अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे.
भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने. नंतर प्यादे म्हणून अमेरिकेने तसेच चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरविली, सोयीस्करपणे तालिबानकडे दुर्लक्ष केले, हुकुमशहा पोसले ते सारे एकप्रकारे भारताला शह देण्यासाठीच. आज हा भस्मासुर जग जाळायला निघाला आहे पण भारताला त्याची झळ अगदी सुरुवातीपासूनच बसते आहे. दहशतवादाला खतपाणी, लॉंचिंग पॅड मिळते ते पाकिस्तानमध्ये... शिक्षण आणि चिथावणी मिळते ती पाकिस्तानमध्ये... जसजशी तांत्रिक प्रगती होते आहे तसतसे हल्ले अधिकाधिक सरस होत आहेत आणि जागतिकीकरणाचा मुखवटा धारण करून येत आहेत तेही पाकिस्तानच्याच माध्यमातून. स्थानिक मुस्लिम समाजाचा दहशतवादाला -- विशेषतः अल कायदा टाईप संघटनांना -- पाठिंबा नाही आणि भारतीय मुसलमान हा वेगळा आहे हा भारतीय प्रशासनाचा दावा अगदीच तकलादू नाही. असो... त्याविषयी कदाचित नंतर कधीतरी.
आज मुख्यतः लिहायले घेतले ते इरफान हुसैन यांच्या डॉनमधील लेखाविषयी... http://www.dawn.com/weekly/mazdak/mazdak.htm . इरफान यांचे लिखाण मी नेहमीच आवडीने वाचतो. 'माझ्या अटी मान्य करा नाहीतर मी जीव देईल' अशी धमकी देणारे पाकिस्तान हे कदाचित एकमेव राष्ट्र असावे असे आणि इतरही बरेचसे नेमके वर्णन इरफान यांनी या लेखात केले आहे. पाकिस्तानातील पत्रकारितेचे एक दर्शनही या लेखाच्या निमित्याने होऊ शकेल. इरफान स्पष्टपणे मांडतात - Indeed, a responsible state would hardly allow the likes of Maulana Masood Azhar of the Jaish-i-Mohammad; Hafiz Saeed of the Lashkar-i-Taiba; and the Indian criminal Dawood Ibrahim to run around loose.
उत्साही जनांनी त्यांचे जुने लेखही चाळावेत.
गुड नाईट - एकलव्य
प्रतिक्रिया
9 Dec 2008 - 9:20 am | मुक्तसुनीत
"मझदाक" या नावाने ते लिहायचे तेव्हापासून , म्हणजे ९९ पासून मी वाचत आलो आहे. डॉन मधे ते लिहायचे - अजूनही लिहितात. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता होतो/आहे.
बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात.
9 Dec 2008 - 1:46 pm | सुनील
बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात
विनोदाचा भाग सोडून द्या. पण फ्रायडे टाइम्सचे नजम सेठी हे पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत आणि इरफान हुसेन याच्याइतकेच (किंवा जरा जास्तच) रोखठोक भाषेत लिहितात.
अर्थात इरफान हुसेन तसेच एजाज हैदर यांचेही लेख वाचण्यासारखे असतात, यावर दुमत नसावे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
9 Dec 2008 - 10:23 am | बिपिन कार्यकर्ते
सौदी अरेबिया मधे गेलो (आणि इंटरनेटचा सुकाळ झाला) तेव्हापासून 'डॉन' नियमित वाचत होतो. तेव्हाच इरफान हुसैन ह्यांची ओळख झाली. (कावसजी हा दुसरा... पाकिस्तानी पारशी बावाजी.) बरेच वेळा पारंपारिक भारतद्वेष्टी पाकिस्तानी भूमिका न घेता अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक लेखन करणारे इरफान हुसैन. प्रस्तुत लेखही चांगलाच आहे.
बिपिन कार्यकर्ते
9 Dec 2008 - 10:34 am | अभिरत भिरभि-या
चांगल्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल एकलव्य यांचे आभार.
पाकी मिडीयाची ही दुसरी आक्रस्ताळी बाजू ..
http://www.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs&feature=related
http://www.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y&feature=related
http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related
http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related
http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related
9 Dec 2008 - 12:36 pm | धम्मकलाडू
ही चर्चाही ऐका, बघा. परवेझ हूडभॉय यांच्यासारखी काही चंदनाची झाडे अजूनही पाकिस्तानात आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
11 Dec 2008 - 1:23 am | धनंजय
परवेझ हूदभाई यांच्याशी माझी भेट झालेली आहे.
सौम्य पण अण्वस्त्रविरोधाबाबत प्रामाणिकपणे कामसू असे सज्जन आहेत.
(डॉन वर्तमानपत्र मी पूर्वी दररोज वाचत असे. [आजकाल वेळेअभावी वाचत नाही.] तालिबानविरोध करताना अधिक माहितीपूर्ण लेखन तिथे वाचायला मिळे. भारतीय वर्तमानपत्रांत बातम्या कमी असत. १९९०-२००० काळात पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रांत तालिबानबद्दल कुठलीही माहिती नसे.)
11 Dec 2008 - 3:48 pm | राघव
या लेखनावरून आठवण झाली मुझफ्फर हुसैन यांची. ते भारतातलेच आहेत पण अतिशय आत्मीयतेने लिहितात. इतर मुस्लीम देशांबाबतचा त्यांचा अभ्यास चांगलाच आहे. तरूण भारत या दैनिकात त्यांचे लेख वाचलेत.
मुमुक्षु
11 Dec 2008 - 10:07 pm | कलंत्री
असे अनुवादीत लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही प्रसिद्ध व्हावेत. पूर्वी सोबत नावाचे साप्ताहिक होते. त्यात उर्दु वर्तमानपत्रातील लिखाण प्रसिद्ध होत असे.
11 Dec 2008 - 11:32 pm | प्राजु
दुव्याबद्दल धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Dec 2008 - 10:06 pm | टग्या (not verified)
दुवा १ "डॉन" वर्तमानपत्रातल्या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"च्या या सदरातील पहिले पत्र विचार करण्याजोगे आहे.
दुवा २ मात्र या बातमीचा अर्थ काय लावावा हे कळत नाही.
17 Dec 2008 - 8:30 am | एकलव्य
प्रतिक्रियांचे आणि वाचकांचे आभार. हुसैन यांचे चाहते पाहून मस्तच वाटले.
निवडल प्रतिप्रतिसाद -
बिपिनभाई - कासवजींचे वाचायला आम्हाला थोडा कंटाळा येतो. पुढेमागे रस वाढेलही कदाचित... असो!
मुमुक्षु - मुझफ्फर यांचे आंतरजालावर काही लिखाण असल्यास जरूर कळवा.
टगेदादा - इंटरेस्टिंग दुवे पुरविल्याबद्दल आभार. सविस्तर चाळतो आणि कळवितो.
आणखी एक - असाच अजून एक कलंदर माणूस म्हणजे ए जी नूराणी. यांची सर्व मते मला पटत नसली तरी त्यांचे लिखाण म्हणजे एक पर्वणी असते... रूढिबद्ध विचारांना अभ्यासाचे एक आव्हान असते. आपण जरूर आस्वाद घ्यावा.
स्नेहपूर्वक,
एकलव्य