शशक--दरोडा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
8 Feb 2023 - 8:00 am

रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत?

अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर....
दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.

धोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

श्वेता व्यास's picture

8 Feb 2023 - 10:57 am | श्वेता व्यास

सत्यघटना शशक आवडली.

कर्नलतपस्वी's picture

8 Feb 2023 - 11:51 am | कर्नलतपस्वी

ना खून ना खराबा
घातला कोटींचा दरोडा
सुटा बुटातला चोर
पोलिसांच्या जीवाला घोर
पायथन कोड फळला
बॅक बॅलन्स झाला खाली
बच्चे लोग बजाव ताली
&#128512

पायथन कोड फळला
//"करोडोंचा मेवा गिळला"//
बॅक बॅलन्स झाला खाली
बच्चे लोग बजाव ताली

सुखी's picture

9 Feb 2023 - 5:49 am | सुखी

मस्त

सुखी's picture

9 Feb 2023 - 5:50 am | सुखी

मस्त लिहिली आहे श श क

सौंदाळा's picture

10 Feb 2023 - 12:51 pm | सौंदाळा

मस्तच
यातील काही रक्कम (कदाचित इंडोनेशिया मधून) रिकव्हर केली होती असे पण वाचले होते.

कुमार१'s picture

11 Feb 2023 - 11:49 am | कुमार१

आवडली