माझं हल्ली असंच होतं, रामदास ह्यांचं काही लिखाण वाचलं की मी अस्वस्थ होतो. रामदास ह्यांच्या 'अडगळीतल्या काही कविता' ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या कवितांवर 'वा! छानच!', 'क्लास', 'उच्च' असले प्रतिसाद देऊन भागत नाही हो आमचं म्हणून मग हे,
१
टाळून
कधी वृत्त
कधी यमक.
कविगणांनी सोडवून घेतलं स्वत:ला.
थरथरवून अंग, उडवावं गोचिडीला,
तसंच.
आता
वेळी अवेळी
अनावर हुक्की आली तर ..
विडंबन करतो.
* * * *
२
दूरवरचं बघणार्या बेसावध कवीला
गाठावं कोपच्यात .
तसा मी गाठतो कवितेला
आजकाल.
जालावर येता येता.
* * * * *
३
दहा वेळा चोपूनही
परत परत येणार्या
लोचट प्रेमवीरासारखं.
नविन काव्य परत दारात!
चतुरंग
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 12:03 am | बेसनलाडू
२, ३ जबरा. वा रंगाशेठ एकाच चेंडूवर सिक्सर आणि चौकार दोन्ही मारल्यागत झालंय.
रंगशेठ गुगली, यॉर्करलाही ठोकायला लागला तर आता कवीजनांनी अजन्टा मेन्डिस् चा क्यारम् बॉल हुडकून काढावा काय?
(गोलंदाज)बेसनलाडू
18 Feb 2009 - 12:59 pm | श्रावण मोडक
पूर्ण सहमत. अजंता मेंडिसच्या बॉलचा शोध घ्यावा लागेलसंच दिसतंय.
18 Feb 2009 - 12:04 am | प्राजु
धन्य आहे तुमची..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Feb 2009 - 1:01 am | केशवसुमार
रंगाशेठ,
ऍकदम जोबर्या..
(आड गल्लीतला)केशवसुमार
18 Feb 2009 - 7:43 am | सहज
ओरीजीनल काव्यापेक्षा भारी वाटतयं
सॉल्लीड आवडल्लं
:-)
18 Feb 2009 - 7:56 pm | मुक्तसुनीत
ओरीजीनल काव्यापेक्षा भारी वाटतयं :
असहमत. (किंबहुना हे क्यायच्या क्याय मत मांडलंय असं मत =)) ! )
सॉल्लीड आवडल्लं
सहमत आहे ! खास रंगा टच आहे.
18 Feb 2009 - 8:04 am | विसोबा खेचर
कविगणांनी सोडवून घेतलं स्वत:ला.
थरथरवून अंग, उडवावं गोचिडीला,
तसंच.
हा हा हा! लै भारी! :)
तात्या.
18 Feb 2009 - 8:44 am | प्रमोद देव
:) :) :)
18 Feb 2009 - 12:18 pm | रामदास
सुंदर विडंबन.
इतकं चांगलं विडंबन होत असेल आणखी कविता लिहाव्याच असं म्हणतो.
18 Feb 2009 - 3:06 pm | शंकरराव
अम्हाला ती मेजवाणीच असेल असे म्हणतो,
चतुरंग व रामदासांना पुढील काव्यास शुभेच्छा
शंकराराव
18 Feb 2009 - 12:21 pm | अवलिया
मस्त ...........:)
--अवलिया
18 Feb 2009 - 3:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दूरवरचं बघणार्या बेसावध कवीला
गाठावं कोपच्यात .
तसा मी गाठतो कवितेला
आजकाल.
जालावर येता येता.
* * * * *
३
दहा वेळा चोपूनही
परत परत येणार्या
लोचट प्रेमवीरासारखं.
नविन काव्य परत दारात!
केवळ क्लास !!!
( खूद के साथ बाता: ऐ आदमी है कुछ हटके )
18 Feb 2009 - 4:52 pm | चतुरंग
शतशः धन्यवाद!!
(पुंड) चतुरंग
18 Feb 2009 - 5:47 pm | राघव
तुम्ही आता कवींसाठी भीतीदायक बनत चाललात राव... ;)
जबराट लिहिलंय!! केवळ क्लास!
(काव्य म्हणजे काय हे न कळलेला) मुमुक्षु
18 Feb 2009 - 7:09 pm | सुवर्णमयी
दूरवरचं बघणार्या बेसावध कवीला
गाठावं कोपच्यात .
तसा मी गाठतो कवितेला
आजकाल.
जालावर येता येता.
वा मस्तच!
चालू द्या.
शुभेच्छा
सोनाली
18 Feb 2009 - 7:36 pm | लिखाळ
जोरदार :)
फारच मस्त ..
पुढच्या ९७ कवितांची आणि विडंबनांची वाट पाहतो आहे :)
-- लिखाळ.
19 Feb 2009 - 11:11 am | दत्ता काळे
ग्रेट. . .!