अवहेलनेचे बकासूर टाचा झिजवताय्त..
अन् मी उन्मुक्त रंगबावरी
भिरभिरतेय ध्येयवेड्या रूपरेषा धुंडाळत
त्याच त्या साजणगहिर्या रंगहाका
पिंपळरसिकांचा अत्तरटाहो
रक्तसूज्ञांचा दंभपराभव
अन् प्रतिबिंबांचा जादूटोणा
यक्
अन् असल्याच शब्दांना कंपूबाजांच्या
"छान गं, मस्त गं, पाणी आलं गं, सुंदर कल्पना गं, कसं सुचतं गं.."
असल्या छप्परतोड प्रतिक्रिया
काहिली काहिली जिवाची
वाटते सांगावे मी कोण या सार्यांना ..
की या तेजतर्रार शून्यमनस्कतेचा
उकळत्या तेलात टाकून
एक मेदूवडा बनवून खावा खुसखुशीत??...
प्रतिक्रिया
9 Mar 2009 - 5:03 pm | वेताळ
तुमचा राग मी समजु शकतो.
वेताळ
9 Mar 2009 - 5:06 pm | झेल्या
विडंबनकर्त्यांना शुभेच्छा..!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
9 Mar 2009 - 5:09 pm | लिखाळ
वाहवा .. मस्त ! :)
शब्दगहिर्या भावनातप्त तेलात
तळू दे पूर्णपणे या पोकळ पापड्या शब्दांच्या.
आनंदरंग फसफसणारी चटणी वाढवेल
उपहासस्वादिष्ट तीव्रखुमारी कवितेची :)
-- लिखाळ.
9 Mar 2009 - 5:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
9 Mar 2009 - 5:10 pm | सँडी
लै भारी!
पन झेपली नाय बगा! माप करा.
- सँडी
9 Mar 2009 - 5:19 pm | विंजिनेर
कविता वाचून बाणभट्टाचे समास एका दमात सोडवल्याचा भास झाला
असो. कविता मला फार झेपत नाहीत त्यामुळे ही उथळ प्रतिक्रिया फार मनावर घेतली नाही तरी चालेल :).
9 Mar 2009 - 9:37 pm | प्रकाश घाटपांडे
समास सोडविन्याची संधी सोडत नाही ब्वॉ तुमी!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Mar 2009 - 5:19 pm | घाटावरचे भट
क्या बात है.....
कंपूबाजांच्या काजळरंगी मेंदूच्या
गर्द वळ्यांच्या रानातून निसटणारं एक एक अक्षर
असहायपणे धडपडणारे संदेशप्रवाही न्यूरॉन्स
आणि आकलनाच्या पलिकडची केमिकल्स
नक्कीच वाढवतील खुमारी
जर कुणी खाणार असेल कंपूबाजांचा भेजा....
फ्राय करून!!!
9 Mar 2009 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते
मला तर ब्वॉ रक्तगाभुळलेली वटवाघळं आठवली... ;)
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2009 - 5:49 pm | छोटा डॉन
आ.का.का.क.ना.हे.ज.जा.आ.
तरीपण काव्य उत्तम आहे ...
जाता जाता :
आम्हाला भाईकाकांच्या "हिमालयाची उशी करुन झोपणार्या" नानु सारंजाम्याची आठ्वण आली.
चालु द्यात.
------
छोटा डॉन सारंजामे
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
9 Mar 2009 - 6:25 pm | सहज
सुंदर कल्पना कसं सुचतं बॉ असं?
दोन घटका क्लांत जीवाला शांत केल्याबद्दल धन्यवाद(लगबग)
9 Mar 2009 - 6:29 pm | चतुरंग
काल मी प्यायलो की काय चुकून!? (हल्ली वरचेवर हे असं होतंय बघा!!)
:T
चतुरंग
9 Mar 2009 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार
आ हा हा ज ह ब र्या !
उपेक्षीतांचे दु:ख आजवर इतक्या दाहकपणे कोणीच मांडले न्हवते. तुमचा एक न एक शब्द जणु विषारी सर्प होउन मनाला डसा डसा डसत आहे ! वेदनांची उन्मुक्त घुबडे भयाण आवाजात चित्कारत आहेत ! एखाद्या ड्रॅक्युलाने काचकन गळ्याचा चावा घ्यावा तसे तुमचे शब्द ह्या तनामनाला चावत आहेत ! तुमच्या शब्दांचे हे आसुड आज आमच्या रक्तात कसे न्हाउन निघाले आहेत. उपेक्षीत समाजच्या उद्रेकातुन बाहेर आलेला हा वणवा ह्या कंपुबाजाना भाजुन काढल्यशिवाय राहणार नाही !
परा ढसाळ
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य
9 Mar 2009 - 7:06 pm | श्रावण मोडक
खल्लास झालो.
10 Mar 2009 - 1:43 am | बेसनलाडू
मेदुवडा भारी!
(वडासांबारप्रेमी)बेसनलाडू
9 Mar 2009 - 9:37 pm | आनंद
वाटते सांगावे मी कोण या सार्यांना ..
सांगुन टाका तुम्ही कोण ते.
जुनेच असावेत.
10 Mar 2009 - 1:43 pm | जयवी
लै भारी......!!
10 Mar 2009 - 1:44 pm | जयवी
लै भारी......!!
10 Mar 2009 - 1:54 pm | ऋचा
ह्याचे विडंबन नाही पाडले का?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
10 Mar 2009 - 2:09 pm | विसुनाना
अरेरे! नका हो रसिकांना बोल लावू...!
चित्त विदीर्ण करणार्या निरर्थशब्दलतिकांच्या हिदोळ्यावर कुणी काकू झुलत आहेत का?
की कुणा कोकीळाची मुकी व्यथा निंबाच्या झाडावर बसून वसंतारव करते आहे?
की ... जाऊदे. ;)