तगमग
अवहेलनेचे बकासूर टाचा झिजवताय्त..
अन् मी उन्मुक्त रंगबावरी
भिरभिरतेय ध्येयवेड्या रूपरेषा धुंडाळत
त्याच त्या साजणगहिर्या रंगहाका
पिंपळरसिकांचा अत्तरटाहो
रक्तसूज्ञांचा दंभपराभव
अन् प्रतिबिंबांचा जादूटोणा
यक्
अन् असल्याच शब्दांना कंपूबाजांच्या
"छान गं, मस्त गं, पाणी आलं गं, सुंदर कल्पना गं, कसं सुचतं गं.."
असल्या छप्परतोड प्रतिक्रिया
काहिली काहिली जिवाची
वाटते सांगावे मी कोण या सार्यांना ..
की या तेजतर्रार शून्यमनस्कतेचा
उकळत्या तेलात टाकून
एक मेदूवडा बनवून खावा खुसखुशीत??...
वाचन
8745
प्रतिक्रिया
0