{पुर्वप्रकाशीत्-सदरचा लेख ६ मार्च २००९ रोजीच्या सकाळ वृत्तपत्राच्या कोल्हापुर आव्रुतीत मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झालेला आहे.
हा लेख वृत्तपत्रात येणार हे माहीत असल्याने सर्व संकेतस्थळे दीलेली आहेत ,यातील बरीचशी मिपाकराना माहीत असण्याची शक्यता आहे.
हा लेख आपण येथेही वाचु शकता.
http://farm4.static.flickr.com/3314/3340207823_baf982819d_b.jpg}
महाजालावर मराठीचा जय हो
इंटरनेटला जोडलेला संगणक.. एंटर दाबल्यावर एक छानसे चित्र आणि त्याखाली मनाला भिडणा-या 8 ओळी आणि मग विविध लेखकांच्या वेगवेगळया लेखांची यादी -
अहं हे कल्पनाविश्व नाही. आजघडीला हे शक्य आहे, शक्य झालेले आहे. महाजालावर मराठीने घेतलेल्या गरूडझेपेची ती प्रतिक आहे.
27 फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी दिन. यावेळच्या जागतिक मराठी दिनाला वेगळेच महत्व आहे. या वर्षात विक्रम पंडीतांसारख्या माणसांनी ख-या अर्थाने मराठी जगभरात नेली. याशिवाय यावर्षी पहिले मराठी विश्व साहित्य संमेलन झाले. यावरून वाद होत असले, तरी हे मात्र मान्य करायला हवे की या काळात मराठी ख-या अर्थाने ग्लोबल झाली. महाराष्ट्र भूमीत वावरणा-या मराठीने ''हे विश्वची माझे घर'' ही उक्ती सार्थ ठरवली. मराठी ग्लोबल होताना सहाजीकच तिची माध्यमे वेगळी आहेत. इथे पत्राना नव्हे तर ई - पत्रांना महत्व आहे. आपण ग्लोबल मराठीच्या काळात आहोत. जो काळ इंटरनेटच्या म्हणजेच शुध्द मराठीत महाजालाचा आहे. त्यामुळे सध्या महाजालावर मराठी काय म्हणते, हे जाणणे काळाची गरज आहे.
जेव्हा आपण नेटवर फेरफटका मारतो, तेव्हा लक्षात येते की आता इंटरनेटवर असंख्य मराठी संकेतस्थळे निर्माण झालेली आहेत. पूर्वी 'महाजालावर मराठी कुठे आहे?'' असा जो ओरडा व्हायचा त्याला ही जोरदार चपराक आहे. आणि महत्वाचे म्हणजे मराठीतील पहिले संकेतस्थळ ''मायबोली'' (www. mayboli.com) याला यावर्षीच तपपूर्ती झालेली आहे. 1996 सालच्या गणेशचतुर्थीला निर्माण झालेले हे सर्वांगसुंदर स्थळ .या संकेतस्थळामुळे जगातील मराठी लोक पहिल्यांदा एकत्र आले. त्यांच्यात चर्चा घडू लागली. शंका - समाधान सुरू झाले. नवनवीन लेखकांना त्यांचे लेख लोकापर्यंत पोहचवता येऊ लागले. हे संकेतस्थळ काळानुसार सतत बदलत राहिले. म्हणूनच, जवळजवळ 15 ते 20,000 सदस्यांसह (मात्र अक्टीव सभासद कीती ते माहीत नाही)हे स्थळ विविध उपक्रमांसह संस्कृतीरक्षणाचे देखील काम करत आहे.
पण प्रत्येक संकेतस्थळाला क्वचीत मर्यादा पडतात. त्यामुळे त्यानंतरच्या काळात मराठी माणसाला अभिव्यक्त होण्यासाठी विविध संकेतस्थळांची निर्मीती केली गेली. 'मनोगत' व 'उपक्रम' ही त्यापैकीच (www.manogat.com & www.mrupakram.org) ही संकेतस्थळे आजही जोषात चालू आहेत. या सर्व स्थळांवर अगदी इस्लामपूरपासून ते कॅलिफोर्निया पर्यंतचे सदस्य आहेत. व ते या स्थळांवर पाककृती ते जागतिक विषय यांवर चर्चा करत असतात. 'मनोगत' ने तर शुध्द मराठी लिखाणाची सोय उप्लब्ध करून दिलेली आहे. तर 'उपक्रम' ने खरडवही व व्यक्तिगत निरोप यांची सोय दिलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण घरी बोलतो त्याप्रमाणे बोलणे शक्य झाले आहे.
यानंतर, म्हणजे सर्वात महत्वाचे व सध्या खुपच प्रसिध्द असलेले 'मिसळपाव' हे संस्थळ (www.misalpav.com) वरील तिन्ही स्थळांचा उत्तम मिलाफ त्यांनी साधला आहे. गेल्या अवघ्या दिड वर्षात इथे विविध विषयांवरचे 5000 लेख आहेत. यावरून आपण महाजालावरच्या मराठीच्या प्रगतीचे विश्लेषण करू शकतो. महत्वाचे म्हणजे इथे अगदी 'ग्राफिटी' कार अभिजीत पेंढारकर ते अर्थविश्लेषक रामदासापर्यंत सर्व लेखक आहेत. त्यामुळे ख-या अर्थाने मराठीविश्व जवळ आलेले आहे. याशिवाय बजबजपुरी, मी मराठी इ. स्थळेही बाळसे धरत आहेत. ज्यांच्या नावाने आजचा दिन साजरा केला जातो. त्या कुसुमाग्रजांना आजचे महाजालविश्व पाहून नक्कीच भरून आले असते. म्हणूनच, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थपहिल्यांदा हा साहीत्यविषयक लेखाजोखा. एवढे मात्र नक्की म्हणता येईल की मराठीचा झेंडा जगभरात मानाने डोलत आहे. डोलणार आहे.
ही झाली सामाजिक संस्थळे, पण प्रत्येक व्यक्तीला व्यक्त व्हायचे असते. आणि ती इच्छा पूर्ण करतात ते ब्लॉग. आपल्याला पटणार नाही आज मराठीत वेगवेगळया विषयांवरचे जवळजवळ 1३00 ब्लॉग आहेत. अगदी प्रत्येक व्यक्ती मग ते राजू परूळेकर असोत वा माझ्यासारख्या सामान्य सगळेच ब्लॉगद्वारे व्यक्त होत आहेत. आणि हे सर्व ब्लॉग तुम्ही ''मराठी ब्लॉगविश्व'' (www.marathiblogs.net) वर एकत्र पाहू शकता.
व्यक्ती आणि समाज यांसाठी तर महाजाल वरदान ठरलेले आहे. पण, मराठीची महाजालप्रगती फक्त इथपर्यंत थांबलेली नाही. आत्तापर्यंत गाठलेला टप्पा तर मोठा आहेच.पण, विविध विषयावरच्या विविध संस्थळांनी हा टप्पा अधिकच मोठा केलेला आहे.
आपण, प्रथम सरकारी संकेत स्थळांबद्दल पाहू. महाराष्ट्राचे अधिकृत संकेतस्थळ (www.maharashtra.gov.in) संपूर्णपणे मराठीत असून येथे आपण आपल्या भाषेत कोणतीही माहिती मिळवू शकतो. याशिवाय सतत अपडेट राहणारे (www.mahanews.gov.in) हे संकेतस्थळ अतिउत्तम आहे. याशिवाय जवळजवळ सर्व जिल्हयांची अतिउत्तम संकेतस्थळे आहेत. महाराष्ट्र ख-या अर्थाने ई - गव्हर्नन्स मध्ये पुढारलेल आहे. हे यावरून स्पष्ट होते. याशिवाय विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांची स्वतःची मराठी संकेतस्थळे आहेत.नुकतेच मनसेचे एक अतिउत्तम ,आपण कल्पनाही करु शकणार नाही असे संस्थळ सुरु झालेले आहे.(www.manase.org) त्यामुळे महाजालावर मराठी लोकशाही मोठया प्रमाणावर नांदते आहे.असे म्हणायला हरकत नाही.
याशिवाय लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो तो पत्रकारिता. आज जवळजवळ 15 मराठी वृत्तपत्रांच्या ई - आवृत्या आहेत.( पहा http://batmidar2.blogspot.com/ मराठी व्रुत्त्पत्रे विभाग)विविध वृत्तपत्रांची सतत अपडेट होणारी स्थळे आहेत. नुकतेच 'ई - सकाळ' ने (www.esakal.com) नवे रूप धारण केले आहे. जेथे वाचकानांही व्यक्त होण्याची जागा आहे व या स्थळांना दिवसाला लाखो व्यक्ती भेट देत आहेत. याशिवाय दोन वृत्तवाहिन्या संस्थळावर उप्लब्ध आहेत. फक्त नेटवर असणारे एक चॅनेलदेखील आहे. (www.nautankitv.com) याशिवाय ''कळते - समजते'' (www/batamidar2.blogspot.com) द्वारे ई - पत्रकारिकताही केली जाते. तर ''बातमीदार''(www.batamidar.blogspot.com) सारखे संस्थळ पत्रकारांवर सतत नजर ठेवून असते.
महाजालावर विविध विषयांना वाहून घेतलेली अनेक स्थळे आहेत. अगदी मराठीतून संगणक - प्रश्न सोडवणारे लोकायत (www.lokayat.com) असो, कलाकारांना वाव देणारे ''मानबिंदू''(www.maanbindu.com) हे संकेतस्थळ असो, जुनी नवी मराठी गाणी उप्लब्ध गाणी उप्लब्ध करणारे ''आठवणीतील गाणी''(http://www.aathavanitli-gani.com/) असो किंवा ''माझ्या मराठीचे गायन'' असे म्हणणारे, मराठी माती(http://www.marathimati.com/) असो किंवा गणपतीला वाहलेले एकमेव .कॉम(http://www.ekmev.com/ekmev_marathi_new.htm) असो. हे प्रत्येक स्थळ उत्तम आहे. याशिवाय अगदी अवकाशावर आधारित ''अवकाशवेध.कॉम'' (http://www.avakashvedh.com/)आहे किंवा मराठीतून ग्रीटींग पाठवण्याचे ''मराठी वर्ल्ड''(http://www.marathiworld.com) आणि ''वन स्मार्ट क्लिक'' आहे अगदी चित्रपटांना वाहिलेले ''मराठी मुव्ही वर्ल्ड'' असा कोणताही विषय नाही की ज्यावर मराठी भाषेत संकेतस्थळ नाही. अगदी दासबोधापासून ते आजच्या कवीपर्यंत प्रत्येक विषयावर वेगवेगळी संकेतस्थळे आहेत जी विविध लोकांना उपयोगी पडतात. याशिवाय कुसूमाग्रजांपासून ते जी पर्यंत प्रत्येकाचे लिखाण त्यांच्या विश्वस्तांनी महाजालावर उप्लब्ध झाले आहे. फक्त मराठी गझलांना वाहिलेले संस्थळ देखील उत्तमपणे चालू आहे. अगदी ''मराठी कटटा'' (www.marathikatta.com) उत्तमपणे चालू असून शिवाजी महाराज ते सावकरांपर्यंत प्रत्येकाचे कार्य महाजालावर उप्लब्ध आहे. (www.rajashivaji.com) आणि (www.savarkar.org) एकूणच काय, तर मराठीचा परिघ प्रचंड वाढला आहे. इतकी संस्थळे आहेत की त्यांची ओळख करून दयायला स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल. नेटवरून निघणारे 4 - 5 दिवाळी अंक ते ई - पुस्तके असे सर्व विषय हाताळणे अवघड काम आहे, पण आपल्या मराठी माणसांनी ते आव्हान लिलया पेलले आहे. म्हणूनच या सर्वांचे रंगरूप उत्तम आहे. नुकत्याच झालेल्या विश्व संमेलनाचे संस्थळही उत्तम होते. (www.sfssahityasamelan.org) तांत्रिक बाबतीतदेखील ही स्थळे उत्तम आहेत. याचा प्रत्यय आपणाला (www.marathitube.com) सारख्या संस्थळातून मिळतो. खरेतर विषय भरपूर आहेत. पण उगाचच पाल्हाळ लावण्यात काही अर्थ नाही. ती अनुभव घेण्याचीच गोष्ट आहे. कारण, या महाजालीय समुद्रात पोहण्यातच खरी मजा आहे.
तर दोस्तांनो, स्वतः ''छानसे वाचलेले'' (www.marathigappa.tk)हे संकेतस्थळ चालवताना आणि महाजालावर भ्रमंती करताना माझा या सर्व संस्थळांशी संबंध आला. हा खजिना लोकांपुढे यावा या हेतूने केलेले हे लिखाण. लेखात बरीचशी संस्थळांचे उल्लेख केलेले आहेत व त्यांची वैशिष्ठयेही सांगीतले आहेत. मात्र, अनेक संकेतस्थळे राहून गेल्याची मलादेखील जाणीव आहे. पण जे आहे, ते भरपूर आहे. शेवटी एवढेच म्हणेन, की महाजालावर मराठीचा झेंडा उंचावत राहणार आहे. मराठीला ग्लोबल बनवून आपण तो उचलणार आहोत. तेंव्हा ''स्वान्त सुखाय'' म्हणा वा स्वाभिमानासाठी म्हणा एखादा तरी हा फेरफटका मराच. मी तुम्हाला खात्री देतो -
''माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातरी पैजा जिंके''
ही उक्ती तुम्हाला सहज पटून जाईल.
धन्यवाद
विनायक वा.पाचलग
Pachlag@in.com
marathilikhan@in.com
(www.marathilegends.tk)
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 10:07 pm | क्रान्ति
मराठी संकेतस्थळांबद्दल इतकी अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!
क्रान्ति
9 Mar 2009 - 10:12 pm | नरेश_
मराठी संस्थळाचा चांगला लेखाजोखा मांडलात.
पुन्हा एकदा धन्यवाद :-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
9 Mar 2009 - 10:12 pm | बिपिन कार्यकर्ते
विनायक, चांगला आढावा घेतला आहेस. छान.
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 10:32 pm | योगी९००
छान आढावा घेतला आहे.
यावेळी खुपच मेहनत घेऊन शुद्धलेखन चुका टाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे लेख अधिकच खुलला आहे..
हा लेख वाचल्यावर आपोआप माझ्या ओठावर"मराठी पाऊल पडते पुढे..." हे गाणे आले.
खादाडमाऊ
9 Mar 2009 - 10:38 pm | प्राजु
सुटसुटीत पण धावता लेखाजोखा आवडला.
छान घेतला आहेस आढावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Mar 2009 - 11:05 pm | भाग्यश्री
सगळा डेटाबेस उत्तम जमवला आहे.. फक्त एक अतिशय खटकले..
'ग्राफिटी' कार अभिजीत पटवर्धन?? लेख वृत्तपत्रात छापण्याआधी नावाची शहनिशा करून घ्यावी.. ते अभिजीत पेंढारकर आहेत ! .. गंमत म्हणजे ते सकाळचे ग्राफिटीकार.. चुकीचे नाव सकाळ मधेच छापलं गेलं आहे , सकाळलाही हे कळू नये?
( मला पडलेला हा प्रश्न आहे, की वृत्तपत्रांत छापताना प्रुफ रिडींग नावाचा प्रकार नसतो का आजकाल? खूप ठिकाणी चुका दिसतात, कधी व्याकरणात तर कधी तपशीलात.. छापायच्या आधी बघतात की नाहीत ही लोकं!?)
संपादन : इथे बदलता येते म्हणून बदललेत हे बरे केलेत.. पण असो.. माझा मुद्दा तो नव्हताच! :|
http://bhagyashreee.blogspot.com/
9 Mar 2009 - 10:41 pm | शरदिनी
लेख आवडला..
धन्स
10 Mar 2009 - 2:50 am | पक्या
लेख चांगला जमला आहे. आवडला.
लेखन शैली आणि शुध्द्लेखन ह्यात बरीच सुधारणा जाणवली. त्यामुळे बरे वाटले.
उपक्रम चे स्पेलिंग चुकले आहे. (mrupakram ). लेख लिहीताना काय चुका आहेत ते पाहिले नाही काय?
www.apalimarathi.com चा उल्लेख हवा होता. भरपूर काही आहे ह्या साईटवर.
10 Mar 2009 - 12:02 am | भडकमकर मास्तर
चांगला आढावा...
.. प्रूफ रीडिंग खूपच सुधारलेले .. त्यामुळे वाचायलाही बरे वाटले.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Mar 2009 - 7:15 am | सहज
लेख आवडला.
10 Mar 2009 - 7:41 am | अनिल हटेला
आवडला लेख !!
ब-याच दिवसानी विनायकाचा लेख पूर्ण वाचला !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
10 Mar 2009 - 9:27 am | दिपक
लेखाजोखा आवडला. :)
असेच लिहित रहा..