बहु असोत कणगीभर संपत्ती ही अहा
प्रिय अमुचा खाबुगिरी एक धर्म हा॥
गगनभेदी माया तरी पडते ती उणी
लोभाच्या सीमाही वाढती झणी
चटक एक रे पदाची सोडी ना क्षणी
माल मिळे म्हणूनी मी ही राजकारणी
मंत्र्यासी अटक गमे जेथ दु:सहा ॥ १॥
प्रासाद हा हवा अन हवी स्वमंदीरे
कार्यकर्त्यांची हीच भव्य भांडारे
रस्ता वा चौकासही नाव मम पुरे
"भेट"-गाठ हीच साफल्य-धून ठरे
शुद्ध नसे वर्तनही पण नसे मज तमा॥२॥
जात, धर्म आणि पंथ किती हव्या मिती
'फोडा अन राज्य करा' हीच तर निती
धर्म, न्याय याची नसे कधी अम्हा क्षिती
शक्ती, युक्ती एकवटूनी डाव साधती
पसरे मम भीती अशी विस्मया वहा॥३॥
गीत राजनीतीचे हे श्रवणी, मुखी असो
लक्ष्मी, कीर्ती, सत्ता फक्त स्वजनी ही ठसो
वचनी, लेखनीही स्वजनोद्धार हा दिसो
सतत 'उन्नती' हाच मंत्र अंतरी ठसो
देह पडो, मूर्ती असो ही असे स्पृहा॥४॥
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची मूळ कविता:
बहु असोत सुंदर संपन्न की अहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥धृ॥
गगनभेदी गिरिवीण अणू नच जिथे उणे
आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवरी जेथिल त्या तुरगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय न दाविणे
पौरूषासी अटक गमे जेथ दु:सहा॥१॥
प्रासाद कशास जेथ हृदय मंदीरे
सद्भावांचीच दिव्य भव्य आगरे
रत्ना वा मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणी खनी ठरे
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा गृहा॥२॥
विक्रम वैराग्य एक जागी नांदती
जरीपटका भगवा झेंडा ही डोलती
धर्मराज कारण समवेत चालती
शक्ती युक्ती एकवटूनी कार्य साधती
पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा॥३॥
गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो
स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो
देह पडो तत्कारणी ही असो स्पृहा॥४॥
(काही मित्रांनी हे विडंबन आणखी चांगले होण्यासाठी मदत केली त्यांचे आभार. काही उत्तम सूचना मी या विडंबनात सामावून घेऊ शकले नाही कारण माझं शब्द(बुद्धी)दारिद्र्य!)
प्रतिक्रिया
28 Apr 2009 - 11:57 am | विनायक प्रभू
लय भारी विडंबन
28 Apr 2009 - 12:40 pm | प्रमोद देव
:)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
28 Apr 2009 - 12:00 pm | बेसनलाडू
विडंबन आवडले.
(धार्मिक)बेसनलाडू
28 Apr 2009 - 12:02 pm | सहज
तात्यांनी लिहल्याप्रमाणे कविता अश्या आल्या की नकोच वाटते. :-(
ठाणेकरांनो मतदान करा. पुण्यात फक्त ४०% मतदान झाले व त्याची काही चर्चाही नाही :-(
28 Apr 2009 - 12:05 pm | अमोल खरे
मस्तच विडंबन.
28 Apr 2009 - 12:10 pm | नाटक्या
छान जमले आहे...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
28 Apr 2009 - 12:12 pm | मैत्र
मस्त जमलं आहे विडंबन... शक्य तितकं वजन सांभाळल्याने चांगलं वाटत आहे.
28 Apr 2009 - 12:13 pm | स्नेहश्री
आदिती खुपच छान आहे विडंबन.
खरोखर आज जे घडत आहे याचे चित्रण तु एकदम छान केले आहेस.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
28 Apr 2009 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
मस्तच ग ! एकदम झकास जमले आहे. आणी मुख्य म्हणजे कुठेही 'जमवलेले' वाटत नाहीये.
अवांतर :- शोभतेस खरी टीकेतकरांची शिष्या ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
28 Apr 2009 - 12:14 pm | अवलिया
जमले आहे विडंबन !
--अवलिया
28 Apr 2009 - 12:20 pm | स्वाती दिनेश
विडंबन आवडले पण अशी आपल्याकडची सत्य आणि सद्यपरिस्थीती पाहता वा, छान असे म्हणायला लेखणी उचलत नाही.
स्वाती
28 Apr 2009 - 1:18 pm | निखिल देशपांडे
तै मस्त जमले आहे हो विडंबन!!!
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
28 Apr 2009 - 2:00 pm | आनंदयात्री
मस्त .. विडंबन आवडले.
28 Apr 2009 - 2:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त .. विडंबन आवडले.
28 Apr 2009 - 5:16 pm | शितल
सहमत. :)
28 Apr 2009 - 7:10 pm | प्राजु
एकदम मस्त!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Apr 2009 - 4:08 pm | चन्द्रशेखर गोखले
झक्कास विडंबन.. एकदम मार्मिक !!
28 Apr 2009 - 5:21 pm | मुक्तसुनीत
विडंबन आवडले. समयोचित विषय. इतर ठराविक विषयांपेक्षा वेगळा. उपहासाचा खुमासदार वापर.
मात्र मीटर थोडे हुकले आहे असे वाटले. आणि मीटर जरी सुधारले तरी , कल्पनांच्या, रचनेच्या वेगळेपणाकडे लक्ष पुरवता येईल. हा विषय चांगला मुरवता आणि आणि आणखी रंजक नक्की बनवता येईल.
मात्र पहिला (?) प्रयत्न खरोखरच अभिनंदन करावा असा. लगे रहो अदितीताई. ;-)
28 Apr 2009 - 5:48 pm | ऋषिकेश
आयला!.. एकदम फक्लास!
लै भारी!
ऋषिकेश
28 Apr 2009 - 5:53 pm | अभिज्ञ
विडंबन आवडले.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
28 Apr 2009 - 7:45 pm | क्रान्ति
जबरदस्त विडंबन! अदिती, ग्रेट आहेस!
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
28 Apr 2009 - 7:59 pm | चतुरंग
('विडंबनाचा हा पहिला प्रयत्न आहे' असे म्हणणे हा तुझा विनय आहे हे मी खात्रीने सांगू शकतो! :D )
चतुरंग
28 Apr 2009 - 8:11 pm | बिपिन कार्यकर्ते
तीचा विनय नाहीये.... ;)
बिपिन कार्यकर्ते
29 Apr 2009 - 12:34 am | श्रावण मोडक
विनय वगैरे हे काय? चालू द्या. आम्ही वाचतो.
28 Apr 2009 - 8:23 pm | घाटावरचे भट
आयला म्याडम...लैच भारी.
-मि.भ.®
29 Apr 2009 - 12:51 am | लिखाळ
वा.. छान आहे.
-- लिखाळ.
29 Apr 2009 - 6:50 am | फारएन्ड
मस्त झाले आहे विडंबन