(गुलाबी चांदणे)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
9 Jan 2009 - 9:06 pm

जयवी यांची सुंदर कविता 'गुलाबी चांदणे' हीच ह्या विदारक सत्यामागची खरी प्रेरणा आहे! ;)

घुमा जडशीळ जाड कसा तनात तनात
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?

भासे कंपन धरणी मन कातर कातर
उरी भय थरथर, स्वप्न करी चूर चूर
कुणी बुकलले माझे आज गुपित गुपित
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?

आठवांचे मज जाळी, ऊन बेजार बेजार
त्याच्या मनात 'बसंती', मन जहर जहर
गाणे गाई मेला तिचे माझ्या कानात कानात
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?

दिनरात ऍसीडिटी, छाती जळत जळत
नादावला कसा बाई तिच्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब कशी घामात घामात
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?

चतुरंग

प्रेमकाव्यकविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

9 Jan 2009 - 9:18 pm | लिखाळ

आठवांचे मज जाळी, ऊन बेजार बेजार
त्याच्या मनात 'बसंती', मन जहर जहर

हा हा .. मजा आली. मस्त आहे विडंबन.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 9:40 pm | श्रावण मोडक

जोर लावला आहे एकूण. चालू द्या.
(इतक्या कवींची खुन्नस परवडेल का?)

अवलिया's picture

9 Jan 2009 - 9:54 pm | अवलिया

हम्म.

चालु द्या

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

संदीप चित्रे's picture

9 Jan 2009 - 10:45 pm | संदीप चित्रे

रंग्याच्या हाताला खुमखुमी आलेली दिसते :)
चालू दे... चालू दे...
>> गाणे गाई मेला तिचे माझ्या कानात कानात
कसे फुलेल चांदणे गुलाबी मनात मनात?

हे तर बेष्टच :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com