शशक--दरोडा
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत?
अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर....
दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.
प्रतिक्रिया
सत्यघटना शशक आवडली.
मस्त..
सुंदर कवितेने प्रतिसाद्ल्याबद्दल धन्यवाद!!
मस्त
मस्त लिहिली आहे श श क
मस्तच
आवडली