येरवडा, पुणे - माहिती हवी...

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
13 Mar 2009 - 11:11 am
गाभा: 

नमस्कार मि.पा. कर
मला उद्या पुण्याला एका कंपनीत मुलाखतीला बोलावलेले आहे. तो पत्ता पुण्यातील येरवड्याचा आहे.

जवळचा लॅन्डमार्क हा आळंदी रोड / विश्रांतवाडी हा सांगीतलेला आहे.
मी नाशिकहुन पुण्यास जाणार आहे.

तेथे जाण्यासाठी शिवाजीनगरहुन सोईस्कर होईल की नाशिक फट्याला उतरून जाणे सोईचे होईल? (वेळ वाचवणे व पुण्यातील रिक्शा (!!)खर्च)
क्रुपया जाणकारांनी माहीती द्यावी.

आधीच धन्यवाद.

अवानंतरः मला येरवड्याच्या हॉस्पिटलात जायचे नाही. :-)

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

13 Mar 2009 - 11:21 am | विंजिनेर

शिवाजी नगर हा शेवटचा स्टॉप आहे.
तुम्ही त्या आधीच्या म्हणजे पाटील इस्टेट च्या स्टॉप ला उतरा.(मात्र, हा "विनंती थांबा" आहे हे लक्षात असुद्या.)
तिथुन आळंदी रोड ला जायला अगदी जवळ आहे (नवीन झालेला पुल पाटील इस्टेट आणि आळंदी रोड ला जोडतो).
मुलाखती साठी शुभेच्छा!

sanjubaba's picture

13 Mar 2009 - 11:31 am | sanjubaba

तो पत्ता पुण्यातील येरवड्याचा आहे. जवळचा लॅन्डमार्क हा आळंदी रोड / विश्रांतवाडी हा सांगीतलेला आहे.

येरवडाचा पत्ता आणि लॅंडमार्क विश्रांतवाडी चा काही तरी चुकतय असे मला वाटते तेव्हा योग्य
मार्गदर्शना साठी पूर्ण पत्ता द्या..........

संजूबाबा

पाषाणभेद's picture

13 Mar 2009 - 12:47 pm | पाषाणभेद

पत्ता देणारा पुणेकर दिसत नाही. ईंग्रजी फाडत होता. :-)
-( सणकी )पाषाणभेद

पाषाणभेद's picture

13 Mar 2009 - 11:36 am | पाषाणभेद

स. नं. ११२/४
जोशी वडेवाले यांच्या जवळ सांगीतलेले आहे.
-( सणकी )पाषाणभेद

छोटा डॉन's picture

13 Mar 2009 - 11:37 am | छोटा डॉन

विश्रांतवाडी आणि येरवडा बरेच लांब आहेत ...
अगदी जाण्यासाठी ३० मिनीटे + लागावीत एवढे, मग अशा परिस्थीतीत हा "जवळचा लँडमार्क" म्हणणे पटत नाही.

येरवड्याला जायचे असल्यास कधीही "पुणे स्टेशन अथवा शिवाजीनगर" ला उतरणे सोईचे आहे.
तिथुन दर १० मिनीटाला बस आहेत, रिक्षाची गरज नाही ...
नाशीक फाट्यावरुन रिक्षा म्हणजे खुप महाग प्रकरण आहे ..
असो.

पत्ता चुकीचा वाटतो वर्ननावरुन, व्यव्स्थीत सांगा ..
इथे नको असल्यास "व्यनी" करा, गडबड आहे हे नक्की ...

----...( पुणेकर )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

विंजिनेर's picture

13 Mar 2009 - 11:42 am | विंजिनेर

इथे नको असल्यास "व्यनी" करा, गडबड आहे हे नक्की ...

सच्चा पुणेकर हा नेहेमीच फसवा-फसवी होउ नये ह्या साठी जागरूक असतो मग ती गोष्ट छोटी का मोठी याला महत्व नाही :)
(काय करणार, तत्वाचा प्रश्न आहे ना शेवटी ? आणि तसेही जात्याच( शब्द चपखल आहे ना ;))हुशार आम्ही )

sanjubaba's picture

13 Mar 2009 - 11:49 am | sanjubaba

बरे झाले सांगितले नाही तर उगाच लांब गेला असता हा पत्ता मह्न्जे अगदी मेण्टल कॉर्नर च्या समोरचा आहे
तिथे जाण्या साठी तुम्हाला गुंजण थिएटर वरुन 8 रुपये पडतील तुम्हाला 6 सीटर पकडावी लागेल. रिक्षा च्या
भानगडीत पडू नका. येरवडा हून जवळ आहे

संजूबाबा

तिमा's picture

13 Mar 2009 - 11:57 am | तिमा

येरवडा हे नांव का पडले असावे ? "येरे वेड्या", यावरुन की येड्याचा आवाज (ये(रव)डा म्हनून ?

sanjubaba's picture

13 Mar 2009 - 11:58 am | sanjubaba

6 सीटर वाल्याना स्टॉप मात्र जोशी वडेवाले सांगा.

संजूबाबा

पाषाणभेद's picture

13 Mar 2009 - 12:44 pm | पाषाणभेद

धन्यवाद पुणेकर.

म्हणजे शिवाजीनगर-पुणे स्टेशन-गुंजण थिएटर - मेण्टल कॉर्नर- जोशी वडेवाले हाच मार्ग ना ?

-पाषाणभेद

sanjubaba's picture

13 Mar 2009 - 1:00 pm | sanjubaba

म्हणजे शिवाजीनगर-पुणे स्टेशन-गुंजण थिएटर - मेण्टल कॉर्नर- जोशी वडेवाले हाच मार्ग ना ?

होय हाच मार्ग पण तुम्ही स्टेशन ला न जाता मनपा ला आलात की तुम्हाला येरवडा ला जायला बस मिळ्तिल
उदा. लोह गाव, वड गाव शेरी, त्या गुंजण म्हणजे येरवडा येथे जातात.

संजूबाबा

चिरोटा's picture

13 Mar 2009 - 1:04 pm | चिरोटा

ह्या(http://www.joshiwadewale.com/Branches.htmल) साइट वर त्यान्चे दुकान विश्रान्त वाडी इथेआहे.

sanjubaba's picture

13 Mar 2009 - 1:23 pm | sanjubaba

गुंजण येरवडा येथून 6 सीटर वाल्याना स्टॉप मात्र जोशी वडेवाले सांगा.म्हणजे तुम्ही बरोबर पोहचालत
संजूबाबा