खेळ दोन ओळींचा - ३

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
17 Dec 2008 - 10:40 am

खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी -

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
.....

पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं.

हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी!

बघुयात कसे काय जमते ते!! शुभेच्छा. :)

मुमुक्षु

मौजमजाप्रकटनआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शेखर's picture

17 Dec 2008 - 11:03 am | शेखर

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
म्हणे मुद्दाच्या प्रतिसादाला अवांतराचा धाक

- शेखर

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:07 am | अवलिया

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
अवांतर प्रतिसादाला संपादकाचा धाक

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

राघव's picture

17 Dec 2008 - 11:34 am | राघव

वाह!

लवंगी's picture

17 Dec 2008 - 11:30 am | लवंगी

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
घसा सुकलाय माझा वरुन धार टाक

अंतरंग....'s picture

17 Dec 2008 - 11:06 am | अंतरंग....

नक्की कसली धार पायीजे तुमाला
आमाला बी कळुद्या

अंतरंग....'s picture

17 Dec 2008 - 11:08 am | अंतरंग....

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
पण दोघांच्या मिलनाची, मॄगजळ करतो दमछाक

मला काही फार जमत नाही, पण सहज ट्राय केला...

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:09 am | अवलिया

मला काही फार जमत नाही, पण सहज ट्राय केला...

कशाचा ट्राय केला? मिलनाचा की ओळी लिहिण्याचा?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

अंतरंग....'s picture

17 Dec 2008 - 11:40 am | अंतरंग....

अर्थातच ओळी लिहिण्याचा.....
अजुन लै येळ हाय मिलनाला....
:)

चेतन's picture

17 Dec 2008 - 11:46 am | चेतन

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
भेटायचचं असेल तर क्षितिजापर्यंत वाक

चेतन

अवलिया's picture

17 Dec 2008 - 11:48 am | अवलिया

ही कोण क्षितीजा? आणि तिच्यापर्यत वाकले तर कोणाला भेटता येते? मोघम नको.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

चेतन's picture

17 Dec 2008 - 12:16 pm | चेतन

>> ही कोण क्षितीजा? आणि तिच्यापर्यत वाकले तर कोणाला भेटता येते?
क्रिप्टीक आहे ते :SS

ही 'मोघम' कोण? (का हे पण क्रिप्टीक) ;)

चेतन

अवलिया's picture

17 Dec 2008 - 12:21 pm | अवलिया

क्रिप्टीक आहे ते
असे होय. बर बर असु देत हो.

ही 'मोघम' कोण? (का हे पण क्रिप्टीक)
नाही. हे मोघम. जेव्हा कोणत्याही गोष्टीला पुर्ण उलगडुन न सांगता काही गोष्टी लपवलेल्या असतात किंवा चर्चा करतांना त्या तिस-या व्यक्तीला कळु नये अशा रितीने संभाषण वा लेखन केले असते तेव्हा त्याला मोघम असे म्हणतात.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

चेतन's picture

17 Dec 2008 - 12:35 pm | चेतन

>>नाही. हे मोघम. जेव्हा कोणत्याही गोष्टीला पुर्ण उलगडुन न सांगता काही गोष्टी लपवलेल्या असतात किंवा चर्चा करतांना त्या तिस-या व्यक्तीला कळु नये अशा रितीने संभाषण वा लेखन केले असते तेव्हा त्याला मोघम असे म्हणतात.

बरं बरं याला मोघम म्हणतात होयं #:S

आभाळ धरतीला मिळतं त्याला क्षितिज म्हणतात बहुतेक :?

चेतन

अवांतर : 'अवलिया' मोघम आहे का ~X(

अवलिया's picture

17 Dec 2008 - 12:40 pm | अवलिया

आभाळ धरतीला मिळतं त्याला क्षितिज म्हणतात बहुतेक
बरोबर आहे. त्याच्यापर्यंत पोहोचता येते. त्याला क्षितिजापर्यत जाणे असे संबोधले जाते.
तुम्ही ज्या क्षितिजाचा उल्लेख केला आहे तिच्यावर वाका असे काहीसे म्हटलेले आहे. त्यामुळे धरतीला मिळणारे आभाळ जे क्षितीज म्हणुन संबोधले जाते ते व ही क्षितीजा हे दोन भिन्न ठरतात.

अवांतर : 'अवलिया' मोघम आहे का
यावर एखादा कौल टाकल्यास माझी हरकत नाही.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

चेतन's picture

17 Dec 2008 - 12:50 pm | चेतन

बरोबर आहे. त्याच्यापर्यंत पोहोचता येते. त्याला क्षितिजापर्यत जाणे असे संबोधले जाते.

माझ्या माहितिप्रमाणे त्या क्षितिजापर्यत कधिच पोहोचता येत नाही.
तुम्ही ज्या क्षितिजाचा उल्लेख केला आहे तिच्यावर वाका असे काहीसे म्हटलेले आहे
मी तरी असे काही म्हणले नाही हे तुमचेच विचार...
धरतिला भेटायला आभाळ वाकले असे मला म्हणायचं होतं

असो
चेतन

अवलिया's picture

17 Dec 2008 - 12:55 pm | अवलिया

मी तरी असे काही म्हणले नाही हे तुमचेच विचार...

म्हणले की म्हणालो? बर असो. :)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

चेतन's picture

18 Dec 2008 - 10:49 am | चेतन

हे दु:ख कुण्या जन्माचे
क्षितिजाला बिलगुन आले
स्वप्नात पुन्हा सापडले
मेघांचे भगवे शेले

कदाचित हे पण मोघम असावे

अवलिया's picture

18 Dec 2008 - 10:55 am | अवलिया

ते दुःख केवळ स्वप्नातील
स्वप्नातच सोडुन दिले
घालण्या गवसणी क्षितीजा
पुन्हा सरसावले शेले

हे मोघम नसावे

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

चेतन's picture

18 Dec 2008 - 11:05 am | चेतन

कदाचित कवी ग्रेस यांनाच माहित असावे

बाकि तुमचि कविता मस्त आहे

चेतन

अवलिया's picture

18 Dec 2008 - 12:55 pm | अवलिया

कदाचित कवी ग्रेस यांना पण माहित नसावे

बाकि तुमचा प्रतिसाद मस्त आहे

(ही प्रतिसाद पाठ खाजवा खाजवी कधी थांबणार?)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

राघव's picture

17 Dec 2008 - 12:05 pm | राघव

एक माझा प्रयत्न -

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
धुकं भरल्या दुलईचं पांघरूण टाक!

मुमुक्षु

अवलिया's picture

17 Dec 2008 - 12:09 pm | अवलिया

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
कशाला हवी दुलई झकास दोन पेग टाक!

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

राघव's picture

17 Dec 2008 - 12:17 pm | राघव

मीलनाच्या एका कुशीत, असे पेग आले लाख! ;)

अवलिया's picture

17 Dec 2008 - 12:23 pm | अवलिया

मीलनाच्या एका कुशीत, असे पेग आले लाख!

चुकुन पेग च्या ऐवजी पेगे वाचले. (पेइंग गेस्ट)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2008 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
रोज रात्री व्हिस्की मारते मला हाक
वाह छान सुंदर असे म्हणावे !
हुकुमावरुन
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

एक नंबर
:)) :))

गीत's picture

17 Dec 2008 - 12:42 pm | गीत

:?
एक प्रयत्न माझा ही ...............
निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
होईल कधी आपले मिलन लवकर सांगून टाक

राघव's picture

17 Dec 2008 - 12:54 pm | राघव

बरंच अवांतर झालंय लेखन!
कृपया दुसरी ओळ ही पहिल्या ओळीशी निगडीत अशीच असावी हे ध्यानी घ्यावे. त्यातच खरी मजा आहे!! असो.
काही प्रयत्न झकास आहेत. अन् त्याचसाठी तर हा धागा आहे. येऊ देत अजून! शुभेच्छा. :)

मुमुक्षु

अप्पासाहेब's picture

17 Dec 2008 - 2:36 pm | अप्पासाहेब

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
सोनपिवळ्या कांती वर पहिलेपणाची झाक

किंवा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
आज -हावा वस्तीला ब्येट पार्टीचा झ्याक

किंवा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
आला थंडीचा महिना द्या हो जरा आलेपाक

किंवा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
तिथे आबांना भोवली हिंदी बोलण्याची चुक

किंवा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
आहे पुरेसे आम्हाला नको फुकटची भिक

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
मिपा वाचता वाचता आला पाठीसी की बाक

किंवा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
पडले शेअर मार्केट आता फायझर घेऊन टाक

किंवा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
लै म्हाग ईलायती बरी मला नवटाक

लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

राघव's picture

17 Dec 2008 - 4:48 pm | राघव

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
सोनपिवळ्या कांती वर पहिलेपणाची झाक

हे आवडले!!

मुमुक्षु

मनीषा's picture

17 Dec 2008 - 7:57 pm | मनीषा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
सागराच्या लाटांना क्षितीजाचा धाक !

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
आसमंती या गुंजते वादळाची गाज |

पॅपिलॉन's picture

17 Dec 2008 - 8:09 pm | पॅपिलॉन

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
तापलेली तनु माझी, मिठीत घेऊन टाक

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

राघव's picture

18 Dec 2008 - 11:08 am | राघव

खूपच छान जमले आहे सगळ्यांना.. बहोत खूब!! :)

माझा आणखी एक प्रयत्न -

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक,
"बरस ना रे, मला चिंब भिजवून टाक!"

(प्रयत्नवादी!) मुमुक्षु

अवलिया's picture

18 Dec 2008 - 1:07 pm | अवलिया

वाह वाह

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

18 Dec 2008 - 4:33 pm | सखाराम_गटणे™

वाह वाह, छानच आहे,
आवडले

पुले शु

----
सखाराम गटणे

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 4:44 pm | धम्मकलाडू

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक,
"ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ!"

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

डावखुरा's picture

18 Mar 2010 - 6:33 pm | डावखुरा

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक,
धास्तावला बळीराजा आता काय थाट?
"राजे!"

प्राजु's picture

18 Mar 2010 - 7:36 pm | प्राजु

निळ्याकाळ्या आभाळाला धरतीची हाक
धरा घाली आण आणि नभ घेई भाक...

निळ्या काळ्या आभाळाला धरतीची हाक
हिरवळी तृणाला या धुक्याचा गं धाक..

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

चतुर नार's picture

19 Mar 2010 - 4:15 am | चतुर नार

निळ्याकाळ्या आभाळाला धरतीची हाक
सोसवेना तिला तिच्या लेकरांचा शोक

चतुर नार's picture

19 Mar 2010 - 4:18 am | चतुर नार

निळ्याकाळ्या आभाळाला धरतीची हाक
जनकाला साद घाली जशी कोणी लेक