तुझे सब है पता... चा भावानुवाद

आचरट कार्टा's picture
आचरट कार्टा in जे न देखे रवी...
5 Feb 2009 - 7:06 pm

मागे ऑर्कूट वरच्या "मराठी कविता" या समुहात माझ्यासकट अनेकांचे भावानुवादाचे प्रयत्न चालू होते. त्यात हे लिहिलं होतं. आज मिपा च्या मुखपृष्ठावर या गाण्याबद्दल वाचलं, आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावं... :)

मूळ गीतमाझा भावानुवाद

मै कभी बतलाता नही, पर अंधेरे से डरता हूं मै माँ
तुम से मै ये कहता नही, पर तेरी परवाह करता हूं मै माँ
तुझे सब है पता, है ना माँ...

भीड मे यूं ना छोडो मुझे, घर लौट के भी आ ना पाऊं माँ
भेज ना इतना दूर मुझ को तू, याद भी तुझ को आ ना पाऊं माँ
क्या इतना बुरा हूं मै माँ...

जब भी कभी, पापा मुझे जोर जोर से झूला झुलाते है माँ,
मेरी नजर ढूंढे तुझे, सोचू यही, तू आ के थामेगी माँ...
उन से मै ये कहता नही, पर मै सहम जाता हूं माँ
चेहेरे पे आने देता नही, दिल ही दिल मे घबराता हूं माँ...
तुझे सब है पता, है ना माँ...

आँखे भी अब तो गुमसुम सी है, और खामोश हो गयी है ये जुबाँ...
दर्द भी अब तो होता नही... एहेसास कोई बाकी है कहां...
तुझे सब है पता है ना माँ...

नाही सांगितलं कुणा, काळोखाची भीती मनी
दाखवत नाही कधी, आई तुझी माया मनी
आहे तुलाही ठाऊक, आई गं...

नको गर्दीत गं सोडू, घरी कसा येईन मी?
दूर नको पाठवू गं, आठवेन का तुला मी?
रुसली का माझ्यावर, आई गं?

बाबा देती खेळताना, झोपाळ्याला मोठ्ठा झोका
तुला शोधते नजर, आधाराचा हात तुझा
नाही बोललो मी त्यांना, जीव भांबावून जातो
भीती दाटे मनी जरी, खोटाखोटाच हसतो
आहे तुलाही ठाऊक, आई गं...

डोळे मिटले मिटले , अन ओठ झाले बंद
आता वेदना कुठली , जाणीवाच होता मंद...
आहे तुलाही ठाऊक, आई गं...

अर्थात, मी मुद्दामच याला भाषांतर च्या ऐवजी भावानुवाद म्हणतो. मीटर पूर्णपणे वेगळा घेतलाय. हिंदीत जो योग्य वाटतो, त्यातच मराठी लिहिणं जमलं नाही. खरंतर मीटरकडे पाहिलंच नाही. जसं सुचलं, तसं लिहीत गेलो. पण एकूण प्रकरण बरं वाटलं मला तरी... :)

संस्कृतीकविताचित्रपटआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 7:10 pm | बिपिन कार्यकर्ते

सालं ते मूळ गाणं रडवल्याशिवाय रहात नाही. भावानुवाद बर्‍यापैकी जमलाय. आशयाच्या दृष्टीने. बाकी ते मीटर-किलोमीटर, छंद-मकरंद वगैरे जाणकार सांगतीलच.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2009 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> सालं ते मूळ गाणं रडवल्याशिवाय रहात नाही. भावानुवाद बर्‍यापैकी जमलाय. आशयाच्या दृष्टीने. बाकी ते मीटर-किलोमीटर, छंद-मकरंद वगैरे जाणकार सांगतीलच.

अवलिया's picture

5 Feb 2009 - 10:08 pm | अवलिया

असेच म्हणतो

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

प्राजु's picture

5 Feb 2009 - 7:53 pm | प्राजु

प्रयत्न चांगला आहे..
किप ईट अप.!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

5 Feb 2009 - 11:32 pm | धनंजय

कीपिटप्!
असेच म्हणतो.

वाहीदा's picture

5 Feb 2009 - 11:24 pm | वाहीदा

भावानुवाद छान जमला आहे !
सगळं न सांगता, न बोलता जिला सगळ्या वेदना , सगळे राग , सगळे आश्रु कळतात ती एकच असते ... माँ / आई
In an entire world There is no any other substitute to mother
there can be another sunny summer, another breezy winter and another rainy blue
but there can never be another 'U' ---अम्मी

~ वाहीदा

शंकरराव's picture

6 Feb 2009 - 5:59 am | शंकरराव

भावानुवाद मस्त .. अप्रतिम...

आक्का वरिल विंग्रजी वर चार ओळी खरडल्या ...... यमक.. ढमक .. जुळवायचा प्रयत्न केला .. अता जस जमल तस ... माझी विंग्रजी कच्ची हाये. गोड मानुन घे नाहीतर जस लागल तस..

सारी दुनिया मे नही है कोई
जो माँ की कमी पूरी करे

हो सके कईबार जैसे
गर्मी मे सुरज की किरण बिखरे
या फिर कभी हो सर्द हवाऍ या कभी घनी बारिश की बौछारे
पर दुबारा कभी न हो सकेगी एक तुम ...अम्मी

शंकरराव (हिंदीत आहे म्हणून गालिबरावांना विश्रांती)

भडकमकर मास्तर's picture

5 Feb 2009 - 11:42 pm | भडकमकर मास्तर

शेवटचे कडवे विशेष उल्लेखनीय...
..
(
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 11:55 pm | विसोबा खेचर

आचरट कार्ट्या, छान भावानुवाद केला आहेस रे! साला रे गाणंच असं आहे की भल्याभल्यांना मोहिनी घालतं!

आपण तर साला ते गाणं सुरू झाल्यावर थेटरात रडलो होतो. म्हणूनच आज मुखपृष्ठावर टाकलं.

अशी सुरेख कलाकृती पाहिली की खूप समधान वाटतं!

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

आचरट कार्टा's picture

6 Feb 2009 - 11:26 am | आचरट कार्टा

सर्वांचे आभार.

खरं आहे... गाणंच असं आहे ना... थिएटर मधे मीही रडलो होतो ऐकताना.
आणि ते गाणं जेव्हा शंकर महादेवन स्वतंत्रपणे सा रे ग म प लिटल चँप्स च्या मंचावरून म्हणतो, तेव्हा तर जादू होते. ती पोरं तर रडायलाच आली होती. ऐकताना आपलीही अवस्था तशीच होते...
त्यात त्याने "जब भी कभी... च्या आधी संगीताचा जो तुकडा आहे मूळ गाण्यात, तो गाळलाय. त्यामुळे तिथला काँट्रा एकदम अंगावर येतो. आणि शेवट "है ना माँ" चा सरप्राइझ काँट्रा तर फक्त अनुभवावा. बोलण्यापलीकडे आहे.
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !