आज मायाजालावर मराठी मधील अनेक गाणी एम पी थ्री या फॉर्मॅट मधे उपलब्ध आहेत...
तरी सगळी गाणी आहेतच असे नाही...
मला खालील गाणी हवी आहेत.
मी ती गूगल, ई-स्निप्स, व तत्सम संकेतस्थळांवर शोधली पण नाही मिळालीत...
कोणाकडे असतील तर कृपया लिंक्स द्याव्यात... मी ती गाणी उतरवून घेईन...
टीपः मला मूळ गाणी हवी आहेत... नव्याने गायलेली नकोत...
१. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का? (मिळाले :) ... धन्यवाद दिपक )
२. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला. (आशाताई) (मिळाले :) ... धन्यवाद खराटा ) http://www.sendspace.com/file/uhn36e
३. भावनांचा तू भुकेला रे मुरारी.. (मिळाले :) ... धन्यवाद खराटा ) http://www.sendspace.com/file/xvrkca
४. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
५. ऋणानुबंधाच्या (मिळाले :) ... धन्यवाद दिपक )
६. बालगंधर्व व छोटा गंधर्व यांची नाट्यगीते
७. का रे अबोला का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला (आशाताई) (मिळाले :) ... धन्यवाद दिपक )
बालगीते:
१. या वार्याच्या बसुनि विमा...सहल करुया गगनाची...चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
२. बाहुलीचं लगीन झोकात लागलं .. नवरोबानं भांडण काढलं
हे सदर सर्वच जण त्यांना हवी असलेल्या गाण्यांची विनंती करण्यासाठी वापरु शकतात.
धन्यवाद
(मराठी संगीतप्रेमी)सागर
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 2:01 pm | केदार_जपान
आपण उल्लेख केलेलि नाट्यगीते... (वसंतरावांच्या आवाजतिल तरी किमान)
यथे मिळतिल..
तिकडे शोध घेताना artist मधे वसंतराव आणी category मराठी टाका.
कदाचित आपल्याला त्याचे सभासद होणे गरजेचे आहे..पण ते फुकट आहे... ;)
------------------------------
केदार जोशी
24 Feb 2009 - 2:19 pm | टारझन
अरे बापरे ... विकत की फुकट ?
जरा जुणे धागे चाळा ... कोणी तरी फुकट गाणे मिळण्याची व्यवस्था केली आहे
24 Feb 2009 - 6:35 pm | सागर
टारुबाळा,
शोधायचे कष्ट कोण घेईल :)
मला ही उल्लेख केलेली गाणी हवी होती... तसे मायाजालावर माझ्या संग्रहात बरीच गाणी आहेत... पण वर दिलेली मिळाली नव्हती...
शोधून बघतो... कदाचित नवीन खजिना मिळेल.... जुना धागा तुम्ही दिला तर माझी मजाच आहे :D
धन्यवाद
सागर
24 Feb 2009 - 6:32 pm | सागर
वसंतरावांची ही गाणी माझ्या संग्रहात नव्हती....
मनापासून धन्यवाद :)
- सागर
24 Feb 2009 - 2:12 pm | दिपक
१. परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?
५. ऋणानुबंधाच्या
७. का रे अबोला का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला (आशाताई)
http://www.esnips.com इथे शोधा नक्की मिळतिल...
24 Feb 2009 - 2:57 pm | सागर
दीपकराव
खूप खूप धन्यवाद
परिकथेतील राजकुमारा हे माझे खास आवडीचे गाणे आहे... बाकीची दोन्ही गाणी डाऊनलोडसाठी उपलब्ध नाहीत
पण सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असल्याने ती गाणी टेंपररी इंटरनेट फाईल्स या ठीकाणी डाऊनलोड होतात हे माहित असल्याने एम पी थ्री मिळाल्या :)
खूप खूप धन्यवाद
सागर
24 Feb 2009 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार
काय हे सागर राव ? असे भलते सलते काय बोलता हो माझ्या विषयी ? =))
असो, तुमचे चिर्कुट्ला खाते आहे का ? असेल तर मला संपर्क करा, माझ्या कम्युनीटी मध्ये मी हि सगळी गाणी दिलेली आहेत, तिथुन ती तुम्हाला डाउनलोड करुन घेता येतील ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
24 Feb 2009 - 3:14 pm | सागर
भलते सलते नाही हो...
तुम्ही (तुमच्या नावाचे गाणे) माझ्या आवडीचे आहात :)
चिरकुटवर तुम्ही काही सापडला नाहीत.... विरोपाने माझा प्रोफाईल आयडी पाठवला आहे...
परिकथेतील का होईना पण राजकुमार ना तुम्ही.... ;)
तुमच्या कम्युनिटीला ईन्व्हाईट करा मी डाऊनलोड करुन घेतो
अगोदरच खूप खूप धन्यवाद ... ही सगळी गाणी माझ्या खूप आवडीची आहेत :)
24 Feb 2009 - 4:03 pm | योगी९००
बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती...(बारा ज्योतीर्लिंगावरचे गाणे) - चित्रपट सतीची पुण्याई किंवा थोरली जाऊ...बर्याच दिवसापासून शोधत आहे.
शंभो शंकरा करूणाकरा..
हिच खरी दौलत ची सगळी गाणी.
http://www.esnips.com पण नाही मिळाली.
कोणाकडे असतील तर क्रुपया सांगावे.
खादाडमाऊ
24 Feb 2009 - 4:10 pm | अनिल हटेला
मनी जे दाटले तुला पाहुनी सांगु कसे ,
ह्रदय शब्दातुनी आणावे कसे ,
सांगु कसे ?
इतकच आठवतये ,पण अतिशय शांत आणी सुमधुर गीत आहे हे ..
कुणाला ठाउक असल्यास जरूर सांगा .. :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
24 Feb 2009 - 7:07 pm | अनामिका
मनी जे दाटले तुला पाहुनी सांगु कसे ,
हे गाणे इथे मिळेल http://www.esnips.com/web/gaanimanatali/?flush=1
"अनामिका"
25 Feb 2009 - 8:15 am | अनिल हटेला
धन्यवाद अनामिकाजी !!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Feb 2009 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll
मला एक मराठी गाणे हवे आहे.
'गूज ओठानी ओठाला सांगायचे' असे शब्द आहेत त्याचे.
तसेच 'गर्द निळा गगनझुला' या अल्बम मधील 'गर्द निळा गगनझुला' आणि 'वासाचा पह्यला' ही गाणी हवी आहेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Apr 2009 - 7:50 am | सागर
युरेका युरेका... मिळाले एकदाचे हे सुंदर गाणे
एमपी थ्री डाऊनलोड लिंक : http://www.esnips.com/doc/c22c0201-efd6-4075-b88a-a4c86b6a12cc/गुज-ओठांनी-ओठांना-सांगायचं किंवा माझ्या फोल्डर मधले पहिलेच गाणे आहे
http://www.esnips.com/web/SundarMarathiGaani/
माझी खात्री आहे की ह्या सुंदर गाण्याचे शब्दही सर्वांनाच हवे असणार... हे घ्या :)
गीत - सुधीर मोघे
संगीत - सुहासचंद्र कुलकर्णी
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट - तुझ्यावाचून करमेना (१९८६)
गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं
तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगात साकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं
खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं
गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं
(मराठी संगीतप्रेमी) सागर
25 Feb 2009 - 3:00 pm | गणपा
माझीपण एक मागणी आहे..
खुप दिवसांपासुन एक गाण शोधतोय.
पण माझी अडचण अशी की मला शेंडा बुडखा आठवत नाही , मधलीच एक ओळ आठवतेय.
'त' वरुन ताकभात ओळखणार्या मिपाकरांना कदाचीत माहीती आसेल म्हणून हा प्रपंच...
" देवांचा ही देव करितो, भक्तांची चाकरी" अशी काहीशी ती ओळ आहे.
बहुदा माणिकबाईंच गाण आसाव. नक्की माहीत नाही.
(सगळा आनंदी आनंद आहे.)
25 Feb 2009 - 3:40 pm | लिखाळ
मराठी वर्ल्डवरती गाण्याचे शब्द मिळाले.. हेच का ते गाणे? .. उत्तरा केळरांनी गायले आहे असे तेथे लिहिले आहे. आता शोध सोपा जाईल.
-- लिखाळ.
25 Feb 2009 - 4:13 pm | गणपा
लिखाळराव धन्यवाद.. हेच गाण शोधत होतो.
आता शोधायला सोप्प जाईल.
हे गाण आठवलकी ह्यात चित्रीत केलेले प्रसंग डोळ्या पुढे यायचे, पण गाण्याची सुरवातच माहीत न्हवती त्यामुळे गाड अडल होत.
पुन्यांदा एकदा धन्यवाद.
- गणपा.
25 Feb 2009 - 3:01 pm | अनामिका
१. या वार्याच्या बसुनि विमा...सहल करुया गगनाची...चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
२. बाहुलीचं लगीन झोकात लागलं .. नवरोबानं भांडण काढलं
ही दोन्ही गाणी मला देखिल हवी आहेत .
"अनामिका"
25 Feb 2009 - 4:00 pm | ढ
हे गाणं इथून डाऊनलोड करु शकता.
25 Feb 2009 - 5:21 pm | सागर
"ढ" राव
हे गाणं नव्याने गायलेलं आहे.. मूळ गाणे लहान मुलाच्या आवाजातले आहे
पण हरकत नाही... दुधाची तहान ताकावर भागवू तोपर्यंत :)
सागर
अवांतर : बाकी हे संकेतस्थळ छान दिसते आहे.. नवीन बर्याच गोष्टी आहेत :)
25 Feb 2009 - 6:49 pm | सखाराम_गटणे™
http://www.misalpav.com/node/871
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
25 Feb 2009 - 7:23 pm | सागर
या दुव्यावर बर्याच चांगल्या लिंक्स मिळाल्यात.. पण बर्याचशा चालतही नाहीत...
खास करुन
http://www.esnips.com/web/oldmarathi
http://www.esnips.com/web/newmarathi
ह्यातील सगळी गाणी डिलिट झाली आहेत
सागर
10 Mar 2009 - 10:07 pm | एकशुन्य
मित्रहो,
www.cooltoad.com या संकेतस्थळाला भेट देउन बघा.
"....आणि असेल मग फक्त शांतता.."
10 Mar 2009 - 10:36 pm | सागर
पण कूलटोड वर खरेच थंड आहे सगळे :)
बर्याच एमपी थ्री तिथे नवीन गायकांनी गायलेल्या पण आहेत...
तशी मला अलिकडे बरीच गाणी मिळाली असल्यामुळे ती मी इथे अपलोड केली आहेत...
http://www.esnips.com/web/SundarMarathiGaani
ज्यांना आवडतील त्यांनी डाऊनलोड करावीत
(संगीतप्रेमी) सागर
21 Mar 2009 - 12:35 am | प्रिया८
धन्यवाद!!
सागरजी गाणी अपलोड केलीत म्हणुन धन्यवाद!!!
21 Mar 2009 - 1:41 am | जृंभणश्वान
"आई तुझे लेकरु, येडं गं कोकरु, रस्ता चुकलय..." हे गाणे पाहिजे आहे.
कुठल्या सिनेमातले आहे आठवत नाही, यशवंत दत्त यांच्या तोंडी आहे.
ईस्निप्स आणि कूलटोडवर नाही मिळाले :(
29 Apr 2009 - 5:53 pm | अनंता
एकटा जीव सदाशिव या चित्रपटातील आहे.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
22 Apr 2009 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
'डोळे तुझे शराबी' हे गाणे आहे का कोणाकडे?
दशरथ पुजारी किंवा राम कदम यांपैकी कोणीतरी ते गायलेले आहे.
गुरुनाथ शेणई यांनी लिहीलेले आहे हे गीत. पूर्वी रेडीओवर २-३ वेळा ऐकले होते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Apr 2009 - 10:50 am | उदय सप्रे
सागरा ,
मला पण हा अल्बम हवा आहे :
"घन बरसे हलकासा" - श्रीधर फडके , संगीत - यशवंत देव
22 Apr 2009 - 11:09 am | ठकू
ईस्निप्स
वर गाणे शोधणा-यांसाठी एक युक्ती. गाणे डाऊनलोडींगचा पर्याय उपलब्ध नसेल, तर ईस्निप्सच्या प्लेयर वर ते गाणे पूर्ण वाजवा. मग आपल्या संगणकाच्या Temporary Internet Files मध्ये शोधा. Size प्रमाणे फाईल्स लावल्यास जास्तीत जास्त kbps च्या फाईल्स सर्वात वर येतील असं पाहा आणि तिथून ती फाईल कॉपी (कट पेस्ट नाही) करा आणि आपल्याला हव्या असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा नि मग वाजवून पाहा. अशी फाईल वाजायलाच हवी. नाही वाजली तर vlc player वर वाजवणे किंवा फाईलचे extension बदलणे भाग आहे.
जमल्यास या दुव्यावर प्रतिक्रिया किंवा ईमेल आयडी व गाण्याचे नाव पाठवा. गाणे माझ्याकडे उपलब्ध असल्यास आपल्या ईमेलवर पाठवले जाईल. सर्वच गाणी अपलोड करणे अशक्य असते. त्यामुळे ईमेल हा पर्याय सोयिस्कर पडतो.
यूटॉरंटच्या दुव्यांवरही जर मराठी हा शब्द टाकून शोध घेतलात, तर बरीच गाणी मिळतील. गीत रामायणही तेथे उपलब्ध आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
22 Apr 2009 - 11:16 am | ठकू
अरे हो, विंडोज व्हिस्टा वापरणा-यांसाठी हा पर्याय उपयोगी पडतो की नाही, त्यावर अजून संशोधन सुरू आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
22 Apr 2009 - 11:16 am | ठकू
अरे हो, विंडोज व्हिस्टा वापरणा-यांसाठी हा पर्याय उपयोगी पडतो की नाही, त्यावर अजून संशोधन सुरू आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
22 Apr 2009 - 11:44 am | ठकू
या दुव्यावर दिलेली युक्ती काही माझ्या कामी आली नाही किंवा मलाच नीट समजलं नाहीये. कृपया, कुणाला विंडोज व्हिस्टावर गाण्यांच्या Temporary Internet Files कुठे स्टोअर होतात हे माहित असेल तर सांगा.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
30 Apr 2009 - 2:56 pm | llपुण्याचे पेशवेll
एक काम करा 'फ्री म्युझिक झिला' सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. त्यात ते डायरेक्ट ईस्नीप्स वर प्ले होणारे गाणे सॉफ्टवेअरच्या विंडो मधे दाखवते. त्याबाजूचा चेक बॉक्स चेक करून गाणे डाऊनलोड करा. व त्या लोकेशन ला जाऊन गाण्याच्या फाईलला रीनेम करा. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
22 Apr 2009 - 2:57 pm | पाषाणभेद
हे काव्य कुणाचे आहे ?
वंदना विटणकर की कुणी ?
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||
अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू ||
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s
हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.||
हे गाणे दुरदर्शनवर पाहीले होते. त्या वेळी सह्याद्री चालु झाले नसावे बहूतेक.
हे काव्य मिळेल का ?
आधिच धन्यवाद.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
22 Apr 2009 - 1:39 pm | अनामिका
"आला पाऊस मातीच्या वासात ग"हे पुष्पा पागधरे यांनी गायलेले व श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले गाणे कुणाकडे आहे का?
"अनामिका"
29 Apr 2009 - 3:59 pm | अनामिका
आई तुझे लेकरु, येडं गं कोकरु, रस्ता चुकलय.
हे गाणे इथे मिळेल http://www.esnips.com/web/lahaanpan/?flush=1
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
29 Apr 2009 - 9:07 pm | जृंभणश्वान
खूप दिवस शोधत होतो, आभारी आहे :)
29 Apr 2009 - 7:13 pm | सुमीत भातखंडे
बाल गंधर्वांची पदं कुठे मिळतील?
माझ्याकडे "वदं जाउ कुणाला शरण" आहे.
इतर पदं शोधून पहिली, पण कुठेच सापडत नाहीत.
इस्निप्स वर काही-काही उपलब्ध आहेत, पण डाउनलोडचा पर्याय दिसत नाही.
30 Apr 2009 - 2:46 pm | सागर
http://www.esnips.com/web/Natyasangeet-BalGandharva
ई-स्निप्स वर इथे बालगंधर्वांची बरीच पदे आहेत उपलब्ध
डाऊनलोडचा पर्याय उपलब्ध नसेन तरी ही गाणी आधी आपल्या संगणकावर डाऊनलोड होतात व तेव्हाच आपण ऐकू शकतो
थोडेसे तांत्रिक ज्ञान असेन तर तुम्ही ही गाणी C:\Documents and Settings\\Local Settings\Temporary Internet Files\
या फोल्डरमधे सर्च करुन तुम्हाला हवे तिथे कॉपी करु शकता...