27 am | दवबिन्दु

Full House program मधे एक जण बास्केटबॉल खेळताना बोलतो ए तु तिकड उभा राहु नकोस तिथुन मला बास्केटमधे बॉल टाकायचाय कारन ती जागा माझ sweet pie आहे तस ती गादी म्हनजे तुमच sweet pie आहे सर्वान्च,

.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2009 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार

निखिलराव छोट्याश्या लेखात आठवणींचे मोठे विश्व उभे केले आहेत :) मस्त लिखाण !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सहज's picture

4 May 2009 - 1:21 pm | सहज

मला ही गादी आठवली. मस्त टिव्ही समोर लोळत मॅच पहायची. :-)

पाषाणभेद's picture

4 May 2009 - 4:38 pm | पाषाणभेद

छानच लिहीले आहेस.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

दिपक's picture

4 May 2009 - 4:44 pm | दिपक

नि़खिलभाऊ छोट्या लेखात बरेच काही सांगुन गेलात . आवडत्या वस्तुवर मनापासुन लिहिलेला लेख आवडला. :)

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2009 - 5:09 pm | प्रकाश घाटपांडे

बिरुटे सर म्हणतात तस प्रत्येक वस्तुची एक कथा असते. त्या वस्तुसाठी त्याने स्वतःचा असा एक अवकाश दिला असतो. आमच्या बिट्टु भुभुने पुर्वीच्या घरात पलंगाखाली एक जागा केली होती. पलंगाची चादर बाहेरुन फरशीपर्यंत आली असल्याने एक अवकाश तयार झाला होता. जेव्हा त्याला स्वतःच्या जगात जायच असत त्यावेळी तो इथे आत निवांत पहुडलेला असायचा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ऋषिकेश's picture

5 May 2009 - 12:28 pm | ऋषिकेश

मस्त! लेख आवडला.
ऋषिकेश

दशानन's picture

5 May 2009 - 12:33 pm | दशानन