रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
25 Feb 2009 - 8:31 pm

'रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची' ह्या सुवर्णमयी ह्यांच्या सुंदर गझलेने आमच्या मनात जुन्या 'भेटीगाठींच्या' वेदनादायक आठवणींचे काहूर पुन्हा जागवले ते असे,

रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी

का हव्याशा वाटणार्‍या पोरटीला टाळले मी
फक्त असते तीच सोबत हेच होते मानले मी
....................................................
फोन नंबर दे म्हणालो मी तिलाही पाहता.. मग-
भेटण्याचे , रातच्याला.. मनसुबे रे बांधले मी

रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी
अन् कुल्यांना पाय लावुन धावण्याचे.. .ताडले मी

............................................
हाय मजला चोपण्यासाठी धरावी मान त्याने
जीवघेणे बुकलणे ते एकट्याने सोसले मी

बोलतो तो तात ..करतो वेगळे काही.. तरीही
(नाटकी तो थेरडा मग झोपला का मानले मी)

दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने
परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी

गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन ..
ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी!

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Feb 2009 - 1:05 am | विसोबा खेचर

दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने
परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी

गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन ..
ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी!

रंग्या, मस्त रे! :)

तात्या.

संदीप चित्रे's picture

26 Feb 2009 - 1:33 am | संदीप चित्रे

फोन नंबर आणि चोपण्याला तर खासच :)

अनिल हटेला's picture

26 Feb 2009 - 8:44 am | अनिल हटेला

गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन ..
ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी!

सही !! ;-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2009 - 11:00 am | प्रकाश घाटपांडे

गप्प बसला, वाकला, पडलाच 'रंग्या' खालती अन ..
ठणकणारे अंग माझे रातच्याला शेकले मी!

बोध घ्यावा म्हंतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

केशवसुमार's picture

26 Feb 2009 - 11:57 am | केशवसुमार

रंगाशेठ,
चांगल चालू आहे.. चालू दे..
केशवसुमार

नुसतेच डोकवून जाणार्‍यांचेही आभार! ;)

(कबुतर) चतुरंग

लिखाळ's picture

26 Feb 2009 - 11:32 pm | लिखाळ

हा हा हा ... मस्त आहे... :)
-- लिखाळ.

सुवर्णमयी's picture

27 Feb 2009 - 11:59 pm | सुवर्णमयी

दे बघू 'चपटी' मलाही, ढोसली त्या बेवड्याने
परत माझी बाटली मज मिळत नाही जाणले मी
वा! छान चालू द्या.
आजकाल ड्राय डे बी काय नसतोच.. रोज कविता रोज विडंबन अशा अर्थाने म्हणते आहे:)
सोनाली

चतुरंग's picture

28 Feb 2009 - 12:34 am | चतुरंग

तसा आमचा रोजच ड्राय डे कारण आम्ही घेत नाही!
पण विडंबनाचे म्हणाल तर तशीच एखादी मादक कविता दिसली की आमच्यातला विडंबक डुलायला लागलाच म्हणून समजा! ;)

चतुरंग

अवलिया's picture

28 Feb 2009 - 8:48 am | अवलिया

मस्त हो रंगाशेट.........:)

--अवलिया

सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"