बुश साहेबांना जोड्यांचा आहेर

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जनातलं, मनातलं
18 Dec 2008 - 3:55 am

बुश साहेबांना इराकमध्ये जोड्याचा आहेर मिळाल्याची बातमी दोन दिवसांपासून जगभर गाजते आहे. कुठे या प्रकाराला इराकमधील जनतेचा असंतोष म्हटले जात आहे तर कुठे त्या पत्रकाराचा प्रसिद्धी स्टंट. या विषयावर मिपाकरांना काय वाटते हे जाणून घ्यायला उत्सुक.

जाता जाता - कोणत्या घटनेचा उपयोग कोण कसा करुन घेईल हे सांगणे मात्र मुष्किल. आता हेच पहा ना. या घटनेवर लगेचच एका ब्रिटिश तरुणाने एक खेळ विकसीत करुन आंतरजाळावर टाकला आणि पंचवीस लाखांवर हिट्स मिळवल्या! जगभरातल्या वर्तमानपत्रांप्रमाणे याची माहिती आपल्या मराठी वॄत्तपत्रांत सुद्धा आलेली आहे.

राजकारणमौजमजाबातमीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Dec 2008 - 4:55 am | मदनबाण

बुश साहेबांनी चपळतेने त्यांना फेकुन मारलेले जोडे चुकवले,, पण नंतर जोडे क्रमांक १० चे असल्याचा विनोद त्यांनी केला..म्हणजे या आधी पण ?? :?

(कोल्हापुरी चप्पल वापरणारा)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

नंदन's picture

18 Dec 2008 - 6:02 am | नंदन

खेळ सही आहे. त्या १० नंबरच्या प्रतिक्रियेनंतर "आय डिडन्ट नो व्हॉट दॅट गाय सेड, बट आय सॉ हिज सोल" अशी धमाल प्रतिक्रियाही बुशसाहेबांनी दिली. (बहुतेक त्यांच्या भाषण-लेखकाने लिहून दिली असावी :).)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अभिरत भिरभि-या's picture

18 Dec 2008 - 11:36 am | अभिरत भिरभि-या

बुश साहेबाला जोडेप्रदान करणार्‍याचे कौतुक करणारा बंगळुरातला एक जण सध्या तुरुंगात आहे.
बुश साहेबाची निंदा करणारा हा मुस्लिम कर्मचारी दहशतवादी असावा; या संशयाने त्याच्याच सहकार्‍यांनी पोलिसांना पाचरले.

http://timesofindia.indiatimes.com/Cities/Man_applauds_shoe-ing_of_Bush_...

भास्कर केन्डे's picture

18 Dec 2008 - 10:40 pm | भास्कर केन्डे

बुश साहेबाला जोडेप्रदान करणार्‍याचे कौतुक करणारा बंगळुरातला एक जण सध्या तुरुंगात आहे.
अच्छा, कदाचित यामुळेच एवढ्या मजेदार विषयावर येथे सगळे जण शांत बसून सावध पवित्रा घेत आहेत वाटतं. बाकी आपण मराठी लोकं सुद्धा हुशार असतो नाही का? अंगावर येणारं व घेणं देणं नसनारं काही दिसलं तर कशाला फुकटात वाट्याला जा! ;)

आपला,
(सावध) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अभिरत भिरभि-या's picture

19 Dec 2008 - 1:55 pm | अभिरत भिरभि-या

>> अच्छा, कदाचित यामुळेच एवढ्या मजेदार विषयावर येथे सगळे जण शांत बसून सावध पवित्रा घेत आहेत वाटतं. बाकी आपण मराठी लोकं सुद्धा हुशार असतो नाही का? अंगावर येणारं व घेणं देणं नसनारं काही दिसलं तर कशाला फुकटात वाट्याला जा!

नाय वो काका. तो मराठी नव्हता; मुशलमान व्हता. मराठी लोकांनी काही म्हटलं तर कोण कशाला तुरुंगात टाकेल ??
सगळ्यांना म्हायतेय, आपण नुसत्ये बोलतो करत काय न्हाय ;)

सखाराम_गटणे™'s picture

19 Dec 2008 - 1:58 pm | सखाराम_गटणे™

मस्तच,
अगदी मनातील भावना उतरवल्या आहेत. असेच लिहीत रहा. अशीच तुमची प्रतिभा आम्हाला बघायला मिळुद्यात.

फुले शु

----
सखाराम गटणे

अभिरत भिरभि-या's picture

19 Dec 2008 - 7:31 pm | अभिरत भिरभि-या

>> फुले शु

आमास्नी शू देताय व्हय; आवो म्या बुश सायेब न्हाई.
(स्वकमाईचे बाटाचे पायताण वापरणारा) अभिरत ;)

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 6:32 pm | लिखाळ

> तो मराठी नव्हता; मुशलमान व्हता. <
?? म्हणजे काय?? भाषा आणि धर्म यांची सांगड गोंधळात टाकणारी.
-- लिखाळ.

अभिरत भिरभि-या's picture

19 Dec 2008 - 7:36 pm | अभिरत भिरभि-या

>> ?? म्हणजे काय?? भाषा आणि धर्म यांची सांगड गोंधळात टाकणारी.
काका; शिरियसली न्हाई लिहिलेय; दोन्ही कम्युनिटी आहेत समजून लिवलय . हसत खेळत वाचा आणि सोडून द्या.

(स्वगतः) गणप्या, चांगला ज्वज्जहालेतिजहाल प्रतिक्रिया द्यायची ना !
हात तिच्या मायला तु नाय व्हणार डाण्यासायबांच्या लेखातला "ष्टार" प्रतिसादक

लिखाळ's picture

19 Dec 2008 - 7:39 pm | लिखाळ

दोन्ही कम्युनिटी आहेत समजून लिवलय . हसत खेळत वाचा आणि सोडून द्या.

पटलं नाही. पण हसलो आणि सोडुन दिलं (ऑफिसात असल्याने खेळता येणार नाही. :) )

गणप्या, चांगला ज्वज्जहालेतिजहाल प्रतिक्रिया द्यायची ना !

:)
-- लिखाळ.

अवलिया's picture

18 Dec 2008 - 12:36 pm | अवलिया

निवासी अनिवासी चर्चे प्रमाणेच बुश साहेबांना जोडे मारायला हवे होते की नाही यावर गरमागरम चर्चा होवु शकते / अपेक्षित आहे.
ज्यांना या चर्चेच्या निष्कर्षावर पैज लावायची असेल त्यांनी माझ्या ख व मधे नोंद करावी.
बेईमानीचा धंदा आम्ही इमानदारीत करतो त्यामुळे कुठलीही फसवणुक होणार नाही.

(बुकी) अवलिया

अवलियाची अनुदिनी

दवबिन्दु's picture

19 Dec 2008 - 9:17 am | दवबिन्दु

राजकारन्यांना जोडे मारन्याचा खेळ कदी येनार? मला तर तशेच कराय आवडेल. म्हंजे
पाकिस्तान आवडल अशे बोलनारे अंतुलेगुर्जी, दहशदवाद्यांना मदत करनारे कोन होते ते माहीत असुन न सांगनारे रानेगुर्जी.

हेरंब's picture

19 Dec 2008 - 6:19 pm | हेरंब

इथे बुश या व्यक्तिला महत्व नाही. ते ज्या खुर्चीवर बसले आहेत त्या पदाचा हा अपमान आहे. अणि म्हणूनच तो निंद्य आहे. कुठल्याही राष्ट्रप्रेमी व्यक्तिला आपल्या देशाच्या सर्वोच्च पदी असलेल्या नेत्याचा अपमान सहन होणार नाही, जरी तो नेता प्रजेला आवडत नसला तरी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2008 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बुश साहेबांना जोडे फेकुन मारणार्‍यांचे दररोज एक नवीन कौतुक छापून येते. त्या जोड्याचा अमुक अमुक लिलावात इतकी इतकी किंमत, जोडे फेकुन मारणार्‍याला कोणत्या तरी युवतीने मागणी घातली, त्याच्या समर्थनार्थ लोकांचे आंदोलने... खरं तर पत्रकाला स्वप्नात तरी वाटले असेल का यानिमित्ताने आपण इतके फेमस होऊ :)

स्वगत : बॅरीष्टर अतुंलेंना आता प्रॅक्टीस करावी लागेल जोडे चुकवण्याची ?

-दिलीप बिरुटे