स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले.
सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले. बंगालचे वाघ आणि वाघिणी यांनी प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला जरब बसवली. ज्याने अत्याचार केले, क्रांतिकारकांचा छळ केला, अनेकदा निरपराधांना तुरुंगात डांबले, निःशस्त्र आंदोलकांवर क्रूर हल्ला चढवायचा, बेदम मारहाण करायची असे कृत्य करण्यात स्वतःला धन्य मानुन सरकारी इतमामाचे पूर्ण मोल व इमानदारी सरकारच्या पदरात घालणारे अधिकारी या वाघ-वाघिणींना सहन झाले नाहीत. इथे आपला माज दाखवणे सोपे नाही आणि केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा आपल्याला जाब द्यावा लागेल ही जरब प्रत्येक अधिकाऱ्याला बसली. आपण एक अधिकारी ठार केला म्हणुन राज्य लगेच संपणार नाही पण इथे आता ’मुकी बिचारी कुणी हाका’अशी परिस्थिती राहिली नाही, आता आपली जायची वेळ जवळ आली आहे हे सत्तेला समजून चुकले आणि ती समज देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त खुशीने सांडले.
१९३१ मध्ये पूर्व बंगालमध्ये कोमिल्ला येथे नियुक्त झालेला जिल्हाधीकारी स्टिव्हन्स हा एक मग्रूर अधिकारी. याने सविनय कायदेभंगाची चळवळ करणार्या सत्यग्रहींवर अमानुष लाठिमार करुन असंख्य सत्याग्रहींना जबर मारहाण केली. अर्थातच क्रांतिकारकांना तो सलू लागला व युगांतर सारख्या क्रांतिकारक संघटनांनी त्याच्या वधाचा विडा उचलला. आपले भवितव्य समजुन चुकलेला तो जिल्हाधिकारी सावध झाला. त्याने बंदोबस्तात राहणे पसंत केले. त्याने सरकारी कचेरीत येणेच बंद केले, तो आपल्या बंगल्यात बसूनच सर्व कारभार बघु लागला. मात्र काहीही झाले तरी या उन्मत्त अधिकाऱ्याला यमसदनास पाठविण्याचा निश्चय क्रांतिकारकांमध्ये पक्का होता. बंगालच्या क्रांतिकारक संघटनांमध्ये मुलीही आघाडीवर होत्या. खुद्द कोमिल्ल्यात युगांतरच्या शाखेत प्रफुल्लनलिनी ब्रह्म हिने अनेक मुलींना प्रभावित केले होते.
तिच्याच नेतृत्वाखाली शांती धोष व सुनिती चौधरी यांनी स्वत:ला झोकुन दिले. शांतीचे वडील कोमिल्ला विद्यापिठात तत्त्वद्न्यानाचे शिक्षक होते, आई एक गृहिणी होती. शांतीला आपल्या पित्याकडुनच देशभक्तिचे बाळकडु मिळाले होते. सरोजिनी नायडु यांचे १९२६ साली जेव्हा कोमिल्ला येथे भाषण झाले तेव्हा प्रारंभीचे स्तवन गीत शांतीने म्हटले होते. शाळेत तिची ओळख सुनिती चौधरी हिच्याशी झाली व पुढे दोघीही प्रफुल्लनलिनीबरोबर युगांतर मध्ये सामिल झाल्या जिथे त्यांची भेट प्रख्यात क्रांतिकारक अखिल नंदी याच्याशी झाली. सुनिती चौधरी ही इब्राहिमपूरची, घरची गरीबी. हिच्या प्रमाणेच हीचे दोन भाऊ देखिल क्रांतिकार्यात शिरले होते. मात्र हे पुढे जेव्हा तिला व भावांना सरकारने पकडले तेव्हा उघड झाले, त्याआधी तिला आपले भाउ क्रांतिकार्यात उतरल्याचे व भावांना आपली बहिण क्रांतिकारक असल्याचे माहित नव्हते. क्रांतिकारक संघटनांमध्ये गोपनियतेची शपथ देत असल्याने ते स्वाभाविक होते.
कोमिल्ल्यात युगांतरचे कार्यकर्ते होते शांती, सुनिती, प्रफुल्लनलिनी, बिरेन भट्टाचार्य, अखिल नंदी, ललित बर्मन, क्षितिज रॉय आणि त्यांना मार्गदर्शन करीत होते सुपती रॉय. ५ मार्च १९३१ रोजी बिरेन भटाचार्यच्या नेतृत्वाखाली ब्राहमण बारिया येथील ट्पाल कचेरीतून सरकारी खजिन्यत भरण्यासाठी जाणारी पंचविस हजार रुपयांची थैली लुटली. हे पैसे अखिल नंदीकडे सोपविण्यात आले व याच पैशातुन क्रांतिसाठी पिस्तुले व काडतुसे विकत घेतली गेली. क्रूरकर्मा जिल्हाधिकारी स्टिव्हन्स याच्या वधाच्या योजन्या आखल्या जाउ लागल्या. हा शूरवीर आपल्या बंगल्यात जागत्या पहाऱ्यात लपून बसल्याने याला गाठायचा कसा हा प्रश्न भेडसावित होता. साधरणत: स्त्री क्रांतिकारक तोपर्यंत थेट हल्ल्यात सहभागी न होता मदत कार्य, प्रचार कार्य व साधारण क्रंतिकारकांच्या सहायिकांचे कार्य करीत होत्या. मात्र स्टिव्हन्सला घरात शिरुन मारायचा तर मुलींना प्रवेश मिळणे त्यातल्या त्यात शक्य होते तेव्हा या कामासाठे मुलींना निवडायचे का आणि त्या हे करु शकतील का असा विचारविनिमय सुरू झाला.
या कामसाठी आपण तयार आहोत आणि ही कामगिरी आपल्यालाच मिळावी अशी मागणी शांती घोष आणि सुनिती चौधरी यांनी केली आणि सगळे चकित झाले. या दोघींचे वय होते फक्त चौदा वर्षे! ईयत्ता आठवीची परिक्षा नुकत्याच दिलेल्या या विद्यार्थिनी. सगळेच स्तिमित झाले. सहा फूट उंचीचा तो आडदांड गोरा समोर उभा राहिला तर या थरथर कापतील, या त्याला काय मारणार अशी शंका व्यक्त होताच त्या वाघिणींनी ठासून सांगितले की त्या ही कामगिरी पार पाडतीलच असा त्यांना ठाम आत्मविश्वास आहे. मग त्या दोघिंनी उलट आपल्या प्रमुखांना सवाल केल की कधी कधी पुरुष क्रांतिकारकांचे हल्लेही यशस्वी ठरले होतेच की, मग आता या दोघींना संधी का मिळु नये? अखेर ज्येष्ठ नेत्यांनी परवानगी दिली.
सर्वांना निरुत्तर करीत त्या अवघ्या १४ वर्षांच्या विरांगनांनी ती जबाबदारी उचलली. गोळ्या झाडण्यासाठी गावाबाहेरील कोटबारीच्या जंगलात सराव झाला. या लहान मुलींनी पिस्तुल प्रथमच हाताळले होते. पैकी सुनिती ही कृश अंगकाठीची, तिची बोटे हडकुळी होती. तिला मागचा चाप अंगठ्याने ओढायला जमत नव्हता, तिने आपल्या प्रशिक्षकाला शक्कल सुचविली की मला अंगठ्या ऐवजी मधल्या बोटाने चाप मागे ओढयला शिकव! ही शक्कल लागु पडली. या दोघींनी दोन दिवस सराव केल. तेवढा पुरेसा होता कारण एक तर वेळ नव्हता व दुसरे म्हणजे गोळ्या अगदी जवळुन झाडायच्या होत्या.
आणि प्रत्यक्ष कृतिचा दिवस उजाडला - दिनांक १४ डिसेंबर १९३१. कडक्याची थंडी पडली होती. अखिलदांनी पडदे लावलेल्या घोडागाडीतून त्या दोघींना बंगल्याच्या जवळ पास नेउन सोडले. त्या काळी मुसलमान स्त्रिया पडद्याच्या गाडीतुन जा ये करीत असल्याने कुणी शंका घेतली नाही. फाटकापाशी उतरल्यावर या दोघींनी नोंदपुस्तिकेत आपली नावे मीरा व इला अशी लिहिली व आपण ढाक्यात मुलिंसाठी पोहण्याच्या स्पर्धा अयोजित होत असून त्या संदर्भात परवानगीसाठी साहेबाला भेटाला आल्याचे सांगितले. कुणाला संशय आला नाही. दोघी थेट बंगल्यात गेल्या. स्टिव्हन्स बाहेर वरांड्यात येताच दोघींनी आपण ढाका येथुन आलो असुन पोहण्याच्या स्पर्धांमध्ये कोमिल्लच्या मुलींना भाग घेण्यास परवनगी द्यावी यासाठी आपण अर्ज आणला असल्याचे त्यांनी सांगत अर्ज काढुन दिला. हा अर्ज घेउन स्टिव्हन्सने वाचला व त्याने सांगितले की याबाबत मुलींनी मुख्याध्यापिकेला भेटावे. तो तसा शेरा लिहिण्यासाठी आतल्या खोलीत जाताच या दोघींनी शाली दूर सारुन आत लोकरी पोलक्याच्या आंत लपविलेली पिस्तुले बाहेर काढुन सज्ज केली व अर्ज घेउन स्टिव्हन्स बाहेर येताच सुनितीने थेट त्याच्यावर अवघ्या ५-६ फूट अंतरावरुन नेम धरीत धडाधड चार गोळ्या झाडल्या. काय होताय हे समजायच्या आंतच स्टिव्हन्सला गोळ्या बसल्या. त्याने सावरुन पळायचाअ प्रयत्न केला पण सुनितीच्या गोळ्यांनी आपले काम चोख बजावले होते. तो जागीच कोसळला व गतप्राण झाला. आवाज व किंकाळ्या ऐकताच आंत धावलेल्या नेपाळ सेन या सहायक अधिकाऱ्यावर शांतीने गोळ्या झाडल्या पण त्या मधे आलेल्या एका शिपायाला लागल्या. शिपायांनी वेढल्यावरही प्रतिकार करणऱ्या या वाघिणिंना शिपायांनी हाती येताच बेदम मारहाण केली. अवघ्या चौदा वर्षाच्या मुलींनी एका क्रूरकर्म्याला कंठस्नान घालुन नवा ईतिहास लिहिला, त्यांचा पराक्रम सर्वतोमुखी झाला. कॉंग्रेसने मात्र ’उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणास नाही’ या व्रताला जागुन त्यांचा निषेध केला.
अवघ्या नऊ दिवसात त्यांच्यावर अभियोग उभा केला गेला व त्यांना ’दयाळुपणे’ फक्त जन्मठेपेची’ शिक्षा फर्मावण्यात आली. शांती घोषने निकाल ऐकताच न्यायधिशाला सुनावले की ’दावणीला बांधलेल्या जनावराप्रमाणे सडण्यापेक्षा आम्हाला फासावर लटकायला आवडेल’. या दोघींनी आपला झुंझार बाणा तुरुंगातही सोडला नाही. अंधारकोठडीला न जुमानत त्या दोघींनी आपल्याला ’क’ ऐवजी राजबंद्यांच ’ब’ वर्ग देण्यात यावा यासाठी अन्नस्त्याग्रह केला. एकदा तुरुंगपर्यवेक्षिकेशी अनैतिक संबंध असलेला एक तुरुंगद्वारपाल जेव्हा वारंवार स्त्री विभागात चकरा मारु लागला तेव्हा त्यांनी त्याच्या विरुद्ध तक्रारी केल्या व आवाज उठवुनही दाद मिळत नाही हे समजल्यावर उपोषणास प्रारंभ केला व अखेर त्याची बदली केली गेली.
१९३९ साली आयुष्याची कोवळी वर्षे तुरुंगात करपून गेल्यानंतर अनेक राजबंद्यांबरोबर त्यांचीही सुटका झाली. दरम्यान दोघींच्याही घरची वाताहात झाली होती. मात्र त्यांनी न डगमगता नव्या आयुष्याला सुरुवात केली. सुनिती चौधरी १९४८ मध्ये डॉक्टर झाल्या व त्यांनी वैद्यकिय पेशा स्विकारुन गरीबांची सेवा केली. त्यांनी प्रद्योतकुमार घोष या क्रांतिकरकाशी विवाह केला. शांती घोष यांनी मात्र स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणात सक्रिय भाग घेतला.
अवघ्या १४व्या वर्षी असा असामान्य पराक्रम करणाऱ्या या मुलींची नावे सुद्धा आपल्याला माहित नाहीत याची खंत वाटते. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यात त्यांचा वाघिणीचा वाटा आहे. आज त्यांच्या शौर्यकृत्याच्या ७७ व्या स्मरणदिनी त्या दोघींना सादर अभिवादन.
प्रतिक्रिया
14 Dec 2008 - 10:54 pm | कलंत्री
द्वारकानाथजी,
हा लेख दोन क्रांतिकारक कन्यांना समर्पित आहे. त्यावर जे काही लिहायचे ते अवश्य लिहा. पण या लेखात गांधीवाद घुसवु नका. आपण त्या विषयावर एक स्वतंत्र लेख लिहा.
सर्वसाक्षींच्या लेखाचा अंश.
१. सर्वात अगोदर तात्यांनी गांधींवर निष्कारणच टिका केली. तेंव्हा गांधीवाद लेखाच्या आड आला नाही.
२. सर्वसाक्षींनी प्रश्न किती गांधीवाद्यानी हौतात्म्य स्विकारले असे विचारले तेंव्हा गांधीवाद आड आला नाही.
३. मग आताच आम्ही गांधीवाद्याना अभ्यास करा आणि उत्तरे द्या तेंव्हा गांधीवाद या लेखाच्या आड कसा आला?
वकिल आणि न्यायाधिश एकच होणार असेल तर निर्णय मिळेल न्याय मिळणार नाही.
कृपया कोणीतरी निपक्षपाती पणे आम्हाला सांगा आम्ही काय करायचे ते?
गरिब गांधीवादी
14 Dec 2008 - 10:59 pm | आजानुकर्ण
कलंत्रीसाहेब,
इसापनीतीमध्ये सुंदर गोष्ट आहे. एकदा एक कोल्हा आणि शेळीचे पिल्लू नदीवर पाणी पित असते. कोल्हा पटकन त्या पिलाजवळ जातो आणि म्हणतो, मी तुला मारुन टाकीन.
पिलू म्हणते, मी काय केले.
कोल्हा म्हणतो, की तू माझे पाणी उष्टे, घाणेरडे करत आहेस.
पिलू म्हणते, अहो पण मी उताराच्या बाजूला आहे, तुमच्याकडे पाणी आधी येते आणि नंतर माझ्याकडे. मी कसे काय पाणी घाणेरडे करेन?
कोल्हा म्हणतो, अरे साल्या तू नाही तर तुझ्या पूर्वजांनी तरी केलेच असेल ना.
मेलं बिचारं ते पिलू नंतर.
तात्पर्य समजून घ्या.
आपला
(लांडगा) आजानुकर्ण
14 Dec 2008 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कलंत्री काका, तुमच्या आणि सर्वसाक्षीजींच्या वादात पडण्याची अजिबात इच्छा नाही, तेवढी माझी पतही नाही. पण ज्याला जे आवडतं ते त्याने घ्यावं आणि आपल्या रस्त्याने आपल्या इप्सितस्थळी जावं हे इष्ट नाही का? तुम्ही गांधीवादावर एवढे लेख लिहिले तिथे कुणी क्रांतिकारकांचे गोडवे गायल्याचं दिसलं नाही. मग इथे का गांधीवादावर, गांधीजींवर चर्चा व्हावी? तुम्हाला गांधीजी, गांधीवाद या गोष्टींवर आणखी चार लेख लिहिता येतीलच ना?
त्यातून तुम्ही सर्वसाक्षीजींचं अधोरेखित केलेलं वाक्य हे संपादक (मॉडरेटर) मंडळाने मनावर घेऊन तुमचा प्रतिसाद संपादन केला आहे का? आणि खरं सांगायचं तर सर्वसाक्षीजींनी तुम्हाला आणखी "एक लेख लिहा असं सांगितलं आहे", तेवढंच काय ते मनावर घ्या ना? तुमच्यात आणि त्यांच्यात जो काही प्रकारचा वाद आहे तो वैयक्तिक पातळीवर येऊ लागला आहे अशी जाणीव होत आहे अशी शंका येत आहे.
माझा हा प्रतिसाद नाही आवडला तर सरळ दुर्लक्ष करा किंवा खरडवही आहेच, तुमच्या गांधीवादात बसेल त्या पद्धतीने माझ्या खरडवहीत हाणाच मला! पण इथे का बादल्या ओतून धुणी धुवायची सुरुवात करायची?
अवांतरः गांधीवादात श्रुंगारिक साहित्य वाचणं/लिहिणं मान्य असतं का?
14 Dec 2008 - 11:39 pm | बगाराम
अदितिजी कलंत्री सरांचा प्रतिसाद एकदा नीट वाचा. गांधीवाद ह्या लेखात त्यांनी आणलेला नाही. पहिल्या प्रतिसाद तो तात्यांनी आणलेला आहे. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर न देता गप्प बसावे ही अपेक्षा म्हणजे दडपशाही नाही का?
अवांतरः गांधीवादात श्रुंगारिक साहित्य वाचणं/लिहिणं मान्य असतं का?
हा मात्र विषयांतराचा अतीशय चावट प्रयत्न वाटला. इथल्या चर्चेशी त्याचा काय संबंध आहे? संपादकांनी चर्चा भरकटवणाअरी असली विषयांतरे टाळावीत
15 Dec 2008 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणखी एक लेख लिहा पण हा धागा भरकटवू नका असं सुचवलेलं आहे, आणि मी त्याचाच पुनरुच्चार केला आहे. आता यात कसली दडपशाही? (आपण माझे प्रतिसाद नीट वाचून, त्याचा अर्थ लावून मग प्रतिसाद लिहित नाही का? नसेल तर तसं करा.)
अवांतराचा मुद्दा हा कलंत्रीकाकांनी सुरु केलेल्या दुसर्या धाग्याच्या संदर्भात होता, तो अवांतरच होता आणि त्याकडे दुर्लक्ष करणंच अपेक्षित होतं.
बाकी तात्यांनी जर तो मुद्दा आणला होता तर त्याकडे या धाग्यापुरतं दुर्लक्ष करणं आणि वाटल्यास आणखी एक लेख लिहून गांधीजींची महत्त्व विषद करायला कोणीही थांबवलं नव्हतं. अगदी गांधीविरोधकांनीही या धाग्यावर तात्यांच्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष करुन चर्चा फक्त या दोन वाघिणींपुरती मर्यादित ठेवली होती. तात्यांच्या 'त्या' वाक्याला महत्त्व कोणी दिलं ते जरा बघणार का?
16 Dec 2008 - 6:59 am | बगाराम
म्हणजे सुरुवात तात्यांनीच केली होती ना? आणि माझ्या तरी पाहण्यात ह्या धाग्यावर कुणीही गांधींवर लेख लिहिलेला दिसत नाही.
बाकी तुम्ही केलेल्या चावट वियषयांतरावर बोट ठेवल्यावर त्या मुद्द्याला मात्र सोयिस्कर बगल दिली आहेत.
14 Dec 2008 - 11:49 pm | कलंत्री
गांधींनी पराकोटीचा ब्रह्मचर्यपालनाचा आग्रह धरला होता. त्यामूळे गांधीविचारसरणीत हे संमत नाही.
पण या प्रश्नाचा रोख समजला नाही.
20 Dec 2008 - 7:26 pm | वेताळ
गांधींनी पराकोटीचा ब्रह्मचर्यपालनाचा आग्रह धरला होता. त्यामूळे गांधीविचारसरणीत हे संमत नाही.
गांधीजीचे लग्न झाले होते व त्याना ३ मुले होती अशी माहिती मी वाचली आहे.मग वरील वाक्याचा अर्थ मला समजला नाही
वेताळ
20 Dec 2008 - 7:42 pm | आजानुकर्ण
गांधींनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्म-समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना या एकादश तत्त्वांचे पालन करण्याचाच प्रयत्न केला. त्यातली सुरुवातीची पंचतत्त्वे ही जैन धर्मातून घेतली आहेत. गांधींनी धरलेला ब्रम्हचर्यपालनाचा आग्रह स्वतःसाठी होता. (तोदेखील मला वाटते मोहापासून मुक्ती मिळवण्यासाठी धरला असावा) दुसऱ्यांनी ब्रम्हचारी राहावे असा त्यांनी आग्रह धरलेला नाही.
गांधींचे ब्रम्हचर्यपालन व त्यासंदर्भात केलेले प्रयोग हे बरेच वादग्रस्त होते. तरुण स्त्रियांकडून मसाज करुन घेणे, आश्रमात नग्नावस्थेत अंगाला माती लावून वावरणे, कटाक्षाने स्रियांच्या सहवासात राहणे, सोबत झोपणे वगैरे प्रयोगांची त्याकाळात बरीच निंदा, टिंगल झाली आहे. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी स्त्रियांच्या व पुरुषांच्या सहवासात शरीराला वेगळे वाटू नये. येशू ख्रिस्त, रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणे शरीराला नैसर्गिक नपुंसकत्त्व यावे अशी त्यांची इच्छा असल्याचे सांगितले.
गांधीजींचे याबाबतची मत मला अजिबात पटलेली नाहीत.
आपला
(गांधीप्रेमी) आजानुकर्ण
आठवेल तसे लिहिले आहे. चूक भूल देणे घेणे
15 Dec 2008 - 2:07 pm | स्वप्निल..
सर्वसाक्षीजी,
आपला लेख अतिशय चांगला आहे. या क्रांतीकारकांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.
दोन्हीहि क्रांतीकारकांना सलाम!!!
स्वप्निल..
15 Dec 2008 - 3:54 pm | अनिल हटेला
>>>>ह्या वाघिणींना आमचा मानाचा मुजरा. सर्वसाक्षी ह्यांचे मनःपुर्वक आभार !
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
15 Dec 2008 - 5:13 pm | झकासराव
ह्या दोन वाघिणीना माझा मानाचा मुजरा.
सर्वसाक्षीजी ही माहिती आधी नव्हती. इथे दिल्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद.
अवांतर : स्वांतंत्र्यासाठी आणि स्वकीयांसाठी त्या दोघीनी हे धाडस केले. त्यांची तुलना इथे चर्चेत फालतु लोकांशी होत आहे हे पाहुन मन कळवळल. :(
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
15 Dec 2008 - 5:37 pm | चेतन
माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद
ह्या दोन वाघिणीना माझाही मानाचा मुजरा.
अवांतरः कोणी गांधींवर टिप्पणी केली म्हणुन त्याविरोधात क्रांतिकार्यांवर टिप्पणी करणे गांधिवादात बसते का?
16 Dec 2008 - 2:08 am | भास्कर केन्डे
येथे कर माझे दोन्ही जुळती!!
धाडसी, पराक्रमी व मातृभक्त वाघिनींना कोटी कोटी प्रणाम!
साक्षीसाहेब,
पुन्हा एकदा समयोचित विषयावर हृदयस्पर्षि लेखन करुन या विरांगणांची माहिती दिल्याबद्दल आभार!
आपला,
(अनेक पराक्रमी स्त्री-पुरुषांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत याची जाण असणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
17 Dec 2008 - 10:23 pm | कलंत्री
या कथेला / प्रसंगाला काहीतरी संदर्भ असेलच. कोणत्यातरी पुस्तकातून अथवा वर्तमानपत्रातून हे लिहिले गेले असेल अशी माझी खात्री आहे. अशा पद्धतीच्या घटनांचे पुस्तक छापले गेले पाहिजे. प्रचार / प्रसार नाही आणि वरुन लोकांना बघा क्रांतिकारकांची काहीच माहिती नाही असेही सांगायचे. कोठेतरी हे थांबायला हवे. क्रांतिकारकाचे यश-अपयश आणि त्यांच्या मर्यादा याही स्पष्ट झाल्या पाहिजे. कृपया हे आवाहन स्विकारावे.
18 Dec 2008 - 2:33 pm | भिंगरि
हि चर्चा आणि त्यावरिल प्रतिसाद मी आजच वाचलेत. सर्वसाक्षि, ह्या थोर क्रांतिकारांना आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठि शतशः धन्यवाद.
काहि मंडळिंनि घेतलेल्या आक्षेपांना माझ्यापरिने उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय.
१) क्रांतिकारकांनि महसुल लुटला त्या विषयि आक्षेप.
ह्यात क्रांतिकारकांनि काय चुक केले ते मला अजुन निटसे कळले नाहि. मुळात हा महसुल जरि लोकांच्या पक्षि सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाइतुन गोळा झाला असला तरिहि तो त्यांच्यासाठि वापरला जाणार होता का? हा इथे कळिचा मुद्दा आहे. अर्थातच हा सगळा पैसा राणिसरकारांच्या हिंदुस्थानावरिल अक्षय सत्तेसाठि वापरला जाणार होता. गोरगरिब जनतेचि कुठलिहि भलाइ ब्रिटिशांना अपेक्षित नव्हति. अश्या परिस्थितित हा पैसा वापरण्याऐवजि, जनतेकडुन (म्हणजे सुलतानिमुळे अर्धपोटि रहाणार्यांकडुन) वर्गणि मागुन शस्त्रास्त्र गोळा करण्याचा तर्क काहि पटला नाहि. वेळ आलि तेन्व्हा सामान्यातल्या सामान्य महिलांनि आपले दागिने सुभाषबाबुंना (सुभाषचंद्र बोस) काढुन दिले होते युध्दखर्चासाठि हे वेगळे सांगायचि गरज नाहि. तात्पर्य इतकेच कि सशस्त्र क्रांतिकारकांना किंवा एकंदरच स्वातंत्र्ययोध्यांना जनतेचा पाठिंबा होता.
२) १४ वर्षांच्या मुलिंचे ब्रेनवॉशिंग आणि त्यांचा करुन घेतलेला वापर. (त्या अनुषंगाने त्यांचि तालिबान्यांशि केलि गेलेलि तुलना).
रशियन सैन्याला हुसकावुन लावणार्या मुजाहिदिनि सैनिकांचे सरासरि वय १४-१६ वर्षे होते हि वस्तुस्थिति आहे (कारण त्यावरच्या वयाचे फारसे लोक शिल्लकच नव्हते). परकिय आक्रमकांविरुध्द लढलेल्या ह्या मुजाहिदिनांना तेथिल जनतेने स्वातंत्र्ययोध्देच मानले. ह्या मुजाहिदिनांपैकि एक गट आपल्या धर्मांध महत्वाकांक्षेपायि आज सगळिकडे दहशतवादि पाठवतोय तेच तालिबान इथल्या उल्लेखात अपेक्षित आहेत अस मी गृहित धरते.
तर मुख्य फरक असा कि क्रांतिकारकांच उद्दिष्ट हे भारताला परकिय सत्तेच्या जोखडातुन मुक्त करुन येथिल गोर्-गरिब जनतेच्या भल्यासाठि दक्ष असणार सरकार स्थापन करण्याच होत. कुठल्याहि धर्माला टार्गेट करुन त्यांच वर्चस्व प्रस्थापित करण किंवा इतरांच शिरकाण करण हे नव्हत. ज्या धर्मांध तालिबानि वृत्तिशि तुम्हि त्यांचि तुलना करताय त्यांनि खुद्द त्यांच्याच देशातल्या जनतेवर अत्याचार केलेत उदा. स्त्रीयांना गोषात रहाण्याचि, शिक्षण न घेण्याचि सक्ति, पुरुषांना इस्लामविरोधि गोष्टि न करण्याचि सक्ति उदा. दाढि करण, इस्लामाला मंजुर नसलेला पोषाख न करण, टिव्हि न बघण इत्यादि, अन्य धर्मियांन्नि फक्त विशिष्ट रंगाचे कपडे घालण अशि बरिच उदाहरणे देता येतिल.
दुसरा मुद्दा चौदा वर्षाच्या कोवळ्या वयाचा. मुळात त्या काळाचा विचार करताना आजच्या काळातिल परिंमाण वापरण योग्य ठरणार नाहि. त्या काळि चौदा हे तितकस अजाण वय नव्हत. मुलिंचि लग्न करताना त्यांच वय किमान चौदा वर्ष असाव असा आगरकर इत्यादि सुधारकांचा आग्रह होता (त्या ७/८ वर्षांच्या अजाण बालिका असु नयेत हा मुद्दा होता). हे चुक कि बरोबर हा मुद्दा कृपया उपस्थित करु नका मला फक्त त्या काळातिल वस्तुस्थितिकडे लक्ष वेधायच आहे. अस असताना ह्या शिक्षण घेणार्या (म्हणजे तुलनेने स्वतंत्र विचार करु शकण्याचि क्षमता असणार्या) किशोरिंचे ब्रेन वॉशिंग केले गेले अस म्हणण त्यांच्यावर अन्याय करण वाटत. शिवाय ह्या मुलिंचे क्रांतिकारंकात रुपांतर करणार्या निवासि संस्था कुठेहि अस्तित्वात नव्हत्या, इतरवेळि हि सगळि मंडळि आपआपल्या घरात चारचौघांसारखि रहात, त्यामुळे प्रचारकांच्या प्रभावापुढे प्रश्नचिन्ह उभे रहाते. परपुरुषांपुढे वावरण (बोलण वगैरे सोडा) म्हणजे अब्रहमण्यम समजल्या जाणाच्या त्या काळात ह्या मुलिंनि हे धाडस करण्याचि तयारि दर्शवण हिच मुळि माझ्यामते एक क्रांतिकारि घटना आहे.