पंगत

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
5 Apr 2009 - 1:28 am

ऑफिसातून घरी परत आल्यावर काकांनी घरी आधीच येऊन पडलेलं टपाल चाळलं. भरणा करण्यासाठी आलेली बिलं बाजूला काढून ठेवली. उरलेलं टपाल बहुतांशी जाहिराती आणि लग्नांची आमंत्रणं! वसंत ॠतू सुरु झालेला, लग्नसराईचे दिवस! काकांनी जाहिराती फेकून दिल्या आणि लग्नपत्रिका काकूला उघडण्यासाठी म्हणून बाजूला ठेऊन दिल्या...

"हे बघ गं तू उघडून!", काकांनी इतरांची लग्न हा विषय अनेक वर्षांपूर्वीच काकूवर सोपवलेला आहे. एकतर त्यांना पत्रिका वाचूनही लग्न नक्की कुणाचं आहे आणि आपल्याला त्या लग्नाला का बोलावलंय याचा अर्थबोध होत नाही. मग काकूच "अरे ही नाही का आपल्या मंजूआत्याच्या सुनेच्या भावाची भाची नंदिता? तिचं लग्न आहे" असा खुलासा करते. काकांना वीस वर्षांपूर्वी त्यांना भेटलेली स्वतःच्या नाकात बोटं घालणारी शेंबडी नंदिता आठवत असते. अरे वा! आजकाल इंडियात शेंबड्या मुलींची लग्नंही होतात वाटतं हा मनातला विचार दाबून टाकून काका म्हणतात,

"मग ते लग्न, आहेर, वगैरे सगळं तू पहाशीलच!" याही बाबतीत काकूचं श्रेष्ठत्व काकांनी मान्य केलेलं आहे. त्यामूळे आपल्या डोक्यामागला ताप कमी होतो या स्वार्थी विचाराने!!!!
"ते झालंच, मी ते सगळं बघीन. अरे पण हे बघ, हे आमंत्रण केवळ तुलाच आलंय!!!", काकून एक आमंत्रण काकांच्या हाती दिलं....
"तुला आमंत्रण न देता केवळ मलाच पाठवलंय? अरे बापरे! कुणाला तुझ्या हस्ते जिवंत समाधी घ्यायची इच्छा झालीये?"
"अरे तसं नाही! ते मिसळपावतर्फे आहे बहुतेक"
"असं होय!" असं म्हणून काकांनी तो लखोटा फोडला....
आतला मजकूर वाचून डांबिसकाकांना प्रचंड म्हणजे अगदी अवाढव्य धक्का बसला!!!!!

सगळी दुनिया आपल्याभोवती गरागरा फिरतेय असं त्यांना वाटू लागलं. प्रथम त्यांना हा कॅलिफोर्नियातला भूकंपच होतोय असं वाटलं! पण इतर सगळ्या वस्तू, काकूसकट, स्थिर असल्याचं पाहून हा भूकंप नसून त्या आमंत्रणाचाच इफेक्ट आहे ते त्यांनी ओळखलं.....

"काय? कुणाचं आमंत्रण आहे?", काकू
"अगं प्रमोद देवकाकांचं आमंत्रण आहे! मिसळपावावरच्या सगळ्या सिद्धहस्त लेखक-लेखिकांची मेजवानी आयोजित केलिये त्यांनी!!!"
"हॅ, हॅ, हॅ!!! सिद्धहस्त लेखकांच्या मेजवानीचं तुला आमंत्रण? भलतेच विनोदी दिसतात हे देवकाका!!!", खवचट काकू
"अगं खरंच!!!"
"चुकून पाठवलं असेल तुला ते! चुकीचा पत्ता पडला बहुतेक!! फार वय झालंय का देवकाकांचं?"
"अगं नाही! हे बघ, आमंत्रण अगदी नांव घातलेलं आणि पर्सनलाईज्ड आहे! माझ्या लेखांचाही उल्लेख केलाय त्यात!!!"

आता प्रचंड धक्का बसायची पाळी काकूची होती. तिने ते आमंत्रण हातात घेऊन पुन्हा पुन्हा वाचून पाहिलं. स्वत:ला एक बारीकसा चिमटाही घेऊन पाहिला. हे सगळं सत्यच आहे याची खात्री पटल्यावर ती मोठया गंभीरपणे म्हणाली,

"काय एकेक नवलच बाई! असो! आता जाणारच आहेस तर जरा नीटनेटका होऊन जा. तुझं नांव एक कानफाटकं 'पिवळा डांबिस' आहे ते आहे पण जरा पोशाख तरी नीट करून जा!"
"नीटनेटका म्हणजे? मी काय तिथे अर्धी चड्डी आणि टी शर्ट घालून जाणारे? चांगला शर्ट-पॅन्ट घालून जाणारे! टायसुद्धा लावतो हवं तर!!", काका चिडले...
"कमालच करतोस! आणि त्यांच्याकडे भारतीय बैठकीची पंगत असली तर? पॅन्ट नेसून मांडी घालून कसा जेवणार? त्यातून हे 'देवा'ब्राम्हणाच्या घरून आलेलं निमंत्रण! तू आपला सोवळं नेसूनच जा!!"

आयला, खरंच की! हे काकांच्या लक्षातच आलेलं नव्हतं!! काकूच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत काकांनी बर्‍याच वर्षांपूर्वी भारतातून आणलेलं आणि आता कपड्यांच्या कपाटात अगदी तळाशी ठेवलेलं रेशमी सोवळं बाहेर काढलं. ते नेसायची कला डांबिसकाका फार वर्षांपूर्वीच विसरले होते. शेवटी काकुनेच त्यांना सोवळं नेसवून दिलं. वरती एक जुना लखनवी झब्बा चढवला. देशी पायताणं उपलब्ध नव्हती म्हणून मेसीजमधून आणलेले सॅन्डल्स घातले. अहाहा! काय इंटरनॅशनल ध्यान दिसत होतं डांबिसकाकांचं!!!!

" अरे हो! अशा भोजनाला पळी-पंचपात्री घेउन जातात म्हणे!!", काकांना अचानक आठवलं....
"पण आपल्याकडे नाहिये पळी-पंचपात्री!!", काकू जराशी सचिंत...
"आयडिया!!! मी माझा स्कॉचचा ग्लास आणि कॉकटेल ढवळायचा चमचा घेऊन जाऊ का? एकदम ओरिजिनल!!!!", काका उत्साहात म्हणाले....
"कशाला? असली-नसलेली अब्रू घालवायला? काही नको! तू जा तसाच!! नसली एकवेळ पळी-पंचपात्री म्हणून काही बिघडत नाही", काकूने अंतिम निर्णय दिला....

अशा तर्‍हेने नटूनथटून डांबिसकाका देवकाकांनी आयोजित केलेल्या मिपावरील सिद्धहस्त लेखक-लेखिकांच्या मेजवानीसाठी योग्य दिवशी योग्य समयी हजर झाले!!!!

***************

"या, या, डांबिसकाका!!!" देवकाकांनी अगदी दिलखुलास स्वागत केलं. आपल्याला आलेलं निमंत्रण चुकीने आलेलं नव्हतं हे पाहून डांबिसकाकांचा जीव भांड्यात पडला...

डांबिसकाका बघतात तर तिथे रामदास, धनंजय, तात्या इत्यादि मिपावरचे समस्त खरेखुरे सिद्धहस्त लेखक लेखिका जमा झालेले!! अशा मोठ्या लोकांमध्ये डांबिसकाका एकदम बुजून गेले...

काय करावं ते न कळून ते घोळक्यात मिसळले....
तितक्यात मागून कुणाचंतरी बोलणं ऐकू आलं म्हणून त्यांनी कान टवकारले....

"ह्ये डांबिसाला इथे कशाला बोलावलं आपणां सगळ्या सिद्धहस्त लेखकांत?" अवलिया रामदासांच्या कानात....
"अरे असू दे! हिरवट असला तरी मिपावरचा एक लेखकच आहे ना तो?" दयाळू रामदासस्वामींनी समजुतीच्या स्वरात सांगितलं...
"पण तो नुसतं पाकिस्तानी ठेवलेल्या बाया आणि लेस्बियन्सवर तर लिहितो!!!" अवलिया.
"मग त्यात काय झालं?", 'संभोग म्हणजे काय?' फेम विजुभाऊंनी डांबिसकाकांची बाजू घेतली, "ते काय लिखाण नाही का?"
"बरोबर आहे! आणि सगळेच मुसलमान काही वाईट नसतात!!!!", खोबारवाल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सौदी मालकांचे स्मरण ठेवीत दुजोरा दिला....

आपल्या मताला विरोध होतोय हे पाहून अवलियांनीही मग फार ताणलं नाही.....

तितक्यात, "काय डांबिसकाका, उशीर केलात यायला!!", हे कोण बोलतंय म्हणून काकांनी वळून पाहिलं तर साक्षात मराठवाडाभूषण प्रा. डॉ. बिरूटेसर!! आज त्यांची डबल बॅरल बंदूक सोबत नसल्याने काकांनी त्यांना क्षणभर ओळखलंच नाही..
"अं, हो, झाला खरा उशीर" असे काहीसे गुळमुळीत उत्तर द्यायचा डांबिसकाकांनी प्रयत्न केला. तेव्हढ्यात,
"अहो, त्यांचं विमान उशीरा जमिनीवर उतरलं असेल! खी, खी, खी!!!!", हाताची मूठ करून अंगठा तोडाला लावून खूण करत चतुरंग खिदखिदला...
डांबिसकाका काहितरी सणसणीत उत्तर देणार होते पण तेव्हढ्यात तात्यानेच त्याला फटकारला.....
"ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले,
"आलास रे डांबिसा? ब्येस केलंस! काय माझ्यासाठी शिंडीचा पत्ता, फोननंबर आणलास की नाही?"
डांबिसकाकांनी बरोबर आणलेला (प्रत्यक्षात सिंडीच्या सिक्युरिटी ऑफिसरचा पत्ता असलेला) कागद तात्यांच्या हाती दिला. तात्यांचा चेहरा, जितका जमेल तितपतच, उजळला....

"चला, पानं मांडली आहेत!!" तेव्हढ्यात देवकाकांनी घोषणा केल्यामुळे सगळे सिद्धहस्त साहित्यिक जेवणाचा समाचार घेण्यासाठी पंगतीकडे वळले....

आता आपण कुठे बसावे या विचाराने डांबिसकाका पुन्हा गोंधळले. त्यांना उगाच कबीराची 'ऐसी जगह बैठिये की संपादक न बोले ऊठ!' ही ओळ आठवली. त्यांचा गोंधळलेला चेहरा पाहून देवकाका मदतीला आले...

" डांबिसकाका, तुम्ही इथे बसा." असं म्हणून त्यांनी डांबिसकाकांना पंगतीमधे धनंजय आणि रामदास यांच्या मध्ये बसवले. एका बाजूला मूर्तिमंत विद्वत्ता आणि दुसर्‍या बाजूला साक्षात लालित्य यामध्ये डांबिसकाका अवघडून बसले. कंबरेवरचे धाकट धड आणि कंबरेखालचे सशक्त पाय यांच्यामध्ये अवघडून बसणार्‍या कंबरेजवळच्या अवयवांसारखे!!!

'उभयान्वयी अव्यय' म्हणजे काय ते काकांना आत्ता उमजले.....

"चला सुरू करा!!" देवकाकांनी घोषणा केली...

सगळे सिद्धहस्त साहित्यिक समोरच्या पानातील देवकाकाहस्त मेजवानी फस्त करण्यासाठी तुटून पटले.....

(जर मिपाकरांना आवडलं तर क्रमश:)

विनोदसाहित्यिकसमाजआस्वाद

प्रतिक्रिया

नंदन's picture

5 Apr 2009 - 1:53 am | नंदन

"ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले,
"आलास रे डांबिसा? ब्येस केलंस! काय माझ्यासाठी शिंडीचा पत्ता, फोननंबर आणलास की नाही?"
डांबिसकाकांनी बरोबर आणलेला (सिंडीच्या सिक्युरिटी ऑफिसरचा पत्ता असलेला) कागद तात्यांच्या हाती दिला. तात्यांचा चेहरा, जितका जमेल तितपतच, उजळला....

=)) =))

पुढचे भाग येऊ द्या काका, वाचतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

5 Apr 2009 - 11:14 am | टारझन

"ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले,

=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
बेकार ... पटकन पुढचा भाग हवाय :)

स्वगत : चतुरंगांचा णवा रंग कळला ;) आणि डांबिसाचार्यांना सिद्धटवाळगृपमधे टाकूनही पस्तावलो नाही ... सही जा रेले भिडू

-केशरी टारझन

स्वप्निल..'s picture

5 Apr 2009 - 11:57 am | स्वप्निल..

=)) =)) =))

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2009 - 7:45 pm | पिवळा डांबिस

डांबिसाचार्यांना सिद्धटवाळगृपमधे टाकूनही पस्तावलो नाही ...
बाबारे, तुझ्या अपेक्षेला उतरायचं म्हणून तर लिहिलं.....
;)
मग लिहू ना पुढला भाग?

टारझन's picture

5 Apr 2009 - 11:40 pm | टारझन

ऑफकोर्स पुढचा भाग/ भाग्ज आलेच्च पाहिजेत .. लवकरात लवकर्स ..

बेसनलाडू's picture

7 Apr 2009 - 12:05 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चतुरंग's picture

6 Apr 2009 - 3:03 am | चतुरंग

ए, तू गप रे!! हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!! जा, मधुशालेचं विडंबन कर जा!!!", मग तात्या डांबिसकाकांकडे वळून म्हणाले,
हे पिडाकाका भलतेच सुटलेत! धू धू धुताय की अब्दुलखान!!
'मधुशालेचं विडंबन' काय? आम्हाला काय तुमच्यासारखं लिहिता येत नाही हो त्यामुळे .. हाणा गरिबाला!!

बाकी पुढचे भाग टाकू का? नेकी और पूछ पूछ?
लगेचच यायला हवेत पुढचे भाग!! वाट बघतोय.

(खुद के साथ बातां : रंग्या, तुला धुतल्यावर सगळे कसे खिदळलेत बघितलंस! काहीतरी उपाय करायलाच हवा ह्या डांबीसखानाचा!! :? :W )

चतुरंग

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 4:19 am | मदनबाण

=)) :D =))

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अवलिया's picture

5 Apr 2009 - 5:32 am | अवलिया

___/|\____

आजोबा !! (नाही नाही...सॉरी....) पिडा काका ! :)
प्रतिक्रिया द्यायला जास्त ताणत नाही, लवकर येवु द्या पुढचा भाग :)

--अवलिया

शितल's picture

5 Apr 2009 - 6:49 am | शितल

काका,
पंगत लै लै लै भारी.
'उभयान्वयी अव्यय' म्हणजे काय ते काकांना आत्ता समजले.....

=))

प्राजु's picture

6 Apr 2009 - 7:00 am | प्राजु

मस्तच चालू आहे धुलाई..
पुढचे भाग लवकरच येऊदेत.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव's picture

5 Apr 2009 - 7:00 am | प्रमोद देव

सुरेख आहे पंगत!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राची's picture

5 Apr 2009 - 7:16 am | प्राची

काका,
लै भारी झालाय लेख =D>
लवकर येऊ द्या पुढचा लेख.

भडकमकर मास्तर's picture

5 Apr 2009 - 7:21 am | भडकमकर मास्तर

रविवार सकाळ छान सुरू झाली...
वाचतोय...
अजून येउद्यात
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शिप्रा's picture

5 Apr 2009 - 7:52 am | शिप्रा

>>"तुला आमंत्रण न देता केवळ मलाच पाठवलंय? अरे बापरे! कुणाला तुझ्या हस्ते जिवंत समाधी घ्यायची इच्छा झालीये?
=)) पटले, काका खतरनाक लिहिल आहे..लवकर येऊ द्या पुढचा भाग

विसोबा खेचर's picture

5 Apr 2009 - 7:58 am | विसोबा खेचर

मंजूआत्याच्या सुनेच्या भावाची भाची नंदिता

हे 'जवळचं!' नातं आवडलं! :)

"आयडिया!!! मी माझा स्कॉचचा ग्लास आणि कॉकटेल ढवळायचा चमचा घेऊन जाऊ का? एकदम ओरिजिनल!!!!",

क्लास... :)

डांबिसा, पंगतीची सुरवात मस्त रे. येऊ द्या अजूनही. आज थोडी सवड होती म्हणून मिपावर आलो आणि तुझा हा हलकाफुलका लेख वाचून सुखावलो..

जियो..

आपला,
(डांबिसाचा फ्यॅन) तात्या.

विनायक प्रभू's picture

5 Apr 2009 - 9:48 am | विनायक प्रभू

कोर्स ची पंगत आहे ही?
सुरुवात लय भारी.

श्रावण मोडक's picture

5 Apr 2009 - 10:39 am | श्रावण मोडक

पुढे?

सुनील's picture

5 Apr 2009 - 11:16 am | सुनील

उत्तम. आवडलं तर आहेच तेव्हा क्रमशः जरूर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Apr 2009 - 11:46 am | बिपिन कार्यकर्ते

जय हो... आता पंगतीचंही वर्णन येऊ द्या... सॉल्लीड आहे.

=))

(सौदीहृदयसम्राट) बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2009 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंगत मस्त रंगली आहे, और भी आने दो !

-दिलीप बिरुटे
(डबल बॅरलवाला )

अबोल's picture

5 Apr 2009 - 12:10 pm | अबोल

पिवळे काका प॑गतित ताटावर बसुन खोळ॑बलोय, आता पुढिल लवकरच वाढा

दशानन's picture

5 Apr 2009 - 12:28 pm | दशानन

पिडाआ !

लै भारी बॉ !

एकदम बेक्कार हसू सुटले =))

दातातल्या दातात :- " च्यामायला, एवढं भारी आम्हाला का नाही जमत :? "

क्रान्ति's picture

5 Apr 2009 - 1:42 pm | क्रान्ति

=)) =)) =D> =)) =)) =D> =)) =)) =D> =)) =))
पुढे काय काय वाढताय पिडाकाका? सुरुवात इत्की जोरदार झालीय, की विचारता सोय नाही!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Apr 2009 - 8:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, साष्टांग नमस्कार. _/\_
तुमचं नाव 'सिद्धहस्त' लेखकांच्या यादीत आलं यात काहीही आश्चर्य नाही.

(लिंबूटींबू) अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

रेवती's picture

5 Apr 2009 - 9:05 pm | रेवती

लेखात बरेच षटकार ठोकलेत पिडांनी!
काही ठिकाणी ह. ह. पू. वा.

हे चतुरंग दिवसेंदिवस द्वाड होत चाल्लंय!! स्वतः पीत नाही म्हणतंय पण मनात मात्र सदानकदा दारूचेच विचार!!!
हेच म्हणते.

(जर मिपाकरांना आवडलं तर क्रमश:)
हे काय विचारणं झालं?
अश्याप्रकारच्या लेखांना अनेकदा क्रमश:

रेवती

निखिल देशपांडे's picture

5 Apr 2009 - 9:18 pm | निखिल देशपांडे

ओ काका लव्कर येवु द्या पुढचा भाग.... मस्त जमली आहे पंगत....

उन्हाने कावलेल्या मनाला बरे वाटले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

धनंजय's picture

6 Apr 2009 - 12:27 am | धनंजय

षट्कार मारतायत पिडांकाका!

धोतराचा काष्टा घट्ट खोचला आहे, याची शहानिशा करून घेतली. (फिटलं तर फिटलं, त्याचं काही नाही. लाज गेली म्हणून आब्रू जायची भीती घालणारी आम्हाला कोणी काकू नाही? पण सोग्यात बांधलेली तीर्थाची बाटली पडून फुटायला नको. तीर्थस्खलनानाचे पाप फार मोठे असते, बाबांनो.)

रामदास's picture

6 Apr 2009 - 6:15 am | रामदास

टोक घट्ट खोचून सगळं काही बंदोबस्तात आहे ना याची खात्री करून घेतली आहे.
पुढच्या भागात विकेटी पडायला सुरुवात होईल बहुतेक.

मिसळभोक्ता's picture

6 Apr 2009 - 10:24 pm | मिसळभोक्ता

तीर्थस्खलनानाचे पाप फार मोठे असते, बाबांनो.)

एका थेंबाला चाळिस थेंबांचे आणि सात धातूंचे पाप लागते ना ? मग खोचा घट्ट खोचणेच आवश्यक ! कसे ?

-- मिसळभोक्ता

अनिल हटेला's picture

6 Apr 2009 - 5:36 am | अनिल हटेला

>>>>(जर मिपाकरांना आवडलं तर क्रमश:)

-----> आवडेश !! पूढील भाग आनाच मंगताये !!!
:-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सँडी's picture

6 Apr 2009 - 5:46 am | सँडी

मस्तच!

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण त्याची आठवण ठेवावी लागते.

घाटावरचे भट's picture

6 Apr 2009 - 6:36 am | घाटावरचे भट

बेष्ट!! क्यालिफोर्नियापीठाधीशांचा विजय असो!!

वाहीदा's picture

7 Apr 2009 - 12:57 am | वाहीदा

___/\___ धन्य ती मैच !!
षटकार ठोकलेत काका तुम्ही !!
~ वाहीदा

'उभयान्वयी अव्यय' मस्तच !!

क्लिंटन's picture

7 Apr 2009 - 6:30 am | क्लिंटन

पिडांकाकांनी मस्तच लेख लिहिला आहे.पुढचा भाग लवकर येऊ द्या.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अरेच्चा हे वाचलेच नव्हते की.........

किसन शिंदे's picture

7 Nov 2014 - 9:28 pm | किसन शिंदे

फर्स्ट टाईम वाच्या ही पंगत. अफाट म्हणजे अफाट प्रतिभा आहे पिडां काकांकडे. :)

चला..आता पुढच्या भागाकडे वळतो.

लव उ's picture

8 Nov 2014 - 1:59 pm | लव उ

मस्तच काका