वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
1 Sep 2023 - 10:02 am

नेणतां वैरी जिंकती.
नेणतां अपाई पडती.
नेणतां संहारती घडती.
जीवनाश.

समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो.

या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो.

समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे. एका राजनेत्याला प्रजा सुखी आहे की नाही, प्रजेच्या गरजा किती, सरकारी अधिकारी त्यांच्या कर्तव्यांचे पालन करत आहेत की नाही, इत्यादी जाणण्याची गरज असते. ते जाणूनच राजा प्रजेच्या हितासाठी पाऊले उचलतो. या शिवाय राजाला त्याचे आंतरिक आणि बाह्य शत्रू किती, शत्रूंची शक्ती किती, त्यांचे मनसुबे काय, त्यांच्या हालचाली काय, इत्यादींवर लक्ष ठेवावे लागते. जो राजा शत्रूचे मनसुबे जाणण्याच्या प्रयत्नात कसूर करतो त्याचा पराभव होतो. त्याची सत्ता जाते आणि कधी- कधी जीव ही जातो. हे सर्व जाणण्यासाठी राजा गुप्तचर ठेवतो. जे त्याला सर्व माहिती पुरवितात. ज्या राजा जवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणा असते त्याचा पराभव होणे शक्य नाही. छत्रपति शिवाजी महाराजांपाशी सक्षम गुप्तहेर यंत्रणा होती. ती प्रत्येक मोहिम पूर्वी शत्रूचे बल, त्याच्या हालचाली, त्याचे दुर्बळ पक्ष इत्यादींची अचूक माहिती पुरवायची. या माहिती आधारावर राजे रणनीती निर्धारित करत होतो. त्यामुळेच राजे अफझल खानाचा वध करू शकले, शाहिस्ता खानाचे बोटे कापू शकले आणि आग्र्याहून सकुशल स्वराज्यात परत येऊ शकले.

दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी, चीन ने 1950 मध्ये तिब्बत गिळंकृत केला, तरी ही ते हिंदी चिनी भाई-भाईच्या दिवास्वप्नात मग्न राहिले. चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्नच केला नाही. परिणाम 1962 मध्ये आपला दारुण पराभव झाला. त्यांनी चीनचे मनसुबे जाणण्याचा प्रयत्न केला असता तर 1950 ते 1962 हा १२ वर्षांचा कालावधी चीन सोबत असलेल्या सीमेला सुरक्षित करण्यासाठी पर्यात होता. आपला पराजय झाला नसता.

राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे.

धोरणइतिहाससमाजआस्वादमत

प्रतिक्रिया

लिओ's picture

1 Sep 2023 - 6:42 pm | लिओ

छान लिहिले आहे.

एक प्रश्न

राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे.

हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ?

समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar's picture

1 Sep 2023 - 7:03 pm | Nitin Palkar

मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे.
नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल.
राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण's picture

1 Sep 2023 - 7:09 pm | अहिरावण

आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या

बोस
शास्री
पटेल
नंदा
इंदिरा गांधी
संजय गांधी
रा़जीव गांधी
चंद्रशेखर
वीपीसिंग
नरसिंह राव
अटल बिहारी
सोनीया गांधी
मनमोहन सिंग
नरेंद्र मोदी

आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल.

नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा
सावरकर
गांधी

इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा

बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

तिता's picture

2 Sep 2023 - 7:01 am | तिता

सहमत

सर टोबी's picture

1 Sep 2023 - 8:22 pm | सर टोबी

लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही.

त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2023 - 3:10 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत.

तिता's picture

2 Sep 2023 - 7:03 am | तिता

१००% सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Sep 2023 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

भागो's picture

2 Sep 2023 - 8:51 am | भागो

दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते?
जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2023 - 7:35 pm | अमरेंद्र बाहुबली

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या
देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या
देशसेवा करताहेत.
आणि आपण त्यांची गुलामगिरी
आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

विवेकपटाईत's picture

2 Sep 2023 - 6:58 pm | विवेकपटाईत

अधिकांश प्रतिसाद विषयाला धरून नाही. वैरी का जिंकतो हा विषय होता. यात राजनीती नाही.

अहिरावण's picture

4 Sep 2023 - 10:10 am | अहिरावण

जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील?

तुम्ही राजनीती आणता

आम्ही नाही

चित्रगुप्त's picture

2 Sep 2023 - 9:51 pm | चित्रगुप्त

अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात.

समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे:

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥
परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥