सक्काळी सक्काळी मिपावर आलो आणि 'ब्यूटी पार्लर अर्थात यौवन फुफाटा' ही कविता वाचून डोळे भरुन आले! काल भडकमकर मास्तरांनी जालिंदर जलालाबादींची ओळख काय करुन दिली आणि आज ही नवकविता वाचायला काय मिळाली, सगळेच विलक्षण! हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! धन्य आहेस माऊली धन्य आहेस!! अशा साक्षात्काराच्या क्षणी कविता होणार नाही तर काय होणार?
सांग ढापण्या
कसा मी फसतो...
.....
पायजमा पट्ट्यापट्यात
नाड्यांचे गुंतलेले पेड
....
मळमळे जीव नुरे
काचेवर धूम्र पुटे
....
हल्लीच लावलिये शेंडी
अन् कातरलेत आरंभशूर कल्ले
...
फसव्या कवितेची झालीय बाधा
वाचकगणांची विचक्षण त्रेधा
...
काव्यपुटकुळ्यांना मसाज अन् मलम?
का सरळ करावेत कलम?
...
कशाला अनमान अन् कोणते सोपस्कार
रंग्या रंग्या कविता फार...
चतुरंग
प्रतिक्रिया
3 Apr 2009 - 4:34 pm | दशानन
=))
लै भारी ;)
3 Apr 2009 - 4:35 pm | मराठमोळा
वाचवा!!!! मला कुणीतरी वाचवा..
हसुन हसुन मरेन मी आज बहुतेक...
=)) =))
आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
3 Apr 2009 - 4:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
क ह र विडंबन आहे! पहिल्या वाक्यापासून हसायला सुरूवात झाली .... =)) =)) =))
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
3 Apr 2009 - 8:25 pm | प्राजु
काय कविता की कहर!!!!
कशाला अनमान अन् कोणते सोपस्कार
रंग्या रंग्या कविता फार...
छप्परफाऽऽऽड!!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Apr 2009 - 10:25 pm | शितल
=))
हसुन हसुन दमले.
3 Apr 2009 - 4:38 pm | पहाटवारा
अहो विडंबनाच्या नियमांमधे मूळ काव्याचा गाभा शिल्लक ठेवावा लागतो.
प्रत्येक कड्व्याचा दुसर्या कडव्याशी अन कडव्यातील प्रत्येक ओळीचा दुसर्या ओळीशी संबध ठेवुन तुम्ही तर मजाच घालवली बॉ !
3 Apr 2009 - 4:40 pm | दिपक
=))
कशाला अनमान अन् कोणते सोपस्कार
रंग्या रंग्या कविता फार...
"र" च्या जागी "ड" होता का? ) :)
3 Apr 2009 - 4:42 pm | विसुनाना
आत्मानुगामी विप्लवकाव्यभुभुक्काराचे हे विलापविडंबन पाहून मनास अत्यंत क्षोभ झाला. ;)
3 Apr 2009 - 4:49 pm | श्रावण मोडक
हे असले धागे ऑफिसात उघडायचे नाहीत या नियमाचा अपवाद करून वेडेपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून घेतले. ;)
3 Apr 2009 - 5:34 pm | विनायक प्रभू
रंगाचा
लय भारी
दंगा
3 Apr 2009 - 5:35 pm | भडकमकर मास्तर
अगायाया....
अशी विद्रोही चळवळाची खिल्ली उडवणे हाच प्रस्थापितांचा रोजचा खेळ झाला आहे.
णिषेढ...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
3 Apr 2009 - 6:10 pm | अमोल खरे
नाहीतर काय........जालिंदर जलालाबादी यांच्याबाबहोतेकाहिसे हेच झाले होते नाही ? =))
3 Apr 2009 - 6:53 pm | संदीप चित्रे
>> हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! :)
विडंबन आवडलंच :)
3 Apr 2009 - 7:29 pm | मदनबाण
आता कुठे ओरिजनल कविता कळली !!! :D
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
9 Apr 2009 - 4:13 pm | धमाल मुलगा
मदन्या,
फोकलीच्या, आज लय दिवसांनी तुझ्यामुळं कॉफीचा फवारा उडला मेल्या. =)) =)) =))
बाकी रंगाशेठच्या प्रतिभेबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावं?
जय हो! जय हो!! जय हो!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
3 Apr 2009 - 7:30 pm | टिउ
फार अतिशयोक्त लिहिले आहे.
स्पश्ट बोल्तो..राग नसावा.
नाही आवड्ले.
...
नवकविनच्या क्वितेचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा
विडंबन बेक्कार आवडलं!
4 Apr 2009 - 11:07 am | केशवसुमार
रंग्या रंग्या कविता फाड... अस म्हणायच का?
केशवसुमार
5 Apr 2009 - 3:27 am | पक्या
टिउ शी सहमत. मलाही आवडले नाही हे विडंबन. त्यापेक्षा मूळ कविता चांगली वाटली. वाचून मजा तरी आली.
9 Apr 2009 - 6:38 am | केदार_जपान
पैला लाइन्स मधेच खल्लास्स.... ;)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
-केदार
9 Apr 2009 - 7:11 am | विसोबा खेचर
साला हा रंगा बघावं तेव्हा फार्मातच असतो! :)
तात्या.
9 Apr 2009 - 7:22 pm | उमेश कोठीकर
रंगा ये वोSSSSSSSS रे;रंगा ये वोSSSSSSSSSS रंगाई,रंगाई माझे रंगाई.....
9 Apr 2009 - 7:42 pm | सूहास (not verified)
मस्तच..
फसव्या कवितेची झालीय बाधा
वाचकगणांची विचक्षण त्रेधा
ईथे हसुन हसुन त्रेधा ऊडाली..
सुहास
9 Apr 2009 - 7:44 pm | लिखाळ
हल्लीच लावलिये शेंडी
अन् कातरलेत आरंभशूर कल्ले
हा हा हा .. लै भारी रंगाशेठ !
-- लिखाळ.