((बेत आहे..!))

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
20 Apr 2009 - 8:36 pm

उपटसुंभाचे 'बेत' वाचून आम्हालाही पूर्वीचे बेत आठवले, काही आमचे आणि काही दुसर्‍यांचे...;)

आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे.
आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे.

भेटणे मजला पुन्हा ती टाळते नाक्यावरी का
मज कळेना योग हा की कटवण्याचा बेत आहे.

अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला
खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे!

टाकली पोटात जेव्हा मी जराशी जास्त फेणी
कोण वदले, आज टकुरे सडकण्याचा बेत आहे?

रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ
का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?

रोजच्यासम आज टांगा पलटलेला मुळिच नाही
आज माझा मार थोडा चुकवण्याचा बेत आहे!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

20 Apr 2009 - 9:01 pm | दशानन

=))

लै भारी !

आज थोडीशी टकीला चाखण्याचा बेत आहे.
आज थोडे टुन्न होउन लुढकण्याचा बेत आहे.

आज डॉक्टराला फाट्यावर मारुन आम्ही हेच काम केले आहे ;)

थोडीशी ही शब्द रचने मुळे अडखळलो, खरं तर येथे बोतलशी असं हवं :D

थोडेसं नवीन !

श्रावण मोडक's picture

20 Apr 2009 - 9:04 pm | श्रावण मोडक

रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ
का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?
असे तुम्हीच म्हणू लागलात तर या कवींनी करायचे काय? मान-धन नाही निदान विडंबन तरी असं म्हणतात अनेक जण. असे काही तरी विचारून खचवू नका त्यांना...

संदीप चित्रे's picture

20 Apr 2009 - 10:37 pm | संदीप चित्रे

पण मार चुकवण्याचा बेत करून उपयोग नसतो -- तो पडतोच :)
बाकी विडंबन नेहमीप्रमाणे उत्तमच

बेसनलाडू's picture

20 Apr 2009 - 11:08 pm | बेसनलाडू

भारी हो रंगाशेठ! छान आहे.
(ना़क्यावरचा)बेसनलाडू

नाटक्या's picture

21 Apr 2009 - 12:53 am | नाटक्या

टकिलाचा हा परिणाम होईल हे माहीत नव्हते....

- नाटक्या

अवलिया's picture

21 Apr 2009 - 5:13 am | अवलिया

रोजच्यासम आज टांगा पलटलेला मुळिच नाही
आज माझा मार थोडा चुकवण्याचा बेत आहे!

एकंदर तुमचा वात्रटपणा पहाता मला नाही वाटत तुमचा बेत सफल होईल ! ;)

मस्त.........येवु द्या अजुन!!

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 7:26 am | भडकमकर मास्तर

अंगणी माझ्या कशाला बायकांनी फेर धरला
खेळ चैत्री चालले की चोपण्याचा बेत आहे!

हे बेस्ट

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

उपटसुंभ's picture

21 Apr 2009 - 10:29 am | उपटसुंभ

बेत छान जमवलात चतुरंग..!
मजा आली वाचताना..! :)

********************************
रोजच्यासम आज मरणा मी तुझ्या स्वाधीन नाही
आज माझाही जरासा झुंजण्याचा बेत आहे..!
********************************

राघव's picture

21 Apr 2009 - 11:08 am | राघव

लय भारी!!
अवलिया अन् मास्तरांशी पूर्ण सहमत!! ;)

राघव

आंबोळी's picture

21 Apr 2009 - 4:15 pm | आंबोळी

अवलिया अन् मास्तरांशी पूर्ण सहमत!!

(धारी)आंबोळी

(बेतशुद्ध) चतुरंग

केशवसुमार's picture

21 Apr 2009 - 10:04 pm | केशवसुमार

रातचा गाठून कविला समज आपण नीट देऊ
का असा पाडीत गजला राहण्याचा बेत आहे?

रंगाशेठ,
चांगला बेत आहे..पण आपल्या धंद्याला मारक आहे.. ;)
(बेताळ)केशवसुमार