अजुन मी...

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
3 Dec 2008 - 9:43 am

मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

तेच शब्दांचे धुमारे, तीच वेडी आस मजला,
रक्त माझे सांडले पण, अजुन मी झुकतोच आहे.

निष्क्रीयतेच्या दलदलीचा थांग मज लागेल कैसा,
खेळ रुतलेल्या रथांचा* अजुन मी बघतोच आहे.

तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा,
"कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे.

प्रिय मजला सख्य "त्याचे", काळजाचा भाग जैसा!
ओकल्या गरळीस त्याच्या अजुन मी पुसतोच आहे.

शांतवाया आज मजला भाषणे सारेच देती..
भाव लोण्याचा* कळूनही अजुन मी भुलतोच आहे.

कोण ते वेडे? कशाला प्राण त्यांनी फुंकले?
रोज येथे भारताचा आत्मा मरतोच आहे.

(विषण्ण) मुमुक्षु

* अभिप्रेत अर्थ -
१. रथांचा = मनोरथांचा
२. भाव लोण्याचा = मृतांच्या टाळू वरील लोण्याचा Rate.

कवितासमाजप्रकटनविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

फार आवडली,
हे
तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा,
"कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे.

आणि हे एक
कोण ते वेडे? कशाला प्राण त्यांनी फुंकले?
रोज येथे भारताचा आत्मा मरतोच आहे.

फार विचार करायला लावणार मांडलंत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2008 - 12:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा,
"कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे.

अर्थातच या ओळी तर फारच जास्त!

श्रावण मोडक's picture

3 Dec 2008 - 3:34 pm | श्रावण मोडक

अगदी खरे. अजून मी हीच अवस्था झाली आहे साऱ्यांची. दहाएक अग्रलेखांवर जाईल अशी टिप्पणी.

प्राजु's picture

4 Dec 2008 - 12:25 am | प्राजु

काय म्हणू?? एकदम सुरेख कविता. खरंच भारताचाच नव्हे भारतीयांचाही आत्मा मरतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/